Tag: चंद्रपूर मनसे

  • MNS party joining event in Chandrapur । 🔥 मनसेचा विसापूरमध्ये झंझावाती प्रवेश – भाजपा व काँग्रेसला मोठा झटका?

    MNS party joining event in Chandrapur

    MNS party joining event in Chandrapur : चंद्रपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे जिल्हा संपर्क अभियान सुरु असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीकरिता गावाखेड्यावर मनसेचे कार्यक्रम सुरु आहेत.

    अमन अंधेवार यांच्या मार्गदर्शनात पक्षप्रवेश

    दरम्यान बल्लारापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या विसापूर या गावात मनसेच्या शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमासह इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेशाचा कार्यक्रम मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विसापूर येथील मनसेचे जुने पदाधिकारी व आता मनसे जनहीत कक्ष बल्लारापूर तालुका सचिव राजू लांडगे यांच्या नेतृत्वात दिनांक 28 जून ला आयोजित करण्यात आला होता. MNS Visapur branch inauguration

    वन्यप्राण्यांचा कर्दनकाळ, रेल्वेच्या धडकेत सांबराचा मृत्यू

    विसापूर गावात शाखा फलकाचे उदघाटन करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी मंच्यावर मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, जनहीत कक्षाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष पियुष धुपे, मनसे महिला सेनेच्या चंद्रपूर शहर अध्यक्षा वर्षा भोंबले, अनुप यादव इत्यादीची उपास्थिती होती.

    कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित होते, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पक्ष प्रवेश विसापूर राजू भाऊ लांडगे, बळी भाऊ नरूले शाखा अध्यक्ष, किशोर नागापुरे, नारायण शिकारदार, दिलीप नान्ने, राकेश जवादे. रमेश शिवरकर, निलेश राऊत, नानाजी शिकारदार, जीवन मेश्राम, ग॔गाधर नान्ने, शिवा वाडिले, फरजना शेख, संगिता लांडगे, अमन थूल, प्रतीक चिकाटे, शरद गणवीर, राज आत्राम, परितोष मंडळ, कैलाश पाटील, आसिफ शेख इत्यादी मानसैनिकांनी प्रयत्न केले.

  • Mns party : असंख्य युवकांचा मनसेत पक्षप्रवेश

    Mns party : असंख्य युवकांचा मनसेत पक्षप्रवेश

    Mns party पोंभूर्णा:-मनसेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आकाश तिरुपतीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेचे जिल्हा सचिव (बल्लारपूर विधानसभा) किशोर मडगूलवार तथा मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे यांच्या संकल्पनेतुन पोंभूर्णा तालुक्यातील अनेक युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

    7 वर्षीय मुलाची बिबट्याने केली शिकार

    Mns party महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकांचे बिघूल वाजले असुन येणार्या काहि दिवसात विधानसभेची सार्वत्रीक निवडणूक होवु घातली आहे राजकिय पक्षाणी आपआपल्या परीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत आपले कौल महाराष्ट्राच्या परीवर्तणाला देण्याचे निर्धार केला असल्याचे दिसुन येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांणा प्रेरीत होऊन सन्मानिय राजसाहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेऊन पोंभूर्णा तालुक्यातील यूवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला.

    विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात

    दिनांक २१ सप्टेंबर रोजी शनिवारला मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, यांच्या मार्गदर्शनात पोंभूर्णा तालुक्यातील अनेक युवकांनी मनसेमध्ये पक्षप्रवेश करीत राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली नव्याने पक्षप्रवेश केलेल्या युवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर पदाधिकार्यांनी उपस्थीतांना मागदर्षण करीत पक्षासाठी एकनिष्ठेने काम करा येणाऱ्या काळात आपल्याला अपेक्षीत महाराष्ट्राचा नवनिर्माण झालेला दिसेल असा विश्वास व्यक्त केला.

    महत्वाचे : पीएम सुर्यघर योजनेचा लाभ घ्या

    कार्यक्रमाचे आयोजन मनविसे तालुकाध्यक्ष आशिष नैताम मनसेचे तालुका सचिव अमोल ढोले मनविसे तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम यांनी केले असून पक्षप्रवेश सोहळ्यात मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे, मनसेचे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आकाश तिरुपतीवार, मनविसे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आशिष नैताम, मनसेचे तालुका सचिव अमोल ढोले, मनविसे तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, मनसेचे पोंभूर्णा शहराध्यक्ष निखिल कन्नाके, मनसेविसे तालुका सचिव महेश राजु नैताम, शन्मुख देऊरमल्ले, शुभंम वांढरे,प्रथम चांदेकर मनसेचे पदाधिकारी तथा मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

  • Chandrapur Mns : चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचे इंजिन धावणार

    Chandrapur Mns : चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचे इंजिन धावणार

    Chandrapur Mns आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे, सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
    आज 10 ऑगस्टला शहरातील महेश भवन येथे चंद्रपूर मनसेचा विधानसभा मेळावा आयोजित केला होता.
    आयोजित मेळाव्यात मनसे नेते राजू उंबरकर, मनसे प्रवक्ते योगेश चिले, शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे उपस्थित होते.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील नाकर्तेपणाच्या खड्ड्यात झाला अपघात


    Chandrapur mns यावेळी प्रवक्ते योगेश चिले म्हणाले की मनसे चंद्रपूर जिल्ह्यातील 6 जागेवर विधानसभा निवडणूक लढविणार आहे, आमच्याकडे उमेदवार सुद्धा तयार आहे, लवकरच पूर्व विदर्भात राज साहेब ठाकरे यांचा दौरा होईल, 5 वर्षे सरकार जनतेला आश्वासन देत आहे आता आम्ही मैदानात उतरलो आहे, सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेपेक्षा सध्या सुरक्षित बहीण योजना राबविण्यात यावी. बहिणींना सध्या सुरक्षेची गरज आहे.

    राजकीय : चंद्रपूर कांग्रेसचे सेल्फी विद खड्डा स्पर्धा व आंदोलन

    आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे ला फारसे यश मिळाले नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा जागेवर रमेश राजूरकर यांनी निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते, राष्ट्रीय पक्षाना राजूरकर यांनी चांगलाच घाम फोडला होता, मात्र आता रमेश राजूरकर हे भाजप पक्षात गेले असल्याने मनसेला उमेदवारांची वानवा आहे.

    राजुरा, चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभेतील निवडणूक लढविणार्या मनसे उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते, आता या पार्श्वभूमीवर मनसे 6 जागा लढविणार आहे मात्र उमेदवार कोण आहे? याबाबत सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 200 ते 225 जागेवर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले मात्र ज्या उमेदवारांची जिंकण्याची शक्यता आहे त्यांना उमेदवारी देणार असे म्हटले होते, मात्र चंद्रपुरात जिंकण्याची शक्यता असलेला उमेदवार सध्या तरी पक्षात नसल्यासारखे चिन्ह आहे, तरीही मनसे प्रयत्न करीत उमेदवार निवडत निवडणूक लढविणार आहे.

  • शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात मनसेचे चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रस्तारोको आंदोलन

    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात मनसेचे चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रस्तारोको आंदोलन

    News34 chandrapur

    वरोरा :- राज्यात तीन पक्षाचं शिंदे सरकार हे आश्वासने देऊन सुद्धा त्याची पूर्तता न करता उलट शेतकऱ्याचा त्यांनी एक प्रकारे छळ चालवला आहे. कारण चालू हंगामात अतिवृष्टी, पूरबुडाईची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करून सुद्धा ते पैसे दिले नाही व पीक विम्याचे पैसे सुद्धा इन्शुरन्स कंपन्याकडून दिल्या गेले नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन हातात आलेले सोयाबीन गेले कापसाला भाव नाही आणि सरकारची मदत सुद्धा नाही.

     

    त्यामुळं शेतकरी गळ्याला फास लावण्याच्या स्थितीत पोहचले आहे. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबवली होती त्यापासून वंचित साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आजपर्यंत केली नाही, त्यात वरोरा भद्रावती क्षेत्रातील जवळपास 5 हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही आणि आता अतिवृष्टी, पूरबुडाई व पीक विम्याचे अनुदान जाहीर करून सुद्धा ते पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे दिनांक 12 डिसेंबर ला दुपारी 12 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी टेमुर्डा परिसरातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

     

    तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सन 2017 ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले होते, परंतु त्यात चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यावेळी झाली नव्हती, त्यामुळे या कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांनी सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केला व काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारला कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्याचे आदेश दिले होते. मात्र मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही.

     

    दरम्यान कर्जमाफी करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दोन वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे आणि चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचे पोर्टल सुरू करू व त्यांच्या खात्यात पैसे टाकू अशी घोषणा केली होती परंतु आता हिवाळी अधिवेशनात कुठलाही आमदार शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर गंभीर नसल्याने व
    यावर्षी झालेली अतिवृष्टी व पूरबुडाई व पीक विम्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा आवाज पोहचावा व ह्या शिंदे, फडणवीस व अजित पवार सरकारला जाग यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानिक वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन येत्या मंगळवार नागपूर चंद्रपूर मार्गावरील टेमुर्डा येथे रास्तारोको आंदोलनं करण्यात आले.

     

    या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष उमाशंकर तिवारी, जनहीत कक्ष विभाग जिल्हा अध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे, संजय रेड्डी, विशाल देठे, राम पाचभाई, रेवती इंगोले, मोहित हिवरकर, प्रशांत बदकी, संजय काटकर, गजू वादाफाळे, मनोज गाठले, राजेंद्र धाबेकर, युगल ठेंगे, धनराज बाटबरवे, सुनील पाझारे, प्रतीक मुडे, महेंद्र गारघाटे, रामा डुकसे, अशोक दाते, भदुजी गिरसावळे. सुधाकर ठाकरे,गुलाब गुळघाणे, शेखर कारवटकर इत्यादींनी केले.

  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन चंद्रपूर मनसे आक्रमक

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन चंद्रपूर मनसे आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. जून ,जुलै मध्ये अतिवृष्टी झाली , येलो मोझॅक सारख्या रोगांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. अवकाळी पाऊसानी अक्षरशः शेतकऱ्यांना झोडपून काढलं.

     

    धान पट्यातील शेतकऱ्यांना अगोदर पुराचा ,आणि अतिवृष्टीच्या मुळे अतोनात नुकसान झालं आणि आता अवकाळी पावसाने कपलेल्या ओळीवर्ती पाणी साचल्याने अतोनात नुकसान झालं , मानमोळी , घाटे अळी मुळे सुधा शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने पंचनामे प्रत्येक्षात शेतात जाऊन , नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करायला पाहिजे ते न करता ऑफिस मध्ये बसून निवडक शेतकऱ्यांना विचारून त्यांच्या मर्जीतील शेतकऱ्यांची नावे लिहले जातात. खरा गरीब नुकसान ग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहतो. प्रशासनाने यावर कठोर पावले उचलावी.

     

    पीक विमा दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता , तो अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला गेलेला नाही. ज्यांना पाठविलं त्याठी काही तोकडी रक्कम जमा केल्या जाते. ज्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेत त्यांना आपणाकडून कडक निर्देश द्यावेत. पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावा. आता अवकाळी पावसाच्या नुकसानीचा सुधा पीक विमा तसेच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसांनाच्या बरोबरीत द्यावे, शेतकऱ्यांची थट्टा करू नये.

     

    शेतकऱ्यांच्या पिकाची वन्य प्राण्यांच्या मुळे झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई देण्यात यावी. परसोडा येथील शेतकऱ्यांना घेऊन आर.सी.सी.पी.एल. कंपनीशी शेतकऱ्यांच्या मागणी नुसार बैठक करून मार्ग काढून द्यावा. या विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यावेळी निवेदन देण्यात आले.

     

    यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार , मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे , वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष महादेव भाऊ , विद्यार्थी सेना ता.अध्यक्ष विवेक धोटे. केतन ताग्रम, मयूर मदनकर, कोरपना शेतकरी सुधाकर कुंभारे ,पुलगामवार , बोकले पाटील , आणि मनसैनिक उपस्थित होते.

    येत्या दिवसात शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांनी दिला आहे.

  • चंद्रपुरात मनसेने काढली आरोग्यव्यवस्थेची तिरडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नुकत्याच घडलेल्या नांदेड, ठाणे, नागपूर येथील दुर्दैवी घटनेनंतर आरोग्य व्यवस्था किती हाल आहे हे स्पष्ट झाले आहे. यातच चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपाचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू झाला.
    यामुळे कुपोषित अवस्थेत पडलेल्या शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसे चंद्रपूर तर्फे आरोग्य व्यवस्थेची तिरडी काढत निषेध नोंदविण्यात आला व यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. Realme चा 5G मोबाईल फक्त 11 हजार 999 रुपयात, आजच खरेदी करा amazon वर

     

    तिरडी वर औषधांचा हार चढवत प्रशासनाच लक्ष वेधण्यात आले, तसेच यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी शासनाकडे अनूपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर कडक शासन करावे, औषधांचा पुरवठा रुग्णांची वाढती संख्या पाहून करावा, गेली दोन वर्षापासून होत असलेली औषध पुरवठ्याची मागणी त्वरित पूर्ण करण्यात यावी, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची, कामगारांची शेकडो रिक्त पदे त्वरित भरावी, ऑपरेटिंग एक्स-रे मशीन सुरू करावी, रखडलेल्या यंत्रांची खरेदी अती तातडीने करण्यात यावी, सोनुग्राफी करीता महिने महिन्याची तारीख रुग्णांना न देता, त्यावर त्वरित उपययोजना करावी, कर्मचाऱ्यांचे वर्षभरापासून अधिष्ठाता यांचे कार्यालयात रखडलेले उपचाराचे बिल त्वरित अदा करण्यात यावे, खाटांची संख्या वाढविण्यात यावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या, विविध फलक दाखवीत निद्रावस्थेत असलेल्या शासनाच्या व सरकारच्या ढिम्म कारभाराचा यावेळी निषेध केला.

     

    यावेळी उपअधीक्षक यांचे कार्यालय गाठत खाली असलेल्या कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल अर्धा तास ठिय्या मांडत अधिकाऱ्यांना बोलावून चर्चा केली. यावेळी शासनाकडून खरेदीत, भरीत प्रक्रियेत, व औषधी पुरवठा करण्यात होणारी दिरंगाई यामुळे अनेक अडचणींना स्थानिक अधिकाऱ्यांना व डॉक्टर यांना समोर जावे लागत आहे हे स्पष्ट झाले. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अवगत करून आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी दिले.

     

    सदर आंदोलनात कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंह,व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार,विधीसेना जिल्हाध्यक्ष मंजुषा लेडांगे,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, जनहित सेना जिल्हाध्यक्ष सुनील गुडे,तालुअक अध्यक्ष प्रकाश नागरकर,शहर संघटक मनोज तांबेकर, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन टेकाम, अक्षय चौधरी, राज वर्मा,वर्षा भोमले, युगल ठेंगे, नितेश जुमडे, करण नायर, मयुर मदनकर, कार्तिक खंगार,सुयोग धनवलकर, राकेश पराडकर, तुषार येरमे,पियुष धुपे,असलम शेख, अभी उमरे, विनोद रेब्बावार,ऋषि बालमवार, कार्तिक खंगार व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

  • चंद्रपूर मनसे वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष कोण?

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मनसेच्या प्रदेश नेतृत्वाने दोन वर्षांपूर्वीच पदावरून उचलबांगडी केल्यानंतरही भरत गुप्ता हे जिल्हाध्यक्ष पदाचा गैरवापर करीत स्वत:ला जिल्हाध्यक्ष म्हणून मिरवित आहे. पक्षनेतृत्वाने चंद्रपुरात वाहतूक सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मनसे वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाशी भरत गुप्ता यांचा आता कोणताही संबंध नसून ते केवळ मनसेचे कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत, असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, राहुल बालमवार यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

     

    भरत गुप्ता यापूर्वी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष होते. दोन वर्षांपूर्वी वाहतूक सेनेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून त्यांना पदमुक्त करण्यात आले. यानंतरही ते जिल्हाध्यक्ष पदाचा वापर करीत होते. दोन महिन्यापूर्वी प्रदेश नेतृत्वावाने वाहतूक सेनेचे नवे पदाधिकारी जाहीर केले. यानुसार चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा या तीन विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा संघटक म्हणून महेश वासलवार यांची तर वरोरा, ब्रह्मपुरी आणि चिमूर या तीन मतदार संघाची जबाबदारी उमेश तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

     

    मात्र, भरत गुप्ता समाजमाध्यमे तसेच होर्डिंग्जवर स्वत:चा उल्लेख मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष असा करीत असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, गुप्ता केवळ मनसेचे कार्यकर्ते आहेत. ते जिल्ह्यात कोणत्याही पदावर नाही, असे बालमवार आणि रोडे यांनी स्पष्ट केले.

     

    यानंतरही त्यांच्याकडून अनधिकृतपणे पदाचा गैरवापर होत राहिल्यास वरिष्ठांकडे तक्रार करू अशी माहिती अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला महेश वासलवार, उमेश तिवारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

  • विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा दिनांक 10 सप्टेंबरला वाढदिवस मनसे कार्यकर्त्यांनी थाटात साजरा केला असतांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे तालुका संघटक मनोज तांबेकर यांच्या नेत्रुत्वात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश कार्यक्रम पार पडला.

     

    यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे.विधी विभाग जिल्हा अध्यक्ष मंजु लेडांगे जनहित कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुढे. रमेश काळबांधे,ता, अध्यक्ष प्रकाश नागरकर विवेक घोटे करन नायर मयुर मदनकर क्रिष्णा गुप्ता प्रविन शेवते पीयूष धुपे, राज वर्मा. वर्षा भोंबले व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

     

    स्थानिक विश्रामगृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश घेण्यात आला असुन चंदू भगत. रहसुद्दिन शेख. विनोद धाबेकर. नागोजी सोनवणे. रवी बावणे. दिनकर बांगडे, शेरुभाई, नमसिन भाई. ओमजी शर्मा, कवडू चिंचोलकर, दत्ता उम्बरकर, विलास दांडेकर. अर्जुन खोब्रागडे व आश्विन देठे यांचा जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी पक्षाचा दुपट्टा खांद्यावर टाकून पक्ष प्रवेश घेतला यावेळी पक्ष स्थरावर त्यातील कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

  • चंद्रपूर मनसे जिल्हाध्यक्ष बालमवार यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा

    News34 chandrapur

    चंद्रपूर/पोम्भूर्णा – चंद्रपूर जिल्हा मनसे अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या वाढदिवसानिमित्त मनवीसे तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी तब्बल 49 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

     

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर चे तडफदार नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

     

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे पोम्भूर्णा शहर अध्यक्ष पवन बंकावार व तालुका अध्यक्ष आशिष नैताम यांनी बालमवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

    रक्तदान शिबिरात युवकांनी आपली अभूतपूर्व उपस्थिती दर्शवित रक्तदान कार्यक्रमात सहभागी होत रक्तदान केले, यावेळी तब्बल 49 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

     

    आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राहुल बालमवार, मनवीसे चंद्रपूर तालुका अध्यक्ष विवेक धोटे, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, प्रकाश नागरकर, मयूर मंदारकर, कृष्णा गुप्ता, आकाश तिरुपतिवार, निखिल कन्नाके, रोशन भडके, राजू गेडाम, महेश नैताम, विवेक विरुटकर, सुजित परचाके आदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.