Tag: मोरवा विमानतळ

  • Swati Pandey MADC visit Morwa airport । “टेक-ऑफ” चा मार्ग मोकळा? स्वाती पांडे यांचा चंद्रपूर मधील महत्त्वपूर्ण दौरा!

    Swati Pandey MADC visit Morwa airport

    Swati Pandey MADC visit Morwa airport : चंद्रपूर, दि. 24 : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (MADC) च्या  उपाध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे  यांनी नुकतीच चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाला भेट दिली. नागपूर फ्लाइंग क्लबने आपला फ्लाइंग सेक्शन प्रशिक्षणासाठी अलीकडेच या ठिकाणी स्थलांतरित केल्याने सदर भेटीचे आयोजन करण्यात आले होते. Chandrapur airstrip flying training expansion

    भविष्यातील विकास संधींचा आढावा

    मोरवा विमानतळ हे MADC च्या मालकीचे असून, नागपूर फ्लाइंग क्लबला विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी सुपूर्त करण्यात आले आहे. सौ. पांडे यांचा दौरा या प्रशिक्षण केंद्रातील उपलब्ध पायाभूत सुविधा, तांत्रिक गरजा व भविष्यातील विकास संधींचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

    चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

    यावेळी सौ. पांडे यांनी प्रशिक्षणार्थी कॅडेट्सशी संवाद साधत प्रत्यक्ष प्रशिक्षण अनुभव जाणून घेतला आणि त्यांच्या अडचणी व अपेक्षांचा देखील आढावा घेतला. तसेच नागपूर फ्लाइंग क्लबचे व्यवस्थापकीय संचालक तेजू सिंग पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षण उपक्रमांची माहिती व भविष्यातील योजना जाणून घेतल्या.

    Somayya institute of technology

    राज्यातील विमान प्रशिक्षण क्षेत्रात दर्जात्मक प्रगती साधण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या दृढ संकल्पनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे. विमान प्रशिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्याचा अग्रगण्य स्थान प्राप्त व्हावे, या उद्देशाने स्वाती पांडे यांची ही भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे.

  • Aviation Industry : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी युवक – युवतींना होता येणार वैमानिक

    Aviation Industry : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी युवक – युवतींना होता येणार वैमानिक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नक्षलग्रस्त, दुर्गम आणि आदिवासी जिल्ह्यांतील युवक आणि युवतींना सक्षम करण्यासाठी, चंद्रपूर फ्लाइंग स्टेशन अंतर्गत मोरवा विमानतळ, चंद्रपूर येथे पायलट प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आखला जात आहे. या उपेक्षित भागातील इच्छुक वैमानिकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. पायलट प्रशिक्षण कार्यक्रम 18 महिन्यांचा सर्वसमावेशक प्रशिक्षण अभ्यासक्रम ऑफर करेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक पायलट बनण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान मिळू शकेल. pilot training program

     

    प्रवेशयोग्यता सुनिश्चित करण्यासाठी, कार्यक्रम कठोर निवड प्रक्रियेवर आधारित 10 विद्यार्थ्यांची निवड करेल ज्यामध्ये लेखी परीक्षा आणि वैद्यकीय मूल्यमापन समाविष्ट आहे. प्रति विद्यार्थी एकूण प्रशिक्षण खर्च अंदाजे रु. 41 लाख. ही संधी अधिक व्यवहार्य बनवण्यासाठी, निवडलेल्या विद्यार्थ्यांना एकूण प्रशिक्षण खर्चाच्या फक्त 10 टक्के योगदान देणे आवश्यक आहे. ही आर्थिक मदत विद्यार्थ्यांवरील ओझे कमी करण्यास आणि आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील व्यक्तींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम अधिक सुलभ बनविण्यात मदत करेल. Aviation industry

     

    या दुर्गम भागात पायलट प्रशिक्षण देऊन, या उपक्रमाचा उद्देश केवळ तरुणांना सशक्त करणेच नाही तर शहरी आणि ग्रामीण संधींमधील अंतर कमी करणे देखील आहे. हे या क्षेत्रांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या अप्रयुक्त क्षमता आणि प्रतिभा ओळखते आणि सर्वांना समान संधी प्रदान करण्याचा प्रयत्न करते. हा कार्यक्रम केवळ इच्छुक वैमानिकांसाठीच दरवाजे उघडत नाही तर या जिल्ह्यांमध्ये आर्थिक वाढ आणि विकासाचा मार्गही तयार करतो.

     

    हे विद्यार्थ्यांना मौल्यवान कौशल्ये आणि पात्रतेसह सुसज्ज करेल, ज्यामुळे त्यांना विमान वाहतूक उद्योगात परिपूर्ण करिअर बनवता येईल. या दूरदर्शी उपक्रमाद्वारे, सरकार सर्वसमावेशक वाढ आणि सक्षमीकरणासाठी आपली वचनबद्धता दाखवत आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील युवक आणि युवतींच्या स्वप्नांमध्ये गुंतवणूक करून ते उज्वल भविष्य आणि अधिक न्याय्य समाजाचा मार्ग मोकळा करत आहे. Economic growth

     

    लाभार्थी उमेदवाराकरीता निकष:

    उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10+2 भौतिकशास्त्र व गणित विषय घेऊन, ग्रामीण भागासाठी किमान 65 टक्के गुण व शहरी भागासाठी किमान 70 टक्के गुण प्राप्त करून पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा किंवा झालेली असावी. उमेदवार डीजीसीए मान्यताप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून केल्या जाणाऱ्या तपासणीमध्ये शारीरिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे.

     

    सदर प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरीता जिल्हा प्रशासनाकडून अर्ज मागविण्यात येतील. त्यानंतर लेखी परीक्षेद्वारे पात्र झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल व अंतिमरित्या पात्र विद्यार्थ्यांची वैमानिक प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी (अति.) दगडू कुंभार यांनी कळविले आहे.

  • चंद्रपुरातील मोरवा विमानतळ होणार विकसित

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर हा औद्योगीक जिल्हा आहे. येथे अनेक उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगांना पुरक असे नवे उद्योग या जिल्ह्यात उभे राहु शकतात ही बाब लक्षात घेत येथील उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी व्यावसायिक विमाने उतरण्याच्या दृष्टीने विकसीत करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

     

    आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली असून या भेटी दरम्यान सदर मागणी केली आहे. या मागणीचे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे. यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील इतरही प्रश्नांबाबत आमदार किशोर जोरगेवार यांची राहूल नार्वेकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.

     

    चंद्रपूर हा औद्यागिक जिल्हा असून मोठे वीज निर्मिती प्रकल्पकोळसा खाणीलोहखनिजसिमेंट उद्योगकागदउद्योगआयुध निर्माण प्रकल्पवनसंपत्तीपर्यटन असे अनेक उद्योग चंद्रपूर येथे आहे. यामुळे या क्षेत्रात अजून नवीन उद्योग आणि कारखाने उभारण्याची क्षमता आहे. या सर्व उद्योगांचे संचालन आणि नियमन मुंबईनागपूरदिल्लीबंगलोरअहमदाबादरायपुर या सारख्या शहरांमधून होत असते.

     

    चंद्रपूर व गडचिरोली सारख्या सुदूर व मागास क्षेत्राला जोडण्याकरिता शासनाच्या वतीने १९६७ ला मोरवा या ठिकाणी २२ हेक्टर जागेत विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने विमान धावपट्टी विकसित करण्यात आली. सदर विमानतळाची धावपट्टीची लांबी 900 मीटर व रुंदी 28 मीटर इतकी आहे. त्यामुळे सदर विमानतळ केवळ छोटेखानी विमान उतरण्यासाठी योग्य आहे. तसेच सद्यस्थितीत सदर विमानतळाचा वापर केवळ व्हीआयपीच्या हालचालींसाठी केला जातो.

     

    मात्र आता सदर विमान धावपट्टी व्यावसायिक विमान चलन च्या दृष्टीने विकसित केल्यास या विमानतळाचा वापर अधिक योग्य रीतीने केल्या जाऊ शकतो. तसेच नक्षलप्रभावित चंद्रपूर-गडचिरोली जिल्हायाकरिता सद्यस्थितीत केवळ हे एकच विमानतळ आहे. मोरवा येथील धावपट्टी चा विकास आराखडा नुसार व्यवसायिक विमान चालवण्यासाठी योग्य आहे. त्यामुळे राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या  व नक्षलप्रभावित चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला व्यवसायिकदृष्ट्या विमानसेवेने जोडण्यासाठी व  येथे नवीन रोजगार निर्मितीसाठी मोरवाचंद्रपूर विमानतळाची धावपट्टीचा विकास करण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

  • नागपूर फ्लाईंग क्लबचे विमान मोरवा विमानतळावर दाखल

    News 34chandrapur

    चंद्रपूर : नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. याअनुषंगाने नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – 172 आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी सदर विमानाने टेकऑफ, लँडींग व हवाई मार्गात येणा-या अडथळ्यांचे तसेच प्रशिक्षणासाठी इतर आवश्यक बाबींचे निरीक्षण केले.

     

    एखाद्या विद्यार्थ्याला वैमानिक होण्यासाठी 200 तास फ्लाईंग अवर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मोठ्या संख्येने होत असलेल्या विमानांच्या आवागमनामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी फ्लाईंग अवर्स पूर्ण होण्यास विलंब होतो. त्यामुळे नागपूर येथील फ्लाईंग क्लबसाठी पर्यायी ऑपरेशनल बेस म्हणून वेगळ्या धावपट्टीची गरज आहे. याबाबत चंद्रपूरातील मोरवा विमानतळाचा पर्याय शोधण्यात आला असून विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक बाबींची मोरवा येथे पूर्तता करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. याच अनुषंगाने आज (दि.6) मोरवा विमानतळ येथे विमानाची प्राथमिक चाचणी करण्यात आली.

     

    सदर विमानाचे वैमानिक कॅप्टन इझिलारसन व त्यांचे दोन सहकारी अभियंते सादत बेग आणि हरीष कश्यप हे विमानानेच नागपूरवरून मोरवा विमानतळावर दाखल झाले. काही वेळ उड्डाण करून निरीक्षण केल्यानंतर सदर विमान नागपूरकडे रवाना झाले.

     

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा नोडल अधिकारी अजय चंद्रपट्टण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता विष्णू ओडपल्लीवार, अमित पावडे आदी उपस्थित होते.