Tag: अवकाळी पाऊस

  • unseasonal rain Nagbhid paddy loss । निसर्गाचा कोप: नागभिडमध्ये हाहाकार!

    unseasonal rain Nagbhid paddy loss

    unseasonal rain Nagbhid paddy loss : चंद्रपूर – १ मे गुरूवारी रात्री आठ वाजताचे सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपिटीने नागभिड तालुक्यातील चिंधीचक, चिंधीमाल, तळोधी (बा), उश्राळमेंढा परिसरात उन्हाळी धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन हातात येणारे पिकच अस्मानी संकटाने जमिनदोस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाचे तात्काळ उन्हाळी धानपिकांच्या नुकसानी पंचनामे करून भरपाई देण्याची अशी मागणी उन्हाळी धान शेतकऱ्यांनी केली आहे. compensation for paddy damage in Nagbhid farmers


    चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, मुल, सावली, गोंडपिपरी व पोंभूर्णा तालुक्यात धानपिकांची लावगड केली जाते. यावेळी खरीप हंगामात प्रचंड तुट आल्यानंतर शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकांकडे लक्ष केंद्री केले होते. नागभिड, सिंदेवाही, तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी बारीक व ठोकळ धानपिकांची लागवड केली होती. रब्बी हंगामात म्हणजे उन्हाळी धानपिकाची नागभिड तालुक्यात यावेळी जानेवारी फरवरी महिण्यात लागवड करण्यात आली. hail damage to summer paddy in Nagbhid

    इरई नदी खरंच वाचणार का?

    चार महिण्याचा कालावधी होत असताना उन्हाळी धानपिक हातात येण्याची आशा होती, परंतु अस्मानिक संकटाने शेतकऱ्यांचा घात केला आहे. ऐन तोंडचा घासच गुरूवारी रात्री आठ साडेआठच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने हिरावला आहे. चिंधीचक व तळोधी बाळापूर परिसरातील उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, आकारपूर, सावर्ला शेतशिवारात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. सोबतच गारपिटही मोठ्या प्रमाणात झाल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धान काढणीला आला असताना बोराच्या आकाराच्या पडलेल्या गारपिटीने धानाचे कबंरडले मोडले आहे. धान मोठ्या प्रमाणात खाली झडले आहे. farmer distress due to crop damage Maharashtra

    पिक खाली लोळले आहे. तब्बल अर्धा ते पाऊन तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. सोबत गारपिठही झाल्याने शेतकरी भयभित झाला आहे. मागील खरीप हंगामात किडींमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. पिकांत प्रंचड घट आली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांच्या संसाराचे बजेट कोलमडले. त्यानंतर शेतकऱ्यांनी खचून न जाता उन्हाळी धानपिकाची लागवड करण्याची तयारी सुरू केली. जानेवारी ते फरवरी महिण्यात नागभिड तालुक्यात सिंचन व्यवस्था असलेल्या शेकऱ्यांनी बारीक ठोकळ हलक्या जातीच्या उन्हाळी धानपिकाची लागवड केली.

    लागवडीला साडेतिन महिण्याचा कालावधीत होत असताना शेतकऱ्यांनी पिकाची निगा राखली. पंधरवाड्यात हातात पिक येण्याची शक्यता असतानाच काल गुरूवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने उन्हाळी धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 70 ते 80 टक्के उन्हाळी धानपिकांचे गारपिटीने जमिनदोस्त झाले आहे. तसेच काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. या परिसरात अवकाळी पाऊस येत असल्याने उरले सुरले पिकही हातातून जाण्याची भिती शेतकऱ्यांनी वर्तविलीआहे. compensation for paddy damage in Nagbhid farmers

    उन्हाळी धानपिकाच्या लागवडीला होतो दुप्पटीने खर्च

    खरीप हंगामात दरवर्षीच शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडत आहे. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाने शेतकरी पुरता कमकुवत होत आहे. अंगावर कर्जाचे ओझे चढत आहे. कर्ज फेडणे शेतकऱ्यांना डोईजड जात आहे. अशाही परिस्थीतमध्ये सिंचन सुविधा असलेले शेतकरी उन्हाळी धानिकाची लागवड  करीत आहेत. खरीपापेक्षा उन्हाळी धानपिकांमध्ये जास्त उत्पादनाची आशा असते. परंतु पिकाच्या लागवडीकरीता दुप्पटीने खर्च होतो. नागंरटी, चिखलटी, रोवणी, पऱ्हे हंगाम, खत, निंदा, धानपिक कापणी, मळणी तसेच किटकनाशके आदींवर होणारा खर्च एकत्र केला तर दुप्पटीने उन्हाळी धानपिकावर खर्च झालेला आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी पिकाची लागवड करण्यास कर्जाची सुविधा नाही. त्यामुळे  कर्ज किंवा उसणवारे घेऊन पैशाची जमवाजमव करून खर्च करावा लागतो आहे. काही शेतकरी त्यांच्याकडे असलेले दागिने गहाण ठेवणू उन्हाळी पिकांची लागवड करतात.  agricultural news Nagbhid Maharashtra

    उन्हाळी धान उत्पादकांना तात्काळ नुकसान भरपाई द्या :

    चिंधीचक व चिंधीमाल शेतशिवारात झालेलया वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन हातात येणारा शेतकऱ्याच्या तोंडातील घासच अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे झालेले नुकसान कधीही भरून निघणारी नाही. गारपिटीमुळे सुमारे 70 ते 80 टक्के धान जमिनी वरती झडलेले आहेत. उन्हाळी धानपिक लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ मदतीची गरज आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनानी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चिंधीचक ग्राम पंचायतीचे उपसरपंच प्रदीप समर्थ यांनी केली आहे.

  • अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत, तात्काळ नुकसान भरपाई द्या – कांग्रेसचे निवेदन

    अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत, तात्काळ नुकसान भरपाई द्या – कांग्रेसचे निवेदन

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या २७ नोव्हेंबर २३ रोजी आकस्मिक आवकाळी पाऊस पडला यात मुल – सावली तालुक्यातील धान तूर कापूस पिकांची प खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.यामुळे राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी धान कापून तूर धान्य आदी पीकाना अवकाळी पावसाच्या फटक्या बाबत त्वरित सर्वेक्षण करुन माहिती घेण्यासाठी महसूल विभागात प्रत्यक्ष मोका चौकशी करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शेतकऱ्यांना सोबत घेऊन करण्यात यावे. यात धान पीक तूर कापूस पीक याचा प्रामुख्याने समावेश करावा अधिकाधिक धान पीक उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे, अवकाळी पावसाचा फटका धान पिकाला जास्त बसला आहे.

     

    आता धान पीक कापणी केले असून आलेल्या पाण्याने धा सरदड्या जमिनीला चीपकुन गेल्या आहेत. अजूनही कापणी होताच आहे. काही भागात मोठ्या प्रमाणात कापणी झाली आहे, धान बांधण्यापूर्वी धान शेतातच सुकायला ठेवल्या जातो आता अचाणक आलेल्या अवकाळी पावसाने कापलेला आणि उभा असलेल्या धान पीकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.

     

    त्यामुळे धान कापूस तूर इतर पिके कडधान्य पीक नुकसानच्या धर्तीवर धान पीक नुकसानीची मोका पाहणी करून नुकसानग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत देण्यात यावी.करीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने. सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात मान. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री यांना मा. तहसीलदार यांचे मार्फत आज दि.२८/१२/२०२३ रोजी निवेदन देण्यात आले. आपला मुल तालुका हा केवळ एका धान पीक पट्टा म्हणून परिचित आहे,बहुतांश शेती वर पाण्यावरची असल्याने येतील शेतकरी कसाबसा आपल्या कुटुम्बाचा उदरनिर्वाह करीत असतो. त्यात नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुबाला साभाळणे अडचणीचे झाले आहे. मुलाबाळांचे शिक्षण, लग्न कसे करावे.

     

    पहिलेच कर्ज बाजारी असताना पुन्हा कुठून कर्ज घ्यावे या विवंचनेत सापडले आहेत. शासनाने या सर्व बाबींचा विचार करून तातडीने धान पीक नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे तयार करावे.आणि शासनाकडून शेतक-याना नुकसान लवकारत लवकर भरपाई मिळवून दयावी. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांनी चालू वर्ष २०२४ चा पीक विमा काढला असून कंपनीने विम्याचे पैसे जमा केले आहे. तेव्हा विमा कंपनीला शासनाने आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकरी यांचे त्वरित पाहणी व पंचनामे करून तात्काळ तात्काळ विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी तालुका काँग्रेसने निवेदनातून केली आहे.

     

    निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी सभापती व संचालक घनश्याम येणुरकर, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, सोसायटी संचालक विवेक मुत्यलवार, आ.भा.समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, संचालक संदीप कारमवार, मनोज ठाकरे, युवक अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, शहर उपाध्यक्ष कैलाश चलाख, महिला शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, सचिव शामला बेलसरे, कोषाध्यक्ष राधिका बुक्कवार, सदस्या समता बंसोड, अन्वर शेख, नंदकिशोर मडावी, औद्योगिक काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्तात्रय समर्थ, सुशी सरपंच अनिल सोनुले , संचालक हसन वाढई, मनोज, यांचेसह कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्त व शेतकरी बांधव उपस्थित होते.

     

    काँग्रेसने निवेदन देताच शासनाचे पंचनामे करण्याचे आदेश

    मुल तालुका कांग्रेस शेतकऱ्यांच्या अवकाळी आकस्मिक पाऊसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी व विमाचे पैसेही त्वरित मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांना, तहसीलदार यांचे मार्फतिने निवेदन देताच महाराष्ट्र शासनाने लगेच अवेळी पाऊसाने नुकसान झालेल्या शेतीपिकाचे पंचनामे करण्याबाबतचे आदेश क्र.सी एल एस-२०२३/प्रं. क्र.२६०/म.३ दिनांक २८/११/२०२३ अन्वये तात्काळ आदेश उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केले आहे.

  • आकस्मिक पाऊसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    आकस्मिक पाऊसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    News34 chandrapur

    मुल – मुल तालुक्यात एकमेव धानाचे उत्पन्न शेतकरी घेत असून सिंचन सुविधे अभावी केवळ धान हेच एकमेव उत्पन्न शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. एका उत्पन्नाच्या भरोशावर मुल सावली तालुक्यातील शेतकरी बांधव विसंबून आहेत असे असताना ऐन धान फसलची कापनी करण्यात आली असून धानाची कापणी झाल्यानंतर धानाचा दाना पूर्ण वाळविण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो परंतु कापणी होऊन चार – पाच दिवस झाले आहेत.

     

    तसेच अनेक शेतकऱ्यांची कापणी अजूनही सुरू आहे. असे असताना आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९-०० वाजता आकस्मिक पाऊस आल्याने मुल चीमढा, बोरचांदली, राजगड, फिस्कुटी, विरई, खेडी, टेकाडी, गडीसुर्ला, जूनासूर्ला, नवेगाव (भू) बेंबाळ, नांदगाव, भेजगावं,हळदी, चीचाला, टाडाळा, जा,चीरोली, कांतापेठ, मारोडा, भादूर्णी, राजोली, चिखली, डोंगरगाव, यांचेसह मुल व सावली तालुक्यातील अनेक गावातील कापलेले धानाच्या सरड्या पूर्ण ओल्या झाल्या असून शेतकऱ्यांच्या हाती आलेले उत्पन्न पाऊसामुळे खराब झाल्याने असंख्य शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

     

    मुल- सावली तालुक्यातील काही शेतकरी मजुरांच्या हाताने धानाची कापणी केली तर काही शेतकऱ्यांनी खर्चाचा बजेट लक्षात घेता हार्वेस्टर मशीन लाऊन धान कापणी व चुरणी एकसाथ केली असून शेकडो क्विनटल धान वाळत ठेवले असून पाण्यात भिजल्याने अतोनात नुकसान झाली आहे. तालुक्यातील शेतकरी बांधव आकस्मिक येत असलेल्या पाऊसामुळे एकही पोता धान घरी आणते की काय ? असा प्रश्न अनेक शेतकरी बांधवांना पडला असून गेल्या दोन वर्षापूरवी अशीच परिस्थिती आली होती. त्यावेळेला महावीकास आघाडीचे शासन असताना कृषी मंत्री श्री. दादा भुसे, आमदार तथा पालक मंत्री श्री. विजय वडेट्टीवार, सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष शिंह रावत, चंद्रपूर जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी प्रत्यक्ष मुल – सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी केली होती. तेव्हा शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले होते तशीच परिस्थिती यावषी सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधव हैराण झाले आहेत.

     

    दरवर्षीच काही ना काही संकट शेतकऱ्यांवर येतच असतात. यावर्षी सुरवातीलाच धांनाला २८०० रुपये पर्यंतचा भाव मिळत आहे. परंतु आता आलेल्या पाण्यामुळे धानाची पोत ओली झाली तर मात्र कोणताही व्यापारी ओले झालेले धान घेणार नाही. कारण तांदूळ लाल होतात. म्हणजे आजच्या स्थितीत शेतकऱ्यांची स्थिती हाती उत्पन्न येऊनही कपाळावर हात ठेऊन रडत बसण्याची पाळी शेतकरी बांधवावर येऊन पडली आहे. हीच परिस्थिती कापूस लावलेल्या शेतकऱ्यांची आहे.

     

    कापसाचे बोंड वेचण्यााठी आली असताना अचानक आकस्मिक पाऊसाने कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. अशा प्रसंगी शासनाने, मा. पालक मंत्र्याने, जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी तात्काळ मुल सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर येऊन पाहणी करावी व शासनाकडे तसा अहवाल त्वरित सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा खरीप पिकाचे विमा काढला असून शासनानेच विमा कंपनीला तसे आदेश देऊन शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करायला लावावी आणि शेतकरी बांधवांना त्वरित नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मुल – सावली तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे.