Tag: भीषण अपघात

  • mother and daughter killed in road accident । आई, आपण पोहचू ना?” – पण त्या दोघींचा प्रवास वाटेतच संपला

    mother and daughter killed in road accident

    mother and daughter killed in road accident : बल्लारपूर – राजूराहून चंद्रपूरकडे दुचाकीने जात असताना ट्रक खाली येऊन आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वर्धा नदीच्या राजुरा पुलाजवळ बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बामणी गावाच्या हद्दीतील जलाराम मंदिराच्या समोर सोमवारचे दुपारी दीड वाजताचे दरम्यान घडला आहे.

    चंद्रपुरात जड वाहनांना नो एंट्री?

    मृतकाचे नाव ज्योती बंडू रागीट (३८ वर्षे) आणि त्यांची मुलगी सेजल बंडू रागीट (८ वर्षे) राहणार पेठ वार्ड राजुरा, असे आहे . ज्योती या स्कुटी क्रमांक एम एच ३४ बी एस५५३८ ने चंद्रपूरला आपल्याकडे आईकडे जात होत्या. धडक दिलेल्या ट्रकचा क्रमांक एम एच ३४बीझेड ७६९९ असा आहे.सेजल ही सहाव्या वर्गाची विद्यार्थिनी होती.


    बामणी – राजुरा ते आदिलाबाद या राष्ट्रिय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सूरू आहे. रस्त्याची उंची वाढविण्याकरीता मातीचे ढिगारे टाकण्यात आले. कुठल्याही प्रकारचे ठोस नियोजन नसल्याने या धिगाऱ्यावरील माती रस्त्यावर येत आहे. पावसात घसरून तर पाऊस नसताना प्रचंड धुळीचे साम्राज्य या ठिकाणी बघायला मिळत आहे. national highway construction accident

    जीव मुठीत घेऊन प्रवास

    नुकत्याच झालेल्या पावसात तर भर रस्त्यात चिखल होऊन अनेकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागला. या मार्गावरून नेहमीच प्रवश्याना तारेवरची कसरत करावी लागत असुन वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा अनेकांना प्राणाला मुकावे लागणार असल्याची भिती प्रवाशी व्यक्त करीत आहेत.

    पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, पोअं. नरेंद्र वाकडे करीत आहे

  • Big Road Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, 4 युवक जागीच ठार

    Big Road Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, 4 युवक जागीच ठार

    big road accident गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील गडचांदूर-भोयेगाव मार्गावरील निमणी-लखमापूर मार्गावरील दूध डेअरी जवळ आज 13 ऑगस्टच्या मध्यरात्री अंदाजे 1 ते 2 वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव अर्टिगा कार ने मागून जोरदार धडक दिल्याने जिवती तालुक्यातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

    राजकीय : विधानसभेची उमेदवारी द्या, 75 हजार मतांची आघाडी घेत निवडून येणार


    Big road accident जिवती तालुक्यातील 5 तरुण MH-04 FR-4081 या अर्टिगा कारने चंद्रपूर वरून गडचांदूर कडे येत असताना गडचांदूर पासून अवघ्या 5 ते 7 किमी अंतरावर असलेल्या लखमापूर-बाखर्डी मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक MH-18 N-6656 ला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत सुरज गव्हाले वय 22 रा. शेणगाव, सुनील किजगीर वय 27 रा. शेणगाव, आकाश पेंदोर 22 रा. पाटण, श्रेयश पाटील वय 22 रा. टाटाकोहोड ह्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अजय गायकवाड रा. कोलामगुडा हा गंभीर जखमी झाला.


    अपघाताची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पोस्टमार्टम करिता पाठविला व गंभीर जखमी युवकास उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र जखमी युवक गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. सदर घटनेमुळे जिवती तालुक्यात शोककळा पसरली आहे.

    अवश्य वाचा : कुख्यात गुन्हेगारांची चंद्रपुरात गोळ्या झाडून हत्या


    मागच्या आठवड्यात सुद्धा याच मार्गावर उभ्या ट्रकला धडक दिल्याने दोन जणांच्या मृत्यू झाला होता. परत रात्री अशीच पुनरावृत्ती झाल्याने मार्गावर पुन्हा भीषण अपघात घडल्याने लोक संतापले आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी रात्रीच अपघातग्रस्त कारला रस्त्याच्या बाजूला करत उभ्या ट्रकला पोलीस स्टेशन मध्ये आणले व रास्ता खुला रहदारीस केला. समोरील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.

    भोयेगाव-गडचांदूर मार्गावर अपघाताचे सत्र

    काही वर्षांपासून सुरू झालेल्या या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, सदर मार्गावर रोज 2 ते 3 अपघात होतात, या मार्गावर सर्व्हिस रोड नाही, रस्त्यावर वाहने उभे करू नका असे प्रशासनाचे निर्देश असताना सुद्धा चालक वर्ग प्रशासनाच्या आदेशाला जुमानत नाही.

  • Big Accident Chandrapur : दारूचा मोह जीवावर बेतला

    Big Accident Chandrapur : दारूचा मोह जीवावर बेतला

    News34 chandrapur

    वरोरा – तालुक्यातील खांबाडा येथील पेट्रोल पंप वरून डिझल भरून वर्धा जिल्ह्यातील नंदोरी येथे जात असलेल्या टिप्पर ला भरधावं वेगात असलेली दुचाकी टिप्पर च्या मागून घुसली यात घडलेल्या अपघातात दुचाकीवरील २ जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी असल्याची घटना खांबाडा येथील उदय बार जवळ सायंकाळी ७.३० वाजता घडली. मारोती चप्पलवार {२२), वैभव अडबले (२० ) दोघेही राहणार गोठाडी शेगाव, जि. वर्धा असे मृतक युवकाचे नाव आहे. Chandrapur accident

     

     

    वर्धा जिल्ह्यातील नंदोरी येथील गिता कन्ट्रक्शन कंपनीचा टिप्पर क्रमांक एमएच ३४ – २८०६ हा डिझेल भरण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याची सीमा असलेल्या खांबाडा येथील पेट्रोल पंप वर आला. डिझल भरून परत जात असताना त्याच मार्गाने तीन जण बसलेली दुचाकी भरधावं वेगात टिप्परच्या मागच्या बाजूने घुसली या भीषण अपघातात मारोती चप्पलवार व वैभव अडबले या दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. तिघेही वर्धा जिल्हातील गोठाडी शेगाव, येथील रहिवाशी असुन वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे खांबाडा येथे दारू पार्टी करण्यासाठी आले असल्याची चर्चा आहे. वृत्त लिहीपर्यंत गंभीर जखमी युवकाचे नाव कळले नाही. Marathi news

     

     

    घटनेची माहिती मिळताच वरोरा येथील रुग्णदूत लखन केशवानी घटना स्थळी तात्काळ दाखल होत अपघातग्रस युवकांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात वरोरा पोलीस करीत आहे.

  • Big Accident : काम आटोपून ते घराकडे येत होत्या पण मध्येचं घडलं भीषण

    Big Accident : काम आटोपून ते घराकडे येत होत्या पण मध्येचं घडलं भीषण

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ब्रम्हपूरी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या माहेर या गावातून वर्धा जिल्ह्यात चणा कापणीसाठी गेलेल्या १७ महिला सुमो गाडीतून काम आटोपून परतत असताना, उमरेड तालुक्यातील सिर्सीजवळ काल गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाहन उलटल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. चालकासह १४ महिला गंभीर जखमी झाल्या.

     

    ब्रह्मपुरी शहराजवळील माहेर येथील १७ महिला गेल्या काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात चणा कापणीसाठी जात होत्या. याकरीता महिलांनी सुमो वाहन भाड्याने घेतले होते. ते वाहन महिला कामगारांना दररोज ने आण करीत होते. काल गुरूवारी चालकाने माहेर गावातून पहाटेला १७ महिलांना सुमो वाहनात बसून पिंपरी गावी चना कापणीला घेऊन गेला होता. दिवसभर चणा कापणीच्या कामानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास उमरेड तालुक्यातील सिर्शी जवळ परत येत असताना महिलांचे वाहन उलटून गंभीर अपघात झाला.

     

     

    अपघातामध्ये रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागडे या महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तनवी विनोद मेश्राम, दुर्गा विजय आडकिने, संगीता देविदास आडकिने, वीणा विक्रांत अडकिने, सोनाबाई सिद्धके, संध्या संतोष बागडे, सरिता विजय नागापुरे, मनोरथा शांताराम मेश्राम, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अरविंद बागडे या महिलांसह वाहन चालक शंकर प्रभाकर मसराम (३०) रा. जांभुळघाट गंभीर जखमी झाला.

     

    घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुकर यांनी घटनास्थळ गाठून मदत कार्याला सुरुवात केली. एका रुग्णवाहिकेतून तीन महिलांचे शव उमरेड येथे पाठविण्यात आले. उर्वरित जखमींना चार रुग्णवाहिकेतून नागपूर येथे हलविण्यात आले असून स्वतः सतीश वारजुकर जखमी सोबत नागपूरला गेले आहेत. घटनेने माहेर गावात शोककळा पसरली आहे.

  • Surjagad Truck Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

    Surjagad Truck Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – कोठारी- गोंडपिपरी मार्गावरील आक्सापुर येथील हनुमान मंदिर जवळ हायवा ट्रकने दोन दुचाकींना सामोरा-समोर धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. Big accident in chandrapur

     

     

    रविवारी दुपारच्या सुमारास दोन दुचाकी क्रमांक Mh34AG 3224 व MH33 K6739 धारक मुलचेरा गडचिरोली येथून चंद्रपूर कडे येत होते, त्याचं वेळी चंद्रपूर वरून हायवा ट्रक क्रमांक Mh40 CM 3233 हा चंद्रपूर वरून सुरजागड येथे अतिवेगाने जात होता, हनुमान मंदिर आकसापूर येथे हायवा ट्रक ने दोन्ही दुचाकी धारकांना जबर धडक देत तब्बल 100 मीटर फरफटत नेले. Surjagad company

     

    हा अपघात इतका भयावह होता की एका दुचाकी धारकांचे धड अलग झाले, यामध्ये अमृत सुनील सरकार वय (32) वर्ष रा. कालीनगर मुलचेरा, शैलेंद्र कालिदास रॉय (63) विजयनगर मुलचेरा, मनोज निर्मल सरदार (43) कालीनगर मुलचेरा मृतकाचे नाव असून ट्रकचालकाने अपघात केल्यावर घटनास्थळावरून पसार झाला.

     

     

    विशेष म्हणजे सुरजागड कंपनी सुरू झाल्यापासून आजपर्यंत गोंडपीपरी तालुक्यात असंख्य अपघात झाले आहे, यामध्ये अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला, सुरजागड येथून वाहतूक करणाऱ्या जड वाहनाच्या वेगावर कुणाचेही नियंत्रण नाही, त्यामुळे गोंडपीपरी येथील नागरिकांचा नाहक बळी जात आहे.

     

     

    सदर अपघाताचा तपास कोठारी पोलीस निरीक्षक राजकीरण मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी श्रीनिवास जाधव, राजूरकर, टेम्भुर्णे व उपरे करीत आहे.

  • ब्रह्मपुरीत भीषण अपघात, विद्यार्थिनींचा मृत्यू

    ब्रह्मपुरीत भीषण अपघात, विद्यार्थिनींचा मृत्यू

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या अंगावरून ट्रक गेल्याने ट्रक खाली दबून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १२जानेवारी२०२४ रोजी दुपारी ११:४५ वाजेच्या दरम्यान नेवजा बाई हितकारणी कन्या विद्यालय गेट समोर ते बाजार समितीच्या गाळे बांधकाम केलेल्या कॉर्नरवर जवळ घडली.

    समीक्षा संतोष चहांदे वय (१७)वर्ष असे मृतक विद्यार्थिनीचे नाव असून ती मालडोंगरी येथील रहिवासी होती.

    समीक्षा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ती आज शाळेत जात होती.

     

    ट्रक येत असल्याचे पाहून ती बाजूला होण्याचा प्रयत्न केला असता अरुंद रस्ता व रस्त्यावर खड्डे असल्यामुळे रस्त्यावरून बाजूला होण्याच्या नादात तिची सायकल स्लिप होऊन ती ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली. त्यातच हा अपघात घडला असल्याचे अंदाज वर्तविला जात आहे.प्रतीक्षाच्या अंगावरून ट्रक गेल्याने ती चिरडली गेली. व घटनास्थळी तिचा मृत्यू झाला. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. व काही क्षणातच पोलिसांना प्राचारण करण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर ट्रक व ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले.

     

    मृतदेह सेवाविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

  • चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात भीषण अपघात

    चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात भीषण अपघात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील अति वर्दळीचा भाग व अपघात प्रवण स्थळ वरोरा नाका चौकात आज मोठी दुर्घटना घडली, या घटनेत ट्रक ने तब्बल 4 वाहनांना चक्काचुर केल्याची माहिती आहे.

    ट्रायस्टार हॉटेल ते वरोरा नाका चौकात अतिक्रमण झपाट्याने वाढत आहे, या मार्गावर होणाऱ्या अपघाताला हे अतिक्रमण सुद्धा कारणीभूत ठरले आहे.

