Revenue Officer caught red-handed taking bribe । चंद्रपुरात सुट्टीच्या दिवशी लाचखोरी, ३० हजारांची लाच घेताना सहायक महसूल अधिकाऱ्याला अटक

Revenue Officer caught red-handed taking bribe

Revenue Officer caught red-handed taking bribe : चंद्रपूर – प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पुनर्पडताळणी अहवाल पाठविण्यासाठी जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितली, विशेष बाब म्हणजे आरोपी सहायक महसूल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी कार्यालयात बोलाविले होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने ३० हजार रुपयाची लाच घेताना सहायक महसूल अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली.

Atm फोडणाऱ्या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

तक्रारदार हे चंद्रपुरातील रहिवासी आहे, त्यांची चारगाव तालुका भद्रावती मधील घर व खुली जागा औष्णिक वीज केंद्रात गेली असल्याने त्या मालमत्तेवर तक्रारदार यांच्या मुलीचे नाव प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून नामनिर्देशित केले होते. राज्य वीज निर्मिती मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तक्रारदार यांची मुलगी हि प्रकल्पग्रस्त राखीव जागेतून कनिष्ठ अभियंता पदासाठी पात्र झाली, मात्र राखीव जागेतून निवड झाली असल्याने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुनर्पडताळणी करणे आवश्यक होते, त्याकरिता यासंदर्भात जुलै २०२५ मध्ये जिल्हा पुर्नवसन कार्यालयाचे पत्र प्राप्त झाले होते.

तक्रारदार यांनी मुलीसह जिल्हा पुनर्वसन कार्यालय गाठत सहायक महसूल अधिकारी नरेन्द्र खांडेकर यांची भेट घेत विचारपूस केली, त्यावेळी मुलीच्या नोकरीसाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुनर्पडताळणी करीत त्याचा अहवाल महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित मुंबई यांना पाठविण्यासाठी खांडेकर यांनी तक्रारदाराला २ लाख रुपयांची लाच मागितली, तडजोडीअंती १ लाख रुपये व अहवाल तयार झाल्यावर ३० हजार रुपये देण्याचे ठरले. जुलै महिन्यात तक्रारदार यांनी १ लाख रुपये नरेन्द्र खांडेकर यांना दिले होते. Chandrapur Latest News

तर अहवाल पाठविणार नाही

२६ सप्टेंबर रोजी तक्रारदार यांनी खांडेकर यांना संपर्क करीत पुनर्पडताळणी अहवाल पाठविला का याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले कि कार्यालयात येऊन उर्वरित ३० हजार रुपये द्या तेव्हा अहवाल पाठविणार अन्यथा नाही असे सांगितले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २८ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर मध्ये याबाबत तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यावर रविवारी २८ सप्टेंबर रोजी खांडेकर यांनी ३० हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली. Chandrapur Revenue Officer Arrested

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत प्रशासकीय भवन येथील उपजिल्हाधिकारी पुनर्वसन कार्यालय चंद्रपूर मध्ये ३० हजार रुपये स्वीकारताना नरेंद्र खांडेकर यांना पंचासमक्ष रंगेहात अटक केली. याबाबत पुढील तपास सुरु आहे.

सदरची यशस्वी कारवाई सागर कवडे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर नागपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी हिवराज नेवारे, विजेंद्र वाढई, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, राजेंद्र चौधरी, सचिन गजभिये, महेश माहूरपवार, मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे व सतीश सिडाम यांनी केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *