Tag: चंद्रपूर कांग्रेस

  • Congress stance on road divider corruption । विकासाच्या नावाखाली सुरु असलेल्या भ्रष्टाचाराला कांग्रेसचा विरोध – रामू तिवारी

    Congress stance on road divider corruption

    Congress stance on road divider corruption : चंद्रपूर : बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत सुरू असलेल्या रस्ता व दुभाजकाच्या वादग्रस्त कामावर काँग्रेस ने स्पष्ट भूमिका मांडली आहे. “विकास कामांना विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध आहे, अशी भूमिका काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केली आहे.

    Also Read : चंद्रपूर मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची फाईल तयार

    बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत रस्त्याचे बांधकाम व्हावे, यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने यापूर्वी देखील आंदोलन करण्यात आले होते.  महाकाली प्रभागातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका कल्पना लहामगे यांनी या दुभाजक कामातील गैरव्यवहारांविरोधात महानगरपालिका आयुक्तांना लेखी तक्रार सादर केली आहे.

    अव्वाच्या सव्वा दराने दुभाजक बांधण्याचे कंत्राट

    रस्त्याऐवजी अव्वाच्या सव्वा दराने दुभाजक बांधण्याचे ठेके देण्यात आले असून, हे सार्वजनिक निधीचा अपव्यय असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. माजी नगरसेविका लहामगे यांनी दिलेले पत्र हीच काँग्रेसची अधिकृत भूमिका असल्याचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. 


    तिवारी यांनी म्हटले की, मर्जीतल्या कंत्राटदाराला लाभ देण्यासाठी मनपाचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले, तर कंत्राटदाराला तितकाच फायदा झाला. कामाची गुणवत्ता शून्य असून जनतेच्या पैशांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. काँग्रेसने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अभियंते, कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

  • Congress claims bogus voters increase । Chandrapur लोकसभा मतदारसंघात 50,000 बनावट मतदार

    Congress claims bogus voters increase

    Congress claims bogus voters increase : चंद्रपूर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

    यावेळी भाषणात माजी आमदार सुभाष धोटे यांनी धक्कादायक आरोप करताना सांगितले की, “माझ्या राजुरा विधानसभा मतदारसंघात तब्बल 20 हजार बोगस मते वाढविण्यात आली. तक्रारी नंतर त्यापैकी 6 हजार 700 बोगस मतदार वगळले गेले असले तरी शिल्लक मते कायम राहिली. यातूनच भाजपचा उमेदवार केवळ 3 हजार मतांनी निवडून आला. यावरून निवडणूक आयोग बदमाश असल्याचे स्पष्ट होते,” असा दावा त्यांनी केला.

    नदीत फुटबॉल चा खेळ, दोघांचा मृत्यू

    ५० हजार बोगस मतदार

    धोटे पुढे म्हणाले की, “माझ्याकडे ऑनलाइन नोंदणीद्वारे ही बोगस मते वाढविण्यात आल्याची माहिती आली असून याबाबत मी राजुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फक्त राजुरा मतदार संघातच नाही तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात तब्बल 50 हजार बोगस मते वाढविण्यात आली आहेत. राहुल गांधी जे सांगत आहेत ते सत्य आहे,” असेही ते म्हणाले. fraudulent voters accusation

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सज्ज असून “प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन बोगस मते ओळखून त्यांना वगळण्याचे काम काँग्रेस करणार,” असा निर्धार धोटे यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला

  • Selfie with khadda : खड्डयांसोबत सेल्फी काढा व जिंका रोख बक्षिसे

    Selfie with khadda : खड्डयांसोबत सेल्फी काढा व जिंका रोख बक्षिसे

    Selfie with khadda शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेऊन आहे. त्यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने ‘सेल्फी विथ खड्डा’ हे अभिनव आंदोलन करण्यात येत आहे. चंद्रपूरकर जनतेला १५ ऑगस्टपर्यंत खड्ड्यांसोबतचा सेल्फी काढून पाठवायचा आहे. परिक्षकांच्या निवडीनंतर प्रथम (५ हजार), द्वितीय (३ हजार) आणि तृतीय (२ हजार) रुपयांची बक्षीसे देऊन विजेत्यांना पुरस्कृत केले जाणार आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर मनपाची सेल्फी विद तिरंगा स्पर्धा


    Selfie with khadda चंद्रपूर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी हे दोन मुख्य मार्ग आहेत. या दोन्ही मार्गावर मुख्य बाजारपेठ आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांची या रस्त्यांने नेहमी वर्दळ असते. मागील महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील या दोन्ही मुख्य रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यासोबतच तुकुम, बंगाली कॅम्प, सिव्हील लाईन व अंतर्गत रस्त्यांचीसुद्धा दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  

    योजना – लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर


    खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. काही नागरिक जखमीसुद्धा झाले आहेत. मात्र, रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने कुणाचाही वचक राहिलेला नाही. त्यामुळे मनपातील अधिकारी आपल्या मर्जीनुसार कामे करीत आहेत. त्यामुळे या प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘सेल्फी विथ खड्डा’ अभिनव आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात चंद्रपूरकर जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होऊन खड्ड्यांसोबतचा सेल्फी कासिफ अली (मो. ९८६००५१११), राजू खजांची (मो. ९३२६८६९०९९) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.


    या क्रमांकावर पाठवा सेल्फी
    चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेल्फी विथ खड्डा’ या अभिनव आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी कासिफ अली (मो. ९८६००५१११), राजू खजांची (मो. ९३२६८६९०९९) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन विजेत्यांना रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

  • कांग्रेसने केली लोकसभा समनव्यक पदांची यादी जाहीर

    कांग्रेसने केली लोकसभा समनव्यक पदांची यादी जाहीर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – लोकसभा निवडणूक अवघ्या 2 ते 3 महिन्यात लागू शकते, त्यामुळे राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

     

    राज्यातील एकमेव कांग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या अवकाळी निधनाने आता कोण? याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले मात्र शेवटच्या क्षणी आमदार प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उभे राहू शकतात.

     

    कांग्रेस महासचिव केसी वेणूगोपाल यांनी राज्यातील लोकसभा समनव्यक यांची नियुक्ती जाहिर केली असून चंद्रपूर लोकसभा समनव्यक पदी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची वर्णी लागली आहे.

     

    कांग्रेस पक्षाने अनेक वर्षांनी चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता, मात्र आता कांग्रेस पुन्हा निवडून येणार का? चंद्रपूर जिल्ह्याला पहिली महिला खासदार म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर मिळणार काय? हे चित्र लोकसभा निवडणूक नंतर स्पष्ट होणार.

    सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षात गटबाजीचा सूर आहे, त्या विविध सुराला सतीश चतुर्वेदी कसे जुळवून घेतात याकडे कांग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

  • चंद्रपुरात केंद्र सरकारविरोधात कांग्रेसचे निषेध आंदोलन

    चंद्रपुरात केंद्र सरकारविरोधात कांग्रेसचे निषेध आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सभागृहात जनतेचे प्रश्न उपस्थित करणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. तर, लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सत्ताधारी पक्षाचे काम आहे. यासर्व बाबी संविधानात नमूद आहेत. मात्र, अधिवेशन काळात संसदेत घडलेल्या स्मोक हल्ल्याच्या घटनेवर निवेदनाची मागणी करणाऱ्या तब्बल १४२ खासदारांचे केंद्र सरकारने निलंबन केले आहे. यातून केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (ता. २२) दुपारी ३.३०  वाजता गांधी चौकात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

    यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, कामगार नेते प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांची उपस्थिती होती.

     

    भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला. ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाच्या भूमिकेबाबत स्पष्ट निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून करण्यात आली. या लोकप्रतिनिधींच्या प्रश्नींची उत्तरे देण्याऐवजी केंद्र सरकारने १४२ खासदारांचे निलंबन केले आहे. हा लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला असल्याचे मत आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी व्यक्त केले.

     

    केंद्रातील भाजप सरकार धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढते, ही एक प्रकारे लोकशाही तत्वांची हत्या आहे. लोकशाहीला स्मशान बनविण्याचे काम भाजपकडून सातत्याने होत असल्याचा आरोप आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला. केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने संविधानातील नियमांना पायदळी तुडविण्याचे काम सुरू केले आहे. खासदारांचे निलंबन करून हुकुमशाही वृत्तीची प्रचिती देशाला दाखवून दिली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या या अपमानाच्या विरोधात आपण आता पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने एकत्रितपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले.

     

    प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनीसुद्धा केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, विनोद दत्तात्रेय, गोपाल अमृतकर, अरुण भेलके, नंदू नागरकर, संतोष लहामगे, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, रमिज शेख, कुणाल चहारे, प्रशांत भारती, सुनीता अग्रवाल, विना खनके, सकिना अन्सारी, उमाकांत धांडे, भालचंद्र दानव, राहुल चौधरी, हर्षित रामटेके, युसूफ भाई, पप्पू सिद्दीकी, दुर्गेश कोडाम, गोस खान, प्रमोद बोरीकर, मुन्ना तावाडे, नरेंद्र डोंगरे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, प्रशांत दानव, नौशाद शेख, पितांबर कश्यप, दुर्गेश कोडाम यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

  • चंद्रपुरात आम आदमी पक्षाला खिंडार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आजही निवडणूक आयोगाने घोषित केल्या नसल्या तरी पुढची निवडणूक सर्व पक्षांना महत्वाची असल्याने सध्या पक्षबांधणीचे काम विविध पक्षांनी सुरू केले आहे.

    चंद्रपुरात आम आदमी पक्षाने अनेक ठिकाणी कार्यकर्ते जमविले असून आधीचा पक्ष व आताचा आम आदमी पक्ष यामध्ये मोठा फरक जाणवतो, मात्र आता आम आदमी पक्षाला सुद्धा चंद्रपुरात मोठं खिंडार पडलं आहे.

     

    चंद्रपूर आम आदमी महिला अध्यक्ष ऍड. सुनीता पाटील यांनी कार्यकर्त्यांसाहित कांग्रेस पक्षात प्रवेश केला.

    आप पक्षात महिलांच्या संघटन उभारणी मध्ये सुनीता पाटील यांचा मोठा वाटा होता.

     

    रविवारी विश्रामगृह चंद्रपूर येथे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनीता पाटील यांनी कांग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला.

     

    यावेळी आप च्या महिला उपाध्यक्ष जासमिन शेख, रूपा काटकर, मीना पोटफोडे, महिला सचिव वंदना कुंदावार, सहसचिव सुभद्रा मुन, शबनम शेख, स्वाती डोंगरे, सुहास रामटेके, स्नेहा महाकश्यप, पुष्पा बुधवारे, संतोषी यादव, भीमराव मेंढे, अभिजित संगेवार, सुशील वाहुले, लक्ष्मण पाटील, मुकेश पांडे, रज्जू भैया, अकीब शेख, अमजद खान, नंदकिशोर स्वान, प्रशांत रामटेके, कविता टिपले आदि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.