Tag: पेन्शन योजना

  • sudhakar adbale on teacher pension rights । सुधाकर अडबाले यांचा शिक्षकांच्या पेन्शन हक्कासाठी आक्रमक पवित्रा!

    sudhakar adbale on teacher pension rights

    sudhakar adbale on teacher pension rights : चंद्रपूर : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत नगरपरिषद व नगरपंचायतीतील शाळांमधील शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयक प्रश्नावर आमदार सुधाकर अडबाले यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाकडे मागणी केली. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी उत्तरात पुढील एक ते दीड महिन्यांत ही फाईल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री (अर्थमंत्री) यांच्याकडे सादर केली जाईल आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. pension scheme for municipal school teachers

    चंद्रपूर सहकार क्षेत्राचे चाणक्य भाजपात

    ३१ ऑक्टोबर २००५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्तीवेतन योजना (डीसीपीएस) लागू करण्यात आली. राज्यातील महानगरपालिकेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील नगर विकास शासन निर्णय २२ फेब्रुवारी २०२२ अन्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) लागू करण्यात आली आहे. मात्र, नगरपंचायत व नगरपरिषद शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना अद्याप कोणतीही पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही,” असा मुद्दा आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात उपस्थित केला.

    निर्णय जाहीर करणार का?

    ते पुढे म्हणाले, “सदर योजना ही अंशदानावर आधारित असून, कर्मचाऱ्यांचा हिस्सा आणि शासनाचा हिस्सा यावर पेन्शन मिळते. पण आज वीस वर्षे झाली तरीही या कर्मचाऱ्यांना कोणतीही पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही. दरम्यान, काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले, काहींचे निधन झाले, तरी त्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. मागील अधिवेशनात देखील याबाबत शासन विचाराधीन असल्याचे उत्तर देण्यात आले होते आणि या वेळेसही तसेच उत्तर दिले गेले. हे अधिवेशन संपण्यापूर्वी याबाबत स्पष्ट निर्णय जाहीर करणार का?” असा थेट सवाल अडबाले यांनी सरकारला केला. maharashtra teacher pension update 2025

    या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, “नोव्हेंबर २००५ पासून लागू करण्यात आलेल्या अंशदान निवृत्तीवेतन योजनेला केंद्र शासनाच्या नवीन निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) मध्ये २०१५ पासून संलग्न करण्यात आले आहे. यासंदर्भात वित्त विभागाने संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. ही फाईल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री (अर्थमंत्री) यांच्याकडे सादर केली जाईल आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

  • guaranteed pension plan : आताच करा गुंतवणूक आणि मिळवा भरघोस पेन्शन

    guaranteed pension plan : आताच करा गुंतवणूक आणि मिळवा भरघोस पेन्शन

    guaranteed pension plan शिक्षण पूर्ण झालं की युवा नोकरीच्या शोधात लागतो, चांगलं पॅकेज मिळाव यासाठी आजचा युवा चांगलाच धडपडतो, मात्र म्हातारपणात आपल्या आयुष्याच्या कमाईने आपली शेवटचं आयुष्य चांगलं जावं यासाठी अनेकजण पेन्शन प्लॅन मध्ये गुंतवणूक करतात.

    अवश्य वाचा – RTE शिक्षणाचा अधिकार ऑनलाइन पोर्टल या तारखेला होणार पुन्हा सुरू

    guaranteed pension plan जे आयुष्याच्या शेवट आपण सुखी जीवन जगू याची आशा बाळगत आजचा युवा वर्ग उद्याची गुंतवणूक करीत आहे, आज आपल्याला आम्ही अश्याचं काही पेन्शन प्लॅन बद्दल माहिती देणार आहो, जे तुम्हाला पेन्शनची हमी देणार आहे.

     

    अटल पेन्शन योजना

    या योजनेत 18 ते 40 वर्षांपर्यंतचे नागरिक गुंतवणूक करू शकतात. या योजनेत वयाची 60 वर्षे झाले की गुंतवणूकदाराला 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते. 18 ते 40 वर्षाच्या कालावधीत तुम्ही किती गुंतवणूक करता, यावरून तुम्हाला किती पेन्शन द्यायचे हे ठरवले जाते.

     

    एसडब्ल्यूपी मध्ये म्यूच्यूअल फंड

    एसडब्ल्यूपी म्हणजे सिस्टेमॅटिक विदड्रॉअल प्लॅन. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला महिन्याला निश्चित पेन्शन मिळू शकते. बाजारातील चढ-उताराचा या योजनेवर परिणाम पडतो. म्हणूनच बाजारात मोठी घसरण झाल्यास तुम्ही गुंतवलेले पैसे बुडू शकतात.

     

    सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम

    guaranteed pension plan सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची शासकीय योजना आहे. एकूण पाच वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 8.2 टक्क्यांनी व्याज मिळते.  या योनजेत कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेत प्राप्तिकराच्या कलम 80सी अंतर्गत  1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर करबचतीचा फायदा मिळतो.

     

    पोस्ट ऑफिस मासिक पेन्शन योजना

    ही एक पोस्ट ऑफिसची मासिक पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत पाच वर्षांपर्यंत पेन्शन मिळवता येते. या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर 7.4 टक्के व्याज मिळते. या योजनेत कमीत कमी 9 लाख आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत एका व्यक्तीला जास्तीत जास्त 5,550 रुपये मासिक पेन्शन मिळते. जॉइंट अकाउंट असेल तर अशा खात्यांवर जास्तीत जास्त 9,250 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. Post Office Monthly Pension Scheme