Tag: गणेशोत्सव

  • where to immerse Ganesh idols in Chandrapur । 🌊 विसर्जन कुठे कराल? चंद्रपूर मनपा घेऊन आली २५ कृत्रिम तलावांची सुविधा

    where to immerse Ganesh idols in Chandrapur

    where to immerse Ganesh idols in Chandrapur : चंद्रपूर 22 ऑगस्ट – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने 25 कृत्रिम तलाव व 25 निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली असुन सर्व घरगुती व लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

    डीजे लावताय तर हा आदेश वाचा, अन्यथा गुन्हा दाखल होणार

       शहरात मुख्यतः दीड दिवस,5 दिवस तसेच 10 दिवसाच्या गणपतीची स्थापना करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी विसर्जनाच्या व्यवस्थेची गरज भासते. त्यामुळे घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच अथवा जवळच्या कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपातर्फे व्यवस्था करण्यात आली आहे.

    नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती या कमी उंचीच्या ठेवण्यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन मनपामार्फत आधीच करण्यात आले होते. मागील वर्षी   पीओपीच्या मुर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्रीगणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपुरक श्रीगणेशोत्सव संपन्न व्हावा याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. Chandrapur municipality artificial immersion tanks locations

    3 फिरते विसर्जन कुंड –

     गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय 3 ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. या फिरत्या विसर्जन कुंडांचे झोननिहाय मार्गक्रमण वेळापत्रक आणि संपर्क क्रमांक देखील महापालिकेद्वारे देण्यात आलेले आहेत.

    एक खिडकी योजना – मनपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुद्धा सुरु करण्यात आली होती. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाद्वारे संयुक्तरीत्या सार्वजनिक मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. eco-friendly Ganesh visarjan in Chandrapur 

    कृत्रिम तलाव स्थळ – एकूण – २५

    • १) झोन क्र. १ (कार्यालय) संजय गांधी मार्केट – २
      २) साईबाबा मंदीर वडगाव – १
      ३)वडगाव पोलीस चौकी – १
      ४) दाताळा रोड,इरई नदी – २
      ५) तुकुम प्रा.शाळा(मनपा,चंद्रपूर) – २
      ६) तुकुम एस टी वर्कशॉप – २
      ७) रामाळा तलाव – ४
      ८) छत्रपती शिवाजी चौक – २
      ९) गांधी चौक – १
      १०) लोकमान्य टिळक प्रा.शाळा पठाणपुरा रोड – १  
      ११) विठोबा खिडकी विठ्ठल मंदीर वॉर्ड – १
      १२) महाकाली प्रा.शाळा – १
      १३) सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ – २
      १४) झोन क्र. ३ (कार्यालय)  – २
      १५) लालपेठ ( हनुमान मंदिर ) जुनी बस्ती
  • Order issued prohibiting the Dj laser light । 🙏 गणेशोत्सव व ईद मिरवणुकीसाठी महत्त्वाचा आदेश

    Order issued prohibiting the Dj laser light

    Order issued prohibiting the Dj laser light : चंद्रपूर, दि. 21 : आगामी काळात जिल्ह्यात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण साजरे केले जाणार आहे. या उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने मानवी जिवीताला धोका, आरोग्याला, सुरक्षिततेला धोका तसेच जनतेमध्ये गोंधळ निर्माण होणे, तसेच भांडण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्गमित केले आहेत.

    चंद्रपुरात देहव्यापार, गुन्हे शाखेची धाड

    ईद ए मिलाद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

    चंद्रपूर जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव तसेच यादरम्यान ईद-ए-मिलाद हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळाकडून वेगवेगळ्या तारखेला मुर्ती विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ईद-ए-मिलादनिमित्त सुध्दा मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. Chandrapur procession laser safety order police

    लेझर लाईटमुळे अंधत्व येणे, डोळे निकामी होणे, आरोग्याला धोका आणि गोंधळाची स्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये 27 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेशोत्सव व ईद – ए- मिलाद मिरवणुकीमध्ये लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे पोलिस अधिक्षकांच्या आदेशात नमुद आहे.

  • Ganesh idol exhibition Chandrapur । 🌟 यंदाचा उत्सव खास! चांदा क्लबमध्ये मिळणार मातीच्या गणेश मूर्तींचे अनोखे कलेक्शन 🌿

    Ganesh idol exhibition Chandrapur

    Ganesh idol exhibition Chandrapur : चंद्रपूर – आगामी श्रीगणेशोत्सव काळात यंदाही चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले असुन श्री गणेश मूर्ती दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये व नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता याव्या या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले.  

    चंद्रपूर मनपा आयुक्त जाणार जपान दौऱ्यावर

        लवकरच गणेशोत्वास सुरवात होणार असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्तिविक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नसतो.यावर उपाय म्हणुन यावर्षी मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा मनपाने उपलब्ध करून दिली होती व त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. यावेळॆस मागणी असल्याने सिटी हायस्कूल जवळील जुन्या विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्याशिवाय इतर फुटपाथ अथवा रस्त्यावर विक्रेत्यांना पूर्णपणे मनाई आहे.  

    रस्त्यावर मूर्ती विक्री केल्यास कारवाई

         चांदा क्लब येथे येथे व्यवस्था  करण्यात येणार येणार असुन स्टॉल्स, पेंडॉल व्यवस्था मूर्ती विक्रेत्यांना स्वतः करावयाची आहे. विद्यूत व्यवस्थेसाठी पॉईंट, फिरते शौचालय,स्वच्छतेची व्यवस्था,पाणी टँकर मनपा प्रशासनातर्फे करून दिली जाणार आहे. नोंदणी न करता मूर्ती विक्री व साहित्य विक्री करणाऱ्यावर तसेच मनपाने निश्चित करून दिलेल्या जागेशिवाय इतरत्र विशेषतः फुटपाथवर अथवा रस्त्यावर मुर्ती विक्री करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. Chandrapur Clay Ganesh idol exhibition 2025    


         मूर्ती खरेदीस नागरिकांची गर्दी, वाहनांची गर्दी, खरेदीस पुरेसा वेळ न मिळणे, दुचाकी वाहन सोबत असेल तर वाहन उभे करायला जागेचा प्रश्न,चारचाकी वाहन असेल तर सुरक्षित जागी वाहन उभे करून खरेदीस दूर पायी चालत जावे लागते.सोबत परिवाराचे सदस्य असतील तर खरेदी करतांना होणारा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने एकाच जागी मातीच्या गणेश मूर्तीची अनेक दुकाने उपलब्ध होणार असुन नागरिकांना इतरत्र कुठेही गर्दीच्या जागी न जाता मोकळ्या जागेत आपल्या परिवारासहित खरेदीचा आनंद घेता येणार आहे. Chanda Club Ganesh idol exhibition 

         चांदा क्लब येथील मूर्तिकांरांकडून मूर्ती विकत घेणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉ कुपन दिले जाणार असुन यातील 8 भाग्यवान विजेत्यांना घरगुती उपयोगी वस्तु इस्त्री, मिक्सर स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत. गर्दीमुक्त मोकळ्या वातावरणात श्री गणेशाचे आगमन होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी चांदा क्लब येथुन मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.   

  • Chandrapur police DJ free Ganesh festival appeal । चंद्रपूर पोलिसांकडून डीजे मुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

    Chandrapur police DJ free Ganesh festival appeal

    Chandrapur police DJ free Ganesh festival appeal : चंद्रपूर, दि. 5 : आगामी काळात जिल्ह्यात गणेशोत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहिहांडी, पोळा, ईद – ए- मिलाद असे सर्वधर्मीय सण-उत्सव साजरे होणार आहे. हे सर्व उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. ही आपली सर्वांचीच सामुहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले. Chandrapur district festival peace committee preparations

    बाबुपेठ मध्ये अवैधधंदे, आप चे निवेदन

    नियोजन सभागृह येथे जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाच्या वतीने आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्यासह, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे अध्यक्ष, मुर्तीकार, डीजे चालक मालक आदी उपस्थित होते.

    शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवाचा’ दर्जा दिला आहे, असे सांगून डॉ. व्यवहारे म्हणाले, उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभाग नोंदवून बक्षीसे मिळवावीत. गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी घाट निश्चित करून विसर्जनस्थळी पूर्ण व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने प्रथमोपचार व्यवस्था, औषधांची उपलब्धता चोख ठेवावी. Ganesh festival security instructions

    प्रादेशिक परिवहन विभागाने मिरवणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष द्यावे. गणेशोत्सवात वीज पुरवठा खंडीत होणार नाही, तसेच मंडळांना वीज जोडणी महावितरण कंपनीने उपलब्ध करून द्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे असलेल्या रस्त्यांची डागडुजी करावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने मिठाई, अन्न पदार्थांची तपासणी करावी, अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिल्या.

    डीजे मुक्त गणेशोत्सवसाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा : अपर पोलिस अधिक्षक कातकडे

    प्रशासन म्हणजे केवळ शासकीय विभागच नव्हे तर आपण सर्वजण म्हणजे प्रशासन होय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पर्यावरणपुरक गणेशोत्सव, रक्तदान शिबीर, प्लॅस्टिक निर्मुलन, वृक्षारोपण, गरीब शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप असे सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा. तसेच डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी केले.

    पुढे ते म्हणाले, डीजे ऐवजी लेझीम नृत्य, ढोल ताशे असे पारंपरिक वाद्ये वाजवावीत. गणेश मंडळांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून गर्दीला आळा घालता येईल. तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा लक्षात येताच तात्काळ पोलिसांशी संपर्क करा, असे त्यांनी सांगितले. multi‑faith festival celebration rules Chandrapur administration

    शांतता समिती सदस्यांच्या सुचना :

     1. सण उत्सवाच्या दरम्यान विद्युत पुरवठा अखंडीत सुरू राहावा, 2. डीजे चा आवाज मर्यादीत असावा, 3. मिरवणुकीसाठी रस्त्यांची तात्काळ डागडुजी करावी, 4. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, 5. अफवा पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी, 6. मुर्तीची उंची मर्यादेपेक्षा जास्त असू नये, 7. मिरवणुकीदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर ध्वनीक्षेपक बंद ठेवावे, 8. मुर्ती विक्री चांदा क्लब ग्राऊंडवरच व्हावी, 9. लेझर लाईटवर बंदी आणावी, 10. सजावटीमध्ये प्लॅस्टिक, थर्माकॉलच्या वापरावर प्रतिबंध करावे.

  • Ganesh festival online permission portal । चंद्रपुरातील गणेश मंडळांसाठी खुशखबर!, फक्त एका क्लिकवर मिळणार गणेशोत्सवाच्या सर्व परवानग्या

    Ganesh festival online permission portal

    Ganesh festival online permission portal : चंद्रपूर 3 ऑगस्ट – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या एकाच ठिकाणाहुन मिळाव्या यासाठी एक खिडकी प्रणाली सुरु करण्यात आली असुन मनपा मुख्य इमारत येथे गणेश मंडळांसाठी मदतकक्ष सुद्धा सुरु करण्यात आला आहे.

    महिलांच्या नावावर मिळणार घर, चंद्रपूर मनपाने नागरिकांना अर्ज करण्याचे केले आवाहन

          येत्या 27 ऑगस्टपासुन शहरात दहा दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेश मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या या घ्याव्या लागतात. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाच्या परवानगी या एकच ठिकाणाहुन घेता याव्या यासाठी एक खिडकी प्रणाली चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आली आहे. how to get permission for Ganesh pandal

    ऑनलाईन करा अर्ज

           गणेश मंडळांना अर्ज करणे सोपे जावे याकरीता महानगरपालिका कार्यालयात एकल खिडकी प्रणाली मदतकक्ष सुद्धा स्थापन करण्यात आला आहे. https://pandal.cmcchandrapur.com या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करता येऊ शकतो. गणेशोत्सव प्रदुषणमुक्त होण्याच्या दृष्टीने पीओपी मुर्तींना थारा न देता शाडूच्या मुर्तींचाच वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • Ayodhya Ram Mandir : चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना होणार अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन

    Ayodhya Ram Mandir : चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना होणार अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन

    Ayodhya Ram mandir ‘ब्रम्हपूरीचा महाराजा गणेश मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवात भाविकांना होणार “अयोध्येच्या राम मंदिराचे” दर्शन, गणेशोत्सवात सुप्रसिद्ध गायक सलमान अली, इशीता विश्वकर्मा, सिनेअभिनेत्री उर्मिला कोठारे यांची राहणार उपस्थिती

    Ayodhya ram mandir आता अगदी काही दिवसांतच गणपती बाप्पा चे आगमन होणार असून सर्वत्र धामधूम असणार आहे. अशातच संपूर्ण विदर्भात शिक्षणाची पंढरी म्हणून प्रख्यात असलेल्या ब्रम्हपूरी शहरातील गणेशोत्सव देखील तितकाच लोकप्रिय आहे. या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी परंपरा लाभली असून गणेशोत्सवात मोठा सामाजिक सलोखा देखील बघायला मिळतो.

    महत्त्वाचे : महावितरण कार्यालयात तोडफोड, सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे वर गुन्हा दाखल

    Ayodhya ram mandir या परंपरेला कायम ठेवत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरीचा महाराजा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मागील वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ब्रम्हपूरीचा महाराजा या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी देखील मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार असुन यावर्षी या मंडळाच्या वतीने अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात येणार असून भाविकांना अयोध्येच्या राम मंदिराचे साक्षात दर्शन होणार आहे. मागील वर्षी या मंडळाच्या वतीने केदारनाथ मंदिराचा देखावा उभारण्यात आला होता. सोबतच गणेशोत्सवात विविध प्रकारचे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार असून रुपेरी पडद्यावरील कलाकारांची देखील यानिमित्ताने गणेशोत्सवात हजेरी लागणार आहे. हे मात्र विशेष.

    अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

    Ayodhya ram mandir मंडळाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी सायं. ६ वा. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. आरोग्य व रक्तदान शिबीर, रात्री ८ वा. ‘गांधी कभी मरते नही’ महानाट्य, १३ सप्टेंबर रोजी दु.१ वा. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, सायं.७ वा. दादा-दादी टॅलेंट शो असुन यावेळी सिनेअभिनेत्री उर्मिला कोठारे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. डान्स महासंग्राम, १४ सप्टेंबर रोजी दु. १२ वा. कला क्षेत्रातील कलावंतांचा सत्कार, रात्री ८ वा. ‘रामायण’ महानाट्य, १५ सप्टेंबर रोजी सायं. ६ वा. हाऊजी खेळ, १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. ‘भुक’ नाटक, १६ सप्टेंबर रोजी दु.१२ वा. प्रश्नमंजुषा स्पर्धा, सायं.४ वा. वादविवाद स्पर्धा, रात्री ८ वा. होम मिनिस्टर, १७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. इंडियन आयडॉल विजेता, सुप्रसिद्ध गायक सलमान अली व सारेगामापा विजेती इशीता विश्वकर्मा यांचा लाईव्ह सिंगीग शो व रात्री ११ वा. गोपालकाला राहील. तर १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. पासून ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा चे मिरवणुक व त्यानंतर विसर्जन होणार आहे.

    अयोध्येचा राममंदिर विशेष आकर्षण


    यंदा ब्रम्हपुरीचा महाराजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने अयोध्येचा राम मंदीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली असून या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी आल्यानंतर अयोध्येच्या मंदीराचे साक्षात दर्शन होणार आहे. मंदीरात १५ फुट उंच गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सोबतच याठिकाणी मिनी बाजार(मेला) यामध्ये विविधांगी झुले, पाळणे, राहणार असुन सांस्कृतिक, सामाजिक, जनजागृतीपर कार्यक्रमांची मोठी मेजवानी भेटणार आहे. त्यामुळे दररोज विदर्भातील विविध जिल्ह्यांतुन हजारोंच्या संख्येने भाविक याठिकाणी उपस्थिती दर्शविणार असल्याचे सांगितले जात आहे.

  • Shantata committee : आगामी सण, उत्सव आनंदाने साजरे करा, शांतता समितीची बैठक

    Shantata committee : आगामी सण, उत्सव आनंदाने साजरे करा, शांतता समितीची बैठक

    Shantata committee आगामी काळात जिल्ह्यात पोळा, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद असे सर्वधर्मीय सण मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत.

    चंद्रपूर हा जिल्हा शांततेसाठी प्रसिध्द आहे. जिल्ह्याचा हाच लौकिक कायम राखण्यासाठी तसेच सर्वधर्मीय सण शांततेत आणि उत्साहात साजरे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

    Shantata committee नियोजन सभागृह येथे पोलिस दलातर्फे आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, सहायक पोलिस अधीक्षक नियोमी साटम, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, डॉ. मंगेश गुलवाडे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, पोलिस पाटील तसेच शांतता समितीचे सदस्य आणि गणेश मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात मोठी दुर्घटना टळली

    Shantata committee सण आणि उत्सवासंदर्भात प्रशासनाकडून देण्यात येणा-या सूचनांचे सर्वांनी गांभिर्याने पालन करणे गरजेचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शहरात तसेच तालुका स्तरावर महसूल, नगर पालिका प्रशासन आाणि पोलिस विभागाच्या अधिका-यांनी मिरवणुकीचा मार्ग, विसर्जन स्थळ आदींना त्वरीत भेट देऊन पाहणी करावी. गणेश मंडळांनी प्रत्येक दिवशी प्रत्येक शिफ्टकरीता किमान एक स्वयंसेवक, मुर्ती आणि मंडपाच्या संरक्षणासाठी नेमावा. सर्व गणेश मंडळांनी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. प्रत्येक मंडळाने मंडप उभारतांना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अग्निशमन, रुग्णवाहिका तसेच दुचाकी-चारचाकी वाहने सुरळीत वाहतूक करू शकतील, याची दक्षता घ्यावी. लेजर लाईटवर बंदी आहे, त्यामुळे कुणीही त्याचा वापर करू नये. डीजे चा आवाज मर्यादेतच ठेवावा. राष्ट्रगीत आणि राज्यगीताचा एक ठराविक प्रोटोकॉल आहे, त्यामुळे डीजेवर राष्ट्रगीत व राज्यगीत वाजवू नये. तसेच मंडळांनी फायर ऑडीट करून घ्यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

    जिल्ह्याचा शांततेचा लौकिक कायम ठेवा : आमदार किशोर जोरगेवार

    चंद्रपूर जिल्हा हा राज्यात शांततेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वधर्मीय सण येथे अतिशय आनंदाने आणि शांततेत पार पाडण्याचा सर्वांचाच प्रयत्न असतो. शांततेची हीच ओळख कायम ठेवावी, अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. पुढे ते म्हणाले, शांतता समितीच्या सदस्यांकडून आलेल्या सुचनांची प्रशासनाने नोंद घेतली आहे.  सर्व मंडळांनी विसर्जनाच्या मिरवणुका वेळेत काढाव्यात. श्रींच्या मुर्तीकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी मंडळांनी दक्षता घ्यावी. प्रशासनाच्या सुचनांचे सर्वांनी पालन करावे व हा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडावा, असे आवाहनही त्यांनी केले.

    चांदा क्लब ग्राऊंडवरच मूर्ती आणि पुजेचे साहित्य मिळणार : मूर्ती आणि पुजेचे साहित्य खरेदीकरीता रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी चांदा क्लब ग्राऊंड हे मूर्तीकरीता आणि पुजेच्या साहित्याकरीता उपलब्ध करून देण्यात आले आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. शहरातील 100 टक्के गणेश मुर्तीचे विसर्जन हे महानगर पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रीम कुंडामध्येच करावे. तसेच विविध परवानगीसाठी मनपाच्या वतीने ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्यात आली आहे, गणेश मंडळांनी त्वरीत त्यासाठी अर्ज दाखल करावे, असे आवाहन महानगर पालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले. 

    मिरवणुका विनाकारण रस्त्यावर थांबवू नये : अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू

    Shantata committee सर्व गणेश मंडळांनी दिलेल्या वेळेतच विसर्जनाची मिरवणूक काढावी. कोणत्याही धार्मिक स्थळासमोर किंवा रस्त्यावर विनाकारण मिरवणूक थांबवू नये, त्या सतत पुढे नेऊन रस्ता मोकळा करावा. जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच प्रशासनाच्या एका ठेक्याला सर्व साऊंड सिस्टीम बंद करावी. पोलिस आपल्या मदतीला आहेच, काही अघटीत घडण्याची माहिती असल्यास त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी केले.

    नागरिकांच्या सुचना : यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी विविध सूचना केल्या. यात सायबर सेलच्या माध्यमातून अफवांवर नियंत्रण ठेवावे. नागरिकांनीही अफवांवर विश्वास ठेवू नये, रस्त्यावरचे गड्डे त्वरीत बुजवावे, शांतता समितीची बैठक तीन महिन्यातून एकदा घ्यावी, गणेश मंडळांना मंडपसाठी सिमांकन करून द्यावे, विसर्जन स्थळी सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, डीजे चा आवाज मर्यादेत असावा, सर्व सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत सुरू करावे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, डॉक्टरांचे पथक तयार ठेवावे आदींचा यात समावेश होता.