illegal police entry without warrant । युवकाला अमानुष मारहाण, चंद्रपूर पोलिसांवर गंभीर आरोप

illegal police entry without warrant

illegal police entry without warrant : चंद्रपूर – पिडीत युवक आनंद गेडाम ची आई अनिता गेडाम यांनी पत्रकार परिषदेत घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करणाया आणि तिच्या मुलाला जबरदस्तीने घेऊन जाणाया आणि अमानुष अत्याचार करणाया पोलिस अधिकारी आणि त्यांच्या पथकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तिने सांगितले की, ती मित्रनगर येथील डॉ. आंबेडकर कॉलेजच्या मागे राहते.

रस्ते अपघातात बिबट्याचा मृत्यू

24 तारखेच्या रात्री १ वाजता पोलिस अधिकारी देवराव नरोटे आणि त्यांच्या पथक समेत चार महिला पोलिस होते. त्यांनी कोणतीही सूचना आणि वॉरंटशिवाय घराचे गेट तोडले आणि दगडफेक करून बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. यादरम्यान त्यांनी घरातील लोकांना शिवीगाळ केली आणि धमकी दिली. आनंदचा फोटो घ्यायचा आहे असे सांगून मनमानी पध्दतीने वागण्यास सुरुवात केली. chandrapur police brutality case

पोलिस कर्मचायांचे असे वर्तन पाहून तिचा मुलगा आनंद गेडाम घरातून पळून गेला. लवकरच पोलिस अधिकारी आणि त्यांच्या पथकाने त्याला पकडले, रागंबर आणि ठाकूरच्या घरी नेले आणि तेथे अमानुष मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध अवस्थेत त्याला गल्लीत फेकून देण्यात आले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला सरकारी रुग्णालयात पाठवले आणि पोलिस तेथून निघून गेले असा आरोप पिडीत युवकाची आई अनिता गेडाम यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांवर केला. victim rights in police brutality cases

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल

तिने पुढे सांगितले की, दुस_या दिवशी फोन येताच कुटुंब त्याला सरकारी रुग्णालयात भेटण्यासाठी गेले. पिडीत आनंदची प्रकृती खूपच गंभीर होती. सीटी स्कॅन आणि इतर चाचण्यांनंतर डॉक्टरांनी त्याला तात्काळ नागपूर मेडिकलमध्ये रेफर केले. सध्या आनंद खाजगी पोद्दार रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहे आणि त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. आनंद गेडाम यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती अनिता गेडाम यांनी दिली.

Somayya institute of technology
पीडित अनिता गेडाम यांनी पोलीस अधिकारी देवराव नरोटे आणि त्यांच्या टीमवर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर मानवाधिकार उल्लंघनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रपरिषदेच्या माध्यमातुन केली आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक देवराव नरोटे यांच्याशी अधिक माहिती करीता व त्यांची बाजू जाणून घेण्याकरिता संपर्क साधला असता त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही.

या उपरांत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद गेडाम यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर MPDA कायद्यांतर्गत कारवाई करायची असल्याने पोलीस पथक त्याला ताब्यात घेत जिल्हाधिकारी यांच्यासमोर हजर करणार होते, मात्र त्या कालावधीत आनंद च्या आईने पोलिसांचा रस्ता अडविला तब्बल २ तास पोलिसांसोबत बाचाबाची झाली आणि आनंद हा घरातील कवेलु काढत पळून गेला, पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो ३ मजली इमारतीवर लपला मात्र पोलीस येण्याची चाहूल लागताच त्याने दुसऱ्या मजल्यावर टिनाच्या शेड वर उडी मारली आणि पडला, यामध्ये तो जखमी झाला. पण पोलिसांनी आनंद ला सोबत घेत याआधी रुग्णालयात दाखल केले. युवकाच्या आईने केलेले सर्व आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *