join congress party : विजय वडेट्टीवार यांचा वाढता प्रभाव

Join congress party

join congress party वंचीत बहुजन आघाडीचे सावली शहर अध्यक्ष रोशन बोरकर, नितीन दुधे व भाजपचे कार्यकर्ते संतोष कोटरंगे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कार्यावर विश्वास ठेऊन नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यामुळे सावली शहरात इतर पक्षातून काँग्रेस मध्ये इन्कमिंग सुरु असल्याचे चित्र आहे.

राजकारण : उर्जानगर येथील युवकांच्या हाती शिवसेनेची मशाल

Join congress party विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा राज्यात वाढता प्रभाव व शहरातील विकास कामांचा झंझावात बघता इतर पक्षातील कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरु झाली असून वंचित बहुजन आघाडीचे सावली शहर अध्यक्ष रोशन बोरकर, शहर उपाध्यक्ष नितीन दुधे यांनी प्रवेश केला. तर शहरातील भाजपचे कार्यकर्ते संतोष कोटरंगे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश सिंदेवाही तालुक्यातील  येथील कार्यक्रमात विजय वडेट्टीवार, यांचे उपस्थितीत पार पडला.यावेळी पक्ष प्रवेश करणाऱ्या मध्ये सोनी नितीन दुधे, मीनाक्षी मिलिंद वाळके, लोमेश दासरवार, रोहित आलेवार, प्रज्वल पवार, विशाल लाटेलवार, सौरभ गोरडवार, निलेश येनुगवार, रवी वाढई, सुमित लेनगुरे, हर्षद मोहुर्ले, गणेश वाढई, महेश मांदाडे, मिलिंद शेंडे, सुरज लेनगुरे यांचा समावेश आहे.

आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमास सावली काँग्रेस तालुका अध्यक्ष नितिन गोहने, सावली उपनगराध्यक्ष संदिप पुण्यपकार, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, पाणी पुरवठा सभापती सभापती प्रितम गेडाम, नगरसेवक गुणवंत सुरमवार, प्रकाश जक्कुलवार, प्रशांत राईचवार, चंद्रकांत संतोषवार, नगरसेवक मुन्ना रस्ते, आकाश खोब्रागडे, निखिल दुधे, गब्बर दुधे, मयूर दुधे, धम्मदिप बोरकर, अनिकेत वाळके, मिथून गणविर प्रामुख्याने उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *