The crime news : चंद्रपूर जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना

The crime news

The crime news कोरपना अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाची घटना ताजी असताना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.


The crime news सिंदेवाही पोलीस स्टेशन अंर्तगत येत असलेल्या लाडबोरी येथील आरोपी प्रणय सुखदेव नन्नावरे वय 23 वर्षे राहणार लाडबोरी ह्याचे गावातील अल्पवयीन मुली सोबत प्रेम संबध जुडले. त्यांनंतर त्याचे नेहमी भेट गाटी होत असल्याने प्रेमसंबंध अधिक घट्ट झाले. त्यातच आरोपी प्रणय नन्नावरे हे अल्पवयीन मुलीला फुस लाऊन तिच्या सोबत लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले.

पुन्हा वाघांची दहशत, आता थेट रस्त्यावर उतरू – संतोष रावत


त्यानंतर अल्पवयीन मुलीला लग्न करु म्हणुन तीला नागपूर येथे घेऊन गेला. सदर घटनेची माहिती मिळताच मुलीचे वडील याने पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. सदर घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन सिंदेवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सागर महल्ले व त्यांच्या चमुने नागपूर येथे जाऊन आरोपींला अटक केली.
आरोपी ला 137(2),64(2)(M) भाग न्या. स 4,6 पाँक्सो ह्या विविध कलमान्वये अटक करून न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने आरोपीची चंद्रपूर कारागृहात रवानगी केली.

अवश्य वाचा : ख्रिस्ती बांधवांचा कफनपेटी मोर्चा


सदर संपूर्ण घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सागर महल्ले तसेच सिंदेवाही पोलीस पुढील तपास करीत आहेत.

देवा भाऊचा पुढाकार

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *