Tag: ठिय्या आंदोलन

  • village protest for road | आश्वासन फसवं ठरलं? MLA भोंगळे उतरले थेट आंदोलनात

    village protest for road

    village protest for road : राजुरा तालुका (ता. २३ जून) : पालगाव ग्रामस्थ मागील अडीच ते तीन वर्षांपासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडे रस्त्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहेत. चिखल आणि खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदने देऊन तसेच कंपनी प्रशासनाशी चर्चा करूनही रस्ता प्रश्न सुटला नाही. याच पार्श्वभूमीवर ५ मे रोजी ग्रामस्थ आक्रमक होत कंपनीच्या मुख्य कार्यालयात आंदोलन केले होते.

    चंद्रपुरात वाळू माफियांची मुजोरी, वाळूने भरलेला ट्रक तहसीलदार समोर पळविला

    कंपनी प्रशासनाने पाठ फिरविल्याने ग्रामस्थांनी कार्यालयाचा प्रवेशद्वार बंद करून ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनास राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. स्वतः दोन दिवस आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांनी पुढाकार घेतला होता. त्या आंदोलनानंतर कंपनी प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते की ३० मेपर्यंत अल्ट्राटेक ते पालगाव रस्त्याचे काम सुरू केले जाईल. villagers protest for road construction

    सिमेंट कंपनी विरोधात गावकऱ्यांमध्ये संताप

    मात्र ३० मे तारीख उलटून गेली तरी प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झाले नाही. कंपनीकडून केवळ टोलवाटोलवीची उत्तरे मिळू लागली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून आजपासून आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात नांदा फाटा येथील कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता कामासाठी पुन्हा ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली आहे. rural road development issues

    पालगाव हे गाव अल्ट्राटेक कंपनीने दत्तक घेतलेले असून कंपनीची खाणसुद्धा गावालगतच आहे. अशा परिस्थितीतही रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी गावकऱ्यांना आंदोलन करावे लागणे हे दुर्दैव म्हणावे लागेल.

  • Vegetable seller : चंद्रपुरात चिल्लर भाजीपाला विक्रीचा वाद शिगेला

    Vegetable seller : चंद्रपुरात चिल्लर भाजीपाला विक्रीचा वाद शिगेला

    Vegetable seller चंद्रपूर – चंद्रपुरात कृषी उत्पन्न बाजार समिती मधील ठोक भाजीपाला विक्रेता व्यापाऱ्यांनी मनमर्जी वागत भाजीपाल्याची चिल्लर विक्री सुरू केली आहे, ते पूर्णतः नियमबाह्य आहे, त्या चिल्लर विक्रीमुळे गंजवार्ड येथील भाजीपाला विक्रेत्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.

    त्या दलालांविरोधात अनुसूचित जनजाती आयोगाला तक्रार

    Vegetable seller ठोक व्यापाऱ्यांनी चिल्लर विक्री बंद न केल्यास गंजवार्ड येथील भाजी विक्रेता संघटना 12 फेब्रुवारीला कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ठिय्या आंदोलन करणार असा इशारा 9 फेब्रुवारीला आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
    विशेष म्हणजे सदर चिल्लर विक्री ही ठोक व्यापारी व बाजार समिती संचालकांनी सुरू केली आहे.

    चंद्रपुरात आता ठोक व चिल्लर भाजी विक्रेत्यांचा वाद येणाऱ्या काळात वाढणार असल्याची चिन्हे आहे.

    चंद्रपूर शहरात दररोज पहाटे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट मध्ये शेतकरी भाजीपाला घेऊन दाखल होतात, सदर भाजीपाल्याची बोली लागल्यावर लहान व्यापारी ते खरेदी करतात, आणि बाजारात विक्रीसाठी आणतात मात्र सध्या मोठे व्यापारी चिल्लर विक्री करीत असल्याने लहान व्यापाऱ्यांचा माल कुणी खरेदी करीत नाही, त्यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांनी चिल्लर विक्री बंद अशी मागणी लहान व्यापाऱ्यांनी केली आहे.

    छोटे व्यापारी म्हणतात की आम्ही चिल्लर विक्री करीत आपल्या परिवाराचे पोषण करतो मात्र मोठे व्यापारी आमच्या पोटावर लाथ मारू बघत आहे, हे अत्यन्त चुकीचे आहे त्यांनी आता चिल्लर विक्री थांबवायला हवी. अन्यथा आम्हाला मोठ्या व्यापारी विरोधात आंदोलन करावे लागेल.

  • DBT योजनेचा फुग्गा फुटला

    DBT योजनेचा फुग्गा फुटला

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुमुल जिल्हा आहे. आदिवासींच्या विकासासाठी व प्रगतीसाठी संविधानामध्ये अनेक तरतुदी असताना व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व अनेक योजना कार्यरत असताना केवळ राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे या जिल्ह्यातील अनेक आदिवासीं विद्यार्थी महिना उलटूनही डीबीटी न मिळाल्यामुळे अनुदानापासून वंचित म्हणजेच शिक्षण व विकासापासून वंचित राहण्यासाठी बाध्य झाले आहे.

     

    ५ वर्षापूर्वी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही अनुदान देणारी योजना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली. पण गेल्या तीन वर्षापासून नेहमीच बजेट नसल्याचा कारण देऊन या विद्यार्थ्यांना नियमित अनुदानापासून वंचित ठेवण्यात येते आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांचा जेवण, शालेय साहित्य व त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशाअभावी त्यांच्या अडचणीत वाढ होते.

     

    आदिवासी विद्यार्थ्यांकडून हे सतत लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा शासन व प्रशासन पातळीवर याबद्दल संवेदनशीलता नाही. शासनाकडून अनुदान मिळण्यास सातत्याने विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. ही योजना बंद करण्यात यावी, व पूर्वीची वस्तीगृहात मेस व शालेय साहित्य पुरवणी केल्या जावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

     

    या मागणीसाठी आज हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांचा मोर्चा हा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या प्रांगणात पोहोचला. यावेळी उपस्थित सर्व अधिकार्‍यांची तारांबळ उडाली. प्रकल्प अधिकारी मुरुंगणाथम एम यांनी वरच्या पातळीवर दूरध्वनीद्वारे संपर्क केला व या विद्यार्थ्यांची अनुदान लवकरात लवकर कसे मिळतील यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. पण विद्यार्थ्यांना फक्त आश्वासन घेऊन आपल्या वस्तीगृहात परत जावे लागले.

     

    विद्यार्थी आपल्या समस्यां घेऊन प्रकल्प अधिकाऱ्यांकडे आल्याचे समजतात डॉ अभिलाषा गावतुरे यांनी सुद्धा धाव घेतली. त्यांचा प्रश्न किती गंभीर आहे व तथा सोडवणे का आवश्यक आहे हे प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. तसेच कुठलाही आदिवासी वस्तीगृहातील एकही विद्यार्थी उपाशी राहता कामा नये ही गंभीर बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर मदत करण्याचे आश्वासन देखील दिले तसेच डीबीटी न आल्यामुळे कुठल्या ही आदिवासी विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास आणि शाळा सोडून गावाकडे जाऊ नये, स्वतःचे शैक्षणिक नुकसान करून घेऊ नये.

     

    त्यांचा जेवणाचा व शालेय शिक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवू असे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आश्वासित केले. त्यांच्यासोबत नितेश कुळमेथे व इतर कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.

    ज्या जिल्ह्यात आदिवासींनी निर्माण केलेली वनसंपदा आहे आणि या जिल्ह्याला वैभव व संस्कृती जडणघडण ज्यांच्यामुळे आहे त्या समाजाची अवस्था अतिशय बिकट आहे. ज्या वनसंपदेवर लाखोची उलाढाल होऊन वनविभाग व इतर विभाग लाभार्थी बनले आहेत आज त्याच वनातील आदिवासी विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे हे इथल्या राजकीय व प्रशासकीय लोकांसाठी सुद्धा शरमेची बाब आहे.

     

    एकीकडे आदिवासींचा विकास करण्यासाठी स्वतंत्र मंडळ आणि योजना तयार कराव्यात पण त्यांचा विकास तर सोडाच पोटात अन्न द्यायला जर सरकारकडे पैसा नसेल तर खरंच विकास कुणाचा होत आहे असा गंभीर प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला! राजकारणी तुपाशी तर जनता उपाशी हे चित्र चंद्रपूरला नेहमीच बघायला मिळतं. हा प्रश्न तत्काळ निकाली निघावा असे निवेदन डॉक्टर अभिलाषा गावतूरे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

  • चंद्रपूर पोलिसांचा संयम सुटला आणि….

    चंद्रपूर पोलिसांचा संयम सुटला आणि….

    News34 chandrapur

    पोंभूर्णा :- धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर झालेल्या मागील आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेले कलम ३०७ व ३५३ मागे घेण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन पोंभूर्णा पोलिस स्टेशन समोर सोमवार पासून सुरू असलेला ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी साडे अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी ३० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

     

    धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व ईको-पार्कमध्ये आदिवासी संस्कृतीची झालेली अवहेलना प्रकरणी पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.

    सदर आंदोलनात वन विभागाच्या कार्यालयाची तोडफोड सहित पोलीस कर्मचारी व उपविभागीय अधिकारी इंगळे यांच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली होती, त्यानंतर पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते, आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी थेट पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरू झाले, 2 दिवस पोलिसांनी संयम बाळगला मात्र त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवले.

     

    विशेष म्हणजे आदिवासी समाज बांधवांना ठिय्या आंदोलन करण्यासाठी घेऊन आलेले कार्यकर्ते तिथून पळाले होते,

     

    बुधवारी दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान प्रकरण चिघळणार असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जुन्या गुन्ह्यातील ४ लोकांना व आंदोलनातील २६ लोकांना ताब्यात घेतले आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.

     

    यावेळी पोलिसांनी ३७ व ईतर २५ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून त्यांचेवर कलम १४१, १४३, १४७,१४९,३४१,३५३,१०९,१८८ व भादवी सहकलम १३५ अन्वये गुन्हे दाखल केले.

    पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयातील आंदोलना दरम्यान जगन येलके व ईतर १२ लोकांवर ३०७ व ३५३ व विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यातील चार लोकांना पोलिसांनी आंदोलनस्थळी ताब्यात घेतले.

     

    यात गणेश परचाके,दर्शन शेडमाके,कांताबाई मडावी, दिनेश गेडाम यांचा यात समावेश आहे.सदर अटकेतील चारही आरोपींना न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरीत ९ लोकांसहित जगन एलके याना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

    चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर /पोम्भूर्णा – धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर झालेल्या मागील आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेले कलम ३०७ व ३५३ मागे घेण्यात यावे तसेच जर लावलेले गुन्हे मागे घेणार नसाल तर आंदोलनादरम्यान उपस्थित असलेल्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन सोमवार पासून तालुका कचेरी समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारला आंदोलकांनी आपला मोर्चा पोलिस स्टेशनच्या समोर वळवून ठिय्या आंदोलन सुरू केलेला आहे.या आंदोलनाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले आहे.

     

    धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर ईको – पार्कमध्ये आदिवासी संस्कृतीची झालेली अवहेलना प्रकरणी व विविध मागण्या घेऊन ठिया आंदोलन केले होते.त्या आंदोलनातील प्रमुख कार्यकर्तावर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील ३०७ व ३५३ कलम मागे घेण्यात यावे यासाठी आदिवासी बांधव आणि संघटना आक्रमक झाले आहेत. शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी तहसील व पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.मागील आंदोलनादरम्यान आदिवासी बांधवावर ३०७ व ३५३ कलम लावण्यात आले आहे ते तात्काळ काढण्यात यावे नाही तर आम्ही येथून हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतले असल्याने प्रकरण चिघळले आहे.

     

    मागील आदिवासी बांधवांनी केलेल्या आंदोलनात वनविभाग कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती, त्यानंतर पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख बंदोबस्त लावला, व काही जणांवर 307 व 353 कलम अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.

    पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास केला मात्र तपास कार्यात गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी तपासकामी सहयोग केला नाही, त्यानंतर सेशन न्यायालयात अटकपूर्व जामीन रद्द झाला अशी माहिती समोर आली असून आता अटक झाली तर सर्व समाज बांधवांना अटक करा अन्यथा दाखल गुन्हे परत घ्या अशी मागणी घेऊन सध्या पोम्भूर्णा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

     

    आदिवासी बांधवांच्या ठिय्या आंदोलन स्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असून सध्यातरी पोलीस प्रशासन अत्यंत संयम बाळगून प्रकरण हाताळण्याचे काम करीत आहे.

     

    ही बाब योग्य नाही….

     

    गुन्हा न्यायालयात गेला की पुढची कायदेशीर बाजू ही न्यायालय बघतो जर ठिय्या आंदोलन करून गुन्हे मागे होणार असेल तर उद्या प्रत्येकजण गुन्हा करीत पोलीस स्टेशनला घेराव टाकत ठिय्या आंदोलन करणार, प्रशासनाला वेठीस धरणे ही बाब योग्य नाही.

  • प्रशासन नरमले तरीही आदिवासी समाजाचे ठिय्या आंदोलन सुरुचं

    News34 chandrapur

    चंद्रपूर/पोम्भूर्णा – पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे व झेंडा हटविल्यावरून मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे रुपांतर कार्यालयाचे तोडफोड होण्यापर्यंत गेल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याने सध्या हे प्रकरण तापले आहे.

     

    सध्या आंदोलनस्थळाला पोलीस छावणीचे रूप आले असून जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमधून अधिकारी व कर्मचारी पोम्भूर्णा येथे दाखल झाले आहे.

     

    सध्या वनविभाग, महसूल व पोलीस विभागाने आंदोलकांची भेट घेऊन समजविण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी प्रशासनाला वेठीस धरून ठेवले आहे.

     

    याबाबत वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही 2 दिवसांपूर्वी आंदोलकांशी चर्चा केली, त्यांच्या सर्व मागण्या सुद्धा मान्य केल्या परंतु आंदोलकांच्या मागण्या शासन नियमानुसार पूर्ण कराव्या लागणार याबाबत सर्वाना याची माहिती दिली मात्र आंदोलक मागे हटायला तयार नाही.

     

    20 ऑक्टोबर ला आदिवासी समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली, एसडीओ व होमगार्ड ला सुद्धा यामध्ये किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे, सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे यांना नागपुरातील अर्नेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

     

    आदिवासी आंदोलनाच्या हिंसक वळणानंतर सुद्धा पोलीस प्रशासन कमालीचे संयम दाखवीत आहे, आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त लावला असून सध्या प्रशासनाने आदिवासी बांधवांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.