Tag: कांग्रेस

  • BJP political stunt water supply । अमृत योजना अपूर्ण, भाजपचा नवा शो सुरु – काँग्रेसचा सडेतोड हल्लाबोल!

    BJP political stunt water supply

    BJP political stunt water supply : चंद्रपूर | केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून, चंद्रपूर महापालिकेत देखील त्याच पक्षाचे महापौर होते. त्यांच्या कार्यकाळात अमृत पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. मात्र या योजनेची अंमलबजावणी ढिसाळ झाली असून, पावसाळ्याचे कारण पुढे करून भाजपचे आमदार आणि महानगराध्यक्ष आता अमृत योजनेचे काम तात्पुरते थांबवण्यासाठी निवेदन देत आहेत, यासारखे दुर्दैव नाही, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी  केली आहे. BJP failure in urban development

    विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू, महावितरणचा हलगर्जीपणा

    चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २०१७ मध्ये अमृत पाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश देण्यात आला होता. २०१९ पर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आज 8 वर्षे लोटून देखील अनेक भागांमध्ये पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे. घराघरांत पाणी पोहोचलेले नाही. जलमापकांची व्यवस्था कोलमडली आहे. दुसरीकडे, शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम करून ते तस्सेच सोडल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.सत्ताधारी भाजपने कंत्राटदारांशी संगनमत करून अमृत योजनेचे काम उशिरा, हलगर्जीपणे आणि बेफिकिरीने केले. काम अपूर्ण असूनही योजनेची तारीफ केली जात आहे. मात्र, त्यांना जनतेच्या तहानेची जाणीव नाही,” असा हल्लाबोल रितेश तिवारी यांनी केला. AMRUT scheme implementation issues

    आमदार अपक्ष असताना फक्त घोषणा आणि आता


    चंद्रपूरचे आमदार अपक्ष असताना मोठमोठ्या घोषणा करीत होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता तेच काम लांबणीवर टाकण्यात रस दाखवत आहेत. भाजप मनपा प्रशासकांच्या माध्यमातून स्वतःची कामे करून घेत असून, नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

    भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार, भाजपच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी सुरू असलेले काम तात्पुरते थांबवण्याची मागणी केली आहे. भाजपने यासाठी रस्त्यांची खराब अवस्था आणि पावसामुळे होणाऱ्या अडचणीचे कारण दिले आहे.  हे निव्वळ राजकीय स्टंट असून अपयश झाकण्यासाठी भाजप हे नाट्य रचत आहे. ज्यांच्या सत्ताकाळात ही योजना सुरू झाली आणि कामे रखडली, त्याच भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आता काम थांबवावे लागते, यासारखे दुर्दैव नाही.

    प्रसिद्धीसाठी निवेदन

    चंद्रपूर शहरात अमृत योजनेमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जलवाहिनी आणि मलनिस्सारणाच्या कामांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. तरीही भाजपचे नेते केवळ निवेदन देत आहेत, हे केवळ प्रसिद्धीसाठी नौटंकी करीत असल्याचा आरोप रितेश तिवारी यांनी केला आहे. यापुढे नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार झाला तर काँग्रेस आंदोलन करण्यास मागेपुढे बघणार नाही, असा इशाराही रितेश तिवारी यांनी दिला आहे.

  • congress protest against BJP farmer policy । ३ जून रोजी कांग्रेस पक्षातर्फे “शेतकरी आत्मसम्मान पदयात्रा व शेतकरी मेळावा’

    congress protest against BJP farmer policy

    congress protest against BJP farmer policy : चंद्रपूर: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस पक्षाने आर्णी येथे ‘शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी मेळाव्या’ चे आयोजन केले आहे. येत्या मंगळवार, दिनांक ३ जून २०२५ रोजी हा कार्यक्रम संपन्न होणार असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पदयात्रा व मेळाव्याला चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी केले आहे. harshvardhan sapkal congress padayatra

    भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर काँग्रेसचा हल्लाबोल

    काँग्रेस पक्षाने भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची आणि शेतमालाला हमीभाव देण्याची घोषणा केली होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी तर दूरच, खत, बियाणे, औषधांचे भाव बेसुमार वाढवले. BJP government’s broken promises to farmers

    आठवणीतले बाळूभाऊ, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

    तसेच, बोगस खते, बियाणे, औषधे आणि तणनाशके शेतकऱ्यास विक्री करणाऱ्या कंपन्यांना अटकाव केला नाही. पिकविम्यातही बेईमानी केली. गेल्या १०-११ वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारने शेतकरी विरोधी धोरणांचा सपाटा लावला असून, शेतीमालावर गरज नसताना निर्यातबंदी-आणि आयात वाढवून शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अर्थसंकल्पातही शेतीवरील खर्चात कपात केल्याने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कंगाल करून सोडल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

    प्रमुख मागण्या

    शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, सरसकट पिकविमा, शेतमालाला हमीभाव, शेतीला मोफत वीज यांसह इतर मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने या शेतकरी पदयात्रा व मेळाव्याचे आयोजन केले आहे.

    ‘दाभडी’तूनच पदयात्रेचे कारण

    ही पदयात्रा दाभडी येथूनच सुरू होण्यामागे एक विशेष कारण आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील दाभडी या गावी तत्कालीन भाजपचे पंतप्रधान पदाचे दावेदार नरेंद्र मोदींनी २० मार्च २०१४ रोजी ‘चाय पे चर्चा’ नावाने एक स्वप्नरंजित सोहळा घेतला होता. काँग्रेसच्या मते, याच दिवशी शेतकऱ्यांच्या मरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली, हा शेतकऱ्यांच्या आयुष्यातील काळा दिवस होय.

    मोदींनी या ठिकाणी शेतकऱ्यांना भरमसाठ खोटी आश्वासने दिली होती, जी देशाच्या इतिहासात ‘ऐतिहासिक लबाडी’ म्हणून कोरली गेली आहे. या फसवेगिरीवर त्यावेळी भोळ्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि २०१४ ला भाजपचे सरकार स्थापन झाले. देशभरातील शेतकऱ्यांची फसवणूक करून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. पहिल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. आपली फसगत झाली हे शेतकऱ्यांच्या लक्षात आले, परंतु २०१९ ची निवडणूक भाजपाने पुलवामा सैनिक हत्याकांडाची भावनिक चाल आखून जिंकली.

    आज या आश्वासनांना सुमारे अकरा वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. या कालावधीत शेतकऱ्यांची अवस्था मरणाहून वाईट झाली आहे. म्हणूनच, याच दाभडीतून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वात ‘शेतकऱ्यांची आत्मसन्मान पदयात्रा’ काढण्याचा काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे.

    कार्यक्रमाचे स्वरूप आणि उपस्थित मान्यवर

    मंगळवार, दिनांक ३ जून २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता ही शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा ओंकारेश्वर मंदिर दाभडी, ता. आर्णी येथून सुरू होईल आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी येथे पदयात्रेचे रूपांतर शेतकरी मेळाव्यात होईल.

    या पदयात्रेत खासदार प्रणितीताई शिंदे, माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, खासदार नामदेव किरसान, खासदार प्रशांत पडोळे हे सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकरावजी ठाकरे व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली. congress rally for farmers rights 2025

    या पदयात्रा व मेळाव्याला शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन या विभागाच्या खासदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी केले आहे.

  • सत्तेत येताच जुनी पेन्शन योजना लागू करणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जूनी पेन्शन योजना लागू करावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ह्या मागणीच्या संदर्भाने आम्ही पुर्णतः सकारात्मक असुन यासाठी माझा पाठींबा आहे. काॅंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून स्पष्ट भुमिका जाहीर केली आहे.

     

    आगामी काळात राज्यात आमची सत्ता येताच प्राधान्याने जुनी पेन्शन योजना लागू करणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधीपक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेच्या वतीने एल्गार मेळाव्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

     

    यावेळी मंचावर शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले, जुनी पेंशन संघटना राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, राज्य सल्लागार सुनिल दूधे, राज्य महीला उपाध्यक्ष मनिषा मडावी, विभागीय अध्यक्ष अनिल वाकडे, विभागीय उपाध्यक्ष दुशांत निमकर, विपीन धाबेकर, गुरुदेव नवघडे, मनीष वैरागडे, राकेश शेंडे, गुलाब लाडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

     

    यावेळी पुढे बोलतांना विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, विद्यमान शिंदे-भाजप सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. या सरकारने घेतलेले अनेक निर्णय हे चुकीचे होते. कंत्राटी नोकरभरतीचा शासन निर्णय काढून त्याचे कंत्राट ज्या ९ कंपन्यांना देण्यात आले होते. त्या कंपन्या सत्तेतील लोकांच्या होत्या. ह्या कंत्राटी नोकरभरतीला मी तीव्र विरोध केला आणि मुद्दा शेवटपर्यंत लावून धरला आणि तो निर्णय मागे घ्यायला सरकारला भाग पाडला. मात्र आगामी निवडणुकांमध्ये विजय हा आमचाच असून सत्तेत येताच प्राधान्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल. असे वचनही या प्रसंगी त्यांनी दिले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्निग्धा कांबळे यांनी केले. तर सुत्रसंचलन डांगे यांनी केले.

     

    महिला कर्मचाऱ्यांनी बांधल्या राख्या…

    मेळाव्यात राज्य जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना राख्या बांधून ओवाळणीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची विनंती केली.

    मी तुमच्या संघर्षात पुढे राहील…

    जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी आपण जे काही प्रयत्न कराल त्या संघर्षात मी खंबीर पणे तुमच्या पाठीशी उभा राहिल. असे अभिवचन यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना दिले.