Tag: हर घर तिरंगा

  • Har Ghar Tiranga 2025 । तिरंगा रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग – देशभक्तीने रंगले चंद्रपूरचे रस्ते

    Har Ghar Tiranga 2025

    Har Ghar Tiranga 2025 : चंद्रपूर, दि. 14 : नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान, देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याचा ज्वाजल्य इतिहासाचे सर्व नागरिकांना स्मरण व्हावे, या उद्देशाने शासनामार्फत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक असल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि महानगर पालिकेच्या वतीने शहरातून तिरंगा बाईक रॅली काढून देशभक्तीचा जागर करण्यात आला.

    वाघाने केला गाईवर हल्ला, कोरपना तालुक्यात वाघाची दहशत

                यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा रॅलीला रवाना केले. प्रियदर्शिनी सभागृहापासून सुरू झालेली ही बाईक रॅली शहरातून जनता कॉलेज चौक – सावरकर चौक – बंगाली कॅम्प, बसस्थानक मार्गे परत येऊन प्रियदर्शिनी सभागृह येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

                याप्रसंगी डॉ. व्यवहारे म्हणाले, ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, झेंडा रॅली याद्वारे नागरिकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य आणि देशभक्तीची भावना निर्माण करणे, स्वातंत्र्यासाठी आपल्या पुर्वजांनी काय यातना सोसल्या याची जाणीव करून देणे, हे प्रमुख उदिृष्ट आहे. तसेच चंद्रपूर शहरात आज तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात शासकीय अधिकारी कर्मचा-यांसह नागरिकही सहभागी झाले आहेत. Har Ghar Tiranga bike rally

    बाईक रॅलीतुन राष्ट्रभक्तीचा जागर

                मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले, ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. तिरंगा बाईक रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला असल्याचे त्यांनी सांगितले. तर मनपा आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, ‘हर घर तिरंगा’ हा केवळ एका वर्षाचा कार्यक्रम नाही तर जनमानसाने हा उपक्रम नेहमीसाठीच स्वीकारला आहे. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुध्दा तिरंगा बाईक रॅलीतून राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात येत आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावावा तसेच 15 ऑगस्ट रोजी सुर्यास्तापूर्वी हा राष्ट्रध्वज काढावा, असे आवाहन त्यांनी केले. flag hoisting every home campaign

                सदर रॅलीमध्ये विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, युवक-युवती, खेळाडू तसेच  नागरिकांनी सहभाग नोंदविला.

  • Har Ghar Tiranga activities । 🏠 हर घर तिरंगा मोहिमेचा भव्य शुभारंभ!

    Har Ghar Tiranga activities

    Har Ghar Tiranga activities : चंद्रपूर 6 ऑगस्ट – “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत  ‘हर घर तिरंगा’ अभियान 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम घेतले जात असुन 5 ऑगस्ट पीएम श्री सावित्रीबाई फुले प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Azadi Ka Amrit Mahotsav events in schools

    डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करा – चंद्रपूर पोलिसांचे आवाहन

       स्पर्धेत 4 वी ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन देशभक्तीपर, तिरंगा, राष्ट्रध्वज, अशोकचक्र, पोस्टर, रांगोळी यांसारख्या विविध संकल्पनांवर आधारित सुंदर रांगोळ्या रेखाटल्या. स्पर्धेचे मूल्यांकन त्रयस्थ परीक्षकामार्फत करण्यात आले. सौंदर्य, रंगसंगती, संदेशवहन आणि स्वच्छता या निकषांवर आधारित प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक नागेश नित यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व देशप्रेमाच्या भावना जागृत राहाव्यात म्हणून असे उपक्रम सातत्याने राबवण्याचे महत्त्व सांगितले. Rangoli competition on Independence Day

    हर घर तिरंगा, विविध कार्यक्रमाचे आयोजन

       मागील तीन वर्षापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीचे अभियान पहिला टप्पा 2 ते 8 ऑगस्ट,दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट तर तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तिरंगा स्वयंसेवक यांची नोंदणी करून उत्कृष्ट काम केलेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देणे, शाळेच्या भिंतीवर तिरंगाचे चित्र काढणे, तिरंगाविषयक बाबींचे प्रदर्शन भरवणे, रांगोळी स्पर्धा आयोजित करणे, तिरंगा राखी तयार करण्याची स्पर्धा आयोजित करणे असे विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

    त्याचबरोबर शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून पत्रलेखन करून ते जवान,पोलिसांना पोस्टल सेवेद्वारे पाठविणे. स्वत:चे घर, आजुबाजूचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणे, तिरंगाची रोषणाई आणि लाईटिंग करणे असे विविध उपक्रम आहेत.

    तिरंगा महोत्सव

       दुसऱ्या टप्प्याची सुरूवात 9 ऑगस्टपासून होत असून यात ‘तिरंगा महोत्सव’ राबविला जाईल. त्याचबरोबर तिरंगा मेळावा आणि तिरंगा कॉन्सर्ट कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तिरंगा बाईक रॅली किंवा सायकल रॅली सुद्धा काढण्यात येणार आहे. तिसरा टप्पा 13 ऑगस्टपासून सुरू होणार असून यात प्रत्येक घर, कार्यालय, वाहने यावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. अभियानात सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी ध्वजारोहणच्या सेल्फी काढून केंद्र शासनाच्या www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. 

  • Selfie with Tiranga : चंद्रपूर मनपाची Selfie with Tiranga स्पर्धा

    Selfie with Tiranga : चंद्रपूर मनपाची Selfie with Tiranga स्पर्धा

    Selfie with Tiranga चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरो घरी तिरंगा मोहीम जनजागृतीसाठी येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ” तिरंगा सेल्फी ” Selfie with Tiranga स्पर्धा राबविली जाणार असुन यात राष्ट्रध्वजाचा पुर्ण सन्मान राखुन आपल्या घरी तिरंगा फडकाविणाऱ्या नागरीकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

    महत्त्वाचे : वाहतुकीचे हे नियम आपल्याला पाळावेचं लागणार – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन


        या सेल्फी स्पर्धेअंतर्गत विजेत्यांस रोख बक्षिसे देण्यात येणार असुन प्रथम रु. ११,०००/- द्वितीय रु. ७०००/- तृतीय रु. ५०००/-  तसेच ५०० रुपयांची १० प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. नागरीकांना स्वतः च्या घरी लावलेल्या तिरंग्यासोबतचे क्षण सेल्फीद्वारे टिपुन harghartiranga.com या वेबसाईटवर तसेच चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे दिलेल्या गुगलशीट वर पाठवायचे आहेत. तसेच QR कोड स्कॅन करून देखील करता येईल. तसेच सेल्फी नागरिकांना त्यांच्या सोशल मिडियावर सुद्धा अपलोड करावयाची आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात लवकरचं सुरू होणार हवाई सेवा

    अपलोड करतांना #cmc #हर घर तिरंगा #चंद्रपूर हे सर्व हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे. सेल्फीमध्ये तिरंगा स्पष्ट दिसणे गरजेचे आहे. या स्पर्धेचा कालावधी ०९ ते १५ ऑगस्ट असुन सेल्फी पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२४ ही  आहे.स्पर्धेनंतर ईश्वरचिट्ठीद्वारे निकाल घोषित करण्यात येणार आहे.  

    महत्त्वाचे : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर


          शासन निर्देशानुसार ०९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबवण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. ७७ वा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे.या अभियानात सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेच्या CMCchandrapur या फेसबुक पेजला भेट द्यावी.