Chandrapur cricket betting । चंद्रपूरात क्रिकेट बुकींचा राज: पोलिसांच्या कारवाईनंतरही धंदा चालूच

Chandrapur cricket betting

Chandrapur cricket betting : चंद्रपूर जिल्ह्यात मागील ५ वर्षांपासून गुन्हेगारीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढ्लेला आहे,ऑफलाईन गुन्हेगारी सह आता ऑनलाईन गुन्हेगारीने सुद्धा यामध्ये भर घातली आहे. सायबर फ्रॉड आणि ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याने सध्या तरुणाईला प्रचंड वेड लावले आहे. चंद्रपुरात अनेक क्रिकेट बुकी राहतात त्यांना कायद्याचा मुळीच धाक नाही, हे क्रिकेट बुकी मुजोरीने आपलं काम करतात. वर्ष २०२५ मध्ये पोलिसांनी आयपीएल सुरु होण्यापूर्वीच क्रिकेट बुकी वर कारवाईची मोहीम राबवली आहे. online betting police action

कुणाल कामरा वर कारवाई करा, शिवसेनेची मागणी

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे क्रिकेट बुकींच्या मनात धडकी भरली आणि यामधील काही बुकींनी जिल्ह्यातून ऑफलाईन पळ काढला मात्र अजूनही सर्व बुकी आयपीएल च्या माध्यमातून सट्टेबाज सोबत ऑनलाईन संपर्कात आहे.

मागील वर्षी पोलिसांच्या कारवाईमुळे काही बुकी गोव्याला पळाले तर काही नागपुरात जात तिथून आपल्या व्यवसाय सुरु ठेवला होता. यंदा तेच चित्र आहे, काहींनी पळ काढला तर काही जिल्ह्यातील फार्महाउस व रिसॉर्ट मध्ये आपलं बस्तान मांडल्याची माहिती आहे. क्रिकेट बुकी ऑफलाईन बाहेर पळाले असले तरी त्यांचं काम मात्र बेधडकपणे सुरूच आहे. IPL illegal betting news

याचाच अर्थ या बुकींना कुणीतरी सहकार्य करीत आहे. धंदा करण्याची बोलणी फिस्कटली असली तरी अदृश्य हात या क्रिकेट बुकींच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. सध्या नीरज चा बंटी याच्या खांद्यावर धंदा चालविण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. राकेश सुद्धा आपलं स्थान बदलवित इकडे तिकडे फिरत आहे.

दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत असते नेमकं त्याचवेळी यांच्यावर कारवाई करण्यात येते, विशेष म्हणजे क्रिकेट व्यतिरिक्त हा सट्टा फुटबॉल स्पर्धा, कबड्डी वर पण लावण्यात येतो आणि त्याचे म्होरके हे चंद्रपुरातील आहे. पोलीस विभागाने या क्रिकेट बुकींवर प्रतिबंधात्मक कारवाई सहित एमपीडीए या कलम अंतर्गत थेट कारागृहात यांची रवानगी करावी अशी मागणी आता नागरिकांतर्फे होताना बघायला मिळत आहे. MPDA act against bookies

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *