Tag: शिष्यवृत्ती

  • Tuition fees from Scheduled Caste students । 🎓 “शिष्यवृत्ती असूनही फी घेतली जाते? अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची फसवणूक

    Tuition fees from Scheduled Caste students

    Tuition fees from Scheduled Caste students : चंद्रपूर – समाज कल्याण विभागाच्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती  योजनेअंतर्गत राज्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृती प्रदान केली जाते. नागपूर विभागात दरवर्षी सुमारे 70 हजार विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात.

    चंद्रपूर शहरातील रस्त्यावर खड्ड्यातून विकास बाहेर आला

    सन 2025-26 सत्रामध्ये काही महाविद्यालयांकडून प्रवेशाच्या वेळी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे शासन निर्णयाचे उल्लंघन आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, पात्र विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शिक्षण शुल्क घेता कामा नये. action against colleges taking fees from SC students

    तर कारवाई होणार…

    शिष्यवृत्ती योजना सुरळीतपणे व वेळेवर अंमलात आणण्यासाठी महाडीबीटी ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून, या प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयांना आवश्यक निधी वेळेत उपलब्ध होतो. काही महाविद्यालयांकडून शिक्षण शुल्काची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत शासनाने सबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

    Somayya institute of technology

    पात्र विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क घेणाऱ्या तसेच आवश्यक कागदपत्रांची अडवणूक करणाऱ्या नागपूर विभागातील सर्व महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सुचना नागपूर येथील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी दिल्या आहेत.

  • Mahadbt Portal Scholarship Revert Process । ❗ ‘Right to Give Up’ निवडली का? आता करा अर्ज Revert – शेवटची संधी!

    Mahadbt Portal Scholarship Revert Process

    Mahadbt Portal Scholarship Revert Process : चंद्रपूर – महाडीबीटी पोर्टलवरील राईट टू गिव्ह अप, या पर्यायाचे बटण नजरचुकीने अथवा अनावधानाने निवडलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज, महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सामान्य प्रशासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सामाजिक न्याय विभागास अवगत केले आहे. how to edit submitted application in mahadbt portal

    या पर्यायाचा करा वापर

            शैक्षणिक वर्ष 2023-24 आणि 2024-25 मधील जिल्ह्यातील अनुसुचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडून पोर्टलवर नजर चुकीने अथवा  अनावधानाने RIGHT TO GIVE UP पर्याय निवडला गेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी  महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य लॉगीन मधून REVERT RIGHT TO GIVE UP APPLICATION" या पर्यायाचा वापर करून आपला अर्ज 30 जून 2025 पूर्वी Revert back करून घेणे आवश्यक आहे. तसेच Revert back झालेला अर्ज  देखील विहीत वेळेत म्हणजेच 30 जूनपुर्वी विद्यार्थ्यांने त्याच्या लॉगीनमधून ऑनलाईन रित्याच फेरसादर करणे आवश्यक राहील.

    १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठयपुस्तके

    विहीत वेळेत विद्यार्थ्यांने अर्ज फेरसादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी अथवा संबंधित महाविद्यालयाची राहील. सदर तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील कोणतेही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही, या उद्देशाने राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या अंतिम संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन त्रुटीत असलेले अर्ज तात्काळ निकाली काढावी.

    याबाबत महाविद्यालयांचे व्हॉटस्अप ग्रुप व तत्सम इतर समाज माध्यमातून देखील सदर सुविधेबाबतची माहिती विद्यार्थी, त्यांच्या पालकांपर्यंत तात्काळ पोहचवावी. आवश्यकता असल्यास महाविद्यालय स्तरावरुन विद्यार्थ्यांची बैठक/ कार्यशाळा घेण्यात यावी. जेणेकरून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाहीत, असे आवाहन सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

  • 10th and 12th topper SC student scholarship । 10वी-12वीमध्ये पहिला क्रमांक? मिळवा ₹5,000 ते ₹50,000 स्कॉलरशिप!

    10th and 12th topper SC student scholarship

    10th and 12th topper SC student scholarship : चंद्रपूर – इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये शाळा / तालुका / जिल्हा / विभागातून प्रथम येणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांस राजश्री छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेद्वारे अनुक्रमे 5 हजार, 10 हजार, 25 हजार, 50 हजार रुपये गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. 

    शासकीय वसतिगृहात प्रवेश हवा? तर आजच करा अर्ज

    योजनेचा लाभ घेण्याकरीता संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, गुणपत्रिका, बैंक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड व टी.सी. सादर करावे.

              प्रस्ताव सादर न केल्यामुळे पात्र विद्यार्थी जर पुरस्कारापासुन वंचित राहिल्यास त्याची संपूण जबाबदारी ही सबंधित संस्थेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची राहील, याची गांभिर्याने नोंद घ्यावी व तात्काळ प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

    1. What is the 10th and 12th Topper SC Student Scholarship?

    It is a merit-based award scheme for Scheduled Caste (SC) students in Maharashtra who top in their school/taluka/district/division in class 10 or 12. Scholarships range from ₹5,000 to ₹50,000.

    2. Who is eligible for this scholarship?

    SC students who have ranked first in their respective school, taluka, district, or division in 10th or 12th standard are eligible.

    3. What is the amount of scholarship awarded?

    ₹5,000 – School-level
    ₹10,000 – Taluka-level
    ₹25,000 – District-level
    ₹50,000 – Division-level

    4. How to apply for the SC topper scholarship?

    The student cannot apply directly. The respective school or junior college must submit a proposal to the Assistant Commissioner, Social Welfare Office, Chandrapur.

    5. What documents are required with the proposal?

    Caste Certificate (SC)
    Marksheet
    Aadhaar Card
    Bank Passbook (Xerox)
    Transfer Certificate (TC)

    6. What happens if the proposal is not submitted?

    If the school/college fails to submit the proposal, the eligible student may miss the award. The responsibility will lie with the headmaster or principal.
  • OBC overseas scholarship । परदेशात शिक्षणाचं स्वप्न? ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकार देणार शिष्यवृत्ती!

    OBC overseas scholarship

    OBC overseas scholarship : चंद्रपूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्यूएस रँकिंग (जगभरातील 200 च्या आत विद्यापीठांची क्रमवारी) अंतर्गत परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये सन 2025-26 मध्ये प्रवेश घेतलेल्या 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

    शी बॉक्स पोर्टल मध्ये नोंदणी केली का?

    या शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय, अभ्यासक्रमनिहाय जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

    इच्छुक विद्यार्थ्यांनी www.obcbahujankalyan.maharashtra.gov.in किंवा https://.obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करावा तसेच परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रासह 17 मे 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सक्षम किंवा पोस्टाने सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे दोन प्रतित सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे.