Tag: निधी मंजूर

  • Fish market development fund approval । मच्छी बाजाराचा विकास: ५ कोटींचा निधी मंजूर, व्यापाऱ्यांची चिंता आमदार जोरगेवारांनी केली दूर

    Fish market development fund approval

    Fish market development fund approval : चंद्रपूर – पंतप्रधान विकास निधी अंतर्गत बंगाली कॅम्प येथील मच्छी मार्केटसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी म्हणजे आपल्या सर्वांच्या विकासाची नवी दिशा आहे. या नव्या मार्केटच्या कामामुळे काही व्यापाऱ्यांना तात्पुरत्या अडचणी येत आहेत, मात्र आपल्या सर्व अडचणी सोडविल्या जातील, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून नवे मार्केट उभे होईपर्यंत आपला व्यवसाय व्यवस्थित चालावा यासाठी लगतची जागा आरक्षित केली आहे. येथे स्वच्छता, पाणी, स्वच्छतागृह, प्रत्येक व्यापाऱ्याला तात्पुरते मीटर, जाण्यासाठी मार्ग आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत.

    chandrapur fish market

    आज जनसंपर्क कार्यालयात मच्छी व्यावसायिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी त्या सर्व समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते सुभाष कासनगोट्टूवार, चंदू वासाडे, विश्वजीत शहा, गोपाल दिवाण, रामजय राजवंशी, अशोक दत्ता, नारायण दास, संजय रॉय, नरथ्थम दास, संजय बिश्वास आदींची प्रमुख उपस्थिती होती. Temporary market space for fish vendors

    विदर्भातील सर्वात उत्तम मच्छी मार्केट

    यावेळी व्यापाऱ्यांशी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, तुमच्या मागण्या मी गांभीर्याने ऐकल्या आणि लक्षात घेतल्या आहेत. कोणत्याही व्यापाऱ्याचे नुकसान होऊ देणार नाही. विदर्भातील सर्वात उत्तम मच्छी मार्केट बनविण्याचा आमचा प्रामाणिक संकल्प आहे. या मार्केटमुळे केवळ परिसराचा विकास होणार नाही, तर सर्वांना एक सुसज्ज, सुरक्षित आणि स्वच्छ जागा मिळणार आहे. या मार्केटमध्ये मोठ्या व्यापाऱ्यांसह लहान व्यापाऱ्यांचाही सन्मान आणि विचार करण्यात आला आहे. त्यामुळे छोटे व्यापारी आणि गाडेधारक यांच्यासाठीही खास जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.

    चंद्रपुरात धक्कादायक घटना? आपल्याला माहितेय काय घडलं?

    काम पूर्ण होईपर्यंत व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुरु राहिली पाहिजे. यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शेजारील जागा मच्छी विक्रेत्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. तिथे नळ, लाईट आणि पाण्याची योग्य सोय केली जाईल. आपल्या मच्छी मार्केटचा विकास हा केवळ इमारत उभारण्याचा प्रश्न नाही, तर हा तुमच्या हक्कांचा सन्मान आणि तुमच्या व्यवसायाच्या वृद्धीचा प्रश्न आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी मच्छी व्यावसायिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • चंद्रपूर जिल्ह्यात उभे राहणार 52 नवीन तलाठी कार्यालय

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ग्रामीण भागात नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच गावपातळीवरील प्रशासकीय कारभार उत्तम रितीने चालावा, यासाठी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारामुळे 52 नवीन तलाठी कार्यालयाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत महसूल व वनविभागाने 17 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

     

    चंद्रपूर हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असल्याने तेथील गावांमध्ये प्रशासकीय कामकाम उत्तमरित्या चालावे, गावातील नागरिकांना आवश्यक असलेले महत्वाचे दाखले, कृषीविषयक नोंदी / कागदपत्रे वेळेत मिळावेत, यासाठी नवीन तलाठी कार्यालयांची आवश्यकता होती. याबाबत प्रशासनाकडून सुरवातीला 7 कोटी 80 लक्ष रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र कर्मचा-यांच्या निवासस्थानासह तलाठी कार्यालयाची निर्मिती करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सुचना केल्या. त्यानुसार विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला. राज्य शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी दिली असून नवीन तलाठी कार्यालय व कर्मचा-यांच्या निवासस्थानाचा मार्ग मोकळा झाला आहे. यात पोंभुर्णा तालुक्यात 11, चंद्रपूर तालुक्यात 6, बल्लारपूर तालुक्यात 7 आणि मुल तालुक्यात 28 असे एकूण 52 नवीन तलाठी कार्यालये उभारण्यात येणार आहे.

     

    गावपातळीवरील राज्य शासनाचा महत्वाचा घटक म्हणून तलाठ्यांकडे अनेक प्रशासकीय कामे सोपविण्यात आली आहेत. यात गावपातळीवरील 21 गाव नमुने तयार करणे, ते अद्ययावत करणे, वारसान नोंदी घेणे, खरेदी-विक्री व्यवहारानुसार सातबारावर फेरफार नोंदी घेणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानीचे पंचनामे करणे, नागरिकांना नुकसान भरपाईबाबत प्रक्रिया राबविणे, त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणे, रहिवासी व उत्पनाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र नागरिकांना उपलब्ध करून देणे, गावाची पैसेवारी निश्चित करणे, पीक कापणी प्रयोग, ई-पीक पाहणी आदी महत्वाच्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, कृषी गणना करणे, सातबारा वाटप करणे, ऑनलाईन सातबारा नागरिकांना उपलब्ध करून देणे आदी महत्वाच्या कामामुळेच तलाठी हा गावपातळीवरील प्रशासनाचा मुख्य कणा मानला जातो.

     

    या ठिकाणी होणार नवीन तलाठी कार्यालये

    पोंभुर्णा तालुक्यातील वेळवामाल, चेकबल्लारपूर, डोंगरहळदी, उमरी पोतदार, घोसरी, देवाडा (बुर्ज), देवाडा (खुर्द), नवेगाव मोरे, जाम तुकुम, फुटाना मोकासा आणि चेक ठाणेवासना. चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर, पिंपळखुट, जुनोना, पद्मापूर, बोर्डा, दुर्गापूर चांदा रयतवारी. बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, मानोरा, कवडजाई, कळमना, विसापूर, कोठारी, बामणी, मूल तालुक्यातील मरेगाव, भादुर्णी, उश्राळाचक, केळझर, राजगड, पिपिरी दीक्षित, भेजगाव, चिंचाळा, सुशी दाबगाव, ताडाळा, नांदगाव, मूल, राजोली, नवेगाव, कोसंबी, कांतापेठ (रै), चिरोली, गडीसुर्ला, बोंडाळा (भुज), मारोडा, चिखली माल, चिमढा, हळदी गावगन्ना, बोरचांदली, सिंताळा, जुनासुर्ला, बेलघाटा माल आणि डोंगरगाव येथे नवीन तलाठी कार्यालय निर्माण होणार आहे.