Tag: प्रदूषणमुक्ती संदेश

  • Sunday on cycle rally । क्रीडा विभागाचा अभिनव उपक्रम – सायकलवरून पर्यावरण जागृती!

    Sunday on cycle rally

    Sunday on cycle rally : चंद्रपूर – राज्य शासन व युवक सेवा संचालनालय,  पुणे यांच्या ‘खेलो इंडिया‘ उपक्रमांतर्गत आणि साई, मुंबईच्या निर्देशानुसार ‘संडे ऑन सायकल’ उपक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. या अंतर्गत आज (दि. 1) सकाळी  चंद्रपूर शहरातून भव्य सायकल रॅली काढण्यात आली.

    चंद्रपुरातील मच्छी बाजाराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

    या रॅलीत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, नंदू अवारे, मोरेश्वर गायकवाड, क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, संदीप उईके, वरिष्ठ लिपिक रंजना शेवतकर व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीला हिरवा झेंडा दाखवून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी सुरुवात केली. Khelo India cycling event 2025

    आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश

    सायकल चालविणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार असून यामुळे इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण, आरोग्यवृद्धी आणि साहसवृत्तीचा विकास साधता येतो. ‘फिटनेस का डोज, अर्धा तास रोज’ या घोषवाक्याखाली ही रॅली आयोजित करण्यात आली होती.

    सुमारे 10 किलोमीटर अंतराच्या या रॅलीत जनजागृतीपर घोषणांचा समावेश होता. या यशस्वी उपक्रमासाठी क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, संदीप उईके, क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, नंदू अवारे, मोरेश्वर गायकवाड व मानधन कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. खेलो इंडिया चे प्रशिक्षक रोशन भूजाडे यांचे या उपक्रमात मोलाचे सहकार्य लाभले.