Managing business during city roadworks । रस्त्याच्या धुळीने व्यापाऱ्यांचे नुकसान – वेळेत काम पूर्ण होणार का?

Managing business during city roadworks

Managing business during city roadworks : चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर अमृत मिशन अंतर्गत मंजूर सिव्हेज पाइपलाइन, जलपुरवठा योजना आणि रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी खड्डे आणि धुळीमुळे पादचाऱ्यांना आणि दुकानदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे काम ठेकेदाराच्या नियंत्रणाखाली वेळेत आणि लवकर पूर्ण करण्याची मागणी फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे सोमवारी, २४ मार्च रोजी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

निप्पोन डेन्ड्रॉन कंपनीविरुद्ध महिलांनी पुकारला एल्गार

चंद्रपूर शहरातील दोन्ही मुख्य मार्गांवर अमृत मिशन अंतर्गत मंजूर सिव्हेज पाइपलाइन, जलपुरवठा योजना आणि रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते खोदले गेल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, धुळीचे लोट उडत आहेत. हे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे पादचारी आणि दुकानदार यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्ते खोदल्याने आणि खड्डे बुजवताना उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना अडचणी येत आहेत.

दिवसरात्र उडणाऱ्या धुळीमुळे रस्त्यांवर जाडसर थर जमला आहे. परिस्थिती अशी आहे की, जसेच वाहन जातात तसे धुळीचे लोट संपूर्ण वातावरणात पसरतात. दिवसभर रस्त्यावर धूळच धूळ असते. ही धूळ वाऱ्याद्वारे व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पोहोचत आहे. त्यामुळे दुकानातील वस्त्रसामग्री खराब होत आहे आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. खाद्यपदार्थही प्रदूषित होत आहेत आणि वारंवार स्वच्छता करावी लागत आहे. धूळ इतकी उडते की, श्वास घेणेही कठीण होते. त्यामुळे हे रस्त्याचे काम ठेकेदाराच्या नियंत्रणाखाली वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. Sewage pipeline construction impact on local businesses

chandrapur city news

या वेळी फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष रामकिशोर सारडा, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रामजीवन परमार, संदीप माहेश्वरी, दिनेश बजाज, अनिल ताहीलियानी, पंकज शर्मा, हिरा नारंग, व्यंकटेश उपग्नलावर, मन्नू उमाटे, अमित नथवानी, सागर चिंतावार, राकेश ताहीलीयनी, प्रदीप तोशनिवाल, राजू जोशी, हनुमान बजाज, मनिष राजा, चिराग नथवानी, राम धकाते आदी उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *