News34
ऊर्जानगर:-दि.१५ आगस्ट २०२३ रोज मंगळवारला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र सुपर एफ चौक ऊर्जानगर वसाहत येथे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे वरिष्ठ व्यवस्थापक वित्त व लेखा विभाग तथा गुणवंत कामगार श्री सुधाकर काकडे साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष मा नरेंद्र रहाटे साहेब राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष व कामगार नेते ,देवराव कोंडेकर अशासकीय सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती ग्रामीण चंद्रपूर ,अशोकराव धमाणे माजी अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वातंत्रदिनानिमित्य त्याचे महत्व सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या व शिशुमंदिरच्या बाल गोपालांना खाऊचे व चॉकलेटचे वितरण करण्यात आले.
यावेळी गुणवंत कामगार दिनकर मशाखेत्री,राजू भजनकर, राजेंद्र पोईनकर,धनराज सपकाळे,सचिन पाटील,शत्रूघन येरगुडे व ऊर्जानगर वसाहतीतील कामगार व कुटुंबीय, शिशुमंदिरचे विद्यार्थी पालक व केंद्राचे कर्मचारी मोहना खोब्रागडे केंद्र संचालिका,कविता चौहान,सुवर्णा उपरे कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहना खोब्रागडे यांनी केले तर आभार सुवर्णा उपरे यांनी मानले.
Leave a Reply