Tag: राजुरा

  • coal project land acquisition injustice । पवनी प्रकल्पग्रस्तांची मोठी विजयाची दिशा? प्रशासनाला ४ आठवड्यांत अहवाल द्यावा लागणार!

    coal project land acquisition injustice

    coal project land acquisition injustice : राजुरा: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात असलेल्या पवनी गावात जवळपास २८० हेक्टर जमीन होती. त्यातील पवनी-II कोळसा खाण प्रकल्पासाठी वेकोलीने २०३.७७ हेक्टर जमीन संपादित केली आहे. मात्र उर्वरीत ७७ हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडे असून ती चारही बाजूंनी कोळसा प्रकल्पामुळे वेढलेली आहे.

    पिकांवर हुमणी अळीचा कहर. कृषी विभागाने सांगितले हे उपाय

    ही जमीन शेती अथवा वास्तव्याच्या दृष्टिकोनातून वापरण्यायोग्य राहिलेली नाही. दरम्यान वारंवार पत्रव्यवहार करून देखील वेकोलीचे अधिकारी काहीही उत्तर देत नव्हते. या अन्यायाविरुद्ध पवनी येथील पीडित शेतकरी राजेश उलमाले, उषा चन्ने, विजय पोटे, दिनकर मालेकर यांच्यासह ३५ शेतकऱ्यांनी माननीय महाराष्ट्र लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली. मा. न्यायमूर्ती श्री. वि. मु. कानडे यांच्या उपस्थितीत आज सुनावणी पार पडली. lokayukta order for report on pavni land acquisition dispute

    अर्जदारांच्या वतीने ॲड. दीपक चटप यांनी युक्तिवाद सादर करत वेकोली प्रशासनाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधले. या सुनावणीत वेकोलीचे वरीष्ठ अधिकारी तसेच चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. निलेश व्यवहारे हे देखील उपस्थित होते.या सुनावणीत मा. न्यायमूर्ती श्री. वि. मु. कानडे यांनी ४ आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून पुढील सुनावणी ११ सप्टेंबर २०२५ रोजी ठेवण्यात आली आहे.

    पवनी येथील सरपंच पांडुरंग पोटे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी उर्वरित जमीन संपादित करण्याचा ठराव घेतला आहे. तक्रारकर्ते राजेश उलमाले व अन्य शेतकरी हे वारंवार पाठपुरावा करीत असून यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसते.

    प्रकरणाची पार्श्वभूमी:

    • ४ जून २०२२ रोजी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत WCL अधिकाऱ्यांनी उर्वरित जमिनीचे संपादन करण्यास तोंडी सहमती दर्शविली होती.
    • अर्जदारांनी २१ जून २०२२ रोजी त्या बैठकीचे इतिवृत्त मागवले, परंतु आजतागायत पुरवले गेलेले नाही.
    • कोळसा मंत्रालयाकडे २०२२ मध्ये प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती, मात्र त्यावर कार्यवाही झालेली नाही. कालांतराने उर्वरीत जमीन संपादित करणार नाही अशी वेकोलीने भूमिका घेतली.

    ॲड. दीपक चटप यांनी युक्तिवाद करताना पवनी येथील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. प्रशासनाने शेतकऱ्यांना उत्तर न देणे ही बाब कर्तव्यात कसूर ठरणारी आहे. संविधानातील अनुच्छेद १४, २१ व ३००-अ नुसार घटनात्मक हक्कांचा भंग झालेला दिसतो. वापरायोग्य न राहिलेली जमीन देखील संपादित होणे आवश्यक ठरते. त्यासोबतच त्यांनी वेकोलीच्या हलगर्जीपणावर लक्ष वेधले. पवनी येथील उर्वरित जमीन तात्काळ संपादित करावी, वेकोलीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीचे अधिकृत इतिवृत्त पुरवावे, प्रशासनाच्या निष्क्रियतेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी असेही मांडले.

  • Tragic Incident : राजुरा येथे दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

    Tragic Incident : राजुरा येथे दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

    news34 chandrapur

    चंद्रपूर/राजुरा – सास्ती गावात एका हृदयद्रावक घटनेत एका विहिरीजवळ पाणी आणि गाळ साचल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. वेकोलिच्या चड्डा या ठेकेदार कंपनीने विहिरीजवळील माती टाकल्याने अनावधानाने तलावासारखा पाण्याचा तलाव तयार झाल्याची घटना घडली. tragic incident

     

    दोन्ही विद्यार्थी, एक इयत्ता 11वी आणि दुसरा 9वीतला, या तलावासारख्या पाण्यात पोहायला गेले आणि त्यामुळे होणाऱ्या धोक्यांची कल्पना नव्हती. दुर्दैवाने, ते पाण्यात आणि गाळात अडकले, त्यामुळे मित्रांचा अकाली मृत्यू झाला. accident prevantion

     

    राजुरा तालुक्यातील सास्ती या गावी आज 2 मार्च ला सकाळी शाळा सुटल्यानंतर पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही मुलांचे प्रेत पाण्याबाहेर काढले आहे. या मृत मुलांची नावे पियुष राकेश सिडाम, वय17 व साहिल रमेश कुंदलवार, वय 15 अशी आहेत. chandrapur district

     

    घटनेची माहिती मिळताच तातडीने गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि राजुरा पोलिसांना माहिती दिली. यानंतर प्रेत बाहेर काढण्यात आले. मात्र यानंतर कंपनीने नाला रोखून अनाठायी तलाव निर्माण केला, त्यामुळे कंपनीने तातडीने आर्थीक सहायता द्यावी अन्यथा तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. आता या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथुन जमावाने प्रेत उचलु दिले नाही. chadda contractor

  • शिक्षण क्षेत्रातील शिक्षित नागरिकांचे अघोरी कृत्य

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सत्ता प्राप्तीसाठी माणूस कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्हात आला आहे.जिल्हातील राजुरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठानच्या निवडणूकीपुर्वी अघोरी प्रकार पुढे आला.

    आपल्यालाच सत्ता मिळावी,यासाठी संस्थेतील एका संचालकाने इत्तर संचालकांच्या घरी काळा धागा बांधला, हळद, कुंकू लावले.संशयास्पद वस्तू ठेवल्या.या वस्तू निदर्शनास येताच संचालक हादरले. सीसीटीव्हीमूळे हा प्रकार उघडकिस आला.या अघोरी प्रकाराची तक्रार राजुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.संचालक मेघा नलगे आणि त्यांचे तीन नातेवाईक यांच्या विरोधात ही तक्रार आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

     

    प्राप्त माहितीनुसार,जिल्हातील राजुरा शहरातील बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान या संस्थेतर्फे काही शाळा संचालित आहेत.या संस्थेमध्ये संचालक म्हणून अविनाश जाधव, एडवोकेट अरुण धोटे, सुमनताई मामुलकर, अरुण धोटे,डॉक्टर एस. एम. वारकड, बी. यु. बोर्डेवार ,सुदर्शन निमकर, मेघा नलगे, दत्तात्रय येगीनवार ,राजेंद्र जाधव हे सदस्य आहेत.संस्थेचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने सहाय्यक धर्मदाय आयुक्त चंद्रपूर यांच्या आदेशाने निवडणूक घेण्यात आली.

     

    सत्ता आपल्याकडे असावी यासाठी विरोधातील सहा संचालकांच्या घरात काळा धागा, हळद, कुंकू लावले काही संशयास्पद वस्तू ठेवल्यात. अविनाश जाधव, एडवोकेट अरुण धोटे ,डॉक्टर एस. एम. वारकड, बी. यु. बोर्डेवार ,दत्तात्रय येगिनवार यांच्या घरी या वस्तू आढळून आल्यात.हा प्रकार सीसीटीव्ही कैद झाला.हा प्रकार उघळकीस येताच एकच खळबळ उडाली.

     

    सत्ता प्राप्तीसाठी थेट जादुटोण्याचा आधार घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.या प्रकाराणे संचालकांचे कुटुंबिय भयभीत झाले आहेत.हा प्रकार उघडकीस येताच घरी व शेजारच्या सीसीटीव्ही फुटेज बघितल्या गेले.त्यात तिन महिला व एक पुरूष दिसून आला.

    असा घडला प्रकार…

    संचालक घरी नसतांना त्यांचा घरी तीन महिला, एक पुरुष गेलेत. कुटुंबियांना त्यांनी पाणी मागलेत.पाणी आणण्यासाठी ते गेले असता नेमके त्याच वेळी सोफ्याच्या आत काही वस्तू त्यांनी ठेवल्यात.दरम्यान या प्रकाराची तक्रार राजुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

     

    सीसीटीव्ही फुटेज, ऑडीओ रेकाॅर्डींग व सापडलेल्या वस्तू राजुरा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत.या प्रकाराची तक्रार प्राप्त झालेली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी दिली. सध्या या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही.