Tag: तक्रार करा

  • how to report illegal liquor Maharashtra । अवैध दारू बाबत तक्रार करा, डायल करा हा क्रमांक

    how to report illegal liquor Maharashtra toll-free

    how to report illegal liquor Maharashtra toll-free : मागील वर्षभरात जिल्ह्यात अवैध दारुची निर्मिती, त्याची वाहतूक व विक्री करणा-या 1668 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणा- या 151 दारु दुकानांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 129 अनुज्ञप्त्यांधारकांना एकूण 47 लक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.  तर 15 दुकाने 5 ते 15 दिवसांपर्यंतच्या कालावधीकरिता निलंबित ठेवण्यात आली आहेत.

    1668 आरोपीना अटक

    राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात 963 गुन्ह्यात 773 आरोपींना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून 42 वाहनांसह 98 लक्ष 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्या तुलनेत 2024-25 या आर्थिक वर्षात अवैध दारुविरुद्ध केलेल्या कारवाईत दुपटीने वाढ झाली आहे. या कालावधीत अवैध दारुची निर्मिती, विक्री, वाहतूक करणा-यांविरोधात नोंदविलेल्या 1840 गुन्ह्यात 1668 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून 135 वाहनांसह 1 कोटी 9 लक्ष 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 93 अन्वये सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेण्यासाठी 249 प्रस्ताव सर्व उपविभागीय दंडाधिका-यांकडे पाठविण्यात आले आहेत. illegal liquor raids 2024-25 Maharashtra

    जेवणांनंतर पाणी पीत आहात? तर हि माहिती एकदा वाचा

    तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य विक्री दुकानांचे अचानकपणे निरिक्षण केले जाते व नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास विसंगती प्रकरण नोंदवण्यात येते. मागील वर्षभरात (एप्रिल 2024 ते मे 2025) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीत एकूण 151 अनुज्ञप्त्यांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले होते. ही विसंगती प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईस्तव सादर केली असता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी 129 प्रकरणात प्रत्येकी 25 ते 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला असून गंभीर प्रकरणात दारु दुकानांचे व्यवहार 15 दिवसांपर्यत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. मागील वर्षभरात नोंदविलेल्या प्रकरणात नियमांचे भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांना एकूण 47 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

    तक्रारीसाठी डायल करा

    नागरिकांना त्यांच्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास त्याबाबतची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133  वर नोंदवावी, असे आवाहन  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितिन धार्मिक यांनी केले आहे.

  • toll-free number to report illegal alcohol sales । आमदाराने पकडली दारू प्रशासन पडले तोंडघशी, आता म्हणतात तक्रार करा

    toll-free number to report illegal alcohol sales

    toll-free number to report illegal alcohol sales : चंद्रपूर – जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

    राजुरा विधानसभेचे भाजप आमदार देवराव भोंगळे यांनी नागरिकांच्या तक्रारीवर अवैध दारू पकडल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासन आता खळबळून जागे झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेकठिकाणी अवैध व नकली दारूचा पुरवठा होतो मात्र यावर उत्पादन शुल्क विभाग कारवाई करीत नाही, यावर आमदार भोंगळे यांनी तत्परता दाखविल्याने प्रशासन तोंडघशी पडले आहे.

    नागभीड तालुक्यातील नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

    या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक रीना जैनबंधू, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा प्रमुख नितीन धार्मिक, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) योगेश पारधी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

    नागरिकांच्या तक्रारींवर कारवाई करा

    बैठकीत पोलिस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूविरोधात राबवलेल्या विविध कारवायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर दोन्ही विभागांनी संयुक्तपणे तात्काळ कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यावेळी दिले. प्रशासनाच्या तत्परतेमुळे नागरिकांचा यंत्रणांवरील विश्वास वाढेल आणि अवैध दारूमुळे उद्भवणाऱ्या सामाजिक व आरोग्यविषयक समस्यांपासून त्यांना प्रभावी संरक्षण मिळेल, असेही ते म्हणाले. how to report illegal liquor in Maharashtra

    पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे संयुक्त पथक कारवाई करणार

    अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संयुक्त पथक नियमितपणे कारवाईचा आढावा घेईल. तसेच तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करून प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यावे. अवैध दारूच्या विरोधात जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याने दिलेल्या क्रमांकांवर नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात. जिल्हा प्रशासन अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी कटीबद्ध असून, सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

    तक्रारी करिता क्रमांक

    जिल्हा प्रशासनाचे “वंदे मातरम चांदा” टोल फ्री क्रमांक : 1800-233-8691. राज्य उत्पादन शुल्क विभाग टोल फ्री क्रमांक : 1800-233-9999- व्हाट्सअप क्रमांक : 8422001133).