Author: Admin

  • The crime of culpable homicide । तुकूम अपघात – ट्र्क चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – युवतीसेना चंद्रपूर

    The crime of culpable homicide

    मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मृतक व जखमीला आर्थिक मदत द्या – रोहिणी पाटील

    The crime of culpable homicide : चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील तुकूम येथे २ जून रोजी अनियंत्रित हायवा ट्र्क ने वाहनांना धडक देत २ तरुणींना चिरडले यामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाली. या दुर्दैवी घटनेनंतर सुद्धा हायवा ट्र्क चालक व मालकावर अजूनही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, यावर चंद्रपूर युवतीसेनेने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. ubt yuvatisena

    पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातून सानिका कुमरे व काजल आत्राम या चंद्रपूरमध्ये राहत होत्या, २ जून रोजी अभ्यासिकेतून परत जाताना तुकूम येथे सानिका कुमरे ला हायवा ट्रक ने चिरडले. या अपघातात सानिका जागीच ठार झाली तर काजल गंभीर जखमी झाली होती. पोलीस बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या दोन्ही तरुणींचे स्वप्न धुळीस मिळाले. यावर ठाकरे गट शिवसेना युवासेनेच्या सहसचिव व युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील यांनी याबाबत जखमी काजल आत्राम ची भेट घेत तिला धीर दिला. culpable homicide accidental death

    ठोस पुरावे तरीपण कारवाई नाही, आप ने दिला आंदोलनाचा इशारा

    युवतीसेना ने घेतला पुढाकार

    ६ जून रोजी रोहिणी पाटील यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेत या घटनेला जबाबदार ट्रक चालक व मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनेला जबाबदार ट्र्क चालकावर दारूचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा पोलीस अधीक्षकांना दिली, जर घटनेच्या वेळी चालकाला फिट आली होती तर अनफिट चालकाला कामावर ठेवणाऱ्या मालकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. यावर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. news chandrapur

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांची रोहिणी पाटील यांनी भेट घेत मृतक सानिका कुमरे व जखमी काजल आत्राम यांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच जखमी काजल आत्राम यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला परंतु तिची चालण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती ही बाब जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडली त्यांनी तात्काळ आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना हॉस्पिटलला जाऊन चौकशी करायला सांगितले. The crime of culpable homicide

    प्रोजेक्ट ऑफिसर विकास नक्षलवार यांनी स्वतः जखमी काजल आत्राम यांची परिस्थिती बघितली व त्यांनी हॉस्पिटल मधे डॉक्टरांशी बोलून परत काही दिवस जोपर्यंत ती ठीक होईल तोपर्यंत रुग्णालयात ठेवण्याचे सांगितले .दोघांच्या घरची परिस्थिती हि बेताची आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी याकरिता जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली. गौडा यांनी यावर सकारात्मकता दर्शवित याबाबत लवकर पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

    जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेटण्याकरिता गेलेल्या शिष्टमंडळात युवासेना सहसचिव, युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील, युवतीसेना उपजिल्हा अधिकारी धनश्री प्रभा हेडाऊ, युवती जिल्हा चिटणीस रोशनी ध्रुव गोलदार, सौरभ बोढे, सानिका फरकडे, पायल लसंते, शिव राठोड, लोचना वेलके, निधी झाडे, कुणाल मासिरकर, अतुल वांढरे, गौरव आव्हडे, अभिषेक त्रिशूले, निलेश वनकर, वैशू दादांजे, साहिल शेख, संदीप राठोड, आतिष टेकाम, सूरज मोरे, मनीष भोयर, संजना पेंदाम, दिलीप आत्राम, मुकेशकुमार इचारवार, गोविंदा मडावी, प्रीती सलाम व काजल वेलादी उपस्थित होते.

    “२ जून रोजी तुकूम भागात झालेल्या या दुर्दैवी अपघातात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला आपला जीव गमवावा लागला, एक तरुणी जखमी झाली मात्र ट्र्क चालक हा राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्याला वाचविण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु झाले. एकही राजकीय पक्ष या घटनेवर स्पष्ट बोलू शकत नाही आहे, कारण राजकीय दबाव, ती गरीबाची लेक होती म्हून तिला न्याय मिळणार नाही का? पोलीस बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आता न्यायासाठी मृत्यूनंतर सुद्धा तिला यातना सहन कराव्या लागत आहे. चंद्रपुरातील वातावरण हे गलिच्छ राजकारणामुळे नासून गेले.’

