Tag: इंडियन आर्मी

  • Tiranga Rally । ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर देशप्रेमाचा महासागर — चंद्रपूरमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन!

    Tiranga Rally

    Tiranga Rally : चंद्रपूर – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर (indian army) भारतीय सैन्याच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाला मानवंदना देण्यासाठी नॅशनल सेक्युटीसाठी नागरिक या उपक्रमा अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या संयोजनातून चंद्रपूर शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शनिवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ होणार असून, देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन आमदार जोरगेवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून केले. Indian army bravery celebration rally

    त्या नरभक्षक वाघिणीचा बछडा अखेर जेरबंद

       सदर पत्रकार परिषदेला ओबीसी नेते अशोक जिवतोडे, दशरथसिंह ठाकूर, तुषार सोम, माजी महापौर अंजली घोटेकर, प्रकाश देवतळे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, सुभाष कासनगोट्टूवार, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदींची उपस्थिती होती.

    लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सामील व्हा

    पत्रकार परिषदेत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला ठोस आणि चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईमध्ये पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, संपूर्ण देशवासीयांच्या मनात गर्व आणि अभिमानाची लहर उसळली आहे. या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि लष्कराच्या शौर्याला मानाचा मुजरा करणाऱ्या तिरंगा रॅलीचे आयोजन चंद्रपूरमध्ये (chandrapur) करण्यात आले आहे.

    ही रॅली केवळ एक मिरवणूक न राहता, ती देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारतीय लष्कराविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे प्रभावी माध्यम ठरणार आहे. प्रत्येकाच्या हातात तिरंगा आणि मनात मातृभूमीबद्दलचा अभिमान असावा, हीच या रॅलीमागची भावना असल्याचे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.

    Powered by myUpchar

    रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होईल. यानंतर ही रॅली गांधी चौक, जटपूरा गेट मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात परत येईल आणि तेथे रॅलीचा समारोप करण्यात येईल. रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणांनी शहरात देशप्रेमाचे वातावरण निर्माण होणार आहे. तरुणाईचा, महिला मंडळांचा, विविध शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि चंद्रपूरकर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या रॅलीला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून देईल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. या देशभक्तीपूर्ण रॅलीत सहभागी होऊन आपल्या लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी सर्व नागरिकांनी या प्रेरणादायी उपक्रमात भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

  • Kishor Jorgewar on Indian Army । देशगौरवासाठी पक्ष, धर्म, भाषा, जात विसरून एकत्र येणे हेच भारतीयत्वाचे खरे दर्शन – आ. किशोर जोरगेवार

    Kishor Jorgewar on Indian Army

    Kishor Jorgewar on Indian Army : चंद्रपूर – भारतीय सैन्य हे केवळ रणांगणावर लढणारे शूर योद्धे नाहीत, तर प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणेचा स्रोत आहेत. त्यांचे शौर्य, त्यांची निःस्वार्थ सेवा आणि मातृभूमीबद्दलची निष्ठा हीच खरी देशभक्ती आहे. १४० कोटी भारतीयांचा पाठिंबा सैन्याचा आत्मविश्वास वाढवतो. आज आपण पक्ष, धर्म, भाषा, जात विसरून एकत्र आलो आहोत, हेच भारतीयत्वाचे खरे दर्शन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    चंद्रपुरात होणार महापंचायत

    चंद्रपुरात शौर्य उत्सव

    भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर वंदन भारतीय सैन्याच्या शौर्याला या राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत भारतीय सैन्याला सामूहिक वंदन केले. यावेळी आमदार जोरगेवार बोलत होते. Kishor Jorgewar Indian Army salute Chandrapur

    कार्यक्रमास मनीष महराज, पास्टर बिपीन, जामा मस्जिद चे मौलाना इमाम दिलशाद रजा, माजी सैनिक अश्विन दूर्गे, रोषण अलोणे, ओबीसी नेते अशोकराव जीवतोडे, कॉंगेसचे माजी नगर सेवक नंदुजी नागरकर, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष बंडूजी हजारे, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, दशरथसिंह ठाकूर, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझले, तुषार सोम, प्रकाश देवतळे, सुभाष कसान कासनगोट्टूवार, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या चारुशीला बारसागडे, भाजपचे माजी नगर सेवक राहुल घोटेकर, नामदेव डाहुले, बंटी घाटे, गुरुदेव सेवा मंडळाचे दादाजी नंदनवार  मिलिंदजी गंपावार, भाजपचे माजी नगर सेवक राहुल घोटेकर,  पंडित मथुराप्रसाद पांडे, नळे, माजी सैनिक राजेंद्र भोयर, माजी सैनिक गोविंदा डोमकावळे, माजी सैनिक धोंडुबा सपाट, माजी सैनिक मदन देशकर, माजी सैनिक अरुण मालेकर, मधुसूदन रुंगठा, संजय बोरघाटे, वाणी राव, अनिल समर्थ आदींची मंचावर उपस्थिती होती.

    भारतीय सैन्य हि आपली सुरक्षा

    यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, आज आपण केवळ एक भावना, एक श्रद्धा आणि एक अभिमानाने भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणारे, कठीण हवामानातही ताठ मानेने उभे असलेले, प्रत्येक संकटात देशवासीयांचा जीव मोलाचा मानणारे भारतीय जवान आपल्या देशाचे खरे हिरो आहेत. भारतीय सेना ही केवळ एक लष्करी शक्ती नाही, ती आपली अस्मिता आहे, आपली सुरक्षा आहे आणि आपले अभिमानाचे प्रतीक आहे. Chandrapur citizens salute Indian soldiers

    Indian Army honor ceremony Chandrapur

    आजच्या कार्यक्रमात सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय लोक एकत्र आले आहेत. हाच खरा भारत आहे. विविधतेत एकता आणि राष्ट्रप्रेम हाच आपल्या संस्कृतीचा पाया असून, हाच देशाचा गौरव आहे. देशासाठी लढणारा जवान जात, धर्म, पक्ष, प्रांत याच्या पलीकडे जातो. त्याला फक्त भारत माता दिसते. भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळेच आपण शहरात आणि गावात सुरक्षित आहोत. त्यांच्या बलिदानाची परतफेड कधीच शक्य नाही, पण त्यांच्या कार्याला अभिवादन करणे हे आपले कर्तव्य आहे, सैन्याने केवळ सीमारेषा सुरक्षित ठेवल्या नाहीत, तर आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. Chandrapur patriotic event honoring soldiers

    त्यांच्या योगदानाची आठवण फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झाली तर ती पुरेशी नाही. ही कृतज्ञता आपल्याला दररोज जगायला हवी. असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विविध धर्मीय आणि सर्व पक्षीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अमजद खान यांनी आभार  प्रदर्शन केले तर प्रज्ञा जीवनकर यांनीसूत्र संचलन केले.