Tag: जिल्हाधिकारी विनय गौडा

  • Chandrapur District Collector honored । चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना सुवर्णपदक – संपूर्ण महाराष्ट्रात पहिला क्रमांक!

    Chandrapur District Collector honored

    Chandrapur District Collector honored : चंद्रपूर दि. 3 :”आकांक्षित जिल्हे व तालुके” कार्यक्रमांतर्गत 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियान मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला.

    अम्मा चौक वर राजकारण कशाला?

    सहापैकी सहा इंडिकेटर्स पूर्ण

    हा सन्मान नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सभागृहात पार पडलेल्या राज्यस्तरीय सन्मान समारंभात प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याने संपूर्णता अभियानातील सहापैकी सहा इंडिकेटर्स पूर्ण केले. विशेष बाब म्हणजे यापैकी तीन इंडिकेटर्स आरोग्य विभागाशी संबंधित असून ते 100 टक्के समृद्ध करण्यात आले होते. Chandrapur district

    समारंभप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश कुमार देवरा, अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) राजकुमार उपस्थित होते.

    यावेळी जीवती तालुक्यातील यशस्वी सहभागाचे प्रतिनिधीत्व करत गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, आकांक्षित तालुका समन्वयक गणेश चिंटकुंटलवार व ‘उमेद’चे  राजेजी दुधे यांनीही सन्मान स्वीकारला. Jiwati Taluka

    या यशामध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय समन्वयक यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. विशेषतः जीवती तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिद्द, चिकाटी व समर्पण भावनेने केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली.

  • Chandrapur district planning committee । ✅ चंद्रपूरमध्ये विकासकामांचा महामार्ग! जिल्हाधिकारींचे 100% पूर्णतेचे आदेश!

    Chandrapur district planning committee

    Chandrapur district planning committee : चंद्रपूर, दि. 17 : जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यातील विविध विकासकामे प्रभावीपणे राबविली जातात. प्रत्येक विभागाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधीतून मंजूर सर्व कामे 100 टक्के पूर्ण होतील, या दृष्टीने नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.17) दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठक ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, मुख्य वनसंरक्षक रामानुजम, ताडोबा अंधारी प्रकल्पाचे उपसंचालक आनंद रेड्डी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. district annual plan full completion government projects

    तारीख पे तारीख..आता नाही

    बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी श्री. गौडा पुढे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध शासकीय बांधकामे राबविण्यात येत असून ती कामे नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत. कंत्राटदारांकडून कामात दिरंगाई अथवा दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करावा. मागील वर्षी प्रशासकीय मान्यता प्राप्त कामांकरिता अद्याप वितरीत न झालेला निधी लक्षात घेऊन दायित्व निधी मागणीसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावा.  सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृहे, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे इत्यादी आवश्यक मूलभूत सुविधांकरिता सार्वजनिक बांधकाम विभागास प्रस्ताव सादर करावेत. development mandates

    शासकीय कार्यालयांमध्ये ऑनग्रीड सोलर सिस्टीम

    जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये साधनसामग्री व औषधांचा पुरवठा नियमित व्हावा, यासाठी कार्यवाही करावी. तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत शाळांची तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ऑनग्रीड सोलर सिस्टीम बसविण्यात यावी. या कामाचा प्रारंभ जिल्हास्तरावरून करण्यात यावा व योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त कार्यालयांचा ऑन-ग्रीड सोलर सिस्टमचा समावेश करण्यात यावा.

    गडकिल्ल्यांचे संरक्षण व पर्यटन विकासासाठी मास्टर प्लॅन

    गडकिल्ल्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास, गडकिल्ल्यांचे संरक्षण व पर्यटन विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करून त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून कामे पूर्ण करावीत. आगामी काळात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव त्वरीत सादर करावेत, जेणेकरून विकास कामे निवडणुकीपूर्वी पूर्ण करता येतील. जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर होणारी प्रत्येक योजना ही लोकहिताची आहे. त्यामुळे तिची गुणवत्ता राखणे ही संबंधित विभागांची जबाबदारी आहे. याबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • district collector field visit various projects । अंगणवाडीतील दर्जा, आश्रमशाळेतील भोजन, आणि सांडपाण्याच्या योजनांवर जिल्हाधिकाऱ्यांचा पॉवरफुल फोकस!

    district collector field visit various projects

    district collector field visit various projects : चंद्रपूर – क्षेत्रीय भेटीअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नागभीड तालुक्यातील विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली व संबंधितांना सुचनाही केल्या. यावेळी ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार प्रताप वाघमारे, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, बालविकास प्रकल्प़ अधिकारी शिला गेडाम, मुख्याधिकारी सोनम देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी विनोद मडावी, डॉ. आखाडे आदी उपस्थित होते.

    चंद्रपुरात सुरु झाला चांदा ज्योती सुपर १०० कार्यक्रम


    यावेळी जिल्हाधिका-यांनी तळोधी येथील अंगणवाडी, कचरा विलगीकरण केंद्र, पळसगाव खुर्द येथील तलाठी कार्यालय बांधकाम, चिंधीचक येथील मुलींची शासकीय आश्रमशाळा (निवासी), नवेगाव पांडव येथील स्मार्ट पीएचसी बांधकामास भेट, मानव विकास अंतर्गत प्राप्त निधीतून गांडुळ खत प्रकल्प, नवखळा पाणी पुरवठा योजना सोलर प्रकल्प आदी प्रकल्पांना भेट दिली.


    तळोधी येथील अंगणवाडीला भेट दिल्यावर जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, वेळेवर लसीकरण पूर्ण करावे तसेच आहाराचा दर्जा व परिमाण राखावे. दोन अंगणवाडी एकत्र भरत असल्यामुळे एक अंगणवाडी त्वरीत नवीन इमारतीत स्थलांतरित करा. येथील घनकचरा व्यस्थापन प्रकल्प़ लवकरात लवकर कार्यान्वीत करावा. या प्रकल्पाबाबत त्यांनी महिलांशी संवाद साधला. पळसगाव येथील तलाठी कार्यालय बांधकाम वेळेत व दर्जेदार स्वरुपात करावे व बांधकामास तारेचे कुंपन करून घ्यावे. (anganwadi building construction status nagbhid)

    distric collector gowda visit

    भोजनाचा दर्जा उत्तम ठेवा

    जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी चिंधीचक येथील मुलींच्या शासकीय आश्रमशाळा नविन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. सदर बांधकाम जवळपास पूर्णत्वास असून ते त्वरीत हस्तांतरीत करून घ्यावे. यावेळी त्यांनी शाळेतील मुलांशी वर्गात संवाद साधून शिक्षणाचा दर्जा तपासला. तसेच भोजनाचा दर्जा उत्तम ठेवण्याच्या सुचना दिल्या. नवेगाव पांडव येथील स्मार्ट पीएचसी मध्ये पाण्याची गळती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. (tribal girls government hostel school visit)


    नविन बांधकामामुळे खोल्यांची अंतर्गत उंची कमी होणार नाही याबाबत दक्षता बाळगावी. नागभीड नवखळा पाणी पुरवठा सोलर प्रकल्पाला जिल्हाधिका-यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर प्रकल्प लवकर सुरळीत संचलित होईल, याबाबत सर्व यंत्रणानी समन्वय साधावा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
    या भेटीदरम्यान सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी,पोलीस पाटील आदी उपस्थित होते.

  • district collector visit news today । शासकीय योजनांची अंमलबजावणी किती प्रभावी? जिल्हाधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

    district collector visit news today

    district collector visit news today : चंद्रपूर – राज्य शासनाने वरिष्ठ अधिका-यांना फिल्डवर जाऊन विकास कामांच्या प्रगतीचा आढावा तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.3) वरोरा तालुक्यातील विविध विकास कामांना भेट देऊन सदर कामांची पाहणी केली.

    पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी विकास कामांच्या प्रगतीचे टप्पे व अडचणी आदीबाबत अधिकारी व नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात येत असलेले महिला बचत गटाच्या वस्तू विक्री शॉपिंग मॉलला भेट दिली. रोजगार हमी योजनेतून वरोरा तालुक्यातील सालोरी येन्सा येथील प्रगतशील शेतकरी यांच्या रेशीम उत्पादन व मलबेरी प्लांटेशन केंद्र,  कॅम्पा निधीतून वन विभागद्वारे टेमुर्डा येथे राबविण्यात येणारे चारा गवत विकास प्रकल्प, नगर परिषद वरोरा व अंबुजा फाउंडेशन यांच्याद्वारे करण्यात येत असलेले वरोरा शहरातील गांधी सागर तलाव खोलीकरण कामाची पाहणी पाहणी केली. village level government project monitoring

    यावेळी जिल्हाधिका-यांसोबत उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार योगेश कौटकर, नगर परिषद मुख्याधिकारी विशाखा शेळकी, कनिष्ठ अभियंता श्री. खणके, वन परिक्षेत्र अधिकारी श्री. शेंडे , मंडळ कृषी अधिकारी श्री. काळे व इतर अधिकारी उपस्थित होते.

    village level government project monitoring

    ट्र्क चालकाला आली फिट आणि घडला भीषण अपघात, १ ठार २ जखमी

    भद्रावती तालुक्याला सुध्दा भेट

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भद्रावती तालुक्यातील कार्यकारी सहकारी संस्था येथे भेट दिली. तसेच पळसगाव येथील पूर पूर्व परिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. भद्रावती तालुक्यातील मौजा कुचना येथील जिल्हा परिषद शाळेची यावेळी त्यांनी पाहणी केली.

  • district collector visit updates । जिल्हाधिकाऱ्यांचा पोंभुर्णा दौरा: भर उन्हातही विकासकामांचा आढावा

    district collector visit updates

    district collector visit updates : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्षेत्रीय भेटी देऊन विकासकामांची पाहणी करीत आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच बसत असला तरी त्याची पर्वा न करता भर उन्हात जिल्हाधिका-यांनी पोंभुर्णा तालुक्यात भेट देऊन मजुरांशी संवाद साधला.

    कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू, चंद्रपूर जिल्हापरिषदेचे अभियान

    23 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी पोंभुर्णा तालुक्यातील मौजा घनोटी तुकूम येथील मजगी कामाची पाहणी केली. यावेळी तेथे कामावर असलेल्या कामगारांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना मार्गदर्शन सुध्दा केले. यावेळी जिल्हाधिका-यांनी तालुक्यातील विविध विकासकामांना भेटी देऊन प्रगतीचा आढावा घेतला. employment under MGNREGA

    क्षेत्रीय भेटीदरम्यान मौजा आंबेधानोरा येथे अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच तलाठी कार्यालयाची तपासणी करून मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मौजा उमरी पोतदार येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. तसेच बळीराजा शेत पाणंद रस्ताच्या कामाला भेट दिली.

    पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी वैद्यकीय अधिका-यांसोबत रुग्णालयातील वार्ड, भरती असलेले रुग्ण, त्यातील यंत्र सामुग्री, औषध उपलब्धता व इतर आरोग्य विषयक सोई सुविधाबाबत तपासणी करून आढावा घेतला. तसेच पोंभूर्णा येथील महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे अगरबत्ती प्रकल्पाची सुध्दा त्यांनी पाहणी केली. मौजा चिंतलधाबा येथील ग्रामपंचायत क्रीडांगण काम, मनरेगा अंतर्गत 650 वृक्ष लागवड केलेल्या कामास भेट देऊन मार्गदर्शन केले. government health facility inspection

    employment under MGNREGA

    सदर दौ-याच्या वेळी गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार रेखा वाणी, गटविकास अधिकारी विवेक बेल्लालवार, जि.पं.बांधकाम उपविभागीय अभियंता श्रीमती जोशी, पोलीस निरिक्षक राजकमल वाघमारे, नायब तहसिलदार रामकृष्ण उईके, मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके व सुरेंद्र चिडे यांच्यासह गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सहा.कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, ग्रामरोजगार सहाय्यक व गावातील नागरीक उपस्थित होते.

  • chandrapur voter list 2024 : मतदार याद्या प्रसिद्ध, नागरिकांनो आपले नाव तपासा – जिल्हाधिकारी विनय गौडा

    chandrapur voter list 2024 : मतदार याद्या प्रसिद्ध, नागरिकांनो आपले नाव तपासा – जिल्हाधिकारी विनय गौडा

    chandrapur voter list 2024 आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली.

    अवश्य वाचा : आज चंद्रपुरात निघणार मशाल रॅली

    Chandrapur voter list 2024 यात प्रामुख्याने नवमतदारांची नोंदणी, मयत किंवा स्थलांतरीत मतदारांचे नाव वगळणे, मतदार यादीत त्रृटी असल्यास त्यात दुरुस्ती करणे आदींचा समावेश होता. याची फलश्रृती म्हणून जिल्ह्यात तब्बल 38637 मतदारांची वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यात आता 1000 पुरुष मतदारांमागे 965 स्त्री मतदार असून लिंग गुणोत्तर 9 ने वाढल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले.

                जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्दीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.

      chandrapur voter list 2024 पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, 1 जुलै 2024 च्या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादी 30 ऑगस्ट 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, ते लगेच तपासावे, जेणेकरून कोणीही मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. तसेच निवडणुकीची घोषणा होईपर्यंत नाव नोंदणी किंवा नाव वगळणे ही प्रक्रिया सुरू राहते. त्यामुळे नागरिकांनी वेळात वेळ काढून संबंधित ठिकाणी जावून आपले नाव तपासावे, असे आवाहन त्यांनी केले.

      Chandrapur vote list 2024 जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात एकूण 17 लक्ष 92 हजार 147 मतदार होते. यात आता 51125 मतदारांची नव्याने नोंदणी झाली असून 12488 नावे मयत किंवा स्थलांतरीत झाल्यामुळे वगळण्यात आली आहे. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ झाली असून जिल्ह्यात आता एकूण 18 लक्ष 30 हजार 784 मतदार आहेत. यात 9 लक्ष 31 हजार 821 पुरुष मतदार, 8 लक्ष 98 हजार 918 स्त्री मतदार तर 45 इतर मतदारांचा समावेश आहे.

    18 ते 19 वयोगटातील 33825 युवा मतदार : जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 10488 ने वाढली असून जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघ मिळून 33825 युवा मतदार आहेत. यात 18801 पुरुष, 15022 स्त्री आणि 2 इतर मतदार यांचा समावेश आहे.

    मतदान केंद्रांची संख्या, 85 वर्षांवरील मतदार तसेच दिव्यांग मतदार : जिल्ह्यात एकूण 2076 मतदार केंद्र असून राजूरा विधानसभा मतदार संघात – 344, चंद्रपूर – 390, बल्लारपूर – 366, ब्रम्हपूरी – 319, चिमूर – 314 आणि वरोरा विधानसभा मतदार संघात 343 मतदान केंद्र आहेत. तसेच जिल्ह्यात 85 वय आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 13987 आहे. तर दिव्यांग मतदार एकूण 8496 आहेत.

    मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा व देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला सहभाग नोंदविता यावा, यासाठी सर्व मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी. यासाठी मतदार यादी सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागास प्रत्यक्ष भेट देऊन किंवा व्होटर्स हेल्पलाईन ॲप अथवा www.voters.eci.gov.in या वेब पोर्टलद्वारे अर्ज नमुना क्रमांक 6 भरून आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

  • व्हिडीओ गेम पार्लर बाबत धक्कादायक माहिती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 वर बातमी प्रकाशित होताच पोलीस व जिल्हा प्रशासन खळबळून जागे होताच कारवाईचा धडाका सुरू झाला.

     

    आता या व्हिडीओ गेम पार्लर ची जिल्हा प्रशासनाने परवाना तपासणी मोहीम सुरू केली आहे.
    मात्र आधीच परवाने नूतनीकरण करण्यात आले नसल्याने प्रशासनाच्या मोहिमेचा अर्थ काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.

     

     

    या पार्लर बाबत News34 ला धक्कादायक माहिती मिळाली आहे, शहरातील काही व्हिडीओ गेम पार्लर मध्ये पोकर च्या मशीन लावण्यात आल्या होत्या, विशेष म्हणजे पोकर च्या मशीन फक्त केसिनो मध्ये लावण्यात येतात.

    पोकर मशीन म्हणजे काय?

    मोठ्या केसिनो मध्ये लावण्यात येणाऱ्या जुगाराच्या मशीनला पोकर म्हणतात याचा दुसरा अर्थ हा डाकू होतो, म्हणजेच खेळणाऱ्यांच्या खिश्यावर दरोडा टाकण्याचे काम या मशीन द्वारे केल्या जाते.

    वर्ष 2022 डिसेंम्बर पासून जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर संचालकांच्या परवान्यांचे अद्यापही नूतनीकरण करण्यात आले नाही, मात्र पार्लर संचालक प्रशासनाला आमचं काम हे नियमाप्रमाणे असल्याचे ओरबाडून सांगत आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत सुरू करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेबाबत अद्यापही जिल्हाधिकारी यांचं ते पत्र पोलीस निरीक्षकांना प्राप्त झाले नाही.

    शासनाने सुरू केलेल्या मोहिमेआधी खिसा खाली करणाऱ्या या मशीन पार्लर चालक तर्फे मशीन काढण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    गेम पार्लर बाबत बातमी नंतर अनेकांनी आपण या पार्लर मध्ये जाऊन पैश्याचा जुगार खेळत पैसे हरल्याची खंत व्यक्त केली आहे.

     

    विशेष म्हणजे अनेक युवकांनी गेम च्या नावावर पोकर म्हणजे पैश्याचा जुगार खेळला, पार्लर चालकांनी मशीन सेट करीत अनेकांची फसवणूक केली अशी माहिती सुद्धा News34 च्या हाती लागली आहे.

    विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ष 2002 पासून व्हिडीओ गेम पार्लर बाबत जी अधिसूचना काढण्यात आली होती, त्यानंतर आजपर्यंत त्या अधिसूचनेत काही सुधारणा झाली नाही.

     

    जिल्हाधिकारी गौडा यांनी आधी व्हिडीओ गेम पार्लर ला सील मारून तपासणीचे आदेश द्यायला हवे होते मात्र तसे काही झाले नाही, जर असे झाले असते तर व्हिडीओ गेम पार्लर संचालक सेटिंग केलेली मशीन काढू शकले नसते.

    राज्याच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जुगार बाबत कायदे कठोर करणार असल्याची घोषणा असली तरी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहे, बल्लारपूर पोलीस व्हिडीओ पार्लर च्या नावाखाली सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर धाड मारण्याचे धाडस करणार काय?

    नुकत्याच वर्ष 2023 मध्ये जून महिन्यात खापरखेडा पोलिसांनी व्हिडीओ गेम पार्लर मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाडी मारल्या होत्या, या धाडीत तब्बल 88 मशीन सहित तब्बल 26 जणांना अटक करीत 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता, मात्र चंद्रपुरात अशी कारवाई कुठे होताना दिसत नाही.

    पोलीस व जिल्हा प्रशासन नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर वर कारवाई करीत नसल्याने पार्लर चालकांच्या हिंमती वाढल्या आहे.

  • चंद्रपुर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लरच्या परवान्याची तपासणी होणार

    News34 impact

    चंद्रपूर – जिल्ह्यात सुरू असलेले नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

     

    News34 च्या वृत्तानंतर पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला, स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाईचे धाडसत्र सुरू केले, पार्लर संचालक यांच्या परवान्यात अनेक त्रुट्या आढळल्याने पोलिसांनी मशीन जप्त केल्या.

     

    आता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सुद्धा प्रशासनाला जिल्ह्यात सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने तपासण्याचे आदेश पोलीस व तहसीलदार यांना दिले आहे, यासाठी त्यांनी पथक तयार केले असून 15 ऑक्टोबर च्या आता तपासणीचा संपूर्ण अहवाल प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले आहे.

     

    हे असतील तपासणी पथकातील प्रमुख सदस्य

    पोलीस स्टेशन रामनगर हद्द – तहसीलदार व पोलीस निरीक्षक

    शहर पोलीस स्टेशन, दुर्गापूर, पडोली, बल्लारपूर व इतर तालुक्यात पोलीस निरीक्षक/सहायक पोलिस निरीक्षक व तहसीलदार हे या समितीचे प्रमुख सदस्य असतील.

    पथकाचे काम काय?

    व्हिडीओ गेम पार्लर च्या परवान्याच्या जागेत बदल झाला काय?

    परवण्यातील नमूद वेळ पाळतात काय?

    परवान्यात दर्शविलेल्या संख्ये इतकी मशीन पार्लर वर लावण्यात आली की अतिरिक्त मशीन लावण्यात आले?

    पार्लर मध्ये इतर काही अवैध व्यवसाय चालतात काय?

    परवान्याच्या अटी-शर्तीचे भंग होत आहे काय?

    हे सर्व रीतसर तपासून पथकातील सदस्यांनी मुद्देनिहाय तपासणी करीत संयुक्तरित्या अहवाल 15 ऑक्टोबर च्या आत जिल्हाधिकारी यांना सादर करावा असे लिखित आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे.

     

    विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून सदर व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहे, पार्लर चालक हे राजकीय पक्षाशी जुळून असल्याने त्यांनी अनेक नियमबाह्य कामे करीत कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे.

    News34 च्या बातमीनंतर आता या नियमबाह्य कामाला काही प्रमाणात चाप बसणार हे निश्चित झाले आहे.