Tag: कार्यशाळा

  • Shadu clay Ganapati workshop । 🌿 POP मूर्तींना पर्याय!, शाडू मातीपासून गणपती

    Shadu clay Ganapati workshop

    Shadu clay Ganapati workshop : चंद्रपूर 22 ऑगस्ट – चंद्रपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील 26 शाळांमधील सुमारे 2000 विद्यार्थी या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणपती बनविण्याच्या कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, पारंपरिक कला जोपासणे आणि सण हरित पद्धतीने साजरा करण्याचा संदेश देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

    गणेश मूर्ती विसर्जनासाठी मनपाने तयार केले २५ कृत्रिम तलाव

    शाडू मातीच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक फायदे

    विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून आकर्षक व कलात्मक गणेशमूर्ती तयार केल्या. या कार्यशाळेतून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तींच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम’ तसेच ‘शाडू मातीच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक फायदे’ याबाबत माहिती देण्यात आली.

    हा उपक्रम महानगरपालिकेचे आयुक्त  विपिन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षणाधिकारी श्री. नागेश नीट यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात पार पडला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकवर्गाचा सहभाग आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

    महानगरपालिकेतर्फे भविष्यातही अशा प्रकारच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यशाळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती घडवून आणली जाणार आहे.

  • Maharashtra M-Sand Policy । जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांचे आवाहन – नवउद्योजकांनी घ्यावा एम-सॅण्ड प्रकल्पाचा लाभ

    Maharashtra M-Sand Policy

    Maharashtra M-Sand Policy : चंद्रपूर, दि.11 :  वाढत्या शहरीकरणामुळे आणि पायाभूमत सुविधांच्या विकासामुळे वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नैसर्गिक वाळू ही मुख्यत्वेकरून नद्यांमधून मिळते, परंतु यामुळे नद्यांच्या पर्यावरणीय समतोलावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने कृत्रिम वाळू (एम-सँड) या पर्यायाचा अवलंब करत एक शाश्वत, पर्यावरणपूरक कृत्रिम वाळू धोरण तयार केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पहिल्या 50 अर्जदारांना याचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांनी, नवउद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले.

               जिल्हा खनीकर्म विभागाच्या पुढाकारातून नियोजन भवन येथे कृत्रिम वाळू धोरणावर कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे बोलत होते. यावेळी जिल्हा खनीकर्म अधिकारी रोहन ठवरे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक ऋतुराज सूर्य, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उमाशंकर बहादुरे यांची उपस्थिती होती.

    प्रियकराने प्रेयसीचे खाजगी व्हिडीओ इंस्टाग्राम वर केले शेअर

                   यावेळी जिल्हा खनीकर्म अधिकारी रोहन ठवरे यांनी, कृत्रिम वाळू (एम-सॅण्ड) उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने धोरण जाहीर केले आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व नागरिकांसाठी प्रक्रिया सुलभ व्हावी, म्हणून महसूल व वनविभागाने परवानगी मिळविण्याची स्पष्ट कार्यपद्धती जाहीर केली असल्याचे सांगितले, तर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक ऋतुराज सूर्य यांनी, शासन, महामंडळ किंवा खासगी क्षेत्राकडे उपलब्ध असलेल्या, मंजूर झालेल्या जमिनीवर तसेच पूर्वी मंजूर असलेल्या खाणपट्ट्या मधून इच्छुक व्यक्ती, संस्था, कंपनी किंवा युनिट मालक अर्ज करू शकतात. अर्जदार अवैध गौण खनिज उत्खनन किंवा वाहतूक प्रकरणात दोषी असल्यास त्यास अर्ज करता येणार नाही. artificial sand promotion

    ‘महाखनिज ऑनलाइन संगणक प्रणालीवर जिल्हानिहाय ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी सातबारा उतारा किंवा जमीन मिळकतीचे कागद (जमीन खासगी असेल तर), आधारकार्ड व पॅनकार्ड, आवश्यक अर्ज फी ची पावती, महाराष्ट्र प्रदूक्षण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र, उद्योग आधार नोंदणी अथवा जिल्हा उद्योग केंद्राचे नोंदणी प्रमाणपत्र, व्यापारी परवाना (महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन कायदा 2013, नियम 71अन्वये), प्रकल्प स्थळी व परिसरातील वापरासाठी संबंधित प्राधिकरणाची मंजुरी किंवा ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगितले.

    प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उमाशंकर बहादुरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हाभरातून उपस्थित उद्योजक, नवउद्योजकांनी उपस्थित केलेल्या प्रश्न, शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यशाळेचे संचालन अजय मेकलवार यांनी केले. आभार खेलचंद वनकर यांनी मानले. sustainable sand alternatives

    अशी राहील प्रक्रिया : 

                अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी व संबंधित विभागांकडून प्रस्तावाची छाननी होईल. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राज्य शासनाची अंतिम योग्य किंवा अयोग्यतेची मान्यता मिळेल, शासनमान्यता मिळाल्यानंतर सर्व परवानग्या पूर्ण झाल्या असेल, तर सहा महिन्यांच्या आत प्रत्यक्ष एम-सॅण्ड युनिट सुरू करणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील नोडल अधिकारी असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया पार पडेल. जिल्ह्यातील पहिल्या 50 प्रकल्पांना ‘महाखनिज प्रणालीवर अर्ज सादर करून महसूल व उद्योग विभागाच्या सवलती लागू करू शकतात. सर्व प्रकारची मंजुरी व परवानग्या प्राप्त झाल्यानंतरच एम-सॅण्ड युनिट कार्यान्वित करता येईल. सुरुवातीला Consent to Operate’ परवानगी घ्यावी लागणार आहे. Maharashtra M-Sand Policy

    Q1: Maharashtra M-Sand Policy म्हणजे काय?

    A: महाराष्ट्र सरकारने वाळू उत्खननामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान कमी करण्यासाठी कृत्रिम वाळू (एम-सॅण्ड) उत्पादनास प्रोत्साहन देणारे शाश्वत धोरण जाहीर केले आहे.

    Q2: या धोरणाचा लाभ कोणाला मिळू शकतो?

    A: जिल्ह्यातील पहिल्या 50 पात्र अर्जदारांना शासनाच्या सवलती, सबसिडी आणि जलद मंजुरीचा लाभ मिळेल.

    Q3: सबसिडी किती मिळते?

    A: शासनाकडून ₹200 प्रति ब्रास दराने सबसिडी दिली जाईल.

    Q4: अर्ज कुठे करावा लागेल?

    A: अर्ज महाखनिज ऑनलाइन संगणक प्रणाली (Mahakhanij Portal) वर जिल्हानिहाय करावा लागतो.

    Q5: कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?

    A: सातबारा उतारा/जमीन कागदपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड, अर्ज फीची पावती, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र, उद्योग आधार/जिल्हा उद्योग केंद्र नोंदणी, व्यापारी परवाना, आणि आवश्यक मंजुरी/ना-हरकत प्रमाणपत्र.
  • One day workshop : शिक्षक, संशोधक व विद्यार्थ्यांसाठी चंद्रपुरात एकदिवसीय कार्यशाळा

    One day workshop : शिक्षक, संशोधक व विद्यार्थ्यांसाठी चंद्रपुरात एकदिवसीय कार्यशाळा

    One day workshop गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार नाईट कॉलेज चंद्रपूर, सरदार पटेल कॉलेज चंद्रपूर, राजीव गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई आणि असोसिएशन ऑफ ऑल कॉम्प्युटर सायन्स टीचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

    One day workshop जटपुरा गेटजवळील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात ही कार्यशाळा 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.

    पालकमंत्री मुनगंटीवार यांची अशीही गुरुदक्षिणा


    डॉ. प्रशांत बोकारे (कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), डॉ. अजय कुशवाह (नोएडा), कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. मा.राजेश्वर सुरावार (श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर) यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा होणार आहे. डॉ. पी. एम. काटकर (प्राचार्य, सरदार पटेल कॉलेज, चंद्रपूर) आणि संतोष शिंदे (प्रभारी प्राचार्य, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार नाईट कॉलेज चंद्रपूर) हे कार्यशाळेचे प्रमुख आयोजक आहेत.

    या कार्यशाळेत तीन सत्र आयोजित करण्यात येणार आहे ज्यामध्ये नवीन संशोधन पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि वाङ्मय चौर्य होऊ न देण्याकरिता उपाययोजना यावर मार्गदर्शन डॉ. अजय कुशवाहा, श्री. जयंत बेलवाडी आणि डॉ. सौम्या राणी करणार आहेत.

    आता या कर्मचाऱ्यांना मिळणार 10 हजार पेंशन, बघा व्हिडीओ


    कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश पी. इंगोले (केंद्र संचालक, एसएनडीटी, बल्लारपूर), डॉ. श्रीराम कावळे (प्रभारी कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), डॉ. अनिल बोरगमवार (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय प्रतिष्ठान), डॉ. आभा खंडेलवाल (संस्थापक असोसिएशन ऑफ ऑल कॉम्प्युटर सायन्स टीचर्स, नागपूर), डॉ. दिनेश गभणे (प्राचार्य राजीव गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई) आदी उपस्थित राहणार आहेत.


    आयोजित कार्यशाळेत आपण नोंदणी करावी असे स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालय चंद्रपूर यांनी सर्व शिक्षक, संशोधक व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. कार्यशाळेत ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी https://tinyurl.com/IRMPPT2K24 या लिंक वापर करावा.