Tag: फसवणूक

  • Rajan matka Sara matka fraud cases । 💥 ऑनलाईन मटक्याचा स्फोट! ‘Rajan Matka’ आणि ‘Sara Matka’ मधून लाखोंची फसवणूक

    Rajan matka Sara matka fraud cases

    Rajan matka Sara matka fraud cases : चंद्रपूर – कधी काळी शहराच्या कोपऱ्यांवर चालणारा जुगार आता मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचला आहे. ‘राजन मटका’ आणि ‘सारा मटका’ यांसारख्या ऑनलाईन जुगाराच्या ॲप्स आणि वेबसाईटनी चंद्रपुरातील तरुणांना ‘झटपट श्रीमंत’ होण्याचे आमिष दाखवून अक्षरश: कर्जबाजारी केले आहे. या ऑनलाईन जुगारात फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून, कायद्याची अंमलबजावणी करणेही अवघड झाले आहे. mobile matka betting fraud

    चंद्रपुरात बस चा भीषण अपघात एक ठार

    झटपट पैशाचे आमिष आणि फसवणुकीचे प्रकार

    पारंपरिक जुगाराप्रमाणेच या ऑनलाईन मटक्यातही एका किंवा दोन आकड्यांवर पैसे लावले जातात. मात्र, या ॲप्स आणि वेबसाईटच्या माध्यमातून जुगार चालवणारे लोक कमी पैशांवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवतात. याच आमिषाला बळी पडून अनेक तरुण मोठ्या रकमेची पैज लावतात. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे, जर एखादा क्रमांक जिंकण्याची शक्यता जास्त असेल, तर जुगार चालवणारे ऑनलाईन पद्धतीने तो क्रमांक बदलून टाकतात. त्यामुळे जिंकलेला नंबरही हरल्याचे दाखवले जाते. online matka gambling scams

    तक्रार करायची कुठे?

    ऑनलाईन जुगारातील ही फसवणूक एका अदृश्य जाळ्यात चालते. यात कुणीही थेट तक्रार करू शकत नाही, कारण हा व्यवहार ऑनलाईन आणि बेकायदेशीर असतो. देशात जुगारबंदी असूनही ऑनलाईन माध्यमातून हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, हे ॲप्स आणि वेबसाईट अनेकदा परदेशातून किंवा इतर राज्यांतून चालवले जातात, ज्यामुळे स्थानिक पोलिसांना कारवाई करणे अवघड जाते.

    यामुळेच चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक युवक जुगाराच्या या विळख्यात अडकले आहेत. पैशांच्या या व्यसनामुळे अनेकांनी आपली कमाई आणि संपत्ती गमावली आहे. अनेक कुटुंबांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे, तर काही ठिकाणी यातून आत्महत्या झाल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत.

    या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष देण्याची गरज असून, केंद्र सरकारने या ऑनलाईन जुगाराच्या वेबसाईट आणि ॲप्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

  • How to contact Economic Offences Wing । चंद्रपुरात पुन्हा गुंतवणुकीच्या नावावर नागरिकांची मोठी फसवणूक

    How to contact Economic Offences Wing

    How to contact Economic Offences Wing चंद्रपूर, दि. 31 : विविध योजना तसेच अधिक पैशाचा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून, शिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत निधी लिमीटेड शेगाव (बु.) या पतसंस्थेमध्ये  फसवणूक झालेल्या नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधिक्षक कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क करावा, असे आावाहन पोलिस विभागाने केले आहे.

    राज्यातील आयटीआय मध्ये क्रांतिकारी बदल, नव्या अभ्यासक्रमांचा समावेश

    वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील रहिवासी अब्दुल रहेमान शेख इस्माईल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत निधी लिमिटेडचे संचालक मनोज खोंडे, सुभाष चाफले, श्रीकांत घाटे यांनी 8 फेब्रुवारी 2022 मध्ये शेगाव बु. यथे पत निधीची स्थापना केली. स्थानिक लोकांना एजंट, व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करून स्थानिक लोकांना गुंतवणुकीचे प्रलोभन दिले. विविध योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास खूप फायदा होईल, याकरीता वाढीव व्याजदर, दाम दुप्पट परतावा, तात्काळ लोन सुविधा, लखपती बनण्याच्या योजना, पिकनीक कर्ज, तारण कर्ज, बचत गटांना कर्ज अशा विविध योजनांबाबत आमिष दाखविले. legal process for cooperative society investment scam claim

    स्थानिक गुंतवणुकदारांना विश्वासात घेऊन पतसंस्थेचे संचालक आरोपी मनोज खोडे, सुभाष चाफले, श्रीकांत घाटे व इतर आरोपींनी एकूण 1 कोटी 2 लक्ष 73 हजार 578  रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी पोलिस स्टेशन शेगाव बु. येथे भारतीय न्यास संहिता 318(4), 316 (2), 316(5), 3(5) सहकलम 3 एमपीआयडी अॅक्ट 1999 अन्वये गुन्हा नोंद असून तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर करीत आहे. economic offences wing filing procedure cooperative bank fraud

    गुंतवणूकदारांनो आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधा

    या प्रकरणी ज्या गुंतवणूकदाराची फसवणूक झाली आहे, अशा गुंतवणूकदाराच्या रक्कमेच्या याद्या तयार करणे सुरू आहे. तसेच ज्या गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळाली नाही, अशा गुंतवणूकदारानी गुंतवणुकीचे कागदपत्र (गुंतवणूकिचे प्रमाणपत्र, रक्कम जमा पावत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड ज्या खात्यावर पैसे पाहिजे त्या राष्ट्रीयकृत बँक खात्याच्याा पासबुकची झेरॉक्स प्रत) इ. माहितीसह महाराष्ट्र शासन परीपत्रक क्रमांक एम पी आय /प्र.क्र. 09/पोल-11 दिनांक 25/02/2019 अन्वये गुंतवणूकदाराचे परीशिष्ठ- 1 प्रमाणे फार्म भरून देण्याकरीताा आर्थिक गुन्हे शाखा, (पोलिस ठाणे दुर्गापुर परिसर) पोलिस अधिक्षक कार्यालय चंद्रपुर येथे तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक पंकज बेसाणे (मो. नं.7588518549) यांच्याशी संपर्क करावा, असे पोलिस विभागाने कळविले आहे.

  • Tadoba Resorts : ताडोबा येथे रिसॉर्टच्या नावाने अनेकांची फसवणूक

    Tadoba Resorts : ताडोबा येथे रिसॉर्टच्या नावाने अनेकांची फसवणूक

    Tadoba resorts ताडोबा येथे रिसॉर्ट च्या नावाने मोठ्या प्रमाणात अनेकांची फसवणूक झाली असून सदर प्रकरणातील आरोपी भरत धोटे हे पसार झाले आहे.

    Tadoba resorts ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांना रिसोर्ट प्रमाणे कुटी तयार करून देण्याच्या नावावर गुंतवणुकदारांकडून पैसे घेऊन प्रत्यक्ष कोणतेही बांधकाम न करणा-या भरत नानाजी धोटे (वय 38) रा. तुकूम, चंद्रपूर याने 41 लक्ष 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूरकडून करण्यात येत आहे. सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्याच्या दिनांकापासून फरार असून कोणत्याही नागरिकाला याबाबत माहिती असल्यास किंवा आरोपी आढळून आल्यास त्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला द्यावी, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

    अवश्य वाचा : अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

    Tadoba resorts याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिस स्टेशन दुर्गापूर, जिल्हा चंद्रपूर येथे सर्व पिडीत अन्यायग्रस्त फिर्यादी तर्फे अशोक पांडुरंग भटवलकर, रा.म्हॉडा कॉलनी, दाताळा, चंद्रपूर यांच्या लेखी रिपोर्ट वरून आरोपी भरत नानाजी धोटे,  रा. तुकुम, चंद्रपूर यांनी भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी स्थापन करून अभिकर्ते नियुक्त केले. त्यांच्या मार्फतीने मौजा पद्मापूर, अजयपूर, देवाडा, तळोधी  (नाईक), बोर्डा, किटाळी येथे कुट्यांचे  बांधकाम करण्याबाबत युनिव्हर्स ॲग्रो टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करारनामा केला. ताडोबा राष्ट्रीय वन उद्यान येथे  फिरण्यास येणाऱ्या लोकांना रिसोर्टप्रमाणे कुटी किरायाणे देऊन येणारे प्रतिमहिना मासिक उत्पन्न 7083 रुपये देण्याचे प्रलोभन देऊन प्रत्येक गुंतवणुकदारांकडून 2 लक्ष 50 हजार रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात  कुटीचे बांधकाम न करता गुंतवणूकदारांची एकुण 41 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केली. याबाबत  फिर्यादीच्या तक्रारीवरुन सदर गुन्हा नोंद असुन गुन्हयाचा  तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे.

    शिवप्रेमींचा संताप

    सदर  गुन्हयातील आरोपी भरत नानाजी धोटे हा गुन्हा दाखल झाल्याच्या तारखेपासून फरार आहे. तरी सदर आरोपीचा शोध घेण्याकरीता तसेच नमुद आरोपी का कोणास आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर 07172- 273258, 07172-264702 या क्रमांकावर तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर  चिकनकर (मो. नं. 9359258365) या क्रमांकावर माहिती देण्यात यावी, असे आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधिक्षक कार्यालय, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

  • चंद्रपुरात घडला असा गुन्हा की, पोलीस अधीक्षकांनाही करावे लागले हे आवाहन

    चंद्रपुरात घडला असा गुन्हा की, पोलीस अधीक्षकांनाही करावे लागले हे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – डिजिटल युगात गुन्हेगारी सुद्धा आधुनिक झाली आहे, आज गुन्हेगारीच्या युक्तीला तोड नसल्याचे दिसत आहे, ती गुन्हेगारी ऑनलाइन असो की ऑफलाईन, असाच एक गुन्हा चंद्रपुरात घडला, स्थानिक गुन्हे शाखेने अश्याच एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.

     

     

    नागरिकांच्या नावावर फायनान्स ने दुचाकी वाहन खरेदी करीत ते वाहन दुसऱ्या व्यक्तीला विकण्याचा गोरखधंदा तीन युवकांनी सुरू केला होता, मात्र स्थानिक गुन्हे शाखेमुळे हे घबाड पुढे आले.

     

    असे होते गुन्हेगारीचे स्वरूप

    नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे राहणारा आरोपी क्रमांक 1 आशिष सहारे व त्याचे सहकारी आरोपी 2 मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील पवन साहू, आरोपी क्रमांक 3 संदीप कनासिया बालाघाट मध्यप्रदेश येथे राहणारे हे तिघेजण एकमेकांचे मित्र, तिघांनी मिळून नव्या गुन्ह्याची योजना आखली.

     

    नागभीड येथे राहणारा आशिष सहारे याने गावातील गरीब नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढणे सुरू केले, यामध्ये नारायण पर्वते यांच्या नावावर चारचाकी वाहन घेतले, पर्वते यांचे सर्व कागदपत्रे सोबत घेत त्यावर कर्ज सुद्धा घेतले, आणि नंतर तेच वाहन दुसऱ्याला विकले, वाहन घेणाऱ्याला त्या वाहनांचे कागदपत्रे मिळाले नाही.

     

    काही दिवसांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पर्वते यांच्याकडून वाहनांचे हफ्ते मागायला आले, मात्र मी वाहन घेतले नाही असे त्यांनी सांगितले, नंतर फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व माहिती पर्वते यांना दिली, आपली फसवणूक झाली असल्याचे कळताच याबाबत पोलीस तक्रार करण्यात आली.

     

    गुन्ह्याची गंभीरता बघता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्याकडे वर्ग केला.

    स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पथक गठीत केले, सखोल तपास केल्यावर यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने 1 स्कॉर्पिओ, 1 ट्रॅक्टर व 14 दुचाकी असे तब्बल 16 वाहने किंमत 32 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

     

    स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक करीत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 420 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.

