Tag: मोफत शस्त्रक्रिया

  • free heart surgery for child । आमदारांचा जीवनदायी उपक्रम; चंद्रपूरच्या लहानग्यांना नवी संजीवनी!

    free heart surgery for child

    free heart surgery for child : चंद्रपूर – आमदार किशोर  जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित महाआरोग्य शिबिराचा एक हृदयस्पर्शी आणि जीवनदायी टप्पा आज साकारला. या शिबिरातून हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एकूण सहा बालकांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. ही सर्व बालके चंद्रपूर जिल्ह्यातील असून त्यांचे वय आठ वर्षांखालील आहे.

    क्षयरुग्णाबाबत घुग्गुस मधील राजीव रतन चिकित्सालयने घेतला महत्वाचा निर्णय

    मोफत शस्त्रक्रिया होणार

    यामध्ये केवळ पाच महिन्यांचे अक्षु शेंद्रे याचाही समावेश आहे. सर्व बालकांना चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून जुपिटर हॉस्पिटल, मुंबई येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मयूर वाढई, रॉबिन बिश्वास, राकेश बोमनवार, सुमित बेले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व बालकांवर शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार आहे. बालकांना रवाना करण्याच्या या भावनिक क्षणी पालकांच्या डोळ्यात दिलासा आणि आनंदाश्रूंनी भरलेला होता.

    आ. जोरगेवार यांच्या सामाजिक उपक्रमातून सुरू झालेल्या या महाआरोग्य शिबिरामुळे जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना मोफत तपासणी, औषधे आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा मिळत आहे. अशा वैद्यकीय उपक्रमांना पुढे अधिक व्यापक स्वरूप दिले जाणार असून, कोणीही आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये ही आपली भूमिका असून हीच खरी आपली ध्येयपूर्ती असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

  • cataract free Maharashtra mission details । 💥 “मोतीबिंदू” संपवण्याची सुरुवात! महाराष्ट्रात ऐतिहासिक आरोग्य मोहीम

    cataract free Maharashtra mission details

    cataract free Maharashtra mission details : चंद्रपूर, दि. 12 : महाराष्ट्रातील नागरिकांचे नेत्रस्वास्थ सुधारण्यासाठी तसेच वाढत्या मोतीबिंदुची संख्या व सर्वसामान्य आणि गरीब जनतेपर्यंत सेवा पुरविण्याच्या उद्देशाने अंधत्व निर्मूलनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहीम राबविण्यात येणार आहे.

    मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ‘मोतीबिंदु मुक्त महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम जिल्हा सामान्य रुग्णालय व कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. ही मोहीम 22 जुलै ते 22 ऑगष्ट २०२५ या कालावधीत राबविली जाणार आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व मोतीबिंदु रुग्णावर मोफत उपचार केले जाणार आहेत.

    चंद्रपूर जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    यासंदर्भात आज (दि.12) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांची व्ही.सी. द्वारे सभा घेवून अधिनस्थ अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक/सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, नेत्रचिकित्सा अधिकारी यांना सदर मोहिमेचे उद्दिष्ट, नियोजन व अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले.

    मोहिमेचे प्रमुख उद्दिष्टे : 

    मोतीबिंदुच्या रुग्णांचे वेळीच निदान करणे, गरजु रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणे, अंधत्व रोखणे व जनजागृती वाढविणे, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरीकांपर्यंत सेवा पोहचविणे हे आहे.

    संपूर्ण जिल्हाभर या मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक/सेविका यांच्यामार्फत गृहभेटी देवून मोतीबिंदुग्रस्त रुग्णांना शोधून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व मोतीबिंदुग्रस्त रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घेऊन मोफत उपचार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

  • MLA health initiative । “मायेची सावली” ठरले आमदार – गरजूंसाठी आरोग्याचा प्रकाश

    MLA health initiative

    MLA health initiative : जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून मोठा दिलासा देणारी मोहीम राबवण्यात आली आहे. ज्युपिटर हॉस्पिटल, मुंबई आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तपासण्यात आलेल्या बालकांपैकी ११ बालकांना पहिल्या टप्प्यात पुढील उपचारासाठी आज मुंबईला रेल्वेने रवाना करण्यात आले. तेथे त्यांच्यावर हृदयविकारावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. Free heart surgery aid

    आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सायबर घोटाळ्याची होणार चौकशी

    या शस्त्रक्रियांसाठी एका रुग्णावर अंदाजे २ ते ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या ११ रुग्णांवर साधारणतः ४० लाख रुपयांच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. हा संपूर्ण खर्च आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून करण्यात आला आहे. याशिवाय, रुग्ण बालकासह त्यांच्या दोन नातलगांच्या मुंबईतील राहण्याची व प्रवासाची संपूर्ण व्यवस्था आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदारांच्या सामाजिक भानाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.विनोद बुरांडे, प्रविण वाभितकर, रिया सराटे, प्रांजली जिवतोडे, रोहिनी मोहुर्ले, यश वय्यातकर, प्रविन वासेकर, प्रज्ञा नागोसे, नीलिमा शेंडे, रिद्धी बत्तुलवार अशी पाठविण्यात आलेल्या रुग्णांची नावे आहेत.

    medical help for poor children

    आज सकाळी ९.३० वाजता या बालकांना त्यांच्या पालकांसह मुंबईकडे रेल्वेने रवाना करण्यात आले. आमदारांच्या पुढाकारामुळे कोणतीही आर्थिक अडचण न येता मोफत उपचार मिळणार असल्याने रुग्णांचे नातेवाईक भारावून गेले आहेत. आमच्या घरात अशा महागड्या उपचारांची सोय शक्यच नव्हती. आमदार किशोर जोरगेवार यांनी आमच्यावर मायेची सावली धरली, असे भावुक उद्गार बालकांच्या आई-वडिलांनी व्यक्त केले आहेत. medical help for poor children

    उपचारासाठी सर्वतोपरी मदत करणार

    समाजातील गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. आरोग्य शिबिरात पात्र झालेले रुग्ण गंभीर आजारांशी झुंज देत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठीच आमच्या पुढाकारातून या शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च उचलण्यात आला आहे. या बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात आपण यशस्वी होत आहोत. त्यांच्या उत्तम उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना केवळ उपचारच मिळत नाहीत, तर त्यांच्या जीवनात नव्या आशा निर्माण होत आहेत. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यातून मुंबईसारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेची संधी मिळणे ही निशुल्क आरोग्यसेवा उपक्रमाची मोठी देणगी ठरली आहे. तर पुढील टप्यात आणखी रुग्णांना उपचाराकरीता मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.