Tag: सुरेश चोपणे

  • Zero Shadow Day 2025 Maharashtra । 🌞 सावली हरवणार! ‘Zero Shadow Day 2025’ तुमच्या शहरात कधी?

    Zero Shadow Day 2025 Maharashtra

    सावली ही आपल्या आयुष्यात सतत सोबत असते, पण एक असा दिवस येतो की आपल्या शरीराची सावली काही क्षणांसाठी पूर्णपणे अदृश्य होते! यालाच म्हणतात शून्य सावली दिवस. दरवर्षी मे महिन्यात महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये हा अद्भुत क्षण पाहायला मिळतो, जेव्हा सूर्य अगदी डोक्यावर असतो. या दिवशी दुपारी साधारण १२.०० ते १२.३० या वेळात सावली शून्य होते. 2025 मध्ये तुमच्या शहरात शून्य सावली दिवस कधी येतो, त्याची वेळ काय आहे, आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून का घडतो – हे सर्व जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख जरूर वाचा. विज्ञानप्रेमी, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी हा दिवस एक प्रयोगात्मक संधी ठरतो.

    Zero Shadow Day 2025 Maharashtra : शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे कारण ह्या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटासाठी सोडून जाते.तो क्षण आनी दिवस केव्हा आणि कुठे घडतो हे आपण खालील माहिती द्वारे जाणून घेणार आहोत. what is zero shadow day’

    Powered by myUpchar

    पान ठेल्यावर वाद, काही क्षणात खेळ झाला खल्लास, चंद्रपुरात युवकाची हत्या


    सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 ° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात.उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा.तसेच सूर्य दर रोज 0.50 ° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो,त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते.

    2025 मधील शून्य सावली दिवसाची यादी – आपल्या शहरातील तारीख आणि वेळ पाहा!

    विदर्भातील शून्य सावली दिवस
    (वेळा-पूर्वेकडून12.05 ते पश्चिमेकडील रेखावृत्तावर 12.30,एकाच ठिकाणी 2 दिवस हा अनुभव घेता येईल)
    ~~~~
    17 मे- अहेरी, आल्लापल्ली
    18 मे-मूलचेरा
    19 मे-गोंडपिंपरी,
    बल्लारषा,
    20 मे-● चंद्रपुर (12.09),
    ●वाशिम (12.18)
    मुकुटबन, पांढरकवडा, झरी,वणी, दिग्रस, लोणार
    21मे-●गडचिरोली
    (12.06)
    ,सिंदेवाही, वरोरा,घाटंजी, मेहकर
    22 मे-●यवतमाळ
    (12.14), ●बुलढाणा(12.22),आरमोरी, चिमूर^
    23मे-●अकोला(12.18)
    हिंगणघाट, ब्रम्हपुरी, नागभीड,कुरखेडा, देसाईगंज,रामटेक.
    24 मे-●वर्धा(12.12
    ,शेगाव, पुलगाव
    25मे-●अमरावती(12.10)
    ,दर्यापूर
    26 मे-●नागपूर(12.10),
    आकोट,
    ● भंडारा(12.08),
    27 मे-तुमसर, परतवाडा, रामटेक
    28 मे-●गोंदिया(12.06)
    ★★★★★★★★★★

    चंद्रपुर जिल्ह्यातील शुन्य सावली दिवस
    18 मे-पाटण,विरुर,ढाबा,गँगपिंपरि
    19 मे-राजुरा,कोरपना,गडचांदूर,
    पोंभुरणा,कोठारी,राजुरा,बल्लारपूर,
    20 मे-मूल,सावली,चंद्रपुर,घुग्गुस,
    भद्रावती,माजरी
    21मे-वरोरा,सिंदेवाही,चंदनखेडा,
    शेगाव,मोहोर्ली,
    22 मे-चिमूर,नेरी,कोलारा

    23 मे-ब्रम्हपुरी,भिसी,नागभीड



    भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो.पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्या कुमारी येथे शून्य सावली दिवस येतो तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो. what is zero shadow day


    महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात.कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो.भारतातून शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० ° अंशावरून कर्कवृत गेले आहे,त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे.भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली,हिमाचल,काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही. how to observe zero shadow day

    Zero Shadow Day म्हणजे काय? महाराष्ट्रातील वेळा आणि निरीक्षणाची पद्धत जाणून घ्या.


    आता आपण महाराष्ट्रातील शून्य सावली दिवस पाहूया–महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात १५.६° अक्षांश ते धुळे जिल्यात २१.९८ ° अक्षांश ह्या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. एका अक्षांसावर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशीं शुन्य सावली दिवस येतात . महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत,त्यामुळे सर्व शहरे आनी गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे,त्यामुळे आपण दुपारी १२.०० ते १२.३५ ह्या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे.समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल. zero shadow experiment for students

    साहित्य- दोन,तीन इंच व्यासाचा ,एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप,कोणतीही उभी वस्तू,मनुष्य उन्हात सरळ उभी ठेवावी.सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही. अशी माहिती चंद्रपुरातील पर्यावरण तज्ञ प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी दिली.

  • Suresh Chopane fossil research । चंद्रपूरच्या नदीत दडलं होतं रहस्य! वाचल्यावर विश्वास बसणार नाही!

    Suresh Chopane fossil research

    Suresh Chopane fossil research : चंद्रपुर तालुक्यात वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात २५,००० ते १२००० वर्षादरम्यान विदर्भात विचलन करणारे आणि आज लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्म चंद्रपूर येथील भूशात्र संशोधक प्रा.सुरेश चोपणे ह्यांनी नुकतीच शोधली आहे .महाराष्ट्रात अश्या प्रकारची अलीकडील प्लेईस्टोसीन काळातील मिळालेली हत्तीची ही दुर्मिळ जीवाश्म आहेत. डायनोसोर नंतर विशालकाय प्राण्यांची जीवाश्मे पहिल्यांदाच विदर्भात मिळाली आहेत. ह्या जीवाश्मा सोबतच पाषाणयुगीन अवजारे सुद्धा मिळाली आहेत. दुर्मिळ हत्तींचे जीवाश्मे आणि पाषाणयुगीन अवजारे एकाच ठिकाणी सापडणे सापडणे हे अतिशय महत्वाचे मानले जाते. Extinct elephant fossils Maharashtra

    चंद्रपूरचा कडक उन्हाळा, खासदार धानोरकर यांनी सुचवले उपाय

    ही जीवाश्मे प्लेईस्टोसीन काळातील आणि जवळ जवळ २५००० वर्शादरम्यान विदर्भात वास्तव्य करणाऱ्या स्टेगोडॉन गणेश हत्तीची ( Stegodon Ganesa) आहेत. .हत्तीच्या दातावरून ही लुप्त झालेल्या स्टेगाडॉन हत्तीची आहेत असे मत अनेक परदेशी संशोधक तसेच वाडिया इंस्टीट्युट ऑफ हिमालयन जीओलोजी चे निवृत्त प्राध्यापक आणि संशोधक अविनाश नंदा ह्यांनी व्यक्त केले आहे. हे हत्ती २३ ते २६ हजार वर्षापूर्वी विलुप्त झाले.आजचे आशियायी हत्तींचे हे पूर्वज होते. ह्याच ठिकाणी एलेफास नामाडीकस ( Elephas Namadicus) ह्या लुप्त झालेल्या हत्ती सदृश्य डोके सुद्धा आढळल्याने ह्या हत्तीं जीवाश्मांचे चे सविस्तर विश्लेषण करण्याची गरज असल्याचे मत संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केले आहे. Pleistocene fossils Vidarbha

    प्लेईस्टोसीन ह्या २ लाख ते ११,७०० वर्षाच्या कालखंडात भारतात हत्तींचे आणि पाषाण युगीन मानवांचे मोठ्या संख्येत वास्तव्य होते .ह्याच काळाच्या शेवटच्या कालखंडात हिमयुग होते.जेव्हा हे हिमयुग वितळले तेव्हा भारतात प्रचंड महापूर आले आणि ह्या महापुरात अनेक प्रजाती वाहून गेल्या.त्याच पुरातील गाळात ( अल्लुव्हींयम ) अनेक सजीवांचे पुरावे सापडतात.चंद्रपूर जिल्ह्यात सापडलेले हत्ती हे १५ फुट उंचीचे विशाल जीव होते आणि लुप्त झालेल्या हे स्टेगाडॉन हत्तींची ही जीवाश्मे महाराष्ट्रात प्रथमताच मिळाली आहेत अशी माहिती संशोधक पा सुरेश चोपणे ह्यांनी दिली.


    प्रा सुरेश चोपणे हे २०१९ ते २०२४ पर्यंत प्लेईस्टोन काळातील गाळात जीवाश्मे शोधत होते.त्यांना २०२०-२१ मध्ये प्रथमता चंद्रपूर तालुक्यात वर्धा आणि पैनगंगा नदी नदी पात्रात संगमाजवळ जीवाश्मे मिळाली .संपूर्ण कोरोना काळात चंद्रपूर तालुक्यातील वर्धा नदीवर सर्वेक्षण सुरु असतानाच २०२१-२२ मध्ये वरोरा तालुक्यातील वर्धा नदीपात्रात भागात विशाल काय येलीफास नामाडिकस सदृश्य हत्तींची जीवाश्मे आढळली .त्यांचे वर्धा नदीवरील संशोधन हे २०२४-२५ मध्ये पूर्ण झाले असून ही सर्व जीवाश्मे त्यांनि घरी स्थापन केलेल्या ,सुरेश चोपणे रॉक म्युझियम मध्ये संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी त्यांच्या संग्रहालयात ठेवली आहेत.भूगोल,भूशास्त्र ,जीवशास्त्र आणि विज्ञान शाखेच्या संशोधक विध्यार्त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. Lost elephant species India


    मिळालेली जीवाश्मे – सापडलेल्या जीवाश्म अवशेषात हत्तीच्या मांडीची हाडे ,चर्वण करणारी दात (Molar) आणि डोक्याची कवटी ,छातीची हाडे अश्या अवयवांचा समावेश आहे.अजून हत्तीची दोन लांब सुळे दात मिळाली नसली तरी एक तुकडा मात्र मिळाला आहे. .गेल्या दोन-तीन दशकापासून ही जीवाश्मे नदीच्या पुरामुळे वाहून गेलेली असल्याने महत्वाचे पुरावे नष्ट झाली आहेत.परंतु अजूनही काही ठिकाणी सजीवांची जीवाश्मे जमिनीत दडलेली आहेत . सविस्तर उत्खननात ती बाहेर येवू शकतात. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग,पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तसेच तेलंगाना मध्ये हत्त्तीची आशियायी हत्तींची जीवाश्मे मिळाली आहेत परंतु स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्मे मिळण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. Lost elephant species India

    Extinct elephant fossils Maharashtra


    पाषाण युगीन मानवाची अवजारे आढळली – ह्या संशोधनाचा महत्वाचा घटक म्हणजे ह्याच हत्तींच्या जीवाश्मा सोबत पाषाणयुगीन मानवानी बनविलेले दगडी अवजावरे सापडली आहेत. एकाच ठिकाणी हत्तींची जीवाश्मे आणि पाषाण युगीन अवजारे सापडन्यामुळे मानव हत्तींची शिकार करीत होते हे सिध्द होते तर मानवाच्या अति शिकारीमुळे आणि देखील हत्त्ती विलुप्त होण्यास मदत झाली असावी असे लक्षात येते. येथे मिळालेल्या अवजारात हात कुऱ्हाडी (हँन्ड एक्स), आणि इतर प्रकारची अवजारे प्रा सुरेश चोपणे ह्यांना आढळली असून ती प्रा सुरेश चोपणे त्यांच्या संग्रहालयात ठेवलेली आहेत.

  • २८ ऑक्टोबर ला मध्यरात्री खंडग्रास चंद्रग्रहण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – २८ ऑक्टोबर २०२३ ला मध्यरात्री ह्या वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. भारतातून रात्री १.०५ वाजेपासून २.२२ पर्यंत खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. हे ग्रहण भारता सहित आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका,आष्ट्रेलिया खंडातून दिसेल.सर्व खगोल प्रेमी नागरिक आणि विध्यार्थी नि हे ग्रहण पाहण्याचे आवाहन खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यानी केले आहे. २८ ऑक्टोबर ला मध्यरात्री शरद पौर्णिमेला चंद्र मेष राशीत दिसेल.

    छायाकल्प चंद्रग्रहणाची सुरवात ११.३१ वाजता छायाकल्प चंद्रग्रहण सुरू होईल.०१.०५ मिनिटाने खंडग्रास ग्रहण सुरवात होईल.०१.४४ ला सर्वाधिक ग्रहण होईल.ह्या वेळी चंद्र १० ते १२ % ग्रस्तोदित असेल.०२.२२ मिनिटाने खंडग्रास ग्रहण संपेल परंतु साध्या डोळ्याने न दिसणारे छायाकल्प चंद्रग्रहण ०३.५६ वाजता संपेल.संपूर्ण ग्रहनाचा काळ ४.२५ तासाचे तर खंडग्रास ग्रहण ०१.१८ तासाचे असेल.हया वर्षीचे पाहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी झाले होते.हे ह्या वर्षांतील शेवटचे ग्रहण असेल.

    चंद्रग्रहण का घडते?

    जेव्हा सूर्य,पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहणे होतात .जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वी ची सावली चंद्रावर पडते,त्यामुळे चंद्र ग्रहण होते.चंद्र ग्रहणाचे छायाकल्प, खंडग्रास आणि खग्रास असे तीन प्रकार आहेत. ह्यावेळेसचे चंद्रग्रहण खंडग्रास प्रकारातील आहे.ह्याच महिन्यात १४ ऑक्टोबरला कंकनाकृती सूर्यग्रहण झाले होते. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण एकामागोमाग येत असतात.

    चंद्र-गुरू ग्रहाची युती पाहण्याची संधी

    शरद पौर्णिमेला होणाऱ्या ह्या ग्रहणावेळी चंद्रासोबत पृथ्वीच्या जवळ येत असलेल्या गुरू ग्रहाची युती दिसेल.गुरू ग्रह पुढील आठवड्यात पृथ्वी जवळ येत असल्याने आकाराने मोठा आणि तेजस्वी दिसेल.
    देशातील सर्व खगोल प्रेमींनि आणि विध्यार्थ्यानि वैद्न्यानिक दृष्टीकोनातून ग्रहण पाहावे आणि विविध प्रयोग करून पाहावे असे आवाहन प्रा सुरेश चोपणे ह्यानी केले आहे.