Tag: रामनगर पोलीस स्टेशन

  • crime prevention under MPDA act । कायद्याला न जुमानणाऱ्या ‘तावाडे” ला रामनगर पोलिसांनी दाखविला MPDA चा हिसका

    crime prevention under MPDA act

    crime prevention under MPDA act : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वृत्ती वाढत असताना पोलिसांनी MPDA कायद्याचे शस्त्र उगारत गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध करण्याची मोहीम राबवली आहे. आतापर्यंत ३ सराईत गुन्हेगारांना कारागृहात MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.

    तावाडे वर अनेक गंभीर गुन्हे

    जिल्ह्यातील बल्लारपूर व रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर गुन्हे चोरी, जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न, विना परवाना हत्यार बाळगणारे, दुखापत करणारे, बलात्कार करणारे, जाळपोळ व जीवे मारण्याची धमकी सह अवैध धंदे असे १५ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार २८ वर्षीय विनीत नानाजी तावाडे राहणार बापटनगर चंद्रपूर याला वर्षभराकरिता मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर मध्ये २ ऑगस्ट रोजी स्थानबद्ध करण्यात आले. Vinit Tawade criminal history MPDA

    दहशत माजविणाऱ्या कुख्यात गुंडांवर MPDA कायद्यांतर्गत कारवाई

    १५ गुन्ह्यांची नोंद असलेल्या विनीत तावाडे यांच्या विरुद्ध sdpo सुधाकर यादव यांच्या नेतृत्वात रामनगर पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख यांनी प्रतिबंध व्हावा यासाठी कलम ३ (१), महाराष्ट्र झोपडपट्टी हातभट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ सुधारणा २००९, २०१५ MPDA act अनव्ये कारवाईचा अहवाल तयार करून पोलीस अधीक्षक कार्यालय मध्ये पाठविण्यात आला.

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दस्तऐवजाची पडताळणी करून सपोनि योगेश खरसान यांनी स्थानबद्ध प्रस्ताव तयार करीत सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला, या प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ आदेश मंजूर करीत गुन्हेगार विनीत तावाडे ला जिल्हा कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. police action against repeat criminals

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख, अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश खारसान, पोउपनि सुरेंद्र उपरे, पोलीस कर्मचारी संजय देशवाले, अरुण खारकर, परवेज शेख, अनिल जमकात व महिला पोलीस मनीषा मोरे, ब्युलटी साखरे यांनी केली.

  • record criminal arrested during patrolling । 🔥 शुटर अखेर सापडला! ७ ते ९ जुलै दरम्यानच्या घरफोडीचा उलगडा!, रामनगर पोलिसांची कारवाई

    record criminal arrested during patrolling

    record criminal arrested during patrolling : चंद्रपूर – पोलीस स्टेशन रामनगर च्या हद्दीत घरफोडी करणारा शुटर गुन्हे शोध पथकाच्या जाळ्यात सापडला, १३ जुलै रोजी पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली कि रेकॉर्डवरील गुन्हेगार हा रयतवारी कॉलरी परिसरात फिरत आहे, माहितीच्या आधारावर रामनगर पोलिसांनी त्या गुन्हेगाराला अटक केली.

    चंद्रपुरात गुन्हेगारीचा डबल रोल, बोगस पत्रकार ते पोलीस

    १ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त

    रेकॉर्डवरील गुन्हेगार २४ वर्षीय मो. सरफोराज सागीर शहा उर्फ शुटर रा. आमटे ले-आउट रयतवारी कॉलरी, याला गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने माहिती दिली कि ७ जुलै ते ९ जुलै दरम्यान रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी केली. सदर गुन्ह्यातील १ लाख ५४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी आरोपीकडून जप्त केले.

    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी शरद कुडे, आनंद खरात, लालू यादव, पेत्रस सिडाम, प्रशांत शेंद्रे, जितेंद्र आकरे, बाबा नैताम, मनीषा मोरे, रवीकुमार ढेंगळे, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्पलवार, सुरेश कोरेवार व ब्ल्यूल्टी साखरे यांनी केली.

  • stabbing case reported in Chandrapur । चंद्रपूरात भरदिवसा जीवघेणा हल्ला – मित्राला वाचवायला गेलेल्या युवकावर चाकूने वार!

    stabbing case reported in Chandrapur

    stabbing case reported in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा गुन्हेगारीचे हब बनू पाहत आहे, मागील २ महिन्यात जिल्हाभरात गंभीर घटना घडल्या त्यानंतरसुद्धा गुन्ह्याची मालिका सुरूच आहे, या मालिकेत चंद्रपूर शहरात दिवसाढवळ्या चाकू चालला. प्रेम प्रकरणातून एकावर दोघांनी हल्ला केला, मात्र मित्राला वाचविण्याकरिता आलेल्या मित्रावर दोघांनी मिळून चाकू हल्ला केला या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. रामनगर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

    चंद्रपूर भाजपचे राजकीय स्टंट

    मध्यस्ती करणे पडले महागात

    २५ जून रोजी शहरातील वन अकॅडमी समोरील भागात अंश उर्फ अनिष पंढरीनाथ वालकोंडे व आर्यन संतोष रामटेके दोघेही राहणार बाबुपेठ हे एका युवकाला मारहाण करीत होते तितक्यात मित्राला वाचविण्याकरिता मध्ये आलेला २३ वर्षीय श्रेयश दामोधर पिल्लारे राहणार इंदिरानगर याने दोघांना बाजूला सारले मात्र श्रेयश मध्ये का आला म्हणून दोघांनी त्याच्यावर चाकूने वार केले. youth crime recent case

    या हल्ल्यात श्रेयश च्या हाताला गंभीर दुखापत झाली, ते दोघे इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी पुन्हा चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला मात्र काही युवकांनी दोघांना पकडत बाजूला केले, नागरिकांनी अंश व आर्यन ला पकडून ठेवत रामनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली.

    पोलीस घटनास्थळी दाखल झाली, पोलिसांनी अंश व आर्यन ला ताब्यात घेत जखमी श्रेयश पिल्लारे ला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सदर हल्ला हा प्रेम प्रकरणाच्या वादातून झाला अशी माहिती पुढे आली आहे. रामनगर पोलिसांनी अंश वालकोंडे व आर्यन रामटेके यांच्यावर कलम १०९, ११५ (२), १५ (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

  • Chandrapur News : नगीनाबाग येथे मोबाईल स्नॅचिंगची घटना

    Chandrapur News : नगीनाबाग येथे मोबाईल स्नॅचिंगची घटना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 27 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वाजता चंद्रपूर शहरातील नगीना बाग मशिदीजवळ मोबाईल हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. फिर्यादी इशिका वाघमारे ही युवती मोबाईलवर बोलत असताना दोन अज्ञात तरुणांनी चालत्या दुचाकीवरून तिचा रियलमी कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. Mobile snatching

     

     

    ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यातून या गुन्ह्याचा धडाकेबाजपणा समोर आला आहे. Chandrapur

     

    चंद्रपूरसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात अशी घटना प्रथमच घडल्याने या घटनेने चिंता वाढली आहे. इशिकाचा मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. धाडसाने इशिका ने त्यांचा पाठलाग केला. दुर्दैवाने, पाठलाग करताना, इशिका रस्त्यावर कोसळली, त्यामुळे गुन्हेगार पळून जाऊ शकले. या घटनेनंतर इशिकाने 27 फेब्रुवारी रोजी रामनगर पोलिस ठाण्यात तत्काळ तक्रार नोंदवली. Crime

     

    पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. अनेक शहरांमध्ये मोबाईल स्नॅचिंगच्या घटना वाढत्या चिंतेच्या बाबी आहेत आणि नागरिकांनी सतर्क राहणे आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. Safety

     

    सार्वजनिक ठिकाणी, विशेषत: उशिरापर्यंत मोबाइल फोन वापरणे टाळणे आणि सभोवतालच्या सभोवतालच्या सदैव जागरुक राहण्याचा सल्ला दिला जातो. रहिवाशांना सुरक्षिततेची भावना निर्माण करून पोलीस दोषींना त्वरीत पकडतील आणि त्यांना न्याय मिळवून देतील, अशी चंद्रपूर समाजाची अपेक्षा आहे. Police investigation

  • चंद्रपुरात लाखोंचा मुद्देमाल व मोबाईल नागरिकांना सुपूर्द

    चंद्रपुरात लाखोंचा मुद्देमाल व मोबाईल नागरिकांना सुपूर्द

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरी व 2 घरफोडी प्रकरणातील एकूण 13 लाखांचा जप्त मुद्देमाल फिर्यादी यांना पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

     

    जानेवारी 2023 ला महाकाली कॉलरी परिसरातील चंदा वाघाडे व ऑक्टोम्बर 2023 ला जयराज नगर येथील वैभव सिंग यांच्या घरी अज्ञाताने घरफोडी करीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एकूण 9 लाख 3 हजार रुपयांचा माल लांबविला होता.

     

    तसेच वर्ष 2023 मध्ये रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मोबाईल मिसिंगच्या अनेक घटना घडल्या होत्या, रामनगर पोलिसांच्या पथकाने सदर मोबाईल मिळावे यासाठी अथक प्रयत्न करीत मोबाईलचा शोध घेत झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेश व गुजरात येथून 50 मोबाईलचा शोध लावला.

     

    आज 3 जानेवारीला पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या हस्ते घरफोडी गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व मोबाईल फिर्यादी यांना वाटप करण्यात आले.
    यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक रोशन यादव, सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक सामलवार, ठाकरे आदि ची उपस्थिती होती.

  • चंद्रपूर शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात सध्या अवैध धंदे वाढत आहे, जुगार असो की सट्टा आता चक्क शहराच्या मध्यभागात देहव्यवसायाचे जाळे पसरत आहे, अश्यातच रामनगर पोलिसांनी आपल्या हद्दीत सुरू असलेल्या देह व्यापाराचे घबाड उघडकीस आणले.

     

    मुखबिर मार्फत मिळालेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले निशा अपार्टमेंट मध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर महिलांना सुद्धा पैश्याचे प्रलोभन देत त्यांच्याकडून देहविक्री करून घेत होती.

     

    सोबतच या कामात आरोपी महिलेने आपल्या फ्लॅट मधील रूम चा वापर देह व्यवसाय साठी करीत होती, रामनगर पोलिसांनी मारलेल्या धाडीत हे सर्व घबाड उघडकीस आले.

     

    रामनगर पोलिसांनी या देहव्यापर चालविणाऱ्या महिलेवर कलम 3, 4, 5, व 7 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

     

    देहविक्री करणाऱ्या 3 महिलांना स्त्री आधार केंद्र मूल रोड चंद्रपूर मध्ये ताब्यात देत 2 महिलांना अटक करण्यात आली.

     

    सदर गुन्ह्याची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक लता वाढीवे व गुन्हे शोध पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे व पोउपनी मधुकर सामलवार सह पोलीस कर्मचारी यांनी केली.

  • रामनगर पोलिसांची व्हिडीओ गेम पार्लरवर मोठी कारवाई

    News34 Impact

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 ने वृत्त प्रकाशित केल्यावर पोलीस व जिल्हा प्रशासनाने बातमीची दखल घेतली व व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

     

    स्थानिक गुन्हे शाखेने पडोली येथील रॉबिन व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई केल्यानंतर रामनगर पोलिसांनी सुद्धा मोठी कारवाई करीत या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

     

    पेट्रोलिंग करीत असताना रामनगर पोलिसांना सराय मार्केट येथील मनपाच्या गाळ्यात सुरू असलेले राजविर व्हिडीओ गेम पार्लरवर जाऊन चौकशी केली असता त्या पार्लर च्या परवान्यात अनेक त्रुट्या आढळल्या, परवाना व्यतिरिक्त राजविर व्हिडीओ गेम पार्लरमध्ये अतिरिक्त 4 मशीन आढळल्या, पोलिसांनी त्या 4 अतिरिक्त मशीन जप्त केल्या.

     

    रामनगर पोलिसांनी दुकान चालक व कांग्रेस पक्षाचे असंघटित कामगार सेल चे शहराध्यक्ष विनोद संकत व दुकानात काम करणारे राहुल झाडे यांना अटक करण्यात आली.

    कारवाई झाली आता पुढे काय?

    चंद्रपूर शहर सहित जिल्ह्यात पोलीस विभागाच्या या मोहिमेमुळे नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर चालकाचे धाबे दणाणून गेले आहे.

    याबाबत पोलीस अधीक्षक परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जिल्ह्यात सुरू असलेली ही मोहीमेत नियमबाह्य पार्लर धारकांच्या कागदपत्रे व परवान्याची पडताळणी केल्यावर त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात येणार असून परवाना बाबत पुढील कारवाई आता जिल्हाधिकारी महोदय करतील.

     

    जुगार कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करीत विनोद संकत व राहुल झाडे यांना जामिनावर सोडण्यात आले, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे व रामनगर गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.