Tag: डीजे साउंड

  • DJ equipment theft case । 📢 सिंदेवाही पोलीस आणि एलसीबीची धडक कारवाई – डीजे चोरांच्या टोळीचा पर्दाफाश!

    DJ equipment theft case

    DJ equipment theft case : सिंदेवाही – आजकाल चोरीसाठी रोख, सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्याव्यतिरिक्त इतर साहित्य चोरण्यास चोर आपली प्राथमिकता दाखवीत आहे, अश्याच एका प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व सिंदेवाही पोलिसांच्या संयुक्त कारवाई डीजे साहित्य चोरी करणाऱ्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

    ४ महिन्याच्या आयुषला आहे १६ कोटी रुपयांच्या इंजेक्शनची गरज

    पोलीस स्टेशन सिंदेवाही मध्ये चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरु होता, या गुन्ह्यात डीजे चे साहित्य असा एकूण १ लक्ष ५० हजारांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला होता. सिंदेवाही पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते.

    ५ आरोपीना अटक

    सदर प्रकरणाचा व आरोपींचा शोधात असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा व सिंदेवाही पोलिसांच्या संयुक्त शोधमोहिमेला यश प्राप्त होत, या प्रकरणातील आरोपी सिंदेवाही येथील २८ वर्षीय शुभम नागोसे व इतर ४ जणांना अटक करण्यात आली. गुन्ह्यात चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल व व गुन्ह्यात वापरलेले वाहन यावेळी जप्त करण्यात आले. police catch 5 thieves with DJ items

    Powered by myUpchar

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व सिंदेवाही पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सागर महल्ले, पोउपनि प्रेमनाथ ठवकर, पोलीस कर्मचारी जयंत चुनारकर, नितेश महात्मे, गणेश भोयर, प्रदीप मडावी व दिनेश अराडे यांनी केली.

  • चंद्रपुर नवरात्री महोत्सवात डीजे वाजणार काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर : केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 अन्वये तसेच ध्वनी प्रदूषण(नियमन व नियंत्रण) नियम, 2000 च्या नियम 5(3)नुसार, ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी, ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यासाठी, संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याकरीता सन-2023 मधील 10 सवलतीचे दिवस निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी 5 दिवस राखीव ठेवण्यात आले आहे. निश्चित करण्यात आलेल्या 10 दिवसांपैकी अष्टमी दि. 22 ते 23 ऑक्टोबर 2023 हे 2 दिवस नवरात्र उत्सवाकरीता निश्चित करण्यात आले आहे.

     

    तसेच, आमदार किशोर जोरगेवार यांनी नवरात्रोत्सवात माता महाकाली महोत्सवाकरीता पंचमी, षष्टी व सप्तमी दि. 19 ते 21 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वाजविण्यास सवलत मिळण्याकरीता विंनती केली आहे. त्याअनुषंगाने, नवरात्र उत्सवादरम्यान श्री. माता महाकाली महोत्सवाकरीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी, राखीव ठेवण्यात आलेल्या 5 दिवसापैकी 1 दिवस दि. 19 ऑक्टोबर रोजी पंचमी निमित्त सवलतीचा दिवस म्हणून निश्चित करण्यात येत आहे.

     

    निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिका-यांकडून परवानगी घेऊनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, असे जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.