     

    25 नोव्हेम्बरला शहरातील वरोरा नाका चौकातून ट्रक क्रमांक Mh04 DK 6344 हा मूल रोडच्या दिशेने निघाला मात्र बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावरून जाताना अचानक ट्रक चा रिव्हर्स गियर लागल्याने ट्रक अतिवेगात मागच्या बाजूने यायला लागला, मागे असलेल्या चारचाकी वाहन व दुचाकीला धडक देत तब्बल 100 मीटर अंतर ट्रक मागच्या दिशेने गेला, यामध्ये 3 चारचाकी वाहन व 1 दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनात कुणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

     

    ट्रक चालकाने समयसूचकता दाखवीत ट्रक मागच्या बाजूने सरळ नेला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

    मागील अनेक दिवसांपासून चंद्रपूर शहरात अपघातांची संख्या वाढत आहे, याला जबाबदार काही वाहतुकीचे नियम मोडणारे बेजबाबदार नागरिक तर मोठ्या प्रमाणात वाढत असलेले अतिक्रमण आहे.

  • बस व दुचाकीच्या अपघातात युवक ठार

    News34 chandrapur

    गडचांदूर – कोरपणा मार्गावरील खिर्डी गावाजवळ बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून त्यात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला.

    निखिल कोंडेकर असे मृत युवकांचे नाव असून तो विसापूर ता. बल्लारपूर येथील रहिवासी आहे.

     

    किनवट आगाराची बस क्र MH 30 BL 1650 गडचांदुर मार्गे चंद्रपूरला जात असताना समोरून येणारा दुचाकी स्वार युवकाने बस ला समोरासमोर धडक दिली, या अपघातात निखिल जागीच ठार झाला. घटनास्थळी गडचांदूर पोलीस स्टेशनचे पथक दाखल झाले असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.

  • भाजप खासदार अशोक नेते यांच्या वाहनाचा भीषण अपघात

    News34 chandrapur

    गडचिरोली – गडचिरोली लोकसभा मतदार संघाचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाचा आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला, सुदैवाने नेते या अपघातात बचावले.

     

    सकाळी 10 वाजताच्या सुमारास गडचिरोली मतदार संघाचे भाजप खासदार अशोक नेते हे नागपूर वरून गडचिरोली कडे जाण्यासाठी वाहन क्रमांक MH33AA9990 ने निघाले होते, पाचगाव जवळ पोहचल्यावर अचानक त्यांच्या वाहनात बिघाड झाल्याने चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटले, आणि वाहन डिव्हायडरला जोरात धडकले.

     

    या धडकेत वाहनांचे एअर बॅग्स खुलल्याने खासदार नेते बचावले, वाहनात त्यांच्यासोबत असलेले इतर 4 जण सुखरूप असल्याची माहिती आहे.

     

  • चंद्रपुर शहरात दुचाकीवर खोडकर मुलांची मस्ती आणि घडला भीषण अपघात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नवरात्र निमित्त विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते, शुक्रवारी रात्री महाप्रसादाचा लाभ घेऊन घरी परतताना पिता-पुत्राचा भीषण अपघात झाला, या अपघातात 8 वर्षीय मुलगा ठार झाला असून वडिलांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

     

    दोन दुचाकींच्या अमोरासमोर झालेल्या धडकेत सात वर्षीय बालक ठार झाला असून त्याचे वडिल आणि अन्य एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना चंद्रपूर-जुनोना मार्गावरील साई मंदिराजवळ शुक्रवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडला. विहान मनोज बोरकर असे मृतक बालकाचे नाव आहे. तर मनोज भाऊराव बोरकर आणि शिवान निशिकांत येनुरकर हे दोघे जखमी झाले आहे.

    मनोज बोरकर हे सात वर्षीय मुलगा विहानला दुचाकीवर बसवून घराकडे दुचाकीने जात होते. तर विरुद्ध दिशेने शिवान येनुरकर रा. मराठा चौक बाबूपेठ हा युवक दुचाकी क्रमांक एमएच ३४/बीडब्लू ३३८१ ने येत होता. या दोन्ही दुचाकींची साईमंदिराजवळ जोरदार धडक झाली. यात 8 वर्षीय बालक विहान बोरकर हा दुचाकीवरून उसळून डांबरी रस्त्यावर पडल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. तर वडिल मनोज बोरकर गंभीर जखमी झाले आहे. शिवान येनुरकर यालाही गंभीर दुखापत झाली असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकोडे करीत आहेत

    मनोज बोरकर हे बाबूपेठ येथे भाड्याच्या घरात राहत होते, काही खोडकर मुलांच्या दुचाकीवरील मस्तीने पिता पुत्राचा भीषण अपघात घडल्याने 8 वर्षीय विहान ला आपला जीव गमवावा लागला, चंद्रपुर शहरात अल्पवयीन मूल अतिवर्दळीच्या मार्गावरून फिल्मी स्टाईल ने दुचाकी अतिवेगात चालवितात, मात्र यावर वाहतूक विभाग काही ठोस कारवाई करीत नाही.