police caught suspects with sword in car
police caught suspects with sword in car : बल्लारपूर, २७ जून २०२५: चंद्रपूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धारदार तलवारीसह तीन इसमांना अटक केली आहे. आरोपींमध्ये चंद्रभूषण राजदेव चव्हाण, रवी प्रभाकर दोडके (दोघे रा. चंद्रपूर) आणि योगेश बंडूजी कुडकेलवार (रा. बामणी, बल्लारपूर) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. sharp weapon recovered during police raid
हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला अटक
आरडाओरड आणि गुन्हा उघड
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२६ जून २०२५) बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना खबर मिळाली की, पेपर मिलच्या तीन नंबर गेटजवळ एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीमध्ये तीन अज्ञात इसम आरडाओरडा करत आहेत. या माहितीच्या आधारे, तात्काळ पोलीस पथक पंचांसह घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना तीन व्यक्ती आरडाओरडा करताना आढळले. त्यांची नावे विचारली असता त्यांनी वरीलप्रमाणे आपली ओळख सांगितली. आरडाओरडा करण्याचे कारण विचारले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांना संशय आल्याने, पंचांच्या उपस्थितीत त्यांच्या गाडीची झडती घेण्यात आली. त्यावेळी गाडीमध्ये एक धारदार लोखंडी तलवार आढळून आली. पोलिसांनी तात्काळ तलवार आणि पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी (क्र. MH 34 AM 0134) ताब्यात घेतली. तिन्ही आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ४४५/२०२५, कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास पोहेकॉ सुनील कामतकर हे करत आहेत. Indian arms act section 25 explained
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, राजूरा श्री. सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पडली. या कारवाईत सपोनि मदन दिवटे, पोउपनि अभिषेक जंगमवार, सफौ आनंद परचाके, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सुनील कामतकर, पो. अंमलदार विकास जुमनाके, शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी, मिलिंद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, गुरु शिंदे, सचिन राठोड, भास्कर चिचवलकर, म.पो. अंमलदार अनिता नायडू, चापोअं विना येलपुलवार इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या घटनेमुळे बल्लारपूर परिसरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Leave a Reply