Tag: चंद्रपूर शहर

  • Part of a dilapidated building collapsed | 🏚️ चंद्रपूर हादरलं! जटपुरा गेटसमोरील जीर्ण इमारतीचा भाग कोसळला – महिला गंभीर जखमी

    Part of a dilapidated building collapsed

    Part of a dilapidated building collapsed : चंद्रपूर 11 सप्टेंबर 2025 – चंद्रपुरातील जटपुरा गेट समोरील इमारतीचा एक भाग कोसळला, या घटनेत दूध विक्रेता महिला गंभीर जखमी झाली. सदर घटना पहाटे 5 वाजता घडली.

    जन सुरक्षा विधेयकविरोधात महाविकास आघाडीचे निदर्शने

    ऐतिहासिक जटपूरा गेट समोरील विनोद मेहता यांच्या मालकीच्या इमारतीचा वरचा भाग जीर्ण अवस्थेत आला होता, आज झालेल्या घटनेत 50 वर्षीय मनीषा लोखंडे या महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. सदर इमारत ही 50 ते 60 वर्षे जुनी आहे.

    माजी नगरसेविकेचा पाठपुरावा


    याबाबत माजी नगरसेविका छबु वैरागडे यांनी सदर इमारतीच्या झालेल्या जीर्ण इमारतीची अवस्था बघता भविष्यात दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेद्वारे 4 नोटीस पाठविल्या होत्या मात्र मेहता यांनी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. घर मालकाच्या दुर्लक्षामुळे व पालिकेच्या उदासीनतेमुळे कामामुळे महिला जखमी झाली.

    सदर इमारतिच्या तळमजल्यावर छोटं हॉटेल सुद्धा आहे, या घटनेमुळे त्या हॉटेलला धोका निर्माण झाला असून पालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी सदर इमारतीची पाहणी केली असून त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरात अश्या अनेक जीर्ण इमारती असून भविष्यात त्यामुळे मोठी दुर्घटना घडणार ही शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पालिकेने अश्या जीर्ण इमारती लवकरात लवकर जमीनदोस्त कराव्या अशी मागणी नागरिक करीत आहे.

  • why roads are so bad in Chandrapur । चंद्रपुरातील रस्त्यात ‘विकास” खड्ड्यास्वरूपात डोकावतोयं

    why roads are so bad in Chandrapur

    why roads are so bad in Chandrapur : चंद्रपूर – खनिज संपत्ती ने नटलेला चंद्रपूर, राज्यात औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे, विशेष बाब म्हणजे या जिल्ह्याने राज्याला मुख्यमंत्री, सह अनेक मंत्री दिले मात्र आजही हा जिल्हा उपेक्षित आहे. विकासाच्या नावावर नुसत्या बोंबा जिल्ह्यात कालांतरापासून सुरु आहे. शहर व ग्रामीण भागात अनेक अभियांत्रिकी कॉलेज आहे, मात्र त्या कॉलेजकडे जाणारा रस्ता हा पांदण रस्त्यापेक्षा हि खराब आहे.

    मुलींनी मंगळसूत्र विकलं, मात्र तरी झाली फसवणूक, चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

    शेतात जाण्यासाठी बनलेला पांदण रस्ता तरी चांगला असतो मात्र शहरात पायदळ किंवा वाहनाने आपल्याला जायचे असल्यास रस्त्याच्या मधोमध असलेले खड्डे आपल्याला चुकवीत जावे लागते. हि आपल्यासाठी व आपण निवडून दिलेले जनप्रतिनिधी साठी एक लाजिरवाणी बाब आहे. pothole problems in Chandrapur city

    हे मार्ग पांदण रस्त्यापेक्षाही खराब….

    बागला चौक आताचा शहीद हेमंत करकरे चौक ते लालपेठ कडे जाणारा मार्ग, बंगाली कॅम्प ते बस स्थानक, बंगाली कॅम्प ते जुनोना चौक, जटपुरा गेट ते गिरनार चौक या मार्गावरील काही ठिकाणी रस्ता खोल गेला आहे, ज्यावरून वाहन चालविताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते. शहराकडे येणारे मार्ग अत्यंत बिकट परिस्थितीचे आहे.

    शहरात अमृत योजनेच्या कामामुळे अनेक मार्ग बेजार झाले, अनेक मार्गावर मोठे खड्डे पडले, काही सामाजिक संघटनांनी यावर आंदोलन केले, त्यांनतर प्रशासनाने अखेर रस्ते बनवायला सुरुवात केली, रस्ते बनवून महिना उलटल्यावर पाऊस पडला आणि नवनिर्मित रस्त्यावरील विकास हा खड्ड्याच्या स्वरूपात बाहेर पडला. why newly constructed roads break in rain

    यावर विशेष बाब म्हणजे इंजिनिअर यांना काम वाटपात दुजाभाव केल्या जातो यावरून सार्वजनिक बांधकाम विभागात हाणामारी चा प्रकार सुद्धा घडला होता, याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीही देण्यात आल्या होत्या. म्हणजे इंजिनिअर हे कामासाठी भांडतात, त्यांना काम मिळण्यात दुजाभाव होतो, आणि काम मिळाल्यावर निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण करीत ते बाजूला होतात.

    जनतेमध्ये हिंमत कधी येणार?

    चंद्रपुरातील जनता रस्त्यावरील खड्ड्यापायी वैतागून गेली आहे, मात्र आवाज उचलण्याची त्यांच्यात हिंमत नाही, अशी अवस्था जर इतर जिल्ह्यात जसे पश्चिम महाराष्ट्र भागात झाली असती तर सामान्य नागरिक जनप्रतिनिधी यांना जाब विचारून कामे पूर्णत्वास आणतो, मात्र चंद्रपुरातील सुजाण नागरिकांमध्ये अशी हिंमत कधी येणार देव जाणे. कारण जनता हि राजकीय पक्षासोबत जुडलेली असतात, कुणाला काय म्हणावं काय करावं हे कळत नसेल कदाचित.

    Somayya institute of technology

    म्हणून म्हणतात ना ५०० में बिक जाओगे तो ऐसी सडक पाओगे…अशी अवस्था आपली झालेली आहे. दरवर्षी या खड्ड्यामुळे अनेक नागरिक अपघाताला बळी पडते, मात्र गेंड्याची कातडी असलेले जनप्रतिनिधी यांना याचा काही एक फरक पडत नाही.

  • criminal with sharp weapon arrested । 🛑 चंद्रपूरच्या रस्त्यांवर दहशत माजवणारा गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात!

    criminal with sharp weapon arrested

    criminal with sharp weapon arrested : चंद्रपूर – गुन्हेगारांची दहशत हि चंद्रपूर शहरातून हद्दपार होताना सध्यातरी दिसत नाही आहे, हातात शस्त्र मिळाले कि परिसरातील नागरिकांना घाबरविण्याचे काम काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक करीत आहे, अशीच दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला शहर पोलिसाने १ जुलै रोजी बेड्या ठोकल्या.

    चंद्रपुरात ३ जुलै रोजी भाजप आमदार विरोधात निषेध मोर्चा

    रेकॉर्डवरील गुन्हेगाराची दहशत

    चंद्रपूर शहरातील बाबुपेठ ओव्हर ब्रिज च्या खाली महात्मा फुले चौकात रेकॉर्डवरील गुन्हेगार ४१ वर्षीय गणपत शंकर भुजोने हा हातात धारदार कोयता घेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकवीत दहशत माजवीत असल्याची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना मिळाली.

    माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ बाबुपेठ येथे पोहचत गणपत भुजोने ला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता एक धारदार लोखंडी कोयता जप्त केला.

    आरोपी गणपत शंकर भुजोने वर भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलते, पोउपनि विलास निकोडे व गुन्हे शोध पथकाने केली.

  • father killed by son over land dispute । ⚖️ वडिलोपार्जित शेतजमीन बनली मृत्यूचे कारण; पित्यावर धारदार हल्ला!

    father killed by son over land dispute

    father killed by son over land dispute : चंद्रपूर – एखादा गुन्हा घडण्यासाठी कारण हे एकमात्र निमित्त असतं, चंद्रपुरात शेत जमिनीवरून मुलाने वडिलांचा धारदार शस्त्राने वार करीत खून केल्याची घटना २३ जून रोजी चंद्रपूर शहरातील बिनबा वार्ड मध्ये घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला अटक केली आहे.

    बिनबा वॉर्डातील ६२ वर्षीय ताराचंद उर्फ दारासिंह बाबूसिंग बैस यांची वरोरा येथील मोवाडा येथे वडिलोपार्जित शेत जमीन होती, सदर जमिनीवरून बैस यांच्या घरात भांडण होत होते. मात्र या जमिनीचा वाद ताराचंद बैस यांच्या जीवावर बेतला, २३ जून ला रात्री ११ वाजता तारासिंग यांचा मुलगा ३० वर्षीय मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद उर्फ दारासिंग बैस याने त्या शेत जमिनीवरून घरी वाद घातला. Chandrapur land dispute crime report

    त्या रस्त्यासाठी आमदार भोंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन

    दारूच्या नशेत वार

    मुन्ना हा दारूच्या नशेत होता, वाद वाढत गेला, वडील शेत जमीन आपल्याला देणार नाही असे समजल्यावर मुन्ना ला राग अनावर झाला, रंगाच्या भरात त्याने घरातील अवजड धारदार शस्त्र घेत वडील तारासिंग यांच्या तोंडावर, डोक्यावर व शरीरातील इतर भागावर वार करीत त्यांना जीवानिशी ठार केले. चंद्रपूर शहर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत आरोपी मुन्ना ला अटक केली.

    आरोपी मुन्ना बैस वर पोलिसांनी कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. सदरची यशस्वी कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे व पोलीस कर्मचारी करीत आहे.

  • राष्ट्रवादी नगर येथे वृक्षारोपण

    राष्ट्रवादी नगर येथे वृक्षारोपण

    Plantation चंद्रपूर शहरातील वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बालोद्यान राष्ट्रवादी नगर येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम दिनांक 14 जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष कासनगोटटूवार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप वावरे,योग प्रशिक्षक तथा पर्यावरण प्रेमी राजेंद्र गुडांवार पुरुषोत्तम साहारे,शिलाताई चव्हाण, कुसुमताई उदार , पञकार साईनाथ कूचनकर, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर आवारी, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी पर्यावरण विषयावर विशेष महत्त्व विषद केले.

    अवश्य वाचा : पीकविमा नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ द्या – सुधीर मुनगंटीवार

    Plantation सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी नगर येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य सुभाष आवारी,रवि भाऊ ठवळे,सुर्यभान तुमसरे, साहेबराव खवले,संजय एकोनकर, दिनेश आसूटकर, वसंत दडमल,चिताडे मेजर, नथुजी ठाकरे, रामदास येसेकर , विकास बोबाटे,श्रिरामे,कुडे काकाजी, तसेच महिला गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षा सुमित्रा आवारी,प्रिया बोबाटे, ज्योती ठवले,रेखा आवारी,प्रतीभा क्षिरसागर,आशा आसूटकर, किरण एकोनकर,पुजा खवले,कांता तुमसरे, जयश्री भुस्कट,रवाना तूमसरे, आदींनी अथक परिश्रम घेतले.

    सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाषचंद्र आवारी यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते कुंडे साहेब यांनी मानले.

    Rashtrawadi nagar
  • Removel of Encroachment : चंद्रपुरात आजपासून अतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात

    Removel of Encroachment : चंद्रपुरात आजपासून अतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात

    Removel of Encroachment चंद्रपूर शहरातील विविध भागात अतिक्रमणाचे जाळे वाढल्याने शहरात पार्किंग चा पर्याय उरला नसल्याने वाहतूक सेवेत अडथळा निर्माण होत आहे, मात्र आता काही दिवसात नागरिकांना वाहने नियोजित ठिकानी पार्क करण्यासाठी समस्येचा सामना करावा लागणार नाही.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील राक्षस

    याकरिता चंद्रपूर वाहतूक विभाग, शहर पोलीस विभाग व चंद्रपूर मनपाने कंबर कसली असून रखरखत्या उन्हात अतिक्रमण काढण्याचे काम 2 मे पासून सुरू करण्यात आले आहे. Removel of Encroachment

    अवश्य वाचा – RTE च्या नियमात बदल का?

    चंद्रपूर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील व पोलीस उपनिरीक्षक सुधीर जाधव यांच्या नेतृत्वात मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट या मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम आज राबविण्यात आली. Removel of Encroachment

    यावेळी पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले की शहरात वाहने पार्क करण्यासाठी नागरिकांना अतिक्रमण मुळे अडथळा निर्माण होत आहे, त्याकरिता शहरात ज्या ठिकाणी अतिक्रमनाने विळखा घातलाय त्याठिकाणी आम्ही सदर अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. पुढच्या 15 दिवसात शहरातील पार्किंग व्यवस्थेत बदल बघायला मिळेल.

  • Chandrapur News : नगीनाबाग येथे मोबाईल स्नॅचिंगची घटना

    Chandrapur News : नगीनाबाग येथे मोबाईल स्नॅचिंगची घटना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 27 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वाजता चंद्रपूर शहरातील नगीना बाग मशिदीजवळ मोबाईल हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. फिर्यादी इशिका वाघमारे ही युवती मोबाईलवर बोलत असताना दोन अज्ञात तरुणांनी चालत्या दुचाकीवरून तिचा रियलमी कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. Mobile snatching

     

     

    ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यातून या गुन्ह्याचा धडाकेबाजपणा समोर आला आहे. Chandrapur

     

    चंद्रपूरसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात अशी घटना प्रथमच घडल्याने या घटनेने चिंता वाढली आहे. इशिकाचा मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. धाडसाने इशिका ने त्यांचा पाठलाग केला. दुर्दैवाने, पाठलाग करताना, इशिका रस्त्यावर कोसळली, त्यामुळे गुन्हेगार पळून जाऊ शकले. या घटनेनंतर इशिकाने 27 फेब्रुवारी रोजी रामनगर पोलिस ठाण्यात तत्काळ तक्रार नोंदवली. Crime

     

    पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. अनेक शहरांमध्ये मोबाईल स्नॅचिंगच्या घटना वाढत्या चिंतेच्या बाबी आहेत आणि नागरिकांनी सतर्क राहणे आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. Safety

     

    सार्वजनिक ठिकाणी, विशेषत: उशिरापर्यंत मोबाइल फोन वापरणे टाळणे आणि सभोवतालच्या सभोवतालच्या सदैव जागरुक राहण्याचा सल्ला दिला जातो. रहिवाशांना सुरक्षिततेची भावना निर्माण करून पोलीस दोषींना त्वरीत पकडतील आणि त्यांना न्याय मिळवून देतील, अशी चंद्रपूर समाजाची अपेक्षा आहे. Police investigation

  • Tax Payments : चंद्रपुरात कर थकविणाऱ्या नागरिकांच्या तब्बल 13 नळजोडण्या खंडित

    Tax Payments : चंद्रपुरात कर थकविणाऱ्या नागरिकांच्या तब्बल 13 नळजोडण्या खंडित

    News34 chandrapur

    चंद्रपूर – करवसुली अधिक काळापासुन थकीत असल्याने व वारंवार सुचना देऊनही कराचा भरणा न केल्याने मनपा कर वसुली पथकातर्फे पठाणपुरा वॉर्ड क्र.१ व २ येथील १३ नळधारकांची नळ जोडणी खंडित करण्यात आली आहे. Chandrapur city

     

    चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची १४ पथके सातत्याने कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची अथवा नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. Tax collection

     

    कर वसूली मोहीमेदरम्यान दरम्यान पठाणपुरा वॉर्ड क्र.१ व २ येथील आडकू कान्हु गौरकार,मारोती शंकर गौरकार,बापुजी बालाजी व लक्ष्मण ईरगीरवार,सुंदराबाई खनके,पुंडलिक खनके यांच्या मालकीच्या मालमत्तेवर कर अधिक काळापासुन थकीत असल्याचे आढळुन आले त्याचप्रमाणे सदर मालमत्ता धारकांना कर भरण्याबाबत वारंवार सुचना दिल्याचेही आढळून आले,मात्र थकबाकीदारांद्वारे कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने दरम्यान पठाणपुरा वॉर्ड क्र.१ व २ येथील आडकू कान्हु गौरकार,मारोती शंकर गौरकार यांचे प्रत्येकी १,बापुजी बालाजी व लक्ष्मण ईरगीरवार यांचे ६,सुंदराबाई खनके यांचे २,पुंडलिक खनके यांचे ३ असे एकुण १३ नळ जोडणी खंडीत करण्यात आली आहे. Tax payments

     

    काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे.दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत २५ टक्के सूट मिळण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असुन मालमता धारकांनी कराचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. Pathanpura ward

    करावा भरणा – www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर  https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे. Municipal services

     

    त्याचप्रमाणे फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येणे शक्य आहे.मनपाच्या झोन कार्यालयांमध्ये प्रत्यक्षरीत्या कराचा भरणा करता येईल. तसेच  व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून सुद्धा मालमत्ता कर भरता येणार असुन याकरिता 8530006063 या क्रमांकावर वर “hi” टाईप करून आलेल्या उत्तरात ४ था क्रमांकाचा पर्याय निवडुन कर भरता येईल.

  • विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्याविरुद्ध चंद्रपूर मनपाने केली पोलीसात तक्रार

    विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्याविरुद्ध चंद्रपूर मनपाने केली पोलीसात तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या स्वराज्य वक्ता अकादमीविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. २ कार्यालयाद्वारे चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    शहरातील गांधी चौक,मिलन चौक जयंत टॉकीज तसेच मनपा हद्दीतील शासकीय व खाजगी जागा, शहरातील पोस्ट / टेलीफोन पेटी, इलेक्ट्रिक खांब, रस्त्याच्या कडेची झाडे इत्यादींवर प्रशिक्षण देण्यासंबंधी माहिती असलेली भिंतीपत्रके मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावली असल्याचे सहायक आयुक्त सचिन माकोडे यांना १२ डिसेंबर रोजी पाहणी दरम्यान आढळुन आले.

     

    संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने स्वराज्य वक्ता अकादमी, प्रशिक्षक समीर लेनगुळे यांच्यावर  महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या वतीने शासकीय निधीद्वारे शहर सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत,गांधी चौक हे शहराचे मुख्य ठिकाण असुन तेथे दीपस्तंभ उभारलेला आहे. त्या जागेवरच संबंधितांनी भिंतीपत्रके लावली त्यामुळे शासकीय निधीचेही नुकसान झाले.

     

    भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

  • चंद्रपुरात आजपासून राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ

    चंद्रपुरात आजपासून राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मथुरा स्पोर्टिंग क्लब चंद्रपूर तर्फे शहरात 25 वी युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलेले आहे.

     

    चंद्रपूर शहरातील रवींद्रनाथ टागोर शाळेचे मैदान, विठ्ठल मंदिर वार्ड येथे करण्यात आले आहे, आजपासून सुरू होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षपद आमदार सुभाष धोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, विजय डांगरे आदि उपस्थित राहणार आहे.

     

    24 नोव्हेम्बरला व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन झाल्यावर रविवार 26 नोव्हेम्बरला आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे.

     

    राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले असून यामध्ये (मुले व मुली) नागपूर विभाग, मुंबई, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, पुणे, कोल्हापूर व नाशिक विभागातील संघाचा समावेश आहे.

     

    आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन मथुरा बहुद्देशीय संस्था व मथुरा स्पोर्टिंग क्लबचे अभय बद्दलवार व प्रकाश मस्के सह सदस्यांनी केले आहे.