Tag: ताडोबा

  • Tadoba Machan stay experience । बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ताडोबामध्ये जंगलाची मचानीवरून सफर!

    Tadoba Machan stay experience

    Tadoba Machan stay experience : चंद्रपूर –  वाघ व इतर वन्यजींवाच्या हमखास दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत 12 मे 2025  ला बफर क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव उपक्रम निसर्गप्रेमीसाठी राबविण्यात येणार आहे. Tadoba wildlife experience booking

    या उपक्रमासाठी बफर क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रातील 50 मचाणी सज्ज करण्यात आलेल्या आहेत. निसर्ग प्रेमीकरिता ताडोबातील वन्यजीवन मचाणीवर बसून अनुभवण्याची ही सुवर्ण संधी आहे.

    ताडोब्यातील वाघोबाला उन्हाचे चटके, सफारी वेळापत्रकात बदल

    या प्राणीगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी 28 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत http://mytadoba.mahaforest.gov.in/ या संकेत स्थळावर बुकिंग सुरु होणार असून एकूण 100 निसर्गप्रेमी यामार्फत बुकिंग करू शकतात. सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रती व्यक्ती 4500 रुपये इतके शुल्क आकरण्यात येणार आहे. Machan stay Tadoba

    सहभागी होणाऱ्या पर्यटकांनी संकेतस्थळामार्फत 1500 रुपये अदा करून भरलेल्या रकमेची पावती सबंधित पर्यटन गेटला दाखवावी. उर्वरित रकमेमध्ये जिप्सी शुल्क  2 हजार रुपये, पर्यटन गेट ते मचाण प्रवास खर्च व मार्गदर्शक शुल्क  1 हजार रुपये इतके सबंधित पर्यटन गेटवर रोख स्वरूपात देण्यात यावे.

    सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींनी शाकाहारी जेवणाची व पाण्याची व्यवस्था स्वतः करावी तसेच कॅमेरा व सर्चलाईटला सदर उपक्रमामध्ये परवानगी नाही. इतर माहितीकरिता वरील संकेत स्थळावर भेट देण्यात यावी.

    सदर उपक्रमाविषयी काही अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेस श्री. सुमित कोहळे, 8421461698 (सहाय्यक पर्यटक व्यवस्थापक, उपसंचालक बफर कार्यालय, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्याशी संपर्क साधावा.

  • Tadoba Safari Timing Change । उन्हाच्या झळांनी ताडोबा सफारीची वेळ बदलली; जाणून घ्या नवे वेळापत्रक

    Tadoba Safari Timing Change

    Tadoba Safari Timing Change : चंद्रपूर ताडोबा – 45 अंशापार गेलेल्या तापमानामुळे चंद्रपूर देशात हॉट ठरले आहे. येथील जन जीवन प्रभावित होत आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याने सर्वांनाच त्याचा फटका बसत आहे. वाढत्या तापमानापासून जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पलही सुटला नाही. प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे पर्यटन सफारी प्रभावीत होऊ शकते त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापानाने सफारीच्या वेळेत बदल करून पर्यटकांना दिलासा दिला आहे. Tadoba safari timing


    देशातच नव्हे तर जगात चंद्रपर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्याघ्र दर्शनासाठी प्रसिध्द असे स्थळ आहे. त्यामुळे स्थानिक, देश विदेशातील पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. येथे सफारीकरीता बाहेरील पर्यटक मुक्कामी शुध्दा येतात. परंतु सध्या चंद्रपूरला उन्हाचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यापासून वन्यप्राणीही सुटले नाहीत.
    सध्या चंद्रपूर 45 अंशाच्या पार आहे. तर ब्रम्हपुरी 46 अंशाच्या घरात आहे. दरदिवशी तापमानात वाढ होत असल्याने जनजिवन प्रभावीत होत आहे.

    वाढत्या उन्हाच धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने चंद्रपूरला नैसर्गीक आपत्ती जिल्हा म्हणून घोषीत केले आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ताडोबात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. परंतु यावेळचा कडक उन्हाळा ताडोबातील पर्यटकांकरीता कठीण जात आहे. त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ताडोबातील दुपारच्या सफारीच्या वेळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. Tadoba temperature April

    प्रेमात अडथळा निर्माण, चंद्रपुरात झाली एकाची हत्या


    हा बदल 1 मे पासून करण्यात येणार होता, परंतु चंद्रपूरचे तापमान देशात हॉट ठरत आहे शिवाय तापमान 45 अंशाच्या पार गेल्याने गुरूवारपासूनच पर्यटन सफारीच्या वेळात बदल करण्यात आला आहे. सकाळची सफारी ही पूर्ववत वेळेतच सुरू आहे. परंतु दुपारी 2.30 ते 6.30 वाजता पर्यंत होणारी सफारी आता अर्धा तास उशिरा सुरू होणार आहे. म्हणजे 3.00 ते 7.00 वाजताची करण्यात आली आहे. ताडोबा व्यवस्थापनाने वेळेत बदल करण्याचा आदेश निर्गमित केला आहे.


    ताडोबाच्या कोअर व बफर झोनमध्ये विविध नावाने प्रसिध्द असे अनेक वाघ, वाघिणी आहेत. आपल्या रूबाबदार शैलीने ते पर्यटकांना आर्कषीत करतात. त्यामुळेच पर्यटक दरवर्षी ताडोबात पर्यटनांकरीता जावून वाघांचे दर्शन घेतात. ताडोबात वाघांची संख्या वाढल्याने आणि हमखास दर्शन होत असल्याने दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पर्यटकांची चांगलीच गर्दी बघायला मिळते. स्थानिक, राज्यातीलच नाही तर देश विदेशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक् ताडोबा येऊन आपली पर्यटकनाची हौस भागवितात. मात्र यावेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच चंद्रपूर तापायला लागले आहे. सुर्य चांगलाच कोपत असल्याने 45 अंशाच्या पार पारा गेला आहे. safari changed due to heatwave

    अंगाची लाही लाही होत आहे. जन जीवन विस्कळीत होत आहे. याच जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे तापमानही देशात केंद्रस्थानी आले आहे. उन्हाचा सर्वांनाच फटका बसत आहे. शिवाय हवामान खात्याने उष्ण लहरींचा इशारा दिल्याने येथील जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांचे वेळापत्रकात बदले करून 7 वे 11 वाजता केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला.


    त्यापाठोपाठ ताडोबा व्यवस्थापनानेही वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या पर्यटन सफारीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेऊन सफारीची वेळ अर्धातास केली आहे. त्यामुळे पर्यटकांची उन्हापासून सुटका होणार आहे. अनेक पर्यटकांनी तर बुकींग रद्द करून चंद्रपूरातील उन्हापासून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. काही पर्यटक् “कडक उन्हात नको रे बाबा पर्यटन सफारी‘ म्हणून ताडोबात सध्यातरी येण्याचे टाळत आहेत.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील या मार्गावर आला रानहल्ल्या आणि….

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेंवाही – नेहमी व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील आलेसुर – पेंढरी ह्या जंगलव्याप्त चिमूर मुख्य मार्गावर रान हल्ल्याने प्रवासी नागरीकांना दर्शन दिले.

    जवळपास १५ मिनिटे दहशत युक्त वातावरणात ये- जा करणाऱ्यां प्रवासी नागरिकांनी अवाढव्य मोठ्या असलेल्या रानहल्या ला पाहीले त्यामुळे १५ मिनिटे पेंढरी – चिमूर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतुक ठप्प झाली होती.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मार्गावर जंगली जनावरांसाठी अंडर पास ची व्यवस्था नसल्याने अनेक जनावरे रस्त्याने येजा करतात त्यामुळे आजपर्यंत अनेक जनावरांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.