dead bear cub found । 🐻 मांगली जंगलात मृत अवस्थेत आढळले अस्वलीचे पिल्लू; वनखात्यात खळबळ!

dead bear cub found

dead bear cub found : ब्रह्मपुरी वनविभागातील उपक्षेत्र मिंडाळा नियतक्षेत्र मंगळी कक्ष ४८ मध्ये जंगल गस्त दरम्यान १७ जून रोजी अस्वलीचे अंदाजे १ वर्षे वयाचे पिल्लू मृत अवस्थेत आढळले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असता घटनास्थळी अधिकाऱ्यांनी पोहचत माहिती घेतली.

नोंदणी व मुद्रांक विभागात मोठी पदभरती

वनरक्षक एलएस गावंडे ह्या जंगल गस्त करीत असताना त्यांना मांगली बनवाही रस्त्यालगत वन्यप्राणी अस्वल नर वय अंदाजे १ वर्षे हे मृत अवस्थेत आढळून आले, त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली असता घटनास्थळी एआर कन्नमवार हे दाखल झाले.

अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी मौका स्थळाची पाहणी केली, मृत अस्वलाच्या शवाचे निरीक्षण केले असता पिल्लाच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळूंन आल्या. यावेळी वन वसाहत परिसरात त्या पिल्लाचे शव विच्छेदन करीत दहन करण्यात आले.

हिंस्त्र प्राण्याचा हल्ला

सदर अस्वलीचे पिल्लू हे हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होत मृत पावल्याचा अंदाज यावेळी लगावण्यात आला. याबाबत वनगुन्हा नोंदविण्यात आला असून याबाबत उपवनसंरक्षक राकेश सेपट, एमबी गायकवाड सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *