Local Crime Branch : चंद्रपूर शहरात फिल्मी स्टाईल कारवाई पण…

Local crime branch chandrapur

Local crime branch चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशाने जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा अवैध धंदे व्यावसायिकांवर धडक कारवाई करीत आहे. 11 मे रोजी चंद्रपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने फिल्मी स्टाईल कारवाई करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी हा स्थानिक गुन्हे शाखेच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.

अवश्य वाचा : दारू प्राशन केल्यावर पैश्याचा वाद, मित्राने मित्राची केली हत्या

Local crime branch 11 मे ला स्थानिक गुन्हे शाखा पथकाला सुगंधित तंबाखू बाबत गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे जटपूरा गेट कडून शहरात जाणाऱ्या मार्गावर चारचाकी वाहन क्रमांक mh40 a7877 या वाहनाला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने थाम्बविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने वाहन पुढे नेले आणि रस्त्याच्या कडेला थांबवित तो पळून गेला, त्या वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या डिक्कीत ईगल हुक्का सुगंधित तंबाखू आढळून आला, वाहन सहित एकूण 5 लाख 70 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवश्य वाचा : सुधीर मुनगंटीवार यांनी केली एसआयटी चौकशीची मागणी

या प्रकरणी सतीश उर्फ वैभव उर्फ लादेन गुम्मलवार राहणार जलनगर हा मात्र पोलिसांच्या हातून निसटला.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, संतोष एलपुलवार, नितीन रायपुरे व अमोल सावे यांनी केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *