2024 च्या निवडणुकीपूर्वी देशात पुन्हा दंगली होणार – विजय वडेट्टीवार यांचा दावा

News34

चंद्रपूर – जाती-धर्मात भांडणे लावणे, देशात अस्थिरता निर्माण करणे आणि त्यातून सहानुभूती मिळवून सत्ता काबिज करणे, हे भारतीय जनता पक्षाचे काम आहे. दंगली पेटवूनच भाजप सत्तेत आली आहे, हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

त्यामुळे २०२४ मध्ये सत्तेतून बाहेर फेकल्या जाण्याची चिन्हे दिसताच केंद्रातील भाजप सरकार राममंदिराच्या उद्घाटनाला कारसेवकांना बोलावून तेथे गोधरासारखी परिस्थिती निर्माण करू शकते, अशा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

विरोधी पक्षनेता झाल्यावर विजय वडेट्टीवार हे चंद्रपुरात आले होते, त्यांनी भाजप पक्षबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहे, सत्तेसाठी भाजप पक्ष कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो, राम मंदिर उदघाटन नंतर लोकसभा निवडणुकी पूर्वी देशात पुन्हा गोध्राकांड घडू शकते, ते घडल्यावर सहानुभूती म्हणून भाजप पुन्हा केंद्रात सत्तेवर येऊ शकते असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवार यांच्या दाव्याला भाजप पक्ष काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *