leopard dies in village well । शिकारीच्या मागावर गेलेल्या बिबट्याचा विहिरीत पडून अंत

leopard dies in village well

leopard dies in village well : मूल:- तालुक्यातील आगडी येथे एका अंदाजे पाच वर्षीय नर बिबट्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज, बुधवार सकाळी उघडकीस आली.

आगडी येथील रहिवासी बाबूराव निकोडे यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत हा बिबट्या रात्रीच्या सुमारास पडला असावा. विहिरीतून बाहेर पडणे शक्य न झाल्याने त्याचा पाण्यातच मृत्यू झाला.

आज सकाळी बाबूराव निकोडे आपल्या गाईच्या गोठ्याकडे गेले असता, त्यांना विहिरीत बिबट्या दिसला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती वनविभागाला दिली.

अम्मा कि पढाई, गरजू विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

घटनेची माहिती मिळताच, प्रभारी सहाय्यक उपवनसंरक्षक नायगमकर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके, क्षेत्र सहाय्यक नंदकिशोर पडवेकर, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार आणि वनरक्षक अनिल नालमवार यांचा समावेश होता.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृत बिबट्याला चंद्रपूर येथे पाठवण्यात आले.

शिकारीच्या मागे धावताना घडला प्रसंग

प्राथमिक अंदाजानुसार, बिबट्या शिकारीच्या मागे धावताना विहिरीत पडला असावा, असा कयास व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. leopard death due to drowning

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *