Tag: नायलॉन मांजा

  • नायलॉन मांजामुळे धोका वाढतोय; चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम सुरू

    police crackdown manjha : चंद्रपूर ११ डिसेंबर (News३४) – मकरसंक्रांती पूर्व पतंगप्रेमी आतापासून पतंगोत्सव सुरु करतात मात्र यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. नायलॉन मांजाची विक्रीवर आळा यावा याकरिता चंद्रपूर पोलीस विभागाने मूल व दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई केली.

    १० डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या चंद्रपूर पथकाने केली, मुल पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना नायलॉन मांजा बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. (हे हि वाचा – बल्लारपूर मध्ये देशी कट्ट्याचा सुळसुळाट)

    नागोसे मोहल्ला मूल या भागात राहणाऱ्या २० वर्षीय साहिल नागोसे यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता पतंग उडविण्याकरिता वापरण्यात येणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा ३४ मग प्लास्टिक चक्री किंमत १७ हजार रुपये जप्त करण्यात आला. आरोपी साहिल नागोसे वर पोलीस स्टेशन मूल मध्ये कलम २२३, २९२, ३३६ व ५६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. police crackdown manjha

    दुसऱ्या कारवाईत दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विधी संघर्ष बालकाकडून मानवी जीवितास व पर्यावरणास धोकादायक असलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांजा mono kite fighter ३० मग प्लास्टीकी चक्री किंमत ३० हजार रुपये जप्त करण्यात आला. विधी संघर्ष बालकाने प्रतिबंधित नायलॉन मांजाचा अवैध साठा करून ठेवला होता. या प्रकरणी एकूण ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि दुर्गापूर पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोउपनि संतोष निंभोरकर, धनराज करकाडे, अजित शेंडे, प्रफुल गारघाटे, पोउपनि प्रवीण बिंकलवार, शार्दूल, मोरेश्वर गोरे, मंगेश शेंडे व सोनल खोब्रागडे यांनी केली.

    जिल्ह्यात कुठेही व्यापारी नायलॉन मांजा विक्री करीत असले किंवा साठवणूक केला असेल त्याबाबत पोलीस नियंत्रण कक्ष ११२ वर तात्काळ संपर्क करावा असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

  • Nylon manja accidents| मांजा ने चिरला एकाचा गळा

    Nylon manja Accidents

    Nylon manja accidents : चिमूर तालुक्यातील नेरी येथील रोशन लांजेकर युवा व्यवसायिक हे काही कामानिमित्त कन्या शाळे जवळून दुचाकीने जात असताना अचानक पंतगचा मांजा गळ्यासमोर आल्याने गळा चिरला गेला.

    भविष्य वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचवा – राज्यपाल राधाकृष्णन

    दरम्यान त्यांनी तात्काळ मांजा हातात पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून गळा आणि हात चिरून दुखापत झाली आहे. नेरी येथील डॉ वाघे यांच्याकडे प्राथमिक उपचार करून पुढील उपचार चिमूर येथील रुग्णालयात सुरू आहे.

    सदर प्रकरणी अज्ञात पतंग उडवणाऱ्या वर कारवाई करावी तसेच सदर विक्रेत्यांवर कारवाई करावी Just मागणी नागरिकांनी केली आहे.


    काही दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरात सुद्धा 8 वर्षीय बालकाचा मांजाने गळा चिरला होता, त्यानंतर पोलीस प्रशासनाने कारवाईची पाऊले उचलत 34 नायलॉन विक्रेत्यांना 3 दिवसांकरिता हद्दपार केले, मात्र ही हद्दपारीची कारवाई काहीच तालुक्यातील विक्रेत्यांवर केली होती, त्यामुळे इतर तालुक्यात नायलॉन विक्री सुरू असल्याचे चित्र आजच्या घटनेवरून पुढे आले आहे.

  • जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा – ताज कुरेशी

    जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा – ताज कुरेशी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जानेवारी महिना, संक्रांतीचा सण आणि पतंगबाजीचा जोर. यासोबतच आजच्या युगात नायलॉन मांजा वापरला जात आहे. याच्या निषेधार्थ चंद्रपूर काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष ताज कुरेशी यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले.

    सण साजरे करणे ही आपली संस्कृती आहे, या परंपरेनुसार आपण संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून त्याचा आनंद लुटतो. मात्र आज नायलॉन मांजाचा बेकायदेशीर वापर इतका वाढला आहे की, त्यामुळे पादचाऱ्यांना अनेक दुखपतींना सामोरे जावे लागत आहे, शिवाय पक्ष्यांनाही अनेकदा जीव गमवावा लागतो.

     

    या संदर्भात चंद्रपूर शहरात जनजागृतीसह चंद्रपूर काँग्रेस कमिटीचे पर्यावरण जिल्हाध्यक्ष ताज कुरेशी यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.पाटील यांना निवेदन दिले. प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी यावेळी कुरेशी यांनी केली.

     

    यावेळी आयुक्तांनीही पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देण्यासाठी एजाज खान, परवेज शेख, अखिलेश जनबंधू, शारिक भाई आदी उपस्थित होते.

  • चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर केली कारवाई

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर केली कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नव वर्षाच्या सुरुवातीला दुर्गापूर पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केल्यावर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने राजुरा येथे एका मांजा विक्रेत्यांवर कारवाई करीत तब्बल 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

     

     

    जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना दिले होते.

     

    निर्देश मिळाल्यावर पोलीस निरीक्षक कोंडावार यांनी पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांना प्रतिबंधित मांजा विक्रेत्यांबाबत माहिती काढत कारवाई करावी असे आदेश दिले.

     

    अतुल कावळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले, 7 जानेवारीला राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले गांधी भवन येथे गायत्री किराणा स्टोर वर धाड मारली, यावेळी दुकानदार 53 राजेश येरावार ताब्यात घेत दुकानाची तपासणी करण्यात आली, यावेळी मोनो काईट कंपनीची नायलॉन मांजा चक्री 26 नग किंमत 20 हजार 800, टूनटून कंपनीचा नायलॉन मांजा चक्री 18 नग किंमत 12 हजार 600 रुपये, गो इंडिया गो कंपनीचा नायलॉन मांजा चक्री 24 नग किंमत 16 हजार 800 रुपये असा एकूण 50 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

     

    आरोपी येरावार यांच्यावर कलम 5, 15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986, सह कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, अनुप डांगे, जमिर पठाण, मिलिंद चव्हाण व नितेश महात्मे यांनी केली.

  • नवीन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील नायलॉन मांजावर पहिली कारवाई

    नवीन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील नायलॉन मांजावर पहिली कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री सध्या गपचूप सुरू आहे, तलवारी पेक्षा 10 पट धार असलेला हा मांजा एका क्षणात गळा चिरतो, मकरसंक्रांत आली की हा मांजा विविध ठिकाणी दाखल होतो, सध्या प्रशासनाने दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधीच्या सूचना जाहीर केल्या होत्या.

     

    नववर्षात नायलॉन मांजावर चंद्रपूर शहरात पहिली कारवाई दुर्गापूर पोलिसांनी केली आहे.

    दुर्गापूर पोलिसांना मुखबिरने दिलेल्या माहितीनुसार डीबी पथकाने 6 जानेवारीला साडे अकरा वाजताच्या सुमारास दुर्गापूर येथील समृद्धी पतंजली दुकानावर धाड मारली.

     

    या धाडीत प्रतिबंधित नायलॉन मांजा आढळून आला, असून पोलिसांनी 2 चकऱ्या जप्त केल्या आहे, दुकान चालक आरोपी रामचंद्र नंदूरकर यांच्यावर कलम 5, 15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986, सहकलम 188 भांदवी अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

     

    विशेष म्हणजे दुर्गापुर पोलीस स्टेशनला पहिल्यांदाच महिला पोलीस निरीक्षक म्हणून लता वाढीवे यांची नियुक्ती करण्यात आली, दुर्गापूर पोलीस स्टेशनला रुजू होताच पोलीस निरीक्षक वाढीवे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नवीन वर्षातील प्रतिबंधित नायलॉन मांजावर कारवाई केल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.