  • no FIR filed despite evidence । ठोस पुरावे असूनही FIR नाही; आप ने दिला खळखळ्खट्याक आंदोलनाचा इशारा

    no FIR filed despite evidence

    no FIR filed despite evidence : चंद्रपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा (chandrapur mahanagarpalika corruption)अजून एक काळा अध्याय समोर आला आहे. कोहिनूर ग्राउंड येथील नागरिकांच्या फिरण्यासाठी तयार केलेल्या ट्रॅकवरील शासकीय पेव्हर्स अर्बन एनव्हायरॉन कंपनीने चोरून स्वतःच्या खासगी कार्यालयात लावले आहेत. यासंदर्भात दि. १६ मे रोजी पालिका आयुक्तांना तक्रार व ठोस पुरावे (फोटो, व्हिडीओ) सादर करूनही अद्याप कोणतीही FIR नोंदवण्यात आलेली नाही.

    माजी सैनिकाने दिला आमरण उपोषणाचा इशारा

    गाडीत टाकून नेले ती चोरी नाही

    याप्रकरणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील यांची भेट घेतली असता, त्यांनी अत्यंत उद्धटपणे व निष्काळजीपणे उत्तर दिले की, “पेव्हर्स गाडीत टाकून नेले, त्याला चोरी म्हणता येत नाही.” हे उत्तर म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि यामधून पालिका प्रशासनाचा भ्रष्ट चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

    महानगरपालिकेतील संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरलेली असून, हे अधिकारी स्वतःला कोणीही वाकडं करू शकत नाही अशा भ्रमात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत सातत्याने आवाज उठवला जात आहे. मात्र अधिकारी वर्गाची मानसिकता इतकी बधीर झाली आहे की, सामान्य जनतेच्या हक्कांची खुलेआम पायमल्ली केली जात आहे.

    शासकीय संपत्तीवर डल्ला

    ही घटना केवळ पेव्हर्स चोरीची (Pavers theft) नसून, ती सामान्य जनतेच्या हक्कांवर आणि शासकीय संपत्तीवर डल्ला मारण्याची लक्षणीय घटना आहे. जर सामान्य नागरिक काही चूक करतो, तर प्रशासन त्याच्यावर कठोर कारवाई करते. पण एवढा मोठा प्रकार उघडपणे घडूनही महानगरपालिका शांत का आहे? यामागे गुप्त सांठगांठ व भ्रष्टाचाराचा गंभीर वास येतो.

    आज दिनांक ६ जून २०२५ रोजी आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi party) वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना या गंभीर घटनेबाबत सविस्तर तक्रार अर्ज सादर करण्यात आला.
    या वेळी उपस्थित होते:
    👉 मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष),
    👉 राजू कूडे (युवा जिल्हाध्यक्ष),
    👉 योगेश गोखरे (शहर अध्यक्ष),
    👉 प्रशांत सिदुरकर (जिल्हा सचिव),
    👉 संतोष बोपचे (महानगर संगठन मंत्री),
    👉 एड. तबस्सुम शेख (शहर महिला अध्यक्ष),
    👉 हांडेकर गुरुजी (शहर पदाधिकारी),
    👉 विशाल बिरमवार (शहर पदाधिकारी)
    आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते.

    या घटनेबाबत जर पुढील ८ दिवसांत कोणतीही शासकीय कार्यवाही झाली नाही, तर आम आदमी पक्ष चंद्रपूर जिल्हा तर्फे अभिनव आणि बहिरे असल्याचे सॉन्ग करणाऱ्या भ्रष्ट अधिकार्‍यांचा विरोधात तीव्र व ‘खडकट्याक आंदोलन’ करण्यात येईल, असा जबरदस्त इशारा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिला आहे.

