Tag: सीसीटीव्ही फुटेज

  • hit and run case at toll plaza । टोल वाचवण्याच्या नादात कर्मचाऱ्याला चिरडलं; विसापूर टोल नाक्यावर वाहनचालकाचा थरार

    hit and run case at toll plaza

    hit and run case at toll plaza : बल्लारपूर (चंद्रपूर) – बल्लारपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या विसापूर टोलनाक्याजवळ ८ जूनच्या मध्यरात्री १ वाजता एका वाहनचालकाने टोल चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐनवेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ते वाहन त्या कर्मचाऱ्याला चिरडत पुढे गेले. या घटनेत कर्मचारी जखमी झाला असून त्याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    भद्रावतीमध्ये १७ गोवंशाची पोलिसांनी केली सुटका

    सीसीटीव्ही मध्ये थरार कैद

    बल्लारपूर तालुक्यातील विसापूर टोल नाक्यावर मध्यरात्री १ वाजता चारचाकी टाटा एस वाहनाने टोल चुकविण्याचा प्रयत्न केला, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला, यावेळी कम्प्युटर ऑपरेटर २७ वर्षीय संजय अरुण वांढरे याने वाहनासमोर जात त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन चालकाने संजय च्या अंगावर वाहन नेत त्याला चिरडत पुढे गेला. हि सर्व घटना टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    या घटनेत संजय वांढरे जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून त्या वाहनचालकांचा पोलिसांनी शोध घेणे सुरु केले.

  • 20 rupees trick used in robbery । फक्त २० रुपयात १.४ लाखांची चोरी! राजुरामधील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

    20 rupees trick used in robbery

    20 rupees trick used in robbery : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात दिवसाढवळ्या 20 रुपयांसाठी एका व्यक्तीचे 1 लाख 40 हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडली असून चोरट्यांनी चोरीची नवीन शक्कल लढवत ही चोरी केली असून, ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    मनात खाकीचे स्वप्न बाळगून ती निघाली पण वाटेत मृत्यू तिची वाट बघत होता

    राजुरा शहरातील रहिवासी बंडू देठे हे बँक ऑफ इंडिया येथून पैसे काढून दुपारी 12 वाजता बाहेर पडले. त्यांनी पैसे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून मोटारसायकलच्या समोरील बॅगमध्ये ठेवले. यावेळी एका तरुणाने त्यांच्या मागावर राहून 20 रुपयांची नोट खाली टाकली व सांगितले, “काकाजी तुमचे २० रुपये खाली पडले आहेत. देठे म्हणाले कि ते पैसे माझे नाही, त्या युवकाने म्हटले कि तुमच्या खिश्यातुन ते पैसे पडले आहे. बंडू देठे हे पडलेले पैसे उचलण्यासाठी वाकले असताना त्या चोरट्याने बॅगेतून पैसे काढले आणि मागे थांबलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळ काढला.

    घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

    ही संपूर्ण घटना समोरच असलेल्या कपड्यांच्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये (cctv caught theft outside bank) कैद झाली आहे. देठे यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी बल्लारपूर शहरातही अशाच प्रकारे एका व्यक्तीकडून 80 हजार रुपये लुटण्यात आले होते.

    २० रुपयांसाठी देठे यांनी आपले १ लक्ष ४० हजार रुपये गमावले अशी चर्चा राजुरा शहरात सुरु आहे. बँकेतून पैसे काढल्यावर ते सुरक्षितपणे हाताळायला हवे होते. त्या युवकांनी निष्काळजीपणाचा फायदा घेत ते देठे यांचे पैसे लांबवीले.

  • चंद्रपूर पोलिसांना या चोराने दिले आव्हान

    चंद्रपूर पोलिसांना या चोराने दिले आव्हान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मोबाईल हिसकविण्याच्या घटनेत आता दिवसेंदिवस वाढ होत असून कधी चालता बोलता तर कधी वाहनावरून जात असताना मोबाईल हिसकविण्याच्या घटना वाढत आहे, मात्र 10 डिसेंबर ला निवांत बसलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकविण्यात आला, या घटनेमुळे चोराने थेट चंद्रपूर पोलिसांना आव्हान केले असे चित्र निर्माण झाले आहे.

     

    चंद्रपूर शहरातील मुख्य बस स्थानक समोरील महसूल भवन च्या खाली राकेश गोविंदवार हे रात्री 8 वाजताच्या सुमारास निवांत बसून मोबाईल वर मॅसेज चेक करीत होते, तितक्यात त्यांच्या मागे चेहऱ्याला दुपट्टा बांधलेला व्यक्ती उभा राहिला आणि संधी मिळताच गोविंदवार यांच्या हातातील मोबाईल हिसकावित तिथून पळ काढला, त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला मात्र चोरांचा वेग जास्त असल्याने तो कुणाच्या हाती लागला नाही.

     

    हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे, जिल्हा न्यायालय, मुख्य बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गजबजलेल्या महसूल भवन येथे घडलेला हा प्रकार म्हणजे चोराने थेट पोलिसांना आव्हान दिल्यासारखं आहे, नागरिकांनो आपला मोबाईल आता व्यवस्थित सांभाळून ठेवा अन्यथा हा चोर तुमचा मोबाईल हिसकावीत पळ काढणार.

  • चंद्रपुरातील अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील वाहतुकीने सतत कोंडलेल्या जटपुरा गेटवरील अपघाताचा थरारक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे, या व्हिडीओ मध्ये भरधाव वेगात असलेल्या ऑटोने 65 वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली आहे.

    या व्हायरल व्हिडिओत 65 वर्षीय इसम रस्त्यावरून पलीकडे जात असताना त्यांना भरधाव वेगात येत असलेल्या ऑटो ने जोरदार धडक दिली, या धडकेत 65 वर्षीय प्रकाश खोडे राहणार जलनगर हे गंभीर जखमी झाले आहे.

     

    चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे, मात्र यावर वाहतूक विभागाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असून शहरातील भरधाव वेगात चालणाऱ्या वाहनांवर कारवाई फक्त नावापुरती होत असल्याचा आरोप वारंवार वाहतूक विभागावर लागत आहे.

     

    विशेष बाब म्हणजे शहरातील विविध भागात लागलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं कंट्रोल रूम हे चंद्रपूर वाहतूक विभागात आहे.