     

    जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी याबाबत जनतेला आवाहन केले की वाहन खरेदी करताना शोरूम मधून वाहनाची सखोल माहिती घ्यावी, कागदपत्रांची पडताळणी करावी, वाहन मिळवून देतो असे कुणी सांगितले तर पुढील व्यक्तीला आपली कागदपत्रे देऊ नका, त्यासंबंधाने कुणी आपल्याकडे आले की जवळच्या पोलीस स्टेशनला याबाबत माहिती द्यावी.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सपोनि नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी दीपक डोंगरे, गणेश भोयर, संजय वाढई, गोपीनाथ नरोटे, सतीश बगमारे, प्रदीप मडावी व सायबर पोलिसांनी केली.

  • सावधान या ऐप ने केली चंद्रपुरातील 434 नागरिकांची फसवणूक

    सावधान या ऐप ने केली चंद्रपुरातील 434 नागरिकांची फसवणूक

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वर्क फ्राम होमच्या नावाखाली घुग्घूस येथील मायलेकीसह जिल्हाभरातील साडेचारशेवर नागरिकांना एका ऑनलाइन कंपनीने गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित युवतीने घुग्घूस पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात फसवणूक करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित युवती आणि भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

     

     

    मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घूस येथील शुभांगी जीवने ही युवती रोजगाराच्या शोधात होती. तिने गुगलवर रोजगारासंदर्भात शोध घेतला. इन्स्टाग्राम या सोशल मीडियाचा वापरही तिने रोजगार शोधण्यासाठी केला. दरम्यान, काही दिवसानंतर तिच्या व्हॉट्सॲपवर एक लिंक आली. ACCIBIS Hotel online Rating या कंपनीचा संचालक असल्याचे सांगत चंदर सिंग नामक भामट्याने युवतीशी संपर्क करून संबंधित कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळले असे आमिष दाखविले.

     

     

    ही नेटवर्क कंपनी असून, स्वत:च्या आयडी अंतर्गत अन्य लोकांना कंपनीशी जुळविल्यास अतिरिक्त बोनस मिळेल असे सांगण्यात आले. युवतीने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. यानंतर तिला रिटर्न पैसे मिळू लागले. यानंतर तिने स्वत:ची आई, बहिणीसह काही मित्र, मैत्रिणींनाही या कंपनीशी जोडले. यानंतर नेटवर्क वाढत जाऊन साडेचारशे जणांचे हे नेटवर्क झाले. पीडित युवतीला सुरुवातीला दीड लाखापर्यंत तर तिच्या आईला एक लाखापर्यंतचे रिटर्न मिळाल्याने पीडितेने साडे सात लाख रुपये यात गुंतविले होते. यानंतर अनेकांनी दहा ते २० हजार तर काही ५० हजारापर्यंत रक्कम या कंपनीत गुंतविली आहे.

     

    सुरुवातीला कंपनीने रिटर्न दिले. मात्र, मागील काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना रिटर्न येणे बंद झाले. गुंतवणूकदारांच्या आभासी आयडीवर रकमा जमा होत होत्या. मात्र, ते पैसे काढता येत नव्हते. पीडितेसह काही गुंतवणूकदारांनी चंदर सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्याचा भ्रमणध्वनी बंद दाखविला जात आहे. कोणताही संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने घुग्घूस पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली. परंतु, घुग्घूस पोलिसांनी चंद्रपुरातील सायबर गुन्हे शाखेत तक्रार देण्यास सांगितले. यानंतर शुक्रवारी त्यांनी सायबर गुन्हे शाखा गाठून तेथेही तक्रार दिली. परंतु, सायबर गुन्हे शाखेने परत त्यांना संबंधित पोलीस ठाण्यातच तक्रार देण्यास सांगितल्याने न्याय कुणाकडे मागयचा असा प्रश्न पीडितेसह गुंतवणूकदारांनी उपस्थित केला आहे.

     

     

    ऑनलाइन फसवणुकीच्या संदर्भात देशात कोणतेही कठोर कायदे नाही. याचाच फायदा भामटे घेत असून, बनावट कंपन्यांच्या माध्यमातून रोज लाखो लोकांना ऑनलाइन गंडविले जात आहे. अशा प्रकारासाठी केंद्र सरकार जबाबदार असून, देशात ऑनलाइन फसवणुकीविरुद्ध कठोर कायदे करण्याची आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी भूषण फुसे आणि पीडित गुंतवणूकदारांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.