mobile phone thefts
mobile phone thefts : अवघ्या 2 सेकंदात खिशातून मोबाईल लंपास करण्याचा प्रकार 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता चंद्रपूर शहरातील बाजार समिती मध्ये घडला.
ताजा भाजीपाला घेण्यासाठी नागरिक सकाळी चंद्रपूर शहरातील बाजार (morning theft live) समिती रामनगर येथे जातात, मात्र गर्दी झाल्यावर काही चोर त्याठिकाणी आपली हात सफाई दाखवितात.
रामनगर पोलिसांनी पकडला नायलॉन मांजा
असाचं एक प्रकार 2 डिसेंम्बर रोजी बाजार समिती मधील भंडारी यांच्या लहसून विक्री दुकानात घडला.
चाळीशी पार एक नागरिक आपल्या शर्टाच्या वरच्या खिशात मोबाईल ठेवत लहसून खरेदी करीत असतो त्यावेळी जॅकेट व टोपी परिधान केलेला युवक लहसून घेण्यासाठी त्या दुकानात येतो.
सकाळी मॉर्निंग वॉक ला गेले आणि 50 हजार गमावून बसले
त्याचक्षणी त्या युवकाची नजर खिशात ठेवलेल्या मोबाईल वर पडते, आणि तो थांबत संधीची वाट बघतो.
तितक्यात ते गृहस्थ लहसून घेत आपल्या पिशवीत टाकण्यासाठी खाली वाकतात आणि अवघ्या 2 सेकंदात जॅकेट परिधान केलेला युवक लहसून घेण्याचं नाटक करीत पिशवी त्या गृहस्थाच्या जवळ नेत त्यांच्या खिशातील मोबाईल लंपास करतो.
त्यानंतर त्या गृहस्थाला शंका येते, ते काही वेळ युवकाकडे बघत आपल्या पिशवीतील भाजीपाला तपासतात मात्र त्यांचं लक्ष खिशातून लंपास झालेल्या मोबाईल वर पडत नाही.
काही वेळाने ते गृहस्थ तिथून निघून जातात मोबाईल चोरणारा युवक मोबाईल पिशवीच्या बाहेर काढत आपल्या खिशात टाकून पोबारा करतो.
आणि अशाप्रकारे आपल्या निष्काळजीपणामुळे खिशातील 38 हजारांचा मोबाईल अवघ्या 2 सेकंदात चोरीला जातो. घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (cctv footage) कैद झाला आहे.
याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीची फिर्याद नोंदविल्या गेली असून पोलीस त्या युवकांचा शोध घेत आहे.
Leave a Reply