Tag: दुर्गापूर पोलीस

  • resort violence in Chandrapur news । पूल पार्टीतून थेट पोलीस कोठडीत! चंद्रपुरात तरुणांचा चाकूकांड

    resort violence in Chandrapur news

    resort violence in Chandrapur news : जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य परिसरात शेकडो रिसॉर्ट पर्यटक व नागरिकांच्या मनोरंजनाकरिता बांधण्यात आले आहे, मात्र आता हे रिसॉर्ट दारू व नशेचा अड्डा बनत चालले आहे, निसर्गाच्या सानिध्यात मनोरंजन व पार्टी करण्यासाठी आलेल्या काही युवकांनी चंद्रपुरातील पद्मापूर पोद्दार रिसॉर्ट मध्ये गोंधळ घालत, रिसॉर्ट मॅनेजर वर चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले, याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी ५ आरोपी युवकांना अटक केली.

    तलवार हातात, दहशत निर्माण करण्यापूर्वी सिंदेवाही पोलिसांनी केली अटक

    १६ जून रोजी दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असेल्या पद्मापूर गावाजवळील पोद्दार रिसॉर्टमध्ये हि घटना घडली. येथे पूल पार्टीसाठी आलेल्या तरुणांनी नशेत धुंद होऊन डीजे चा आवाज कमी करण्याबाबत वाद करत रिसॉर्ट मॅनेजरवर चाकूने हल्ला केला. Poddar resort crime update June 2025

    डीजेच्या आवाजावरून वाद

    घुग्घूस येथील पाच तरुण सोमवारी सकाळी सुमारास ११ वाजता पोद्दार रिसॉर्टमध्ये आले. दारूच्या नशेत त्यांनी डीजे चा आवाज कमी करा म्हणत वाद घातला. वाद इतका टोकाला गेला की, त्यांनी थेट रिसॉर्ट मॅनेजर ३१ वर्षीय अमर द्विवेदी वर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आणि तेथून फरार झाले. जखमी मॅनेजरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.


    घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांत पाचही आरोपींना भद्रावती येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ललित गाताडे, आकाश आसुटकर, विष्णू बोंगाले, करण तीर्थगिरिवार आणि कृष्णा तोगार यांचा समावेश असून हे सर्व आरोपी घुग्घूस येथील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवकांवर कलम १०९ (१), २९६, ३५१ (३), १८९ (४), १९१ (३) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

  • Tadoba Jungle Safari : ताडोबा जंगल सफारीचे पर्यटकांना मिळाले बोगस तिकीट

    Tadoba Jungle Safari : ताडोबा जंगल सफारीचे पर्यटकांना मिळाले बोगस तिकीट

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या असलेला जिल्हा म्हणून आज चंद्रपूरची ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पामुळे ओळख आहे, वर्ष 2023 मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ठाकूर बंधूनी ऑनलाइन तिकीट विक्री च्या नावाने ताडोबा प्रशासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली होती, मात्र आता पुन्हा काही पर्यटकांची जंगल सफारी च्या नावाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. Tadoba tiger project

     

    छत्रपती संभाजी नगर येथे राहणारे 54 वर्षीय मनीष बावसकर यांनी जून 2023 ला बावसकर कुटुंब व नातेवाईक असे एकूण 18 जणांसाठी ताडोबा सफारी केयुज कडुकर या इसमाकडून बुक केली होती. यासाठी 25 मार्च महिन्यात केयुज कडुकर यांच्या फोन पे वर बावसकर यांनी तब्बल 25 हजार 500 रुपये, 27 मार्च 3 हजार रुपये व 14 एप्रिलला 10 हजार 400 रुपये असे एकूण 38 हजार 900 रुपये पाठविले होते. Jungle safari

     

     

    काही अपरिहार्य कारणामुळे बावसकर हे ताडोबा सफारी साठी येऊ शकले नाही, बावसकर यांनी पुन्हा ताडोबा सफारीसाठी कडुकर यांच्यासोबत सम्पर्क साधला आधीचे पैसे कडुकर यांचेकडे जमा होते, त्यांनतर बावसकर यांनी नोव्हेंबर 2023 ला 5 हजार फोन पे द्वारे कडुकर यांना पाठवीत 27 जानेवारी 2024 ची ताडोबा बुकिंग कन्फर्म केली. Online booking

     

     

    27 जानेवारीला बावसकर कुटुंब हे सफारी साठी ताडोबा येथील मोहरली गेटजवळ आले असता त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याला बुकिंग चे तिकीट दाखविले असता कर्मचाऱ्यांनी ते बोगस असल्याचे सांगितले, आपली फसवणूक झाली असे बावसकर यांच्या लक्षात आले, त्यांनी तात्काळ याबाबत दुर्गापूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

     

     

    दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असता काही तासात आरोपी केयुज कडुकर ला अटक करण्यात आली.

     

    पोलीस तपासात कडुकर यांनी 6 जानेवारीला मुंबई येथील 58 वर्षीय राकेश वाजपेयी यांचीसुद्धा अश्याच प्रकारे फसवणूक केली होती, फिर्यादी बावसकर व वाजपेयी यांची कडुकर यांनी बुकिंग च्या नावाखाली तब्बल 66 हजार 400 रुपयांनी फसवणूक केली, पोलिसांनी आरोपी कडुकर यांच्यावर कलम 420, 66(ड) व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अनव्ये गुन्हा दाखल केला.

     

    याबाबत वनविभाग सध्या काही बोलायला तयार नाही, मात्र आरोपी केयुज कडुकर यांचे 5 वर्षांपूर्वी ताडोबा येथे होम स्टे होते, मात्र त्यांच्या बोगस कामामुळे वनविभागाने कडुकर यांचे होम स्टे बंद केले होते, त्यांनतर सुद्धा सफारीसाठी आलेल्या पर्यटकांशी ओळखी करीत पुन्हा ताडोबा मध्ये यायचं असेल तर मला सम्पर्क करा मी सफारी बुकिंग करतो असे दर्शवायचा.

     

    सदरची यशस्वी कारवाई दुर्गापूर पोलीस निरीक्षक लता वाडीवे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश मोहतुरे, पोलीस कर्मचारी खुशाल खेडेकर, योगेश शार्दूल, योगराज काळसरपे, प्रमोद डोंगरे, मनोहर जाधव यांनी केली.

  • चंद्रपुरात अनेक वर्षानंतर पोलीस ठाण्यात महिला पोलीस निरीक्षकाची नियुक्ती

    चंद्रपुरात अनेक वर्षानंतर पोलीस ठाण्यात महिला पोलीस निरीक्षकाची नियुक्ती

    Marathi News

    चंद्रपूर – चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील तब्बल 65 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचे आदेश जाहीर केले आहे.

     

    यामध्ये पोलीस निरीक्षक 2, सहायक पोलिस निरीक्षक 28 व पोलीस उपनिरीक्षक 35 दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

     

    यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, रामनगर पोलीस स्टेशन व दुर्गापूर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांनी पोलीस स्टेशनमध्ये अनुभवी महिला पोलीस निरीक्षकाची वर्णी लागली आहे.

    दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदाचं महिला पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  यासोबत राम नगर गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांची स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर मध्ये बदली करण्यात आली आहे.

    16 जानेवारीला पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी सदर आदेश जारी केले आहे.

  • नवीन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील नायलॉन मांजावर पहिली कारवाई

    नवीन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील नायलॉन मांजावर पहिली कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री सध्या गपचूप सुरू आहे, तलवारी पेक्षा 10 पट धार असलेला हा मांजा एका क्षणात गळा चिरतो, मकरसंक्रांत आली की हा मांजा विविध ठिकाणी दाखल होतो, सध्या प्रशासनाने दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधीच्या सूचना जाहीर केल्या होत्या.

     

    नववर्षात नायलॉन मांजावर चंद्रपूर शहरात पहिली कारवाई दुर्गापूर पोलिसांनी केली आहे.

    दुर्गापूर पोलिसांना मुखबिरने दिलेल्या माहितीनुसार डीबी पथकाने 6 जानेवारीला साडे अकरा वाजताच्या सुमारास दुर्गापूर येथील समृद्धी पतंजली दुकानावर धाड मारली.

     

    या धाडीत प्रतिबंधित नायलॉन मांजा आढळून आला, असून पोलिसांनी 2 चकऱ्या जप्त केल्या आहे, दुकान चालक आरोपी रामचंद्र नंदूरकर यांच्यावर कलम 5, 15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986, सहकलम 188 भांदवी अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

     

    विशेष म्हणजे दुर्गापुर पोलीस स्टेशनला पहिल्यांदाच महिला पोलीस निरीक्षक म्हणून लता वाढीवे यांची नियुक्ती करण्यात आली, दुर्गापूर पोलीस स्टेशनला रुजू होताच पोलीस निरीक्षक वाढीवे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नवीन वर्षातील प्रतिबंधित नायलॉन मांजावर कारवाई केल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.