swayam portal hostel admission last date
swayam portal hostel admission last date : चंद्रपूर – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याकरीता मुलांचे 12 (चंद्रपुर – 2, राजुरा – 2, गडचांदूर, कोरपना, जिवती, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभुर्णा व गोंडपिपरी येथे प्रत्येकी एक) व मुलींचे 11 (चंद्रपुर – 2, राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा व गोंडपिपरी येथे प्रत्येकी एक) असे एकूण 23 वसतिगृह कार्यरत आहेत. सन 2025-26 करीता रिक्त जागांवर प्रवेशाकरोता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीवर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. how to apply for government tribal hostel online
बकर ईद शांततेत पार पाडा – चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जिल्हास्तरावर चंद्रपुर येथे मुलांचे 2 व मुलींचे 2 असे एकूण 4 वसतिगृह कार्यरत असून या वसतिगृहांमध्ये इयत्ता 11 ते पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमांस प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळणार आहे. तसेच उर्वरीत 19 वसतिगृहांमध्ये वर्ग 8 वी पासून पुढे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे.
वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरतांना सदर प्रणालीमध्ये दिलेल्या सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे व त्यात दिलेल्या कागदपत्रांची जोडणी करण्यात यावी. वसतिगृहातील ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपला अर्ज फक्त रिनीव्हल करायचा आहे, नविन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज भरलेल्या दिनांकापासुन आपण निवडलेल्या वसतिगृहात एक आठवड्याच्या आत सादर करावे. how to apply for government tribal hostel online
वसतिगृह प्रवेशाचे संकेतस्थळ पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 31 जुलै 2025 पर्यंत व व्यावसायीक अभ्यासक्रमांकरीता 31 ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू राहणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.
1. What is the last date for hostel admission on Swayam Portal?
2. Who can apply for hostel admission through the Swayam Portal?
3. Where should I apply for tribal hostel admission in Maharashtra?
4. What documents are required for hostel admission?
Marksheet of the last passed exam
Aadhaar card
Income certificate
Domicile certificate
Passport size photo
Leave a Reply