Author: Admin

  • PCPNDT Act enforcement strategies । गर्भलिंग तपास करणाऱ्यांना आता सुटका नाही, माहिती देणाऱ्याला मिळणार १ लाखाचं बक्षीस

    PCPNDT Act enforcement strategies

    PCPNDT Act enforcement strategies : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे, गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे. जिल्ह्यात असे अवैध गर्भलिंग निदान केंद्र असतील तर ते शोधून काढावे तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्टींग ऑपरेशनची संख्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. Sting operations for sex determination clinics

    रामबाग मैदानासाठी चंद्रपुरात माती सत्याग्रह

    जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी संदर्भात आढावा वैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे आदी उपस्थित होते.

    ३ महिन्यांनी सोनोग्राफी केंद्राची तपासणी

    दर तीन महिन्यांनी नियमितपणे सर्व सोनोग्राफी केंद्राची तपासणी करावी, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व कागदपत्रे, अहवाल, दैनंदिन नोंदवही अतिशय गांभीर्याने तपासावेत. यात कुठेही निष्काळजीपणा होऊ देऊ नका. तसेच अवैध रित्या चालणारे केंद्र शोधून काढण्यासाठी स्टींग ऑपरेशनची संख्या वाढविणे आवश्यक आहे. यासाठी पोलिस विभाग किंवा इतर शासकीय कर्मचा-यांचे सहकार्य घ्यावे. 12 आठवड्यांच्या वर गर्भपात होत असलेल्या केंद्राला आवर्जुन भेट देऊन तपासणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. PCPNDT Act penalties and punishments

    खब-यांसाठी तसेच स्टींग ऑपरेशन करीता बक्षीस योजना : गर्भलिंग निदान चाचणी करणा-या व्यक्तिची माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. तसेच त्याने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने खातरजमा करून संबंधित व्यक्ती / सोनोग्राफी केंद्रावर खटला दाखल झाल्यावर माहिती देणा-या व्यक्तिस राज्य शासनातर्फे 1 लक्ष रुपये व चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे 25 हजार असे एकूण 1 लक्ष 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच स्टींग ऑपरेशनसाठी सहभागी होणा-या गर्भवती महिलेस न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर शासनातर्फे 1 लक्ष रुपये आणि चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

    नागरिकांना आवाहन : जन्मापुर्वी मुलगा किंवा मुलगी आहे, हे जाणून घेणे कायद्याने गुन्हा आहे. असा गुन्हा करणा-या सोनोग्राफी केंद्राची माहिती टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 18002334475 वर, टोल फ्री क्रमांक 104, www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर, मनपा टोल फ्री क्रमांक 18002574010, व्हॉट्सॲप क्रमांक 8530006063 किंवा https://grievance.cmcchandrapur.com/complaint_registration/add या तक्रार निवारण ॲपवरही करता येऊ शकते.

  • Save Ram Bagh Ground campaign । रामबाग मैदानावर ‘मातीचा सत्याग्रह’!, झेडपीच्या इमारतीसाठी मैदानाचा बळी?

    Save Ram Bagh Ground campaign

    मैदानात खड्डा, नागरिकांत खदखद! चंद्रपूरमध्ये उभारला मातीचा सत्याग्रह

    Save Ram Bagh Ground campaign : रामबाग मैदान बचाव संघर्ष समिती च्या आवाहनानंतर आज गुरुवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 7 वाजता शेकडो नागरिक,खेळाडू तसेच पोलीस व सैन्य भरतीसाठी सराव करणारे युवक यांनी एकत्रित येऊन कंत्राटदराने मैदानावर खोदलेल्या खड्ड्यात माती टाकली व ‘मातीचा सत्याग्रह’ केला. कोणत्याही परिस्थितीत रामबाग मैदानावरील नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू देणार नाही, या मैदानावर सिमेंट काँक्रीटचे जंगल होऊ देणार नाही, झेडपी इमारतीचे बांधकाम होऊ देणार नाही, ‘नाही म्हणजे नाही’, असा संकल्प यावेळी आंदोलनात सहभागी नागरिकांनी केला. Mati Satyagraha at Ram Bagh ground

    नागरिकांनी रामबाग वर सुरु असलेले काम बंद पाडले

    मैदानाचे अस्तित्व धोक्यात

    झेडपीच्या नविन इमारतीमुळे भविष्यात या मैदानाचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. गेल्या चार-पाच दशकापासून नागरिक या मैदानाचा सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी वापर करीत आहेत. सिंधी व ताडाच्या वृक्षांनी या मैदानाच्या सौंदर्यात विशेष भर टाकली. मैदानाशी अनेक नागरिकांच्या भावना जुळलेल्या असल्याने कोणत्याही परिस्थितीत या मैदानावर इमारतीचे बांधकाम करू नये अशी स्थानिक नागरिक व खेळाडूंची जनभावना आहे. Citizens oppose ZP office construction


    बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने मैदानावर खड्डा खोदल्यानंतर नागरिक संतप्त झाले व त्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला. जोपर्यंत झेडपीची इमारत इतरत्र स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आमचा विरोध सुरू राहील अशी भूमिका रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने घेतली आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता मुकेश टांगळे यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता एक बैठक संपन्न झाली. या बैठकीला पप्पू देशमुख,भरत गुप्ता व रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे इतर अनेक सदस्य उपस्थित होते. मात्र बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही.

    Mati Satyagraha at Ram Bagh ground

    जिप प्रशासन नागरिकांची दिशाभूल करीत आहे

    नविन इमारत बांधण्याकरिता इतर ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असतांना प्रदूषित शहरातील सौंदर्याने नटलेल्या एका निसर्गरम्य क्रीडांगणावर जिल्हा परिषदेची इमारत बांधण्याचे नियोजन करणे योग्य नाही. या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासन जनतेची दिशाभूल करीत आहे. उद्या दिनांक 9 मे रोजी पुराव्यानिशी जिल्हा परिषद प्रशासनाचा पर्दाफाश करणार अशी माहिती रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

  • Chandrapur rare deer found dead । चंद्रपूरच्या गोविंदपूर शेतात मृत अवस्थेत सापडला दुर्लभ चौशिंगा

    Chandrapur rare deer found dead

    Chandrapur rare deer found dead : गोविंदपूर येथील सापेपारती परिसरात एका शेतात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या चौशिंगा प्रजातीचा नर प्राणी मृत अवस्थेत आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही माहिती स्वाब संस्थेचे नितीन भेंडाळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ तळोधी वन परिक्षेत्राला याबाबत कळवले.

    कामगार वाचवायचे असतील तर …मनसेचे अमन अंधेवार यांची काय आहे मागणी बघा?

    बिबट्याने हल्ला केल्याचा संशय

    वन विभागाने घटनास्थळी धाव घेत मोक्का पंचनामा केला. सदर चौशिंगा नर प्रजातीचा असून, वय अंदाजे सहा वर्षे आहे. त्याच्या मानेवरील दात आणि नखांचे ओरखडे पाहता, बिबट्याने त्याच्यावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तो पळत असताना झाडावर आदळून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. Chandrapur wildlife incident deer death

    ही घटना तळोधी वनपरिक्षेत्रातील गोविंदपूर क्षेत्रात बागडे यांच्या शेतात घडली. घटनास्थळीच मोक्का पंचनामा करण्यात आला व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे शवविच्छेदन करून प्राण्याचे शव त्या परिसरातच पुरण्यात आले.

    या वेळी तळोदीचे क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, गोविंदपूरचे क्षेत्र सहाय्यक आर. एस. गायकवाड, वनरक्षक श्रीरामे आणि चुधरी, तसेच स्वाब संस्थेचे यश कायरकर, जिवेश सयाम, नितीन भेंडाळे आणि वनमजूर उपस्थित होते.

  • Aman Andhewar ESIC hospital demand । कामगार वाचवायचे असतील तर …मनसेचे अमन अंधेवार यांची काय आहे मागणी बघा?

    Aman Andhewar ESIC hospital demand

    औद्योगिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात हजारो कामगार विविध कारखान्यांमध्ये कार्यरत असून, अपघाताच्या घटना वारंवार घडत असतानाही कामगारांसाठी स्वतंत्र व तात्काळ उपचारासाठी आवश्यक असणारे ESIC रुग्णालय उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर कामगारांचे जीव वाचावेत यासाठी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्यात ESIC रुग्णालय सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

    Aman Andhewar ESIC hospital demand : चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातं असतांना व लाखों कामगार या उद्योगात कार्यरत असतांना कामगारांना योग्य व तात्काळ आरोग्य सुविधा जिल्ह्यात मिळत नाही त्यामुळे उपाचाराअभावी कित्तेकांचा जीव जातो म्हणून आपल्या चंद्रपूर मध्ये एक इ.एस.आय.सी रुग्णालय सुरु करा अशी मागणी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कालबांधे, सुनील गुढे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. ESIC hospital demand Chandrapur

    जिवती तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांचा झंझावाती दौरा

    जिल्ह्याच्या कंपन्या मध्ये ज्या दुर्घटना घडतात व कामगारांना गंभीर जखमा झाल्यास चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेज मध्ये कामगारांना भरती करून नंतर खाजगी रुग्णालयात नेतात व नंतर नागपूरला हलवले जाते त्या दरम्यान बहुतांश कामगारांचा मृत्यू होतो, परंतु जर चंद्रपूर जिल्ह्यात इ.एस.आय.सी रुग्णालय जर खोलण्यात आले तर कामगारांचे नुकसान होणार नाही व वेळेवर उपचार करण्यात आला तर कांमागारांचे जीव वाचतील त्यामुळं कामगारांच्या हक्काचे रुग्णालय हे चंद्रपूर जिल्ह्यात इ.एस.आय.सी रुग्णालय स्थापन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले.

  • Pulkit Singh CEO Chandrapur visit । मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांचा जिवती दौरा; विकासकामांचा घेतला आढावा

    Pulkit Singh CEO Chandrapur visit

    Pulkit Singh CEO Chandrapur visit : चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी नुकताच जिवती तालुक्याचा दौरा केलेला असुन, क्षेत्रीय भेटीदरम्यान जिवती तालुक्यातील विविध गावांना भेटी देवुन विविध विकास कामांची पाहणी केली आहे. Rural development in Chandrapur

    चंद्रपुरातील राम बाग वाचवा, नागरिकांचा पुढाकार

    महिला बचत गटांना मार्गदर्शन

    मुख्य कार्यकारी अधिकारी  पुलकित सिह यांनी जिवती तालुक्यातील भेटी दरम्यान ग्रामपंचायत पाटण येथील आदर्श आपले सरकार सेवा केंद्रास भेट देऊन, उत्पन्नाचा दाखला वितरण करण्यात आले. व  महिला बचत गटांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्र देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

    मॉडेल आरोग्य केंद्राला भेट

    उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे यांच्या हस्ते मौजा शेणगाव येथे दिड महिन्यापूर्वी घरकुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. अशा पूर्ण झालेल्या घरकुलाची पाहणी करण्यात आली. मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवुन, येथिल सोई सुविधांची पाहणी करण्यात आली. मॉडेल जिल्हा परिषद हायस्कूलची पाहणी करून, विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

    वृक्षारोपण

    पीटीगुडा नं 1 येथे ऑक्सिजन पार्क, नरेगा अंतर्गत बंधारा बांधकाम , सार्वजनिक कंपोष्टपिट च्या कामांची पाहणी केली. गावात मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. टेकमांडवा येथे उपआरोग्य केंद्राला भेट दिली . येथील आरोग्य विषयक सेवांची माहिती जाणुन घेतली व यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना योग्य ते निर्देश देण्यात आले. जिल्हा परिषदच्या शाळेस भेट देऊन, विद्यार्थींशी हितगुज केली.  Gram panchayat inspection Chandrapur

    पंचायत समिती जिवती येथिल सभागृहात विविध विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचा विविध विकास कामांचा  आढावा  घेऊन गाव स्तरावरील विकास कामे वेळेत पुर्ण करण्याचे यावेळी उपस्थितांना निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांच्या जिवती तालुक्यातील क्षेत्रीय भेटी दरम्यान उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे ,जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायन दोडके व तालुका यंत्रणेतील  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  • Ghuggus sand mafia trucks seized । रेती माफियांना झटका! घुग्घुसमध्ये 3 ट्रक पकडले! 🚜

    Ghuggus sand mafia trucks seized

    Ghuggus sand mafia trucks seized : बुधवारी, दिनांक ०७ मे रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास रेती माफियांविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई केली. या कारवाईत तीन मोठे ट्रक जप्त करून घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. Sand royalty violation Chandrapur

    ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन – हंसराज अहिर

    महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घुग्घुस परिसरातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर नायब तहसीलदार डॉ. सचिन खंडाले, घुग्घुसचे मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे, पिपरीचे तलाठी श्याम खराते आणि शेणगावचे तलाठी यांनी संयुक्तपणे धाड टाकून तीन मोठे ट्रक जप्त केले.

    जप्त केलेल्या वाहनांमध्ये १६ चाकी ट्रक क्रमांक MH २९ BD ५४०० चा समावेश आहे. या ट्रकमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी घाटाच्या ७ ब्रास रेतीची रॉयल्टी होती, परंतु प्रत्यक्षात १२ ब्रास रेती भरून वाहतूक केली जात होती. इतर दोन १४ चाकी ट्रकमध्ये MH २७ BX ७२०९ आणि MH ३२ AJ ४४४२ प्रत्येकी १०-१० ब्रास रेती वाहतूक करत होते आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वैध रॉयल्टी नव्हती. या ट्रकमध्ये पिपरी घाटाची रेती भरलेली होती.

    मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल्टी असलेला ट्रक यवतमाळ जिल्ह्यातील आहे, तर इतर दोन ट्रक कडम तालुक्यातील मेतीखेडा गावाशी संबंधित आहेत.

    पहिला ट्रक टेम्पो क्लबजवळ तर बाकीचे दोन ट्रक राजीव रतन रेल्वे क्रॉसिंगजवळ सापडले.

  • Hansraj Ahir Operation Sindoor । ऑपरेशन सिंदूर: चंद्रपूरमधून हंसराज अहीर यांचे भारताच्या विजयाचे कौतुक! 🚨

    Hansraj Ahir Operation Sindoor

    Hansraj Ahir Operation Sindoor : चंद्रपूर: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा ‘‘ऑपरेशन  सिंदुर’’ सर्जिकल स्ट्राईक करुन  भारताने बदला घेत पाकिस्तान व दहशतवादी संघटनांना सडेतोेड उत्तर दिल्याबद्दल पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय  मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार व तिन्ही सैन्यदलांचे अभिंनदन करुन याविशेष कामगीरीवर गर्व व्यक्त केला आहे. Hansraj Ahir on surgical strike

    चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांना न घाबरणारे सट्टेबाज, वाचा बातमी

    हिशोब चुकता


    कोटली, मुज्जफराबाद व बहावलपुर सह 9 आतंकी तळांना लक्ष्य करीत एअर स्ट्राईक द्वारे शेकडो आतंकवाद्यांचा खातमा करुन भारताने आपल्या भगिनींच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा हिशेब चुकता केला. दहशतवादी संघटनांनी पुन्हा पुन्हा भारताच्या सीमांकडे करड्या नजरेने बघण्याचे धाडस करु नये अन्यथा जगाच्या नकाशावरुनच पुसुन टाकू हा पाकिस्तानला दि. 07 मे रोजी पहाटे केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मधुन दिलेला थेट इशाराच आहे.


    ‘‘देश प्रथम’’ ही मा. नरेंद्र मोदीजींची निती व स्पष्ट  भुमिका आहे. देशाविरुद्ध रचल्या जाणारे कोणतेही कट कारस्थान सहन केले जाणार नाही, त्याची किंमत वसुल करण्याची धमक मोदी सरकारची आहे. आमचे सैन्यदल यासाठी सक्षम आहेत. हेच या सर्जिकल स्ट्राईक ने पुन्हा एकदा दाखवून दिले. अत्यंत नियोजनबध्द व मानवीय दृश्टीकोनाचा परिचय देत पाकिस्तानी नागरीक व तेथील सैन्यदलास इजा न पोहचविता भारताने दहशतवादाविरुध्द केलेला सर्जिकल स्ट्राईक हा भारताचा ऐतिहासिक विजय असल्याचे पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी म्हटले आहे.

  • Save Ram Bagh Ground Chandrapur । रामबाग ग्राऊंड वाचवा! चंद्रपूरच्या नागरिकांनी बांधकाम बंद पाडले! 🏟️

    Save Ram Bagh Ground Chandrapur

    Save Ram Bagh Ground Chandrapur : चंद्रपूर: शहरातील निसर्गरम्य अशा रामबाग ग्राऊंडवर अचानक जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाल्याने स्थानिक जनता तसेच शहरातील खेळाडू व युवकांमध्ये संतापाची लाट उसळली. या मैदानावर काम सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक व खेळाडूंनी प्रशासनाला हे काम बंद करण्याची विनंती केली. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. अखेर या मैदानावर कंत्राटदाराने भला मोठा खड्डा खोदल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आज बुधवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा परिषदेच्या नविन इमारतीचे बांधकाम बंद पाडले. Chandrapur citizens protest

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी गौडा यांचा सत्कार

    chandrapur citizens protest


    यावेळी मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख व राजेश अडुर यांचेसह श्रीकांत भोयर,रविंद्र माडावार,दौलत साटोणे, नवनाथ देरकर, प्रवीण कुमार वडलोरी,माधव डोडाणी,तपन दास,कोमील मडावी,राहुल ठाकरे,प्रफुल बैरम,अक्षय येरगुडे,अमुल रामटेके,अमोल घोडमारे इत्यादी नागरिक व खेळाडू उपस्थित होते.

    उद्या रामबाग मैदानावर निर्णायक बैठक

    रामबाग ग्राऊंड 50 वर्षांपासून सर्वसामान्यांच्या हक्काचे ग्राउंड आहे, येथिल नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू देणार नाही, इथे सिमेंट काँक्रीटचे जंगल होऊ देणार नाही, इथे कोणत्याही इमारतीचे बांधकाम होऊ देणार नाही,नाही म्हणजे नाही असा दृढ संकल्प नागरिक व खेळाडूंनी केला आहे. याबाबत पुढील भूमिका ठरविण्यासाठी उद्या दिनांक 8 मे रोजी सकाळी 7 वाजता रामबाग मैदानावर निर्णय बैठक घेण्यात येणार आहे.

    सेव्ह रामबाग ग्राउंड

    ‘सेव्ह रामबाग ग्राऊंड, रामबाग मैदान बचाव संघर्ष समिती’ च्या बॅनरखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या भागातील तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिक, युवक-युवती व खेळाडूंनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केले आहे.

  • Authorized seed purchase Chandrapur farmers । खरीप 2025: चंद्रपूर शेतकऱ्यांनो, फसवणूक टाळा, अधिकृत बियाणे घ्या! 🌾

    Authorized seed purchase Chandrapur farmers

    Authorized seed purchase Chandrapur farmers : खरीप हंगामाला आता सुरवात होणार आहे. शेतक-यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक विक्रेत्याकडून बियाणे, खते खरेदी करावेत. विक्रीचा परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठा खरेदी करावी, तसेच गावोगावी फिरणाऱ्या एजंटकडून कोणतेही बियाणे घेऊ नये, असे आवाहन कृषी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. Kharif season farming tips Maharashtra 2025

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हाधिकारी गौडा यांचा सत्कार

    आधी बियाणाची जात निवडा

    कृषी विभागाने म्हटले की, शेतक-यांनी प्रतीनुसार आणि पिकाच्या गरजेनुसार योग्य बियाण्याची जात निवडावी. याकरिता स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. शेतकयांनी बियाण्यांच्या पॅकेटवर कंपनीचे नाव, लॉट नंबर, उत्पादन तारीख, अंतिम तारीख, वाणाचे नाव, उगवण क्षमतेची टक्केवारी आणि पाकिटावर छापलेले लेबल तपासावे. स्थानिक हवामान, बियाणे स्वच्छ, रोगमुक्त आणि एकसमान आकाराचे असावे. कचरा, खराब बियाणे किंवा  कीड नसावी. बियाण्याला बीजप्रक्रिया केली आहे का? असल्यास कोणत्या औषधाची केली आहे ते तपासा, नसल्यास कोणत्या औषधाची बीजप्रक्रिया करावी, याचा सल्ला कृषीतज्ज्ञांकडून घ्या. अंतिम तारीख पूर्ण झालेले बियाणे खरेदी करू नये, कारण त्याची उगवण क्षमता कमी असते. खरेदीचे अधिकृतचे पक्के बिल घ्या, जेणेकरून तक्रार असल्यास पुरावा मिळेल. Shankar Totawar farming advice

    बियाण्यांची गुणवत्ता टिकवा

                  हायब्रिड बियाणे घेतल्यास त्याच्या लागवडीसाठी विशेष काळजी आणि खते याची माहिती घ्या. खरेदी केलेले बियाणे कोरड्या आणि थंड ठिकाणी साठवा, जेणेकरून त्याची गुणवत्ता टिकेल. शक्य असल्यास स्थानिक कृषी अधिकारी किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बियाणे निवडा. विकत घेतलेल्या बियाण्याचे पाकीट आणि बिल जपून ठेवावे. विकत घेतलेल्या बियाणांची पाकिटे, अधिकृत बिल आणि थोडेफार बियाणे हंगाम संपेपर्यंत राखून ठेवावे. जेणेकरून तक्रार करावयाची झाल्यास पुरावे म्हणून ग्राह्य मानले जातात. Avoid fake seeds Kharif farming Chandrapur

    पेरणीच्या वेळेस बियाण्याची पिशवी शिलाई केलेल्या बाजूने न फोडता खालील बाजूने फोडावी. जेणेकरून पिशवीवरील टॅग व लेबल चांगले राहतील व ते टॅग आणि लेबल सांभाळून ठेवावे. या गोष्टींची काळजी घेतल्यास चांगल्या प्रतीचे बियाणे मिळेल आणि पिकाचे उत्पादन वाढेल.

    शेतकरी बांधवांनी स्वस्त बियाण्यांच्या अमिषाला बळी न पडता अधिकृत कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करावेत. त्याची पावती घेऊन तो जपून ठेवावी. शेतकऱ्यांच्या बियाणेसंदर्भात तक्रारी असल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी म्हटले आहे.

  • Vinay Gowda best district collector Maharashtra । विनय गौडा यांची कमाल: चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट!

    Vinay Gowda best district collector Maharashtra

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान: चंद्रपूरचे विनय गौडा राज्यात प्रथम!

    Vinay Gowda best district collector Maharashtra : चंद्रपूर, दि. 7 मे : राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. त्या अनुषंगाने आज (दि.7) मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. Chandrapur district collector Vinay Gowda 2025

    पोलीस प्रशासनाला न घाबरणारे गडचांदूरातील सट्टेबाज

     मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले. यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने बाजी मारली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात 84.29 गुण मिळवत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

    कार्यालयीन सुधारणा मोहिमेत अद्ययावत संकेतस्थळ, केंद्र शासनासोबत सुसंवाद, कार्यालयीन स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, कामकाजातील सुधारणा, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी, सुकर जीवनमान, कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात आलेले नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India)  मार्फत मूल्यमापन करण्यात आले होते. या सर्व निकषांवर परिपूर्ण उतरून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात सर्वोत्कृष्ठ ठरले.