Tag: तांडा भद्रावती

  • Bhadravati house burglary । रात्री चोरी, सकाळी अटक! भद्रावती पोलिसांच्या जलद कारवाईने चोर गजाआड

    Bhadravati house burglary

    Bhadravati house burglary : भद्रावती – भद्रावती शहरातील तांडा परिसरात राहणारे एक कुटुंब बाहेरगावी गेले होते, याचा फायदा घेत अज्ञाताने घरी प्रवेश करीत घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली मात्र भद्रावती पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या १२ तासात तो चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

    चंद्रपुरात तोंड दाबून हिसकावले ५० हजार

    शहरातील तांडा भागात राहणारे ३० वर्षीय अजय विजय माडोत हे १२ जून रोजी कुटुंबासहित बाहेरगावी गेले होते. मात्र त्याच रात्री अज्ञाताने घरात प्रवेश करीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लक्ष ३५ हजार रुपयांच्या मुद्देमालावर हात लंपास केला. quick police arrest after burglary Bhadravati

    १२ तासात आरोपीला अटक

    याबाबत भद्रावती पोलिसांना तक्रार प्राप्त होताच त्यांनी कमळ ३३१ (३), (४), ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. भद्रावती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी जात पंचनामा करीत सखोल माहिती घेत तांत्रिकदृष्ट्या तपास करीत व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ४० वर्षीय सोनू रामदास धारावत राहणार बरांज मोकासा, तांडा याला अवघ्या १२ तासात अटक करीत चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला. culprit caught in 12 hours

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाडिवे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथक प्रमुख पोउपनि गजानन तुपकर, पोलीस कर्मचारी महेंद्र बेसरकर, अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे व योगेश घाटोळे यांनी केली.