Tag: ब्रह्मपुरी विधानसभा

  • Brahmapuri Assembly : भाजपच्या या नेत्याला द्या विधानसभेची उमेदवारी

    Brahmapuri Assembly : भाजपच्या या नेत्याला द्या विधानसभेची उमेदवारी

    Brahmapuri Assembly ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राकारिता भारतीय जनता पार्टीकडून जनमतातील उमेदवार अविनाश पाल यांना उमेदवारी मिळावी म्हणून विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी यांनी चंद्रपूर भाजपा प्रभारी फग्गनसिंह कुलस्ते यांची भेट घेऊन निवेदन दिले.

    अवश्य वाचा : गरीब रुग्णासाठी आप पार्टीचे अर्धनग्न आंदोलन

    Brahmapuri Assembly ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात यावेळेस बदल करायचा असल्यास अविनाश पाल यांना उमेदवारी देण्यात यावी व उमेदवारी मिळाल्यास त्यांना जिंकून आणाची जबाबदारी आम्ही प्रमुख पदाधिकारी घेऊ असे त्यांच्या भेटीदरम्यान सांगितले.


    भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता असून दोन पंचवार्षिक पंचायत समिती सदस्य, भाजपा तालुका अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून त्यांनी चांगले काम केले असून सर्वाना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असून आजपर्यंत सावली तालुक्यात उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे यावेळेस भारतीय जनता पार्टीने सावली तालुक्यातील अविनाश पाल यांना उमेदवारी देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी त्यांना सोपविले.

    महायुती सरकारचे मोठे पाऊल, युवक-युवतींना मिळणार मोफत कौशल्य प्रशिक्षण


    निवेदन देताना दौलत भोपये, सदाशिव बोबाटे, नितीन टेप्पलवार, डियेज आभारे, मुक्तेश्वर थोराक, प्रविण देशमुख, प्रविण मेश्राम, ज्ञानेश्वर निकोडे, रोशन अन्सारी, देवानंद पाल, शरद मडावी, रामदास गेडाम, वर्षा गेडाम, गौरव यम्पलवार, अरविंद निकेसर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • मानवतेच्या नात्यातून ” तिळगुळाचा’ गोडवा जीवनात कायम असू द्या – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    मानवतेच्या नात्यातून ” तिळगुळाचा’ गोडवा जीवनात कायम असू द्या – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – मानवी जन्म घेणाऱ्या प्रत्येकाने समाजात राहून माणुसकीचे नाते जपले पाहिजे. धर्म, जात, वर्ण, चालीरीती, रूढी, परंपरा या अंगलट न आणता व अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञान युगात जगताना माणुसकी या सर्वात मोठ्या धर्माची शिकवण अंगीकारणे काळाची गरज आहे. मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर जे तिळगुळ दिल्या जाते त्याचा गोडवा कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात जपून ठेवावा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान येथे आयोजित मकर संक्रांत महोत्सवात उद्घाटक म्हणून बोलत होते.

     

    आयोजित मकर संक्रांत महोत्सवानिमित्त कार्यक्रमात
    कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते, ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार
    सहउद्घाटक म्हणून माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे हे तर अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांची उपस्थिती होती. सहअध्यक्ष म्हणून नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार हे उपस्थित होते.

     

    प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई पारधी, राजीव गांधी पंचायतराज संघटनचे प्रदेश महासचिव थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, बाजार समितीच्या उपसभापती तथा न.प. सभापती सुनिताताई तिडके, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगलाताई लोनबले, तालुका काॅंग्रेस उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, मुंबई येथील कंत्राटदार विजय भागडकर, माजी पोलीस पाटील किशोर तिडके, बाजार समितीचे संचालक दिवाकर मातेरे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा. डी. के. मेश्राम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, माजी सरपंच ईश्वर ठाकरे, उपसरपंच सुरेश ठिकरे, माजी अध्यक्ष से.सो. अनिल पिलारे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

     

    पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, क्षेत्र विकासासोबतच जनतेचे आरोग्य, शासनाचे जनकल्याणकारी योजना, व त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता रोजगार शिक्षण व मूलभूत सुविधा करण्याची सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी नात्याने माझी असून ती मी सदैव विश्वासहतेने पार पाडणर अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
    प्रास्ताविक खेमराज तिडके यांनी तर सूत्रसंचालन संतोष पिलारे यांनी केले.

    गावकऱ्यांनी अनुभवला महीला कबड्डीचा थरार

    संक्रांत महोत्सव निमित्ताने आयोजित महिला कबड्डी स्पर्धेत गावातील महिलांनी सहभाग घेतला. या महिलांनी कबड्डी सामन्यांमध्ये दाखवलेले डावपेच बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महिलांसाठी संगीत खुर्ची व हळदी कुंकू, वाणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.
    त्यानंतर रात्री एकल व सामुहीक नृत्य स्पर्धा घेण्यात आली. त्यात गावातील महिलांसह मुला-मूलींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांचे परिक्षण राहुल मैंद व पराग सहारे यांनी केले.
    विविध स्पर्धांसाठी रोख बक्षीसे सुध्दा ठेवण्यात आली आहे.
    विद्यार्थ्यांसाठी मोटीव्हेशनल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात नांदेड येथील बालाजी गाडे, माजी प्राचार्य भाऊराव राऊत यांनी मार्गदर्शन केले.

     

    वृध्दांना ब्लॅंकेटचे वितरण

    तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके व कंत्राटदार विजय भागडकर यांच्या कडून गावातील वृध्दांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.

  • खेळाडूंसाठी आनंदाची वार्ता – ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा विकास निधी मंजूर

    खेळाडूंसाठी आनंदाची वार्ता – ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा विकास निधी मंजूर

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – ग्रामीण खेळाडूंना वाव मिळावा याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर शासनाच्या वतीने क्रीडा संकुले उभारण्यात आली. अशातच ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी येथील क्रीडा संकुलन मध्ये प्रलंबित असलेल्या विकास कामांना अखेर पूर्णविराम मिळाला असून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नातून मतदारसंघातील तीनही तालुक्याला एकूण 25 कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला असून लवकरच ही विकासकामे सुरू करण्यात येणार आहे.

     

    ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात सिंदेवाही सावली व ब्रह्मपुरी अश्या तीन तालुक्यांचा समावेश आहे. मात्र क्रीडा साहित्य व इतर सोयी सुविधा अभावी आणि खेळाडूंना आपल्या खिलाडी वृत्तीचे प्रदर्शन करणे अवघड जाते. अश्या अनेक प्रतिभावंत खेळाडू व त्यांची प्रतिभा सर्वांपुढे यावी तसेच त्यांनी क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करावे या उदांत हेतूने राज्याची विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ब्रह्मपुरी मतदार संघातील तीनही तालुक्यातील क्रीडा संकुलनामध्ये प्रलंबित असलेली विकास कामे याची मागणी रेटून धरत खेळाडूंकरिता पूर्णपणे शक्ती पणाला लावून शासनाकडून 25 कोटीचा निधी मंजूर करून आणला.

     

    यात सिंदेवाही येथील क्रीडा संकुला पाच कोटींचा विकास निधी प्राप्त झाला असून सिंथेटिक हॉकी टर्फ प्रेक्षक गॅलरी, बास्केटबॉल कोर्ट दुरुस्ती व चेनलिंग फेंसिंग क्रीडांगण समपातळीकरण 200 मीटर धावपथ दुरुस्ती, धावनपथाच्या एका बाजूला प्रेक्षक गॅलरी विथ रुपी पाणी व्यवस्था क्रीडा साहित्य आदी कामांचा समावेश आहे.तर ब्रह्मपुरी येथील क्रीडा संकुल मध्ये एकूण सात कोटींचा विकास निधी मंजूर झाला असून यात 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक इंनडोर हॉलची दुरुस्ती, वुडन फ्लोरिंग बास्केटबॉल कोर्ट सिंथेटिकरण चेंज प्रेक्षक गॅलरी विथ रुपींग खेळांची मैदानी क्रीडा साहित्य विद्युतीकरण व अन्य विकास कामांचा समावेश आहे. तर सावली येथील क्रीडा संकुल मध्ये होऊ घातलेल्या विकास कामांकरिता एकूण 12 कोटींचा विकास निधी मंजूर झाला असून यात बॅडमिंटन हॉल, ऑफिस, जिम हॉल, 400 मीटर धावनपत फुटबॉल मैदान संरक्षण भिंत कबड्डी ,खो-खो ,व्हॉलीबॉल मैदाने, क्रीडा साहित्य फर्निचर, पाणी सुविधा, अशा विविध विकास कामांचा समावेश आहे.

     

    ब्रह्मपुरी मतदार संघातील या तीनही तालुक्यांमध्ये विकास कामांकरिता एकूण 25 कोटी असा मोठा विकास निधी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून मिळाला असून ग्रामीण खेळाडूंना मैदानी स्पर्धा व स्पर्धा पूर्वतयारी याकरिता अधिकाधिक भाव मिळणार आहे. तसेच लवकरच तीनही क्रीडा संकुलनामध्ये विकास कामांना सुरुवात होणार असून खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  • सावली, सिंदेवाही- लोनवाही नगरांच्या विकासासाठी दहा कोटींचा निधी मंजूर

    सावली, सिंदेवाही- लोनवाही नगरांच्या विकासासाठी दहा कोटींचा निधी मंजूर

    News34chandrapur

    ब्रह्मपुरी – ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही- लोनवाही व सावली या नगरांचा विकास साधने हेतू राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हातात परिश्रम घेत मागणी रेटून धरल्याने अखेर नगर विकास विभागाच्या वतीने दोन्ही शहरांना प्रत्येकी पाच कोटी असे दहा कोटी रुपये निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून सिंदेवाही – लोनवाही व सावली शहरांच्या विकासात भर पडणार आहे.

     

    ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात मोडणाऱ्या सावली व सिंदेवाही – लोनवाही या शहरांमध्ये लोक वस्त्यांचे विस्तारीकरण दिवसांगानिक वाढतच असून अनेक प्रभागात विविध विकास कामे प्रलंबित आहेत. या दोन्ही तालुकास्तरावरील शहरांमध्ये पूर्वी ग्रामपंचायत असल्याने अपुऱ्या निधी अभावी विकास कामे होऊ शकली नाही. मात्र शासनाने तालुकास्तरावरील शहरातील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये केल्याने नगर विकास विभागाचे विविध योजना मार्फत शहरांना निधी देण्यात येतो.

     

    यापैकीच एक असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सदर दोन्ही शहराला विकास कामाकरिता निधी प्राप्त व्हावा याकरिता राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी शासनास वेळोवेळी पाठपुरावा करून विकास निधी मंजूर करण्यास भाग पाडले. याचे फलित म्हणून सावली व सिंदेवाही – लोनवाही या दोन्ही नगरपंचायतींना प्रत्येकी पाच कोटी असे एकूण दहा कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला असून लवकरच शहरातील विकास कामे सुरू होणार आहेत. मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी समस्या जाणून घेत आपल्या विकासाभिमुख शैलीतून क्षेत्र आमदार तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पर्यंत शासन स्तरावरून कोट्यावधींचा निधी क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिला हेही विशेष.