    हा लढा केवळ भ्रष्टाचाराविरोधात नाही, तर सामान्य जनतेच्या न्यायासाठी आहे. आम आदमी पक्ष शेवटच्या श्वासापर्यंत या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

  • local security guards losing jobs । स्थानिकांना डावलले! सुरक्षा रक्षकांसाठी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

    local security guards losing jobs

    local security guards losing jobs : चंद्रपूर – टाकळी जेनाच्या अरविंदो रियल्टी एंड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने (Aurobindo Realty and Infrastructure Private Limited Company) माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांच्या मेपल 365 सुरक्षा सेवा प्रा. लि. मधील सर्व सुरक्षा रक्षकांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 74 स्थानिक सुरक्षा रक्षकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात, मनोज ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेत संकेत दिले आहेत की जर संबंधित सुरक्षा रक्षकाची नोकरी कायम केली नाही तर 20 जून रोजी कंपनीसमोर उपोषण केले जाईल. Fast unto death

    विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना राबवा – आमदार जोरगेवार


    पत्रकार परिषदेत मनोज ठेंगणे यांनी सांगितले की, टाकळी जेनाच्या अरविंदो रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही कोळसा खाण कंपनी आहे. या कंपनीने ऑगस्ट 2023 मध्ये मॅपल 365 सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आणि (ex-serviceman) माजी सैनिक मनोज ठेंगणे यांच्याशी सुरक्षेसाठी करार केला होता. या सुरक्षा कंपनीअंतर्गत टाकळी आणि जेना गावातील स्थानिक नागरिकांमधून एकूण 74 रक्षक कंपनीच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.

    करार रद्द केला

    सर्व स्थानिक लोक सुरक्षा एजन्सीमध्ये कार्यरत आहेत. परंतु अलीकडेच कंपनीने या सुरक्षा कंपनीसोबत केलेला करार रद्द केला आहे. या संदर्भात एक मेल देखील पाठवण्यात आला आहे. सुरक्षा सेवा कंपनीचे संचालक मनोज ठेंगणे यांनी आरोप केला आहे की अरविंदो कंपनीच्या अशा प्रकारच्या धोरणामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेले 74 स्थानिक सुरक्षा रक्षक बेरोजगार होतील. त्यांनी सांगितले की अरविंदो कंपनी आता बिहारच्या एसआयएस सिक्युरिटी एजन्सीसोबत करार करणार आहे.

    74 स्थानिक सुरक्षा रक्षकांवर अन्याय

    संबंधित कंपनीने नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा येथील 60 सुरक्षा रक्षकांना कंपनीच्या आवारात आणले आहे. कोणत्याही कंपनीत स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या सरकारने दिलेल्या सूचना असूनही, अरविंदो कंपनी त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अरविंदो कंपनी आता विस्तार वाढत आहे. अशावेळी इतर राज्यांतील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून आम्हा 74 स्थानिक सुरक्षा रक्षकांवर अन्याय केला जात आहे. स्थानिक सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी 20 जूनपासून कंपनीसमोर अन्नत्याग उपोषण करणार असल्याचा इशारा माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.

  • Ek Khidki Yojana । विद्यार्थ्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ राबवा, संजय गांधी योजनेचा सर्वे तात्काळ पूर्ण करा – आ. किशोर जोरगेवार

    Ek Khidki Yojana

    Ek Khidki Yojana : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, पर्यटन, सामाजिक कल्याण, तसेच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांशी संबंधित अनेक प्रस्तावांवर चर्चा झाली.

    बाबुपेठ मधील ऑटो चालकांकडून लाखोंचा सुगंधित तंबाखू जप्त

    या बैठकीस जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अविनाश नकवा, संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार सीमा गजभिये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमरशेट्टीवार, तांगडे, पगारे, निर्माण वर्धा रेल्वेचे कार्यकारी अभियंता वर्मा यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश देवतडे, तुषार सोम, रवींद्र गुरुनुरे, रशिद हेसेन, नकुल वासमवार, करणसिंग बैस, कार्तिक बोरेवार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    एक खिडकी योजना राबवा

    नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजांमध्ये प्रवेश घेताना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे. या प्रक्रियेत अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक तहसील कार्यालयात नायब तहसीलदाराच्या नेतृत्वाखाली ‘एक खिडकी योजना’ तात्काळ सुरू करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश आमदार जोरगेवार यांनी या बैठकीत दिले. student document verification at tehsil office

    संजय गांधी निराधार योजना, सर्व्हेक्षण पूर्ण करा

    तसेच, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यावर त्यांनी भर दिला. सदर योजनेत २७०० अर्ज प्राप्त झाले असून, यातील १२०० नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्वेक्षण पुढील १५ दिवसांत पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. Sanjay Gandhi Niradhar Yojana application

    सप्टेंबर महिन्यात नव्या इमारतीमध्ये मेडिकल कॉलेज सुरु होणार

    या बैठकीत चंद्रपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे मां सा कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. येत्या सप्टेंबर महिन्यात नव्या इमारतीतच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचनाही आमदार जोरगेवार यांनी दिल्या.

    रामाळा तलावात मत्स्योत्पादन व मासेमारीसाठी ‘वाल्मिकी मछुआ सहकारी संस्था मर्या., चंद्रपूर’ यांना कोणत्याही अटी व शर्तीशिवाय करार देण्याची शिफारस यावेळी करण्यात आली. यामुळे स्थानिक मच्छीमार समाजाला स्थिर रोजगार मिळेल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. fisheries cooperative society contract process

    तसेच, मध्य रेल्वेच्या तिसऱ्या लाईन प्रकल्पामुळे नझूल जमिनीवरील जे नागरिक विस्थापित होणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळावा आणि म्हाडाच्या माध्यमातून त्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

    दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने योग्य नियोजन करावे, रस्ते पाण्याने डुबू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देशही आमदार जोरगेवार यांनी यावेळी दिले. या बैठकीस वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

  • how to reduce acidity in morning naturally । सकाळच्या आम्लतेमुळे त्रस्त आहात? हे उपाय तुमचं जीवन बदलू शकतात!

    how to reduce acidity in morning naturally

    how to reduce acidity in morning naturally : आरोग्यवार्ता – सकाळी पोटात अ‍ॅसिडिटीची समस्या केवळ शारीरिक अस्वस्थता निर्माण करत नाही तर आपल्या कार्यक्षमतेवर आणि मूडवरही वाईट परिणाम करते. या लेखात आपण ती त्वरित बरी करण्यासाठी काही उपायांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

    आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित दिनचर्येमुळे आपल्या आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम झाले आहेत, त्यापैकी एक सामान्य समस्या म्हणजे सकाळी उठताच पोटात जळजळ किंवा आम्लता येणे. ही केवळ एक छोटी समस्या नाही तर दिवसाची सुरुवात पूर्णपणे खराब करू शकते आणि आपल्याला अस्वस्थ वाटू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर जेव्हा तुम्हाला तीव्र जळजळ, आंबट ढेकर किंवा पोटात जडपणा जाणवतो, तेव्हा तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की हे अनियमित खाण्याच्या सवयी, वाढता ताण आणि चुकीच्या जीवनशैलीचा थेट परिणाम आहे. ayurvedic remedies for acid reflux in morning

    पुरेशी झोप झाली तरीही शरीर थकलेलं? हे उपाय करा

    या समस्येमुळे केवळ शारीरिक अस्वस्थताच येत नाही, तर आपल्या कार्यक्षमतेवर आणि मनःस्थितीवरही वाईट परिणाम होतो. पोटात आम्ल उत्पादन सामान्यपेक्षा जास्त झाल्यावर आम्लपित्त येते, ज्यामुळे घशात जळजळ होते. ही स्थिती टाळण्यासाठी, आपल्या सवयींकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. योग्य वेळी योग्य अन्न, पुरेशी झोप आणि ताण व्यवस्थापन या समस्येपासून मुक्तता मिळवू शकते. परंतु जर तुम्हाला त्वरित उपाय हवा असेल, तर या लेखातील काही सोप्या उपायांबद्दल आम्हाला माहिती द्या जेणेकरून तुम्ही या समस्येपासून कमी वेळात मुक्त होऊ शकाल. best foods to eat in morning for acidity

    थंड दुधाचे सेवन करा

    थंड दूध हे आम्लपित्त त्वरित कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. दुधात असलेले कॅल्शियम आणि प्रथिने पोटातील अतिरिक्त आम्ल निष्क्रिय करतात, ज्यामुळे छातीत जळजळ आणि आंबट ढेकर कमी होतात. सकाळी रिकाम्या पोटी किंवा आम्लपित्त झाल्यावर हळूहळू एक ग्लास थंड दूध प्या. लक्षात ठेवा की दूध कमी चरबीयुक्त असावे, कारण जास्त चरबीयुक्त दूध पचनक्रिया मंदावू शकते. morning acidity home treatment without medicine

    आल्याचा चहा

    आल्यामध्ये दाहक-विरोधी आणि पाचक गुणधर्म असतात, जे आम्लता कमी करतात. आल्याचा चहा पोटात आम्ल उत्पादन नियंत्रित करतो आणि पचनसंस्थेला शांत करतो.

    बडीशेप

    बडीशेप पाणी हे पचनसंस्थेसाठी रामबाण औषध आहे. बडीशेपमध्ये अॅनेथोल आणि इतर संयुगे असतात, जे पोटाची जळजळ कमी करतात आणि गॅस आणि अपचन कमी करतात.

    कोमट पाणी

    सकाळी होणाऱ्या अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कोमट पाणी पिणे. ते पोटात साचलेले विषारी पदार्थ बाहेर काढते आणि पचनसंस्थेला आराम देते.

    NEWS ३४ लेखात दिलेल्या माहितीसाठी कोणताही दावा करत नाही किंवा कोणतीही जबाबदारी घेत नाही. वरील लेखात नमूद केलेल्या संबंधित आजाराबद्दल अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • tobacco smuggling news update । बाबुपेठ येथील युवकाकडून लाखोंचा तंबाखू जप्त

    tobacco smuggling news update

    tobacco smuggling news update : राजुरा – ५ जून रोजी राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी ५ लक्ष ९९ हजारांचा सुगंधित तंबाखू सहित एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत राजुरा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. police tobacco seizure

    आज ५ जून रोजी राजुरा पोलिसांनी संविधान चौकात नाकेबंदी केली होती, यादरम्यान ऑटो क्रमांक MH३४ D ६३३९ ला थांबवित त्याची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ईगल हुक्का, होला हुक्का, विमल पान मसाला असा एकूण ५ लक्ष रुपयांच्या मालासहित गुन्ह्यात वापरलेला ऑटो एकूण किंमत ५ लक्ष ९९ हजार ३२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    महिलांनो सावध व्हा- भद्रावतीमध्ये चैन स्नॅचिंग ची घटना

    यावेळी पोलिसांनी ऑटो चालक अविनाश आबाजी शेंडे राहणार बाबुपेठ चंद्रपूर याला ताब्यात घेतले आहे.आरोपीविरुद्ध अन्न व सुरक्षा मानके कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

    प्रशासनाचे दुर्लक्ष

    वर्ष २०१२ पासून राज्यात प्रतिबंधित असणारा सुगंधित तंबाखू चंद्रपूर जिल्ह्यात सर्रासपणे विकल्या जात आहे, चंद्रपूर शहरातील प्रत्येक चौकात खर्रा यामध्ये हा सुगंधित तंबाखू मिक्स करण्यात येतो. मात्र अन्न व औषध प्रशासन या माफियांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पोउपनि भीष्मराज सोरते, पोलीस कर्मचारी पांडुरंग हाके, विक्की निवार्ण, प्रभाकर कोराम, जुमनाके, महेश बोलगोडवार,अविनाश बांबोळे, शफिक शेख, आनंद मोरे व शरद राठोड यांनी केली.

  • Chain snatching incident Bhadravati । सावध व्हा! भद्रावतीत चेन स्नॅचिंगची घटना, तीन आरोपी पकडले

    Chain snatching incident Bhadravati

    Chain snatching incident Bhadravati : भद्रावती – २० मे रोजी भद्रावती शहरातील शास्त्रीनगर भागात महिलेच्या गळ्यातील सोन जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती, याबाबत पोलिसात तक्रार दिल्यावर भद्रावती पोलिसांनी या प्रकरणात २ आरोपीसह विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेत त्यांच्याकडून सोन्याची चैन जप्त करण्यात आली. Bhadravati police arrest chain snatchers

    राज्यातील पहिले वन नियंत्रण कक्ष चंद्रपुरात

    २० मे रोजी भद्रावती शहरातील शास्त्रीनगर वार्ड मध्ये रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात युवकांनी जबरीने हिसकावली, याबाबत महिलेने भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

    अल्पवयीन बालकाचा गुन्ह्यात समावेश

    पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला असता या प्रकरणी १९ वर्षीय थॉमस अशोक दुधे राहणार नवीन सुमठाना, दानिश बेग राहणार डोलारा तलाव व एका १७ वर्षीय विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले.

    आरोपीजवळून पोलिसांनी चोरी गेलेली १५ ग्राम सोन्याची चैन असा एकूण १ लक्ष ५० हजार रुपयांचा माल हस्तगत केला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी न्योमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाडिवे यांच्या नेतृत्वात पोउपनि गजानन तुपकर, पोलीस कर्मचारी महेंद्र बेसरकर, अनुप आसटूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे व योगेश घाटोळे यांनी केली.

  • VJNT Ashram School Staff Promotion । सुधाकर अडबाले यांच्या पाठपुराव्याला यश, कर्मचाऱ्यांना पदोन्नती लाभ

    VJNT Ashram School Staff Promotion

    VJNT Ashram School Staff Promotion : चंद्रपूर : राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित विजाभज आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती व प्रोत्साहन भत्ता सुरू करण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीद्वारे मागणी केली होती. अखेर शासनाने दखल घेऊन सदर मागणी मंजूर करून त्याबाबतचा शासननिर्णय दिनांक ०४ जून २०२५ रोजी निर्गमित केला  त्यामुळे राज्यातील अनुदानित विजाभज आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. Maharashtra Ashram School Promotion

    चंद्रपूर महावितरणची सुरक्षा रॅली

    आदिवासी नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती ही योजना सामाजिक न्याय विभागाचा शासननिर्णय ३ डिसेंबर २००७ नुसार सुरू केली. मात्र दिनांक १३ मार्च २०२० ला विभागाने शासननिर्णय काढून हे कर्मचारी या लाभास पात्र नाही म्हणून ही योजना बंद करून घेतलेल्या लाभाची वसूली करण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत या आदेशाविरोधात उच्च न्यायालय नागपुर/औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केल्या. Maharashtra Ashram School Staff Promotion GR

    याचिकेचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूने देऊन विभागीय अधिकाऱ्यांनी सहा महिन्याच्या आत निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना लाभ देण्याचे निर्देशित केले. मात्र, दोन वर्षाचा कालावधी होऊनही शासन आपणास हे लाभ मंजुर करत नाही हे लक्षात आल्यावर व्यथित होऊन शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधाकर अडबाले यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

    शेवट्पर्यंत पाठपुरावा

    जिल्हा स्तरापासून तर मंत्रालय स्तरापर्यंत याबाबत पाठपुरावा केला. मात्र, या विभागाचा अनागोंदी कारभार लक्षात आल्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत लक्षवेधी लावली. विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक उत्तर देऊन अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश निर्गमित करण्याच्या सूचना दिल्या. अखेर शासननिर्णय निर्गमित करून आदिवासी नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या सर्व पात्र विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीचे लाभ मंजूर करण्यात आले. त्यामुळे आश्रमशाळा कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

  • Chandrapur wildlife protection control room । चंद्रपुरात वन नियंत्रण कक्षाचे उदघाटन, राज्यातील पहिला प्रयोग

    Chandrapur wildlife protection control room

    Chandrapur wildlife protection control room : चंद्रपूर – चंद्रपूर वनवृत्त अंतर्गत वने आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धन प्रभावीपणे होण्यासाठी तसेच मानव – वन्यजीव संघर्षाच्या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर लगेच घटनास्थळी पोहचण्यास लागणारा प्रतिसाद वेळ कमी करण्याच्या उ‌द्देशाने चंद्रपूर येथे सुसज्ज वन नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाचे  तसेच सायबर सेलचे उद्घाटन राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. Forest control center wildlife protection

    महावितरण चंद्रपूरच्या सुरक्षा रॅलीने वेधले लक्ष

                यावेळी आमदार देवराव भोंगळे, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक प्रभुनाथ शुक्ला, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, आनंद रेड्डी, श्वेता बोड्डू आदी उपस्थित होते.

    forest control center wildlife protection

                वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, पोलिस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर वन विभागाने वन नियंत्रण कक्ष तयार केला आहे. वनांशी संबंधित जिल्ह्यात घडणा-या घटना, वाघांचे व बिबट्यांचे हल्ले, आगी लागण्याचे प्रमाण आदी माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा ॲक्टीव्ह करण्याचे काम येथून केले जाईल. चंद्रपूरचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतरही संवेदनशील भागात व प्रत्येक सर्कलमध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी वनमंत्र्यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.

    वन नियंत्रण कक्षाची माहिती

     सदर नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक (१८००३०३३) हा आहे. या कक्षातून चंद्रपूर वनवृत्तातील विभागाविषयी माहिती, विभागातील कामकाजाविषयी माहिती मिळण्यास मदत होते. तसेच काही तक्रार असल्यास त्याचे निराकरण या कक्षाच्या माध्यमातून केले जाईल. या कक्षाच्या माध्यमातून चंद्रपूर वनवृत्त व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मधील सर्व वन कर्मचाऱ्यांचे तसेच शासकिय वाहनांचे रिअल टाईम लोकेशन मिळण्यास मदत होते. जेणेकरून कुठे घटना घडल्यास जवळपास असलेल्या कर्मचाऱ्यांचे लोकेशन बघून घटनास्थळी लवकर पोहचता येईल. Forest control room incident management system

    वन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून येथे 24 तास कमर्चारी उपस्थित आहेत. सदर कक्षामार्फत वन कमर्चाऱ्यांकरीता फॉरेस्ट कंट्रोल नावाचे ॲन्ड्राईड ॲप तयार करण्यात आले आहे. सदर एप्लीकेशन हाताळण्याबाबत वनरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकारी पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाला एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यास सदर घटनेची माहिती तात्काळ संबंधित वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना ॲपच्या माध्यमातून लगेच प्राप्त होते. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे वनरक्षकास तात्काळ घटनास्थळी पोहचून कार्यवाही करण्यात मदत मिळते. Wildlife human conflict rapid response

    कार्यवाही पूर्ण झाल्यावर ॲपच्या टिकिटमध्ये घटनेविषयी संपूर्ण माहिती भरली जाते. तसेच सदर माहिती कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित भरली किंवा नाही याची खात्री संबंधित वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी करून नंतर टिकिट बंद केल्या जाते. वन नियंत्रण कक्षाद्यारे शासकीय वाहनांमध्ये सुद्धा कन्सोल स्क्रीन बसविण्याचे काम करण्यात आले आहे. या स्क्रीनमध्ये फॉरेस्ट कंट्रोल ॲपचे लॉगिन करण्यात आले आहे. यामुळे अधिकारी दौऱ्यावर असल्यास त्यांच्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या घटनांची माहिती शासकीय वाहनात मिळण्यास मदत होते. तसेच एखाद्या ठिकाणी मोठी घटना घडल्यास सदर घटनास्थळाच्या जवळपास असणाऱ्या वाहनास नियंत्रण कक्षाद्यारे माहिती देऊन लवकरात लवकर घटनास्थळावर पोहचता येईल.

    1. चंद्रपूर वन्यजीव नियंत्रण कक्ष म्हणजे काय?

    हा एक सुसज्ज नियंत्रण कक्ष आहे जो वन व वन्यजीवाशी संबंधित आपत्कालीन घटनांवर वेळीच प्रतिसाद देतो.

    2. या नियंत्रण कक्षाची आवश्यकता का भासली?

    मानव-वन्यजीव संघर्ष, आगीची माहिती, वाघ/बिबट्याचे हल्ले यावर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी ही यंत्रणा आवश्यक ठरली.

    3. नियंत्रण कक्षात कोणकोणत्या सुविधा आहेत?

    टोल-फ्री नंबर, रिअल टाईम लोकेशन ट्रॅकिंग, अँड्रॉईड अ‍ॅप, 24 तास सेवा व शासकीय वाहनांमध्ये स्क्रीन बसविण्याची सोय.

    4. सामान्य नागरिकांना याचा फायदा कसा होतो?

    कोणतीही वन्यजीव घटना घडल्यानंतर टोल-फ्री क्रमांकावर माहिती दिल्यास वन अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचू शकतात.

    5. ही प्रणाली इतर जिल्ह्यांत सुरू केली जाणार आहे का?

    होय, चंद्रपूरचा यशस्वी प्रयोग पाहून ही संकल्पना राज्यातील अन्य संवेदनशील भागांतही राबवली जाणार आहे.
  • MSEDCL safety awareness week । वीज सुरक्षा सप्ताहात बाईक रॅलीने वीज अपघातांबाबत जनजागृती

    MSEDCL safety awareness week

    MSEDCL safety awareness week : चंद्रपूर : वीज ग्राहकांच्यात वीज अपघाता बाबत जागरूकता निर्माण व्हावी, वीज अपघातांचे प्रमाण शून्यावर यावे म्हणून महावितरणने ‘विदयूत सुरक्षा सप्ताह’ (बाईक रॅली) चे आयोजन केले होते. चंद्रपूरचे मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे, संध्या चिवंडे अधिक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ, रमेश सानप अधीक्षक अभियंता (पा.आ.) यांच्या हस्ते या ‘विदयूत सुरक्षा सप्ताह'(बाईक रॅली) ला झेंडा दाखवून सुरुवात झाली. bike rally for safety awareness

    चंद्रपुरात राष्ट्रीय वन महिला परिषदेचे उदघाटन


    दि. 05 जून 2025ला ‘विदयूत सुरक्षा सप्ताह’ (बाईक रॅली) ला चंद्रपूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे, चंद्रपूर मंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, रमेश सानप अधीक्षक अभियंता (पा.आ.), विदयूत निरीक्षक कोलते, सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं.) श्री. सुशिल विखार, आणि श्री. विशाल पिपरे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी तसेच कार्यकारी अभियंते सर्वश्री. दारव्हेकर, वंदिले, शहाडे, निचत (चाचणी विभाग), सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने बाईक रॅलीत उपस्थित होते.


    “आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रीद घेऊन चंद्रपूर महावितरणच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात दि.१ ते ६ जून २०२५ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून चंद्रपूर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी चंद्रपूर परिमंडळ मुख्यालय बाबूपेठ ते जटपुरा गेट, वन अकॅडमी व परत मुख्यालय बाबूपेठ पर्यंत बाईक रॅलीदवारे विदयूत सुरक्षा सप्ताह विषयी जनजागृती करण्यात आली.
    यावेळी कर्मचाऱ्यांनी वीज सुरक्षेचे संदेश देणारे फलक हातात पकडले होते तसेच वीज सुरक्षेबाबत विविध घोषणाही देण्यात आल्या. Mahavitaran electricity safety program

    bike rally for safety awareness

    ‘विद्युत भवन’ या परिमंडल कार्यालयात आल्यानंतर मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे व संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ, यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना वीज सुरक्षेबाबत व वसुंधरा अभियान माध्यमातून नैसर्गिक परिसंस्थाचे जतन व संवर्धन करण्यासाठी विविध महावितरणच्या कार्यालयातील परिसरात वक्षारोपन करण्यात आले त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे श्री उपाध्याय व देशमुख अंबुजा सिमेंट यांनी विद्युत सुरक्षा बद्दल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले आणि कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

    1. MSEDCL Safety Awareness Week काय आहे?

    MSEDCL Safety Awareness Week ही महावितरण कंपनीने आयोजित केलेली एक विशेष मोहीम आहे ज्यामध्ये वीज अपघातांबद्दल जनजागृती केली जाते.

    2. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

    या आठवड्याचे उद्दिष्ट म्हणजे “शून्य अपघात धोरण” राबवणे आणि वीज सुरक्षा नियमांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे.

    3. कोणकोणत्या उपक्रमांचा समावेश असतो?

    या आठवड्यात बाईक रॅली, वीज सुरक्षा प्रात्यक्षिके, फलक प्रदर्शन, वृक्षारोपण व जनजागृतीपर भाषणे यांचा समावेश असतो.

    4. सामान्य नागरिक यामध्ये कसे सहभागी होऊ शकतात?

    स्थानिक कार्यालयातून माहिती घेऊन, जनजागृती उपक्रमात सहभाग घेता येतो. वीज सुरक्षा नियमांचे पालन करून आपण या मोहिमेस हातभार लावू शकतो.