News34
बल्लारपूर : चंद्रपूर वरून आईल वाहतूक करणारा टँकर बल्लारपूर कडे जात होता. वाहन भरधाव वेगाने जात असताना विसापूर गावाच्या हद्दीत भिवकुंड जवळ अनियंत्रित होऊन वाहन पलटी झाले.यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.
ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजता दरम्यान चंद्रपूर – बल्लारपूर घडली.पावसाळी वातावरण असल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.
चंद्रपूर येथून डांबर आईल भरून टँकर क्रमांक एम.एच.34- ए 1398 बल्लारपूर कडे जात होता. दरम्यान भिवकुंड जवळील नाल्याच्या वळणावर वाहन चालकाच्या निष्काळजीपणाने अनियंत्रित होऊन वाहन दुभाजकावर आदडले. टँकर पलटी होऊन रस्त्यावर आईल सर्वत्र पसरले.
यामुळे बल्लारपूर – चंद्रपूर मार्गांवरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. या अपघातात वाहन चालक व वाहकाला किरकोळ दुःखापत झाली.
अपघाताची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अग्निशमन दलाला पाचरण करून मार्ग स्वछ करून वाहतूक सुरळीत केली.आज सकाळपासून पावसाळी वातावरण असल्यामुळे टँकर मधील आईलने पेट घेतला नाही.परिणामी मोठी दुर्घटना टळली. टँकर चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे वाहनावरील नियंत्रण गेल्याची चर्चा आहे.
Leave a Reply