Author: Admin

  • Crime News Marathi | विकायला आला आणि अडकला! चंद्रपुरात सराईत गुन्हेगाराला अटक

    Crime News Marathi

    Crime News Marathi : २ जिल्ह्यात दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अटक करीत ९ दुचाकी वाहन सहित एकूण ४ लक्ष ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. BikeRecovery

    चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे साम्राज्य, गडचांदूर बनलं सट्टेबाजांचे हब

    चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरी प्रकरणी आरोपीचा शोध घेणे सुरु करीत चोरीचा छडा लावण्याची मोहीम राबवली. ChandrapurCrimeNews

    दुचाकी विक्री करीता आला आणि अडकला

    यादरम्यान गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली एक इसम विना नंबरची मोटार सायकल बंगाली कॅम्प येथे विक्रीसाठी आणली, सदर इसम ग्राहकाच्या शोधात असताना स्थानिक गुन्हे शाखेने त्या इसमाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपलं नाव ३२ वर्षीय मिलिंद जयभारत डंभारे असे सांगितले, डंभारे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

    ९ दुचाकी जप्त

    डंभारे याने पोलीस स्टेशन रामनगर, चंद्रपूर शहर, राजुरा व हिंगणघाट जिल्हा वर्धा एकूण ९ दुचाकी चोरीचे ६ गुन्हे केले असल्याची कबुली दिली. आरोपीकडून वेगवेगळ्या कंपनीच्या ९ दुचाकी वाहन जप्त करीत एकूण ४ लक्ष ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    यशस्वी पोलीस पथक

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे व प्रमोद कोटनाके यांनी केली.

  • Caste based census India 2025 । “जातीनिहाय जनगणना 2025: चंद्रपूरमध्ये OBC समाजात आनंदाचे वातावरण!”

    Caste based census India 2025

    Caste based census India 2025 : चंद्रपुर : केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. याबाबत केंद्राने कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे. घोषणा होताच काही वेळातच चंद्रपूर शहरात विद्यार्थी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (दि.३० एप्रिल) ला एकच जल्लोष केला व केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत अभिनंदन केले. Caste census benefits India

    केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. आज (दि.३० एप्रिल) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. स्वतंत्र भारतात १९५१ साली पहिली जनगणना करण्यात आली होती. तर २०११ साली यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली होती. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ व देशातील इतर ओबीसी संघटनाच्या माध्यमातून जातिनिहाय जनगणना करण्यात यावी ही आग्रही मागणी होती. Caste survey news India 2025

    चंद्रपुरातील धर्मगुरूंनी घेतली शपथ

    अखेर केंद्र सरकारने आता जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विदर्भवादी ओबीसी नेते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक तथा भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोषात केंद्र सरकारचे स्वागत केले.

    कॅबिनेट बैठकीतील या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “सामाजिक रचनेचा विचार करून आणि संविधानातील स्पष्ट तरतुदी लक्षात घेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आज, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी केंद्र सरकारने पुढील जनगणनेत जातीनिहाय जनगणना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सरकार आपल्या समाजाच्या व देशाच्या मूल्यांप्रती व हितसंबंधांप्रती कटीबद्ध आहे. हा निर्णय देखील सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी घेण्यात आला आहे.

    या निर्णयाचा ओबीसी सह इतर सर्वच प्रवर्गातील जातींना फायदा होणार आहे. जातनिहाय जनगणना झाल्यास संविधानाने दिलेल्या अधिकार व हक्कांचे खऱ्या अर्थाने प्रत्येक जातीपर्यंत लाभ पोहोचतील, असे डॉ. अशोक जीवतोडे यावेळी म्हणाले.

  • child marriage prevention pledge । बालविवाह रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात धर्मगुरुंचा निर्धार

    child marriage prevention pledge

    child marriage prevention pledge : चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी बुधवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सभागृहात बालविवाहमुक्त शपथविधी कार्यक्रम पार पडला. जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व “Access to Justice for Children” प्रकल्पाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. stop child marriage campaign

    चंद्रपूर मनपातर्फे मान्सून पूर्व तयारी

    धर्मगुरूंची बालविवाह न करण्याची शपथ

    अक्षय तृतीयेसारख्या पवित्र दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व धर्मगुरूंनी अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह न लावण्याची प्रतिज्ञा केली. ही बाब सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. child protection awareness 2025

    अध्यक्षीय भाषण – श्री. दीपक बानाईत (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी)

    श्री. बानाईत यांनी “रेड झोन” मधील मुलींचा उल्लेख करताना सांगितले की अशा मुलींच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते:

    • शिक्षण अर्धवट सोडलेल्या
    • स्थलांतरित कुटुंबातील
    • सामाजिक दबावामुळे लग्नाला प्रवृत्त होणाऱ्या
    • लैंगिक अत्याचारग्रस्त किंवा प्रेमसंबंधात गुंतलेल्या मुली

    या सर्व घटकांचा विचार करून त्या मुलींना समुपदेशन व मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    प्रमुख पाहुणे ॲड. क्षमा बासरकर यांचे मार्गदर्शन

    बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर यांनी स्पष्ट केले की:

    • बालविवाह हा मुलांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे
    • बालिका शारीरिक, मानसिकदृष्ट्या तयार नसतात
    • बालविवाहामुळे गर्भधारणा, पोषण, आरोग्य यासंबंधी गंभीर समस्या निर्माण होतात
    • धर्मगुरूंनी विवाह लावताना जन्मप्रमाणपत्राची खात्री करणे आवश्यक आहे
    कायद्याचा दंडक – श्री. काशिनाथ देवगडे यांचे स्पष्टीकरण

    रुदय संस्था गडचिरोलीचे संचालक श्री. काशिनाथ देवगडे यांनी सांगितले:

    • बालविवाह ठरविणे, घडविणे, प्रोत्साहन देणे हा गुन्हा आहे
    • दोषींना २ वर्षांपर्यंत सक्त मजुरी व १ लाख रुपये दंड होऊ शकतो
    • बालविवाह झाल्यास POSCO कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल होऊ शकतो
    • स्त्री गुन्हेगारांना कैदेपासून सूट असते

    🤝 धर्मगुरूंसोबत संवाद सत्र – श्री. अजय साखरकर

    जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मा. अजय साखरकर यांनी उपस्थित धर्मगुरूंसोबत थेट संवाद साधला व बालविवाह प्रतिबंधासाठी त्यांची भूमिका स्पष्ट केली. विवाह करताना वयाची खात्री करणे, समाजात जागृती करणे व कायदेशीर परिणाम समजावणे यावर भर देण्यात आला.


    🎙 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शशिकांत मोकाशे सर यांनी केले.
    कार्यक्रमाचा समारोप धर्मगुरूंना धन्यवाद देऊन करण्यात आला.

  • Monsoon drainage preparation । मान्सूनपूर्व तयारीला वेग! चंद्रपूरात युद्धपातळीवर नालेसफाई सुरू

    Monsoon drainage preparation

    Monsoon drainage preparation : चंद्रपूर – शहरातील तीनही झोन अंतर्गत येणाऱ्या 6 मोठे नालेसफाई स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर हाती घेऊन 10 छोट्या नाल्यांच्या स्वच्छता मोहिमेला चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरवात करण्यात आली असुन 2 मे पासुन नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. Drainage cleaning campaign

    खासदार धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांना मिळवून दिला न्याय

       
        नाल्यावर अतिक्रमण केल्याने पाण्याच्या प्रवाहाला अवरोध निर्माण होऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते,याशिवाय पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो झाल्यास परिसरात पाणी शिरून साधन संपत्ती व आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे ज्या नागरिक, दुकानदारांनी नाल्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे त्यांनी ते त्वरित काढण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. नाल्यावरील अतिक्रमण हे पाणी तुंबण्याचे कारण ठरू शकत असल्याचे लक्षात घेता मनपातर्फे नाल्यावरील अतिक्रमणाचा सर्व्हे करण्यात आला होता. यात गडर लाईन कव्हर करणे,पक्के बांधकाम करणे,व्हरांडा बांधण्यासारखे अतिक्रमण केलेले आढळुन आले होते. या सर्व अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम आता राबविण्यात येणार आहे. Chandrapur drainage maintenance


         शहरातील तीनही झोनअंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी मान्सूनपूर्व नाले स्वच्छता करण्याच्या कामाला सुरवात करण्यात येत आहे.


          शहरातील महाविदर्भ वृत्तपत्र कार्यालय ते मच्छीनाला, सावरकर नगर, बगड़खिडकी रेल्वेपटरी, बिनबा मोरी ते सटवाई, रहमत नगर , सिस्टर कॉलोनी, चांबारकुंडी, आकाशवाणी, निंबाळकर वाडी, एस.पी कॉलेज ते नगराळे दवाखाना इत्यादी मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरु असून मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने तेथील गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील माती दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जाणार आहे. त्यामुळे सांडपाणी तुंबून न राहता पुढे वाहून जाईल, सांडपाण्याला वेग आल्याने नाल्याजवळील दुर्गंधी कमी व्हायला मदत होईल.


         नाले सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होणार आहे. सध्या स्वच्छतेच्या कामात नियमीत 315 सफाई कर्मचारी व अतिरिक्त 130 असे एकुण 445 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. याशिवाय मोठ्या नाल्यांच्या सफाईकरीता 3 जेसीबी लावण्यात आल्या असून 2 पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरीत नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येत आहे.

    chandrapur drainage maintenance


        विविध विभागांच्या समन्वयातून स्वच्छता विभाग हे उद्दिष्ट साध्य करणार आहे. नाले स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे सहायक आयुक्त यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात, मुख्य स्वच्छता अधिकारी, झोनचे  स्वच्छता निरिक्षक, आपत्ती व्यवस्थापन पथक सांभाळणार असुन नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे. 

  • school enrollment process । डॉ. अशोक उईके यांचा पुढाकार: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाची ग्वाही

    school enrollment process

    school enrollment process : चंद्रपूर – विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. स्पर्धेच्या या युगात आपला विद्यार्थी कसा समोर जाईल, याचा गांभिर्याने विचार करून शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करावे. आजच्या युगात इंग्रजी शाळांचे प्रस्त वाढले असतांना, जिल्हा परिषदेच्या शाळेतसुध्दा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि उज्वल भविष्य मिळू शकते, असा विश्वास पालकांना देऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी सर्व शिक्षकांनी संकल्प करावा, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.

    प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला न्याय, खासदार धानोरकर यांचा पाठपुरावा

    जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, राजेश पाताळे (माध्य.), अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. school enrollment process

    शाळेतील मूलभूत सुविधांसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जि.प. शाळांतील विद्यार्थी पटसंख्या का कमी होत आहे, याची कारणमिमांसा होणे आवश्यक आहे. या कारणांचा शोध घेऊन शिक्षण विभागाने पाऊले टाकावीत. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. त्यांच्या पाल्यांची गुणवत्ता आणि उज्वल भविष्य आम्ही घडू शकतो, असा विश्वास पालकांना द्या. शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या ‘असर’ आणि ‘नॅस’ या उपक्रमांचा आधार घेऊन शिक्षण विभागाने प्रयत्न करावे. importance of quality education

    शाळेमध्ये शिक्षकांची समिती तयार करून अध्यापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांची शिक्षकांकडूनच पडताळणी करा. नवनवीन संशोधन करा. आगामी शैक्षणिक क्षेत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत होण्यासाठी आतापासून नियोजन करा. शैक्षणिक उपक्रमांतर्गत दर 15 दिवसांनी पालकांच्या उपस्थितीत दर्जेदार चावडी वाचन उपक्रम राबवा. ज्या शाळांमध्ये इंटरनेट कनेक्शन आणि विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो, त्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी देण्यात येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी मानव विकास अंतर्गत बसेसचे योग्य नियोजन करा. public school improvement strategies

    गाव स्तरावरील शाळांना भेटी द्या : शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी गाव स्तरावरील शाळांमध्ये भेटी देऊन नियमितपणे आढावा घ्यावा. ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे, ते खरंच सुरू आहेत का, शाळेतील तक्रार पेटींचा उपयोग होतो का, याची पडताळणी करावी. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवा, अशा सुचना पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या. parent-teacher engagement programs

    मानव विकास अंतर्गत 7445 विद्यार्थीनींना सायकलचे वाटप : चंद्रपूर जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या एकूण 2461 शाळा असून यापैकी 1549 शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. जिल्ह्यात एकूण विद्यार्थी संख्या 3 लक्ष 61 हजार 687 आहे. सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती आणि तक्रार पेटी उपलब्ध असलेल्या शाळांची संख्या 2461 आहे. 475 शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या 549 शाळांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात अपार आयडीचे काम 87 टक्के पूर्ण झाले आहे. मानव विकास अंतर्गत ग्रामीण भागातील 7445 मुलींना सायकलचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने बैठकीत दिली.

  • WCL job updates for project affected । प्रकल्पग्रस्तांचा विजय: खासदार धानोरकरांच्या पाठपुराव्याला यश

    WCL job updates for project affected

    WCL job updates for project affected : चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील गोवरी पौनी विस्तार योजनेतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित नोकरी व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांच्या मागण्या मान्य  केल्या आहेत. या निर्णयामुळे गोवरी पौनी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागला आहे. project affected people news

    बैठकीत उपस्थिती

    यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौंडा, भुसंपादन अधिकारी जथाडे, वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक इलियास हुसेन, राजुरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते अरुण धोटे, राजुरा काँग्रेस तालुका अध्यक्ष रंजन लांडे,माजी पंचायत समिती सभापती कुंदाताई जेणेकर यासह प्रकल्पग्रस्त व शेतकरी उपस्थित होते. 

    चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे साम्राज्य

    शेतकऱ्यांमध्ये होती तीव्र नाराजी

    या योजनेमुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच्या नोकरी आणि पुनर्वसनासारख्या समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला, मात्र अद्याप त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नव्हत्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. district collector order on jobs

    खासदार धानोरकर यांचा पाठपुरावा

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या विस्तृतपणे मांडल्या होत्या. यात प्रामुख्याने नोकरी संबंधीची प्रलंबित फाईल त्वरित मंजूर करणे, सर्व पात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दोन महिन्यांच्या आत नोकरी देणे, अधिग्रहित जमिनीच्या क्षेत्राचा ठिकाणीच नोकरी उपलब्ध करणे आणि जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत जमीन संपादनाची प्रक्रिया थांबवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. pending farmer job files cleared

    पात्र शेतकऱ्यांना सामावून घेणार

    यावेळी, नोकरी वाटपात कोणताही भेदभाव न करता सर्व पात्र शेतकऱ्यांना एकाच वेळी सामावून घेणे, वेकोलि द्वारा नोकरी देताना स्थानिक ठिकाणी नोकरी देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच वैद्यकीय कारण जाणून स्थानिक स्थरावर त्यांना रुजु संदर्भात चर्चा करण्यात आली. वेकोलिने नोकरी सरदर्भातील अन्य क्षेत्रात पोष्टीग करण्यासंदर्भात SOP करण्या करण्यात आली आहे, त्यामध्ये बदल करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. 

    तात्काळ निर्णय होणार

    त्यासोबतच कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव), खैरगाव, टाकळी, चिखली येथील सेक्शन ४ व ७ मध्ये नाव असून सुद्धा सेक्शन ९ च्या अधिग्रहण मध्ये सुटलेली आहे. अशा शेतकऱ्यांची शेती अधिग्रहित करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावर वेकोलि वणी क्षेत्राचे महाप्रबंधक संचालन पिशा रोडी यांनी सांगितले कि, भूमी अधिग्रहण संदर्भाने पत्र वेकोलि मुख्यालय येथे महाप्रबंधक भूराजस्व यांच्याकडे पाठविले असून या संदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात येईल.

    शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान  

    तसेच  यावेळी  मातीच्या ढिगाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करणे, तसेच सांगोळा येथील विशिष्ट सर्वे नंबर आणि वेकोलीच्या खाणकामामुळे होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणीही खासदार धानोरकर यांनी केली होती. या सर्व मागण्या मंजूर झाल्यामुळे आज आलेले प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. यावेळी सर्वानी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले. 

  • police ignoring local crime । चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचं साम्राज्य, गडचांदूरमध्ये सट्ट्याचं केंद्र

    police ignoring local crime

    police ignoring local crime : गडचांदूर – औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नाव समोर येते या औद्योगिक नगरीमध्ये गडचांदूर शहराचे नाव अग्रेसर आहे, सिमेंट कारखान्याचे जाळे या शहरात आहे. त्यामुळे रोजगारासाठी गडचांदूर शहरात बाहेरचे कामगार मोठ्या प्रमाणात येतात, या कामगाराना लुटण्याचे काम गडचांदूर शहरातील काही सट्टेबाज नागरिक करीत आहे. Gadchandur latest news

    जनावरांच्या कळपाने घेतला नववधूच्या आईचा जीव

    जुगार खेळायचा तर गडचांदूर मध्ये या या मथळ्याखाली बातमी news ३४ ने प्रकाशित केली होती मात्र पोलिसांचे लक्ष याकडे गेले नाही कारण कारवाई केल्यास आर्थिक संबंध बिघडून जातात. आर्थिक संबंध जोपासण्यासाठी या सट्टेबाजांवर कारवाई केल्या जात नाही हे विशेष. local crime news

    गडचांदूर शहरातील वार्ड क्रमांक ४ मधील लक्ष्मी टॉकीज हे सट्ट्याचं मुख्य केंद्र बनले आहे, याबाबत संपूर्ण व्हिडीओ सुद्धा news ३४ च्या हाती लागलेला आहे. झेंडी मुंडी, सट्टा, तीन पत्ती असे अनेक अवैध धंदे गडचांदूर शहरात सुरु आहे. गडचांदूर पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

    gambling in small towns

    कोण आहे सूत्रधार?

    गडचांदूर शहरातील या सट्ट्याच्या धंद्यात काही भागीदार आहे, ज्यामध्ये शेरू, किट्टु, गणेश आणि लल्लू यांचा समावेश आहे. इसाफ बँक जवळ लक्ष्मी टॉकीज असा या सट्टेबाजांचा पत्ता आहे.

    चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन जिल्ह्यातील अवैध धंदे संपुष्टात यावे यासाठी ते सतत प्रयत्नशील आहे मात्र त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना स्थानिक पोलीस फाटा देत आहे, गुन्हेगारीने जिल्ह्यात डोके वर काढले असताना सुद्धा पोलीस यंत्रणा अजूनही घडणाऱ्या गुन्ह्याबद्दल गाफील असल्याचे बघायला मिळत आहे. मध्यंतरी पोलीस विभागात काहीसे बदल झाले. पण अजूनही चांगले पोलीस अधिकारी चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेले नाही.

    पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे..

    गडचांदूर शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलीस अधीक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे कारण भविष्यात हे धंदे मोठ्या गुन्हेगारीचे दर्शन पोलीस विभागाला नक्की दाखवेल.

  • Road Accident at Marriage Party । जनावरांच्या कळपाने घेतला जीव! नववधूच्या आईचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    Road Accident at Marriage Party

    Road Accident at Marriage Party : गोंडपिपरी – लेकीच्या विवाहानंतर जावयाच्या घरी स्वागत समारंभासाठी निघालेल्या स्कॉर्पिओ वाहनाचा भीषण अपघात विठ्ठलवाडा-भंगाराम तळोधी मार्गावर झाला. यामध्ये नववधूच्या आईचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. २८) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. Road accident after marriage

    सुधीर मुनगंटीवार यांनी सोडविला पाण्याचा प्रश्न

    जनावरांच्या कळपामुळे नियंत्रण सुटले; वाहन उलटले

    तारसा खुर्द येथील स्नेहा चांदेकर यांचा विवाह रविवारी (दि. २७) गोंडपिपरी येथील कन्यका सभागृहात फुलोरा हेटी येथील महेंद्र रामटेके यांच्यासोबत पार पडला होता. विवाहानंतर दुसऱ्या दिवशी रामटेके कुटुंबीयांनी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभासाठी चांदेकर कुटुंब व वऱ्हाडी मंडळी स्कॉर्पिओ (MH 34 CD 4014) वाहनाने निघाले होते. Animal herd on road accident

    दरम्यान, विठ्ठलवाडा-भंगाराम तळोधी मार्गावर अचानक जनावरांचा कळप समोर आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील स्कॉर्पिओने तीन वेळा पलटी घेत शेतात उलटले.

    छाया चांदेकर यांचा मृत्यू, सात जण रुग्णालयात

    या भीषण अपघातात छाया दिलीप चांदेकर (वय ५०, रा. तारसा खुर्द) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मंदा मोरेश्वर उरकुडे, चेतना सुरेश कुकुडकर, कर्णिका दिनेश धांडे, अश्विनी धांडे, संगीता प्रकाश खोब्रागडे, प्रतिमा वाल्मीक भारशंकर आणि मोहन तुमडे हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

    पोलीस कारवाई सुरू; वातावरण शोकमग्न

    घटनेनंतर गोंडपिपरी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. छाया चांदेकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी वैनगंगा नदीघाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    मृत महिलेच्या पश्चात पती, मुलगा व दोन मुली

    छाया चांदेकर यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी घडलेली ही दुर्दैवी घटना संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • water supply problem in villages । उन्हाळ्यात गाव पाण्याविना करपलं!, सुधीर मुनगंटीवार यांनी दूर केली अडचण

    water supply problem in villages

    water supply problem in villages : चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. महिन्याच्या सुरुवातीला आढावा बैठक घेऊन १५ गावांची पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यानुसार कार्यवाही करीत प्रशासनाने या गावांचा पाणी पुरवठा सुरू केला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईने होणारी अडचण दूर केल्याबद्दल गावकऱ्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. rural water supply scheme

    एनडी हॉटेलमध्ये जुगाराचा बार

    पोंभुर्णा ग्रीड अंतर्गत १ जून २०२२ ला १५ गावांची पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे (मजीप्रा) कार्यान्वीत करण्यात आली. त्यानंतर मजीप्रातर्फे ही योजना जिल्हा परिषदेला हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न झाला. परंतू, १५ पैकी ८ गावांना पाणी पुरवठा नियमित होत नसल्यामुळे योजना हस्तांतरीत होऊ शकली नव्हती. त्याचवेळी मजीप्राकडे वीज देयकाचा भरणा करण्याकरीता निधी नसल्यामुळे ही योजना डिसेंबर २०२४ मध्ये बंद पडली. आणि १५ गावांची योजना बंद झाल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली. public water supply system

    माजी उपसभापती पोंभूर्णा विनोद देशमुख यांनी यासंदर्भात आ. श्री. मुनगंटीवार यांना कळवले. त्यानंतर आ. श्री. मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे दि. ५ एप्रिल २०२५ रोजी आढावा सभा घेतली. १५ गावांतील लोकांना पाणी टंचाई सोसावी लागत आहे. त्यामुळे योजना सूरू करण्याबाबत गावकऱ्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे आग्रह धरला. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ योजना सुरू करण्याचे निर्देश दिले.

    त्यानंतर आ. मुनगंटीवार यांच्या आदेशांनुसार जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे २५ एप्रिल २०२५ रोजी पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या थकीत वीज देयकाचा ५.७१ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला व पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सूरू करण्यात आला.

    गावकऱ्यांनी मानले आभार
    आ. श्री. मुनगंटीवार यांनी आढावा सभा घेऊन निर्देश दिल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आमच्या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला, या शब्दांत गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

    या १५ गावांना झाला लाभ
    चक ठाणेवासना, नवेगाव मोरे, चक नवेगाव, मोहाडा रै, वेळवा, सेलूर नागारेडी, चक कोंसबी-1, फुटाना, देवाडा खुर्द, जाम तु., रामपूर दीक्षित, बोर्डा दीक्षित, कसरगट्टा, चक घनोटी-1, जाम खु. या गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

  • akshaya tritiya marriage । अक्षय तृतीयेला विवाह… पण बालविवाह नकोच!

    akshaya tritiya marriage

    akshaya tritiya marriage : चंद्रपूर – ३0 एप्रिल रोजी अक्षयतृतीया हा सणआहे. यादिवशी मोठ्या प्रमाणात सामुहिक विवाहसोहळे तसेच वैयक्तिक विवाह आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह‌ सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते.  राज्यामध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कार्यान्वित असून महाराष्ट्र शासनाने बालविवाह प्रतिबंध नियम 2022  तयार केले आहेत. 

    चंद्रपुरात आदर्श ठरला सत्यशोधक विवाह सोहळा

    चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गत 5 वर्षात 68 बालविवाह थांबविण्यात आले असून 9 एफआयआर दाखल करण्यात आले आहे. यावर्षी सुध्दा जिल्हा प्रशासन बालविवाह रोखण्यासाठी सज्ज असून गावात बालविवाह होणार नाही, याची दक्षता सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व सुजान नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. child marriage act 2006

    बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006  संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे.  त्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे.  बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी)  हे शहरी भागाकरिता बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असून,  ग्रामसेवक हे  ग्रामीण भागाकरिता प्रतिबंधक अधिकारी आहे. त्यांना सहायक म्हणून अंगणवाडी सेविका आहेत.  गावामध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम बालसंरक्षण समित्या गठित आहे.  पोलिस पाटील, आशावर्कर हे त्यासमितीचे सदस्य आहेत व अंगणवाडी सेविका सदस्य सचिव आहेत.  त्यामुळे गावात बालविवाह तसेच बालकांच्या संबंधित कोणतीही अघटित घटना होणार नाही,  याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

    तर होऊ शकतो कारावास आणि दंड :  बालविवाह झाल्यास विवाह  लावणारे भटजी,  मौलवी,  पादरी,  भंतेजी,  तसेच  मंडपवाले,  कॅटरिंग,  वाजंत्री विवाह सोहळयात सहभागी होणारी वऱ्हाडी मंडळी,  मंगल कार्यालय मालक,  वरवधुचे आई–वडील हे बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये दोन वर्षाचा सश्रम कारावासाच्या शिक्षेस तसेच एक लाख रुपयापर्यंत दंडाच्या शिक्षेस पात्र असू शकेल. child marriage punishment in India

    बालविवाहा बद्दल माहिती देण्याचे आवाहन  : ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रात कुठेही बालविवाह होत असल्यास महिला व बालविभाग अंतर्गत चाईल्डलाईन टोल फ्री क्र.1098 (24तास),  जिल्हा बालसंरक्षण कक्ष 7972059274,  संस्था क्षेत्रीय अधिकारी  7304583054, असेस टू जस्टीस फॉर चिल्डेन प्रकल्प जिल्हा समन्वयक 9112796463  या क्रमांकावर,  जवळचे पोलिस स्टेशन, गावातील ग्रामसेवक अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी (शहरी/ग्रामीण) यांना त्वरीत माहिती द्यावी. report child marriage India

    चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी बालविवाह राखण्याबाबत जागृत राहावे.  माहिती देणाऱ्याचे  नाव गोपनीय ठेवण्यात येईल.  असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौड़ा जी.सी. यांनी केले आहे.