Tag: महिलेचा मृत्यू

  • NSUI demands action for stray cow attack । चंद्रपुरात मोकाट गाईच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, २ महिला गंभीर

    NSUI demands action for stray cow attack

    NSUI demands action for stray cow attack – चंद्रपूर : चंद्रपूर शहरानजीकच्या पडोली येथील इंदिरा नगर, वार्ड क्रमांक १ मध्ये मंगळवारी (१८ ऑगस्ट, २०२५) पहाटे ४ ते ५ वाजेदरम्यान एका मोकाट गायीच्या हल्ल्यात एका ६० वर्षीय बेबीबाई बाबुराव भगत या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    धक्कादायक, अचानक चेम्बर कोसळले, चंद्रपुरातील व्हिडीओ व्हायरल

    स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना गायीच्या मालकाच्या निष्काळजीपणामुळे घडली. मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असतानाही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

    घटनेची माहिती मिळताच, NSUI (National Students’ Union of India) च्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ पडोली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या प्रकरणी एक निवेदन सादर केले. NSUI चे जिल्हाध्यक्ष शफक शेख, तालुकाध्यक्ष संजू कुमार ग्वालवंशी आणि तालुकासचिव प्रमोद शेंडे यावेळी उपस्थित होते. stray cow attack Padoli Chandrapur woman killed

    NSUI ने या निवेदनात प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत:

    • १. कठोर कारवाई: संबंधित मोकाट गायीच्या मालकावर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.
    • २. आर्थिक मदत: मृत महिलेच्या कुटुंबियांना व गंभीर जखमी झालेल्या महिलांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी.
    • ३. कायमस्वरूपी उपाययोजना: शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला असून, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने किंवा संबंधित प्रशासकीय विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

    या घटनेने चंद्रपूर शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

  • sudden electric shock while drying clothes । 💥 अंगणातील तार ठरली मृत्यूचं कारण, महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!

    sudden electric shock while drying clothes

    sudden electric shock while drying clothes : राजुरा – मृत्यू हा कधी आणि केव्हाही येऊ शकतो, त्यासाठी एक निमित्त पुरे आहे, अधिक हृदयद्रावक घटना राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) गावात घडली. घरातील कामे आटोपते करीत असताना महिलेला विजेचा जोरदार धक्का बसला, या धक्क्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.

    चंद्रपुरात गांजा विक्री करणाऱ्या महिलांना अटक

    ४० वर्षीय सुवर्णा राजेश वांढरे असे त्या मृत महिलेचे नाव असून घरासमोरील अंगणात कपडे वाळू लावायला बाहेर आलेल्या सुवर्णा यांनी कपडे वाळविण्यासाठी अंगणातील लोखंडी तारांवर कपडे ठेवत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. हि घटना २० जुलै रोजी रविवारी सकाळच्या सुमारास घडली.

    सर्व्हिस केबलमुळे विजेचा प्रवाह

    विशेष बाब म्हणजे त्या तारेला कटलेली विजेची सर्व्हिस केबल लागली होती त्यामुळे त्या तारांमध्ये विजेचा प्रवाह सुरु होता, याची कल्पना सुर्वणा यांना नव्हती नेहमीप्रमाणे त्या आपलं काम करीत होत्या मात्र आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल असे कुणालाही वाटलं नसेल.

    या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून वांढरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.