Fish market development fund approval
Fish market development fund approval : चंद्रपूर – पंतप्रधान विकास निधी अंतर्गत बंगाली कॅम्प येथील मच्छी मार्केटसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी म्हणजे आपल्या सर्वांच्या विकासाची नवी दिशा आहे. या नव्या मार्केटच्या कामामुळे काही व्यापाऱ्यांना तात्पुरत्या अडचणी येत आहेत, मात्र आपल्या सर्व अडचणी सोडविल्या जातील, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून नवे मार्केट उभे होईपर्यंत आपला व्यवसाय व्यवस्थित चालावा यासाठी लगतची जागा आरक्षित केली आहे. येथे स्वच्छता, पाणी, स्वच्छतागृह, प्रत्येक व्यापाऱ्याला तात्पुरते मीटर, जाण्यासाठी मार्ग आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत.

आज जनसंपर्क कार्यालयात मच्छी व्यावसायिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी त्या सर्व समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते सुभाष कासनगोट्टूवार, चंदू वासाडे, विश्वजीत शहा, गोपाल दिवाण, रामजय राजवंशी, अशोक दत्ता, नारायण दास, संजय रॉय, नरथ्थम दास, संजय बिश्वास आदींची प्रमुख उपस्थिती होती. Temporary market space for fish vendors
विदर्भातील सर्वात उत्तम मच्छी मार्केट
यावेळी व्यापाऱ्यांशी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, तुमच्या मागण्या मी गांभीर्याने ऐकल्या आणि लक्षात घेतल्या आहेत. कोणत्याही व्यापाऱ्याचे नुकसान होऊ देणार नाही. विदर्भातील सर्वात उत्तम मच्छी मार्केट बनविण्याचा आमचा प्रामाणिक संकल्प आहे. या मार्केटमुळे केवळ परिसराचा विकास होणार नाही, तर सर्वांना एक सुसज्ज, सुरक्षित आणि स्वच्छ जागा मिळणार आहे. या मार्केटमध्ये मोठ्या व्यापाऱ्यांसह लहान व्यापाऱ्यांचाही सन्मान आणि विचार करण्यात आला आहे. त्यामुळे छोटे व्यापारी आणि गाडेधारक यांच्यासाठीही खास जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.
चंद्रपुरात धक्कादायक घटना? आपल्याला माहितेय काय घडलं?
काम पूर्ण होईपर्यंत व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुरु राहिली पाहिजे. यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शेजारील जागा मच्छी विक्रेत्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. तिथे नळ, लाईट आणि पाण्याची योग्य सोय केली जाईल. आपल्या मच्छी मार्केटचा विकास हा केवळ इमारत उभारण्याचा प्रश्न नाही, तर हा तुमच्या हक्कांचा सन्मान आणि तुमच्या व्यवसायाच्या वृद्धीचा प्रश्न आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी मच्छी व्यावसायिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Leave